चॅनेल सिरीज -श्रीवाहिनी- श्रीधर तिळवे नाईक
structure
6 T0 7 to prayers and
7 TO 7 :30 initial talk
7:30 to 8 :30 news
8 :30 to
9:30 fashion shopping kitchen
9:30 to 10 college KATTA
10 to 11 LOVE OPERA 1 love in ruia college
11 to 12 sports
12 to 1 FROM WORKPLACE
1 to 2 LOVE OPERA love in j s hall
2 to 4:30 cinema
4:30 TO 5:30 songs and poems
5 :30 to 6
interview
6 to 6:30 chauthi navta
6:30 to 7 internet
7 to 8 love in dahisar soap
8 to 9 mobaila MOBAILA
9 to 10 INTIMATE INTILIGENCE CHALHWALA KARYKARTA
ELCETRA
10 to 11
FACE TO FACE
11 to 11:30 deathbedwarun
11:30 to 12 thod spiritual
structure
6 T0 7 to prayers and
7 TO 7 :30 initial talk
wednesday
आरंभी : वॉर्निंगवजा फीलॉसॉफी : Good Warning मंडळी
आपल्या प्रज्ञेचा वास्तवाशी थेट संबंध येत नाही आपली इंद्रिये, आपला पूर्वानुभव अशा अनेक गोष्टी प्रज्ञा आणि वास्तव ह्यांच्या दरम्यान कलमडतात ज्याला आज आपण व्यक्ति म्हणतो ते अनेकदा अशा मध्येच कलमडणाऱ्या गोष्टींचे गाठोडे असते. वास्तविक व्यक्ति म्हणजे हे गाठोडे नव्हे तर ह्या गाठोड्याला बाजूला सारून त्या वास्तवाला थेट पाहणारी वा अनुभवणारी प्रज्ञा ! हे थेटपण हेच खरे साधन ! दुर्देवाने आपण ते आज गमावत चाललोय आणि संगणक, चॅनेल, इंटरनेट ह्या गोष्टी मात्र मध्येच कलमडणाऱ्या गाठोड्याला आता अनेक पटींनी मल्टीप्लाय करत ह्या थेटपणाच्या साधनालाच धोक्यात आणतायत
तेव्हा थोडक्यात काय
आमचे चॅनेल पहा ह्या न्यूज पहा
पण स्वतःचे थेटपण गमवू नका.
7:30 to 8 :30 news
आजच्या ठळक बातम्या
मिडिआ इज नॉट डेड आणि जर तो मेलेलाच असेल तर त्याने मृत्यूनंतर नरकात पोहचून त्या नरकातून हे जग चालवण्याची कोशीश चालवली आहे अशी तिखट प्रतिक्रिया पत्रकार तरुण अधू ह्यांनी दिली. "मीडिया हा विनाकारण सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करतोय वास्तविक त्याला असं सेक्सी दिसण्याची काहीही गरज नाही " असे ते म्हणाले. श्रीधर तिळवे ह्यांनी ही सर्वच घटना Semiotic किंवा Mediatic Thriller आहे आणि पत्रकारांनी प्रेक्षक उठून गेल्यावर सस्पेन्स दाखवण्याऐवजी आत्ताच काय तो सस्पेन्स दाखवावा असे आवाहन केले. हिंदुस्थानी पक्षाचे अध्यक्ष श्री नारायण ह्यांनी मी पैसे घेतले नसताना केवळ स्पेशल इफेक्टच्या सहाय्याने तसे ते घेतल्याचे दाखवून चॅनेल्सनी आपली बालबुद्धीच प्रकट केल्याचे सांगितले. ह्या घटनेमुळे भाजपचे माजी अध्यक्ष जीवदानी ह्यांनाही जीवदान मिळण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली एका रचित खोटेपणामुळे दुसऱ्या खऱ्यांचाविषयी
शंका घेणे ह्यालाच vishwasarhta विश्वसहिता धोक्यात येणे म्हणतात असं ते म्हणाले. विजयन ह्यांनी मात्र चिन्हांच्याशिवाय सत्य शोधण्याचा दुसरा कुठलाच मार्ग मानवजातीपुढे उपलब्द नसल्याने आणि चिन्हांना originality नसल्याने आयुष्याचा सरफेसपणा उघड करणाऱ्या अशा घटना भविष्यात वारंवार घडणे अटळ आहे असे सांगितले. शेवटी चिन्हे आणि भाषा बनवणारे आपणच तेव्हा सत्य आणि असत्य बनवणारेही आपणच तेव्हा भाषिक चक्रव्यूहात सापडून भाषेकडून मारले जाणे हे अटळच असे ते म्हणाले.
भाजप नेते हिरवाणी ह्यांनी बाबरी मशिद हा खरेतर कायद्याचा प्रश्न आहे वगैरे सर्व गोष्टी बकवास असल्याचे सांगितले हा खरेतर status चा हिंदूच्या status चा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या देशावर हजार वर्षे मुसलमानांनी राज्य केले होते पण ते संपले हे हिंदू कधीच सांगू शकले नाहीत ज्याप्रमाणे १५ ऑगस्ट १९४५ हा दिवस ब्रिटिशांचे राज्य संपल्याची निशाणी होता त्या प्रमाणे ६ डिसेंबर १९९२ हा दिवस हिंदुस्तानातील मुसलमानांचे हिंदुस्तानवरचे
साम्राज्य पूर्ण संपलेले आहे हे सत्य सांगणारा दिवस होता दुर्दैवाने हिंदूना त्यांच्या गोष्टी कधीही नीट बोलता येत नाहीत त्यांच्या मनात एक असते आणि ते भलतंच काहीतरी बोलत असतात. मुसलमानांना हे ऐकणे जड जाते आहे. "आम्ही काहीही करू, कुठेही करू आणि कसेही करू हा जो तेराशे वर्षांचा त्यांचा गर्व आहे तो आम्ही धुळीस मिळवला आहे. आमच्या मुर्त्या जशा फोडल्या जाऊ शकतात तशा तुमच्या मशिदीही पाडल्या जाऊ शकतात एवढे लक्ष्यात ठेवा" असा हा मेसेज होता. मुसलमानांना तो बरोबर कळाला म्हणूनच त्यांची एवढी तिखट प्रतिक्रिया त्यानंतर आली. एक मशिद पाडली तर एवढे दुःख झाले होते मग इतरांची मंदिरे पाडली तेव्हा त्यांना किती दुःख झाले असेल ह्याची थोडीशी कल्पना ह्या घटनेवरून मुस्लिमांना आली असेलच. प्रत्येक वेळेला काळ हा जणू आमचाच आहे अशा थाटात जगणाऱ्या मुसलमानांना काळ आता त्यांचा राहिलेला नाही हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्यांची प्रगती होईल असे ते म्हणाले. मुस्लीम जग एका भ्रमात जगत असून एकविसाव्या शतकात त्यांचा हा भ्रम तुटेल असे ते म्हणाले. मौलाना रिझवी ह्यांनी हिरवाणी ह्यांच्या ह्या वक्तव्याचा जाहिर निषेध करून सरकारने त्यांना अटक करावी अशी मागणी केली. नास्तिक नेते श्री चावकि ह्यांनी अस्तित्वात नसलेल्या ईश्वराच्या आधारे हे जे भांडण दोन धर्मात चालले आहे ते मानवजातीला हानीकारक आहे असे सांगितले. मानवजातीने लवकरात लवकर ईश्वर अस्तित्वात नाही हे सत्य स्विकारावे असे ते म्हणाले.
प्रिया नार्वेकर ह्यांनी "Soap
Operas सत्य अस्तित्वात नाही हेच अंतिमतः सांगत असतात. त्यामुळे अस्तित्वात नसलेली सत्ये शोधून दाखवण्यात एकता कपूर ह्यांना प्रचंड यश मिळते आहे " असे सांगितले. अभिनेते एकतर अक्कलशून्य असतात किंवा mad तरी असतात असे त्या म्हणाल्या. माणसे सत्यावर श्रद्धा ठेवतात कारण सत्यावर श्रद्धा दाखवली नाही तर आपले अस्तित्व निराधार होईल अशी भीती त्यांना वाटते असं त्या म्हणाल्या जतीन नार्वेकर ह्यांनी मात्र कलेत सत्याचे काही काम नाही असे सांगितले Twin Tower वरचा attack हा आजही सौन्दर्यपूर्ण
वाटतो असे ते म्हणाले. T. V. वर दाखवलेला हा शॉट माझ्या संपूर्ण आयुष्यात मी जेवढे शॉट पहिले त्यात Best होता. सुमंगला नार्वेकर ह्यांनी असे वाटणे हे सिनीक आहे असे सांगितले. "एखादी गोष्ट उध्वस्त होताना सुंदर दिसते " हा एक दुर्मिळ फिनॉमेना असल्याने ट्वीन टॉवरची घटना ही एकाच वेळी हृदयद्रावक व सुंदर अशी वाटते असे प्रकाश नार्वेकर म्हणाले. स्नेहल ह्यांनी मात्र त्या घटनेत सूडपूर्तीचे समाधानही काही जणांना लाभले असणार आहे सांगितले शेवटी जतीन नार्वेकर ह्यांनी Guilted Beauty- building असे ह्या घटनेला नाव घेऊन चर्चा संपवली.
प्रिया नार्वेकर ह्यांनी ह्या सर्व गोष्टीवर आपण अजूनही postmodernism च्या तावडीतून न सुटल्याचे हे लक्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली Everybody in my
generation wants to kill postmodernism but nobody knows where it's heart lies. असे त्या मराठीत म्हणाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रिया नार्वेकर व श्रीधर तिळव्यांच्यासारख्या लोकांनी खरेतर इंग्रजीतच लिहायला हवे हे लोक मराठीत का लिहतात अशी प्रतिक्रिया एका श्रोत्याने दिली त्यावर प्रिया नार्वेकर ह्यांनी मोबाईलवर बोलताना मराठीत बोलता ना असा प्रतिप्रश्न केला.
चुंबन घेतलेल्या जोडप्यावरून मुंबईत पडलेले दोन गट अधिकच जहाल झाले. चुंबनवादी लोकांनी ज्यांना स्वतःला प्रेम करता येत नाही आणि जे फक्त मनातल्या मनात मांड्या खातात अशा लोकांचा समूह म्हणजे हा उत्तरधार्मिक गट असल्याचे सांगितले त्याचे नेते सु. आ. शरीरे ह्यांनी हे सर्व मूळचे हिंसक तणावाचे मेकॅनिकल गुलाम लोक असल्याने सांगितले. ह्या गटाचे नेते श्री ज. कृ. उपाध्ये ह्यांनी रिक्तता मॅनेज न करता आलेले वियर्ड आणि चक्रम लोक म्हणजे हा ग्रुप असे भक्कमपणे सांगितले. जेष्ठ विचारसेनानी श्री. पाध्ये ह्यांनी शेवटी हृदय काय किंवा शरीर काय शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला मृत्यू अटळच तो शेवटी सगळ्यांना पुरून उरणार आहे ह्याचे भान बाळगावे आणि ते प्रत्येकाने बाळगावे असे सांगितले तर तरुण विचारसेनानी श्री दयेंद्र नाईक ह्यांनी "ह्या निमित्ताने संपूर्ण मुंबई मनमोकळेपणाने हसली " ही मुंबईकरासाठी मोठी अचीवमेंट असल्याचे सांगितले.
चंद्रदेवबाबा आणि रवीबाबा ह्यांच्यात लंबकणाऱ्या काही भक्तांनी "बाबा लोकांना व त्यांच्या भक्तीला असं vibrator मोडवर ठेवू नये " असे आव्हान केले त्यावर रवीबाबा ह्यांनी " आपण जिथे असतो त्यापेक्षा कैकपटींनी आपण कित्तेक जागी नसतो हे भक्तांनी स्वीकारून आयुष्यात पेन्डूलम असणे स्विकारावे" असे आवाहन केले.
ज्योतिषांनीही
रवीबाबांच्या म्हणण्याला पाठिंबा देऊन ज्योतिषशास्त्र हे जिथे आपण नसतो त्याचा जिथे आपण असतो त्यावर नेमका काय परिणाम होतो ते अभ्यासण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले. विखरून पडलेला वारा एका श्वासात बांधायचा अशक्य प्रयत्न करणाऱ्या ज्योतिषांना उत्तेजन देण्याऐवजी लोक त्यांच्यावर बंदी घालायचा प्रयत्न करतात हे दुःखद आहे असे हे ज्योतिषी म्हणाले.
श्रीधर तिळवे ह्यांनी आज पुन्हा एकदा Postmodernism is dead अशी घोषणा दिली.
त्यांच्या मते पहिल्या महायुद्धानंतर
हिटलरशाही, मुसलोनिशाही, स्टॅलिनशाही अश्या अनेक हुकूमशाह्या सत्तेवर येऊन विज्ञानाचा प्रचंड दुरुपयोग करताना ह्या पिढीने पहिल्या. ह्याचकाळात ब्रिटिश, फ्रेंच वगैरेंची त्यांच्या कॉलोनीजमध्ये जे काही केले ते कुठल्याही हिटलरपेक्षा कमी नव्हते. म्हणजे तथाकथित लोकशाह्या ह्या स्वतःखेरीज इतर देशात हिटलरच होत्या. त्यांनी other is hell असे न मानता other is heaven but I
will create hell for it म्हणून ह्या कॉलनीजमध्ये स्वतःचे नरक निर्माण केले व ते करताना विज्ञान वापरले अमेरि केने जपानच्या सामान्य जनतेवर कसलाही विचार न करता अणुबॉम्ब टाकला कोणत्याच अर्थाने तो rational नव्हता आणि आजही अमेरिका इराक अफगाणिस्तानमध्ये
जे काही करतीये ते हुकूमशाहीच आहे.
आता अशा भयावह वातावरणात कोणता शहाणा विज्ञान व सत्ता ह्यावर विश्वास ठेवेल ? दुर्दैवाने ह्याच हुकूमशाही कालखंडात हायझेनबर्गने प्रिन्सीपल ऑफ अनसर्टनटी सांगितले आणि विज्ञान अंतिम व निश्चित असे काही सांगेल ह्यावरचा विश्वास उडाला. Empericism वर कांटने पहिला घाला घातलाच होता आता हा दुसरा घाला होता पहिल्या घालाने विज्ञानावरची श्रद्धा घालवली व आधुनिकवाद जन्माला घातला तर दुसऱ्याने विज्ञानावरचा विश्वासही उडवला. विज्ञानावरची उडालेली श्रद्धा आणि त्यावेळी प्रतिसृष्टीय तंत्रज्ञानाने
निर्माण केलेल्या अभूतपूर्व वस्तू ह्यातूनच निर्मिकाच्या निर्मितीविषयीचा विश्वास वाढवला व अंतिम सत्याबाबत संशयही निर्माण केला ह्या दोन्ही गोष्टी उराशी बाळगत ह्या लोकांनी नवीन संरचना निर्माण केल्या ह्या संरचनेतील घटक सृष्टीय विज्ञानासारखे निश्चित नव्हते तर ते काहीसे उस्फूर्त व arbitary होते. ह्या संरचनेत एकच घटक स्थिर होता तो म्हणजे संरचक उस्फूर्त संरचक आणि arbitary संरचन ह्यातून जन्मलेल्या ह्या संरचना आधुनिक माणसाची सगळी anxiety व्यक्त करत होत्या हायझेनबर्गने ह्या सगळ्याच संरचनावादाला छेद दिला अणु हा closed Text होता पण तो फुटला आणि अणु हाही open text असल्याचे स्पष्ट झाले. पुढे हायझेनबर्गने अणूचे open text हे कसेही व irrational वागणारे आहे असे सांगितले त्यातून subject वरचा विश्वास उडणे अटळ होते. प्रकाश हा closed कणांनी बनलेला होता पण तो wave रूपात असल्याचे कळाल्यावर open text झाला Relativity च्या सिध्दांताने तर objectivity मोडीत काढली. ह्या सगळ्यातून सगळेच अनिश्चित झाले. सत्य आणि सत्ता ह्या दोन्ही अशा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. Postmodernism
हा ह्या संशयाचाच अविष्कार आहे.
ईश्वरावरची श्रद्धा आणि संशय ह्यांच्या फेऱ्यात सापडत नव्याने सापडलेल्या विज्ञानाचा उत्सव साजरा करायचा की नाही ह्या आवर्तात सापडत मानवजातीने आख्खे क्षेत्रिय युग वाया घालवले मग विज्ञानावरील श्रद्धा आणि संशय ह्यांच्या फेऱ्यात सापडत नव्याने सापडलेल्या तंत्रज्ञानाचा उत्सव साजरा की नाही ह्या आवर्तात सापडत मानवजातीने आख्खे विशिय युग वाया घालवले आणि आता चिन्हीय युग आपल्यासमोर उभे ठाकले आहे तंत्रज्ञानावरील
श्रद्धा आणि संशय ह्यांच्या विलक्षण भोवऱ्यात आपण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मयुगाचे मंत्र अध्यात्मयुगाचे
trkntr विज्ञानयुगाचे यंत्र तंत्रज्ञानयुगाचे तंत्र आणि चिन्हयुगाचे जंत्र हे सर्वच घेऊन आपण एकविसाव्या शतकात दाखल होतो आहे अशावेळी नव्याने सापडलेले इंटरनेट, कम्प्युटर ह्यांचा निदान मुक्त उत्सव आपण साजरं करावा हे करायचे असेल तर हे postmodernism चे भूत आपण जितक्या लवकर आपल्या मानगुटीवरून उतरवू तितके बरे ! जग , विश्व , सृष्टी, प्रतिसृष्टी आणि चिन्हसृष्टी ह्यांचे प्रत्येकाचे आधारभूत सत्य आहे. ह्या सर्वांचे celebration करायचे की ह्यांच्या नावाने आपापसात भांडत, चिंताग्रस्त होऊन आयुष्य घालवायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे असे ते म्हणाले.
8 :30 to
9:30 FASHION- SHOPPING- KITCHEN
FASHION SHOW मधून
तुझ्या कंबरेला कोणतं वळण लावू ? इनस्विंग ठेवू की आऊट स्विंग? स्किनीफिकेशन अटळ आहे पोरी! ते किंवा क्रूसिफिकेशन ! जी मॉडेल त्वचाळत नाही ती मॉड नाही . स्कीनफ्लेशनचा डेंजर वारा मादक वाटतो पण साधक हो . ह्या हवेत आयुष्याचा लेझर माऊस भटकता ठेव पापण्यांच्या आसपास ! अन्यथा त्यांच्या पिपाण्या करून निघून जाईल तुझ्या काळजातली अनकॉन्शस सेक्सडॉल !
दिसतं तसंच असतं
तिथंच करिअर वसतं
हे लवबॉम्बिंग नाही हा आहे डिरेक्टरचा सावधसोहळा ! माझा प्रत्येक क्षण कॅरमबॉलसारखा उगवतो पोरी ! माझं रक्त डीझेल हायड्रॉलिकसारखं धावतं बाईपुढे बोलताना ! ही घाई नाही . ही आहे वाळवंटात सापडलेल्या बंगाली टायगरला आमूर टायगर बनवण्याची खेळी !तात्पुरत्या बदलांचा हा प्रकाशझोत कॅटवॉक करताना उपयोगी पडेल ओ भीगी बिल्ली! परम पाद सोपान पतम पतंग उडवत जा कपड्यांचे ऑडियन्सच्या आकाशडोळ्यात.
जा आणि सर्वांना खड्यात घाल
सर्वांगाने
***
9:30 to 10 college KATTA
कॉलेज युथ कट्टा
टर्रटर्र फाड
कर्रकर्र ताजा हो
खर्रखर्र खरखर
गुर्रगुर्र फिर
तर्र्तर्र झिंग
झर्र्रझर्र्र चाल
चर्रचर्र सोस
छर्र्रछर्र्र भेद
जर्रजर्र निसर्ग
फुर्रफुर्र थंडव
पर्रपर्र पाद
बर्रबर्र शोध
भर्रभर्र उलट
मर्रमर्र काम कर
सर्रसर्र निघ
डुर्रडुर्र संपात
हर्रहर्र ध्यान कर
ठर्रठर्र ठरव
डर्रडर्र घाबर
इर्रइर्र इंटरनेटव
नर्रनर्र नाट लाव
हुर्रहुर्र हुसकाव
आर्रआर्र आयकॉनव
ब्रर्रब्रर्र बोल
फर्रफर्र फोन
घुर्रघुर्र न्याहाळ
ओर्रओर्र चॅट
टूर्रटूर्र प्रवास
ठुर्रठुर्र ठोक
यर्रयर्र गुगल
लर्रलर्र लवर
शर्रशर्र सही कर
उर्रउर्र धपाप
षर्रषर्र पोटव
ळर्रळर्र वळव
ज्ञर्रज्ञर्र ज्ञानव
क्षर्रक्षर्र क्षारव
गुर्रगुर्र कबूतर
घोर्रघोर्र झोपी जा
भुर्रभुर्र उडून जा
ह्या काऊचिऊच्या गोष्टीतून
प्रत्यक्ष चिमण्यांच्याकडे
मोबाईलची रेंज पोहचत नाही अशा प्रदेशात
जिथे त्या तुझी वाट पाहतायत
***
10 to 11 LOVE OPERA 1 love in ruia college
लव ऑपेरा इन रुईया कॉलेज
***
आकाशाच्या छताखाली छतावरून चिठ्या फेकत फेकत आपण पोहचलोय तारुण्याच्या बिल्डिंगच्या छतावर निधड्या छातीने SMS मधून वेळ ठरवत ! कपडे काढत छाती खोलतीये छाती माझ्या केसांच्या अग्रावरचा पशू ऍप्लिकेबल होत चाललाय. स्तन लिहीतायत स्तनावर स्पर्शाचा तीळ मांसल फुकवट्यांचा निष्पाप फुगा फुगतोय आगतोय फुफाट्याचा वारा आदळतोय तुझ्या श्वासातून माझा श्वासावर पुरी बिल्डींग भाडमे जाए कौन आएगा देखने ? क्रौन्चवधाची शक्यता नाहीये कॉलेजच्या ह्या टेरेसवर.
पूर्वी
कविता
लिहताना
मला शांतता लागायची आता बारा चॅनेल्सचा कोलाहल जरी कानात बोंबलला तरी ढळत नाही माझ्या एकाग्रतेचा किडा
इतका सायबर मीही झालोय
ह्या शहराचा केऑस पेलता पेलता
तू दहा तोंडानी दहा आवाज करत दहा चुंबने घेतीयेस कधी फेस ऑफ कधी फेस ऑन मी चाचपतोय तुझ्या शरीराचा पासवर्ड आणि पासपोर्ट तुझ्या सुपरफिशीयल व्हजायनात उत्कटतेचा ग्रोथ ढग गोळा करत रक्त सरकवतिये माझ्या मांड्यात बॉडी स्पीड टेलिकॉम इंडस्ट्री गाडत गडगडत गड गाठतोय जिथे कैद आहे तुझ्या अस्तित्वातील सर्वोत्तम क्वालिटीचा स्पर्शांक आवाजांचं काय घेऊन बसलीयेस शांततेचा कडेलोट आहे त्वचेचा इंटरनेट ऍक्सेस streamings streamcirculation करतायत अबोल ह्रिदमच्या ध्वनीपाकळ्यात ऍपेरेट्सचा अपिअरन्स कोसळू दे मुक्त होऊ दे सिवीलाईज्ड अकौंउंटेबिलिटी ह्या शहरानं तुझ्या भोसड्यात भरलेली तीव्र आवाजात उठाव करत सरकरतीये मिठी तुझे सर्वांग वेटाळत तुझ्यादेहावर मी अठरा जागी उभा राहतोय तेरा जागी कोसळतोय वासनेच्या महापुरात ह्या पारदर्शकतेचं रजिस्ट्रेशन नको करुस संशयी नजरेने तुझ्या डोळ्यात ! ये ! स्पर्शश्रीमंत ये ! ओळखींचा फास्ट ट्रॅक मार्गावरून काढत निर्मळ ये.
तुझा हॉटस्पॉट होतोय जागा निरक्षतेच्या लॉन्ड्रीत धुवायला चाललेत सारे कपडे अंगठा होतोय पुन्हा एकदा निरक्षर बॉटम टू बॉटम पुरी दुनिया काटम
युजर फ्रेंडलीनेस पसरत चाललाय प्रत्येक अवयवात मला माझ्या दहाही बोटांनी करू दे तुझ्यावर प्रेम करू दे ओवरटेक सुगंधाचा भन्नाट वारा सोसत तुझी बॉडी ! उघड दार ! मारू दे माझ्या गाडीतून तुझ्या गाडीत प्रामाणिक उडी दणादण दणादण घे आख्खा ! हा सखा सख्खा ! हे प्राणप्रिये सखे ये आत आणि हो सखोल
सटासट पार होतायत Body- Driven भुकेकंगाल भूगोल
झपाक
ओऊफ
शहर कोसळतय मॅपींगभयात स्पर्शदारिद्र्य घेऊन
तुझ्यावर ! माझ्यावर ! टेरेसवर !
आणि आपण त्याची पर्वा न करता
एकमेकाच्या भन्नाट छातीतून एकमेकाला गोळा करत गर्भश्रीमंत होत चाललोय.
***
11 to 12 क्रीडा sports
चल पुन्हा सुरु करू एक नवा पिकअप एक नवी इनिंग
न सरावलेली पण जिच्यासाठी सराव केला होता
न ठरलेली पण जिच्यासाठी ठराव केला होता
डोक्यापासून पायापर्यंत
काळाचं काय ? Time is itself tragedy of timeless
तो धावा जमवतो तो धावा चिरडतो
ह्या मैदानावरून तो त्रयस्थासारखा पुढच्या मैदानाकडे वळेल
आपल्या पायात त्याचे गोळे येतील
पण तो कापसाच्या बोळ्याइतक्या सहजतेने निघून जाईल
पण तरीही ..... चल
शतक होईल न होईल
विजयी होऊ न होऊ
पण प्रयत्न सेलिब्रेट करू
चल
जरी समोर माझा मृत्यू वाहे
इथे ह्याक्षणी मी आहे मी आहे
मागच्या इनिंगचं फर्निचर हटव
स्वतःला स्वतः नव्याने भेटव
बॅट कम्फरटेबली पकड
कम्फरटेबल बॅट पकड
हात हलके कर वजनदार शॉटसाठी
धावा दगडासारख्या जड असतात
धावा नर्तकासारख्या चपळ असतात
धावा अलंकारिक चकाचक असतात
धावा चमचम असतात
आपण प्रत्येकीपुढं कोर्टींग करू चल
आनंद
जो मरून गेलाय मैदानात
अजूनही वाट पाहतोय
चल मृत्यू धावात गोळा करून त्याला जिवंत करू
चल
घे खोल श्वास
मैदानभर पसरतोय नव्या ओपनिंगचा सुवास
चल
अत्तरात अडकून न पडता
***
ईंटज ऑल अबाऊट बॉडी ब्लडी
कॉलेज कॉलेज
ईंटज ऑल अबाऊट बॉडी ब्लडी
स्किन
अँड स्क्रीन ऑफ बॉडी
हार्ट
अँड ब्लड ऑफ बॉडी
पॅशन अँड कम्पॅशन ऑफ बॉडी
फक अँड लक ऑफ बॉडी
ईंटज ऑल अबाऊट बॉडी ब्लडी
पेन्डूलम ऑफ माईंड इन बॉडी
ऑल थिंग्स काईन्ड ऑफ बॉडी
स्ट्रक्चर पोस्टर
ऑफ द बॉडी
पोश्चर
मिक्स्चर ऑफ द बॉडी
ईंटज ऑल अबाऊट बॉडी ब्लडी
श्रीधरस
श्रीधरस
श्रीधरस
बॉडी
युवर्स
युवर्स
युवर्स
बॉडी
फकिंग
एन्जॉयजिंग फकिंग
बॉडी
जनेटिंग
जनरेटिंग लिविंग
बॉडी
ईंटज ऑल अबाऊट बॉडी ब्लडी
बाय
श्रीधरबॉडी तिळवेबॉडी नाईकबॉडी
फ्रॉम
नेटबॉडी
(चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
No comments:
Post a Comment