Tuesday, October 31, 2017

 श्रीवाहिनी शुक्रवार श्रीधर तिळवे नाईक 
8 to 9 mobaila MOBAILA
                         मोबाईला ! मोबाईला !!

एकोणसत्तरावा शेवट 

मोबाइल बोलतायत 
ते बोलतायत त्यातून नवीन मोबाईल तयार होतायत 
ते जुन्या मोबाईल्सना आऊटडेटेड करून 
कचऱ्यात जमा करतायत 
त्यांना कचऱ्यात जमा करण्यासाठी 
आणि त्यांची जागा घेण्यासाठी 
ते बोलतायत 
ते बोलतायत त्यातून नवीन मोबाईल तयार होतायत

सत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत 
अपेक्षित समाधानकारक 
अनपेक्षित असमाधानकारक 
रिकाम्या जागा सोडत 
दहापैकी तीन प्रश्न सोडवण्यासाठी घेत 
(उत्तीर्ण होण्याची ती अट आहे 
अवतीर्ण होण्याची अपरिहार्यता)
मोबाईल पम्प उपसयतात
ते एक दिसतात 
अनेक असतात 
फारच कटकट सुरु झाली कि होतायत 
उपसण्याचा फक्त आवात येतोय 
अदमास येत नाहीये 
अदमास कशाचा घ्यावा 
दिसतो भलताच कावा 
थांब जरासा 
मला दिसूदे तुझा प्रत्येक बारकावा 
मला घेऊ दे चावा 
मोबाईल बोलतायत 
माझ्या चेहऱ्यावर बसून

बहात्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
त्यांच्या बोलण्याला दुधाचा वास येतोय , बिअरचा वास येतोय , धारावीचा वास येतोय , भैरवीचा वास येतोय 
माझ्या नाकातील वासांची डिक्शनरी परेशान होतीये 
तिला कळत नाही 
मोबाईलना बिनवासाचं बोलायला कसं शिकवायचं 
ती बोलू देतीये 
आणि मोबाईल बोलतायत 
तिच्या डिक्शनरीतील शब्द नष्ट करत 
सुवासपूर्ण 

त्र्याहत्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
त्यांना माहितीये 
Word Is Workship 
OR 
Work Is Wordship 
OR 
Word Is Wordship 
OR   
Word is Isship 
मोबाईल बोलतायत 
आणि मी ते जे बोलतायत 
त्यांना पश्चाताप आणि अपराधी शांततेत 
पुरत 
त्यांना बोलण्यासाठी कुमक पुरवतोय 

चौऱ्याहत्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
माय फेस इज फ्लॅट 
बट माय नोज इज आयफेल टॉवर 
आयम टॉवरिंग
अँड मोबाईल्स आर टॉकिंग अँड टॉकींग 
टेकिंग वॉकिंग 
इन मी 
यु नो 

पंच्याहत्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
लिपस्टिकस आणि हॉकीस्टीक्स 
एकत्रच खेळतायत 
सॉनेट्स आणि नेट्स 
एकत्रच नेटप्रक्टिस करतायत 
पॉकेट्स आणि सॉकेट्स 
एकत्रच जॅकेट्स घालतायत 
मोबाईल चकीत आहेत 
महिला हॉकी स्पर्धेत 
प्रत्येकाला वेगळा फील आहे 
आणि 
ते मैदानावरून बोलतायत 
त्यांची नजर खेळावर नाहीये 
ते उघड्या झालेल्या पोरींच्या टांगानी 
शॉकग्रस्त झालेत 
पोरी खेळतायत 
आणि मोबाईल जीव टांगणीला लागून 
बोलतायत 

शहात्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
इमॅच्युअर्ड 
नॉट यट प्रिपेअर्ड 

सत्याहत्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
And unfortunately 
The scream is not justified 
yet


अष्टयहत्तरावा शेवट 

मोबाईल बोलतायत 
मुक्काम पोष्ट आष्टयातून 

एकोणऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत 
I am just kidding यार 
काही कुणी बोलत बिलत नाहीये 

पण मग बील का येतंय ?

ऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत 
probably its Mishappening
perhaps may be problem 
may be promotion or that kind  of something 
its thing yaar?
thing ?
Thing in Silence ?
Just........Just.....Just
मोबाईल फकींग बास्टर्डस 
बोलतायत 


एक्क्यांऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत म्हणजे माणसे शब्दांशी म्हणजे शब्द माणसांशी म्हणजे माणसे झाडांशी म्हणजे झाड वाऱ्याशी म्हणजे वारा ताऱ्यांशी म्हणजे पारा चेहऱ्यांशी म्हणजे चेहरा मेकअपच्या सामानाशी म्हणजे मेकअपचे सामान मेकअप मॅनशी म्हणजे मेकअप  मॅन माणसाशी 
म्हणजे माणसे 
इंटरेस्टिंग 


ब्याऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत 
आणि ब्लड एडिशन्स फ्लड एडिट करून हवेच्या ग्लोबल एडिट बॉक्सवर ग्लोब वॉर्म करत छापल्या जातायत 
माणूस नावाच्या भाषेत 

त्र्याऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत 
आणि त्यांना सतत बोलायला मिळावे म्हणून 
माझ्या पर्सनल नोटबूक्स - मी 
दोन्ही हातानी पुरवतोय 

चौऱ्याऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत 
चौऱ्याऐंशी योनीचा फेरा 
पाच मिनिटात एका कॉल मध्ये पुरा करत 
त्यांना जन्मोजन्मी सेम परमेश्वर नकोय 
त्यांना 
प्रत्येक पाच मिनिटांनी 
नवी कॉलर आयडेयंटी हवीये 
मोबाईल बोलतायत 
आणि मी माझी कॉलर ताठ करून 
दर पाच मिनिटांनी माझं काळीज बदलत 
त्यांच्याकडून परमेश्वरासारखा चाललोय
माझी आयडेयंटी भिकेला लागलीये 
तरीही ........ 

१०६ वा शेवट 

मोबाईल बोलतायत 
शंभर कौरव बोलून संपलेत 
पाच पांडव बोलून संपलेत 
एक कर्ण उरलाय 
तो शेवटची वाट पाहतोय 

पंच्याऐंशीवा शेवट 

मोबाईल बोलतायत 
एखादा शेवट झपकन मध्येच घुसतो  
तरी 
शब्द तरंगत चाललेत 
तरंगता येणाऱ्या माणसांकडे 
जो कान लावून 
शब्दांचे पोहणे ऐकतोय 
वास्तविक शब्द हवेत तरंगतायत 
आणि त्याला जे जलतरंगात पोहत 
त्याच्याकडे येतायत असं वाटतंय 
मोबाईल बोलतायत 
दुःखी सुखी रुक्ष भक्ष्य आवाजात 
रॉ आणि पातळ टोनमध्ये 
डेनसिटी गायब झालेल्या कल्चरमधून 
त्यांच्या त्वचेतून तरंग उठतायत 
आणि तेही शब्दांना जाऊन मिळतायत 
त्यांचा फोकस त्यांचा वर्तमान आहे 
त्यांना त्यांचा भूतकाळ चाटून संपवायचाय 
आणि ते बोलतायत 
मोबाईल डेडली आवाजात बोलतायत 
शवाचा फन्ना उडवत 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

9 to 10 INTIMATE INTILIGENCE CHALHWALA KARYKARTA ELCETRA
शुक्रवार                       इन्टिमेट इंटीलिजन्स 
गहाळ 

कितीही अत्याचार झाले 
तरी ईश्वर भक्तांशी बोलत नाहीयेत 
सारे अवतार टीव्हीवर टीआरपी वाढवण्यात मग्न 
कुठलेच मटेरियल शाश्वत नाहीये 
तिथं मटेरिअलिझमच्या  टिकाऊपणाबद्दल 
कोण गॅरन्टी बाळगणार ?
 ईश्वराचं abstract material स्ट्रॉंग झालंय हे खरं 
पण त्याच्याही मटेरिअलचं अमरत्व खतम 
नवे नरक दिसतायत जाहिरातीसारखे आकर्षक 
आणि स्वर्ग 
सिडक्शनमध्ये मग्न आहेत 

तुझ्या अध्यात्मिक हातांना लागणारी 
नवी लिंग्विस्टिक साईनस 
निर्वाणाचा पुरवठा करत नाहीयेत 
ती फक्त आसपासची शांतता गोळा करून 
भाषिक खड्डयात घालतायत 

भाषेकडे बुद्धत्वाचा पुरावा नको मागूस  
निर्वाण प्राप्त करून 
तिला निर्वाणाचा पुरावा दे 

प्रत्येक गोष्टीला चिन्ह देत 
मेंदू चाललाय क्लिक 

हे प्रस्तुतीकरण आहे की सादरीकरण 
हे कळणं कठीण आहे

झाड ह्या एका शब्दात 
सगळी झाडं गुंडाळली जाऊ शकतात काय ?
मानव ह्या एका शब्दात 
सगळी माणसे सामावली जाऊ शकतात काय ?

ज्ञानाचा हा बहाणा काय कामाचा ?
माहितीचा हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार ?

शहाणपणापासून सदैव दूर असणाऱ्या मुर्खा 
हे उमजून चाल 
की माहिती शहाणपणाचे केंद्र नाही 
पहिला परीघ आहे 

शब्द केऑसड गोष्टी कनफ्युजड 

मी शब्दांना अस्तित्व देतो 
आणि शब्द अस्तित्वांनाच हुसकावून लावू पाहतात 

कविता हा माझा मध्यममार्ग आहे 
शब्दांना शब्दजागा
आणि अस्तित्वांना अस्तित्वजागा दाखवून देण्याचा 

सामान्य नामे अस्तित्वात येतायत 
सामान्य माणसे अस्तित्वात येतायत 
सामान्य अस्तित्वात येतंय 

भाषा 'सामान्य ' बनवतीये 
कदाचित 
जे 'असामान्य' आहे त्याला 

कविता हीही  भाषा 
म्हणूनच कविता लिहिताना मी नेहमीच 
काळजावर हात ठेवून असतो 
मला भय असतं 
की जे असामान्य आहे 
जे असाधारण आहे 
त्याला मी सामान्य  साधारण बनवतोय 

मी  जग तकलादु बनवण्यास 
हातभार तर लावत नाहीये ना ?


मी लिहितोय कि 
मी वस्तूंना काळाबाहेर न्हेतोय ?

मी  वस्तूंना ओळखतोय 
की मी वस्तूंना ओळख देतोय ?

मला ओळख आहे 
की भाषे द्वारे मला ओळख पुरवण्यात येतीये ?

मी आणि माझ्याविषयीचे इतर 
ह्या दोन्हींना समान जागा का नाही ?

का नेहमीच मी वर ते खाली 
ते डावे मी उजवे
 मी खाली ते वर 
मी आत ते बाहेर 
मी - ते 
का एकच नाही ?
का हे द्वैत?

माझ्या मोबाईल इमेंजीस 
immobility ला  फर्टाईलमध्ये ढकलतायत 
माया जी कधीपासून अस्तित्वात आहे 
विखरून पडत 
अद्वैताबद्दल  बोलत अवयवतीये 

मला अनंतात बुचकळत 
हे द्वैत कुठं चाललय ?
माझ्या इमेजीस कुठं चालल्यात ?
माझ्या ओळखी कुठं चालल्यात ?


 
प्रत्येक कवी स्वतःला rare earth समजतोय 
आणि त्याला हे माहित नाही की 
त्यांची इंडस्ट्री क्रिमिनल गॅंगज चालवतायत 
ओळखीचे हे अपवाचन 
कि ओळखीचे हे मृत्युपत्र 

अनंताची कारणमीमांसा करता येत नाहीये 
अनंता बद्दल फक्त कविता लिहिता येतीये 
ही ट्रॅजिडी 
कि ही मर्यादा ?


१०
झाडाबद्दल लिहिणारे लिहून झाड झाले 
झाडाबद्दल लिहिणारे झाड झाडून गेले 
झाडाबद्दल लिहिणारे झडझडून गेले 
झाडाझडती पूर्ण झाली 
आणि हाती आली 
आढ्यता आणि झाड्यता 

संतोष पावणाऱ्यांना संतोष पावू दे संगणकात 
मी एका अस्सल पालवीसाठी मोताज आहे 


११
नुस्तंच मॉडिफॉय होऊन काय होणार ?
नुस्तंच मॉडेलिंग सुधारून काय फायदा ?
ओळख ही अनंत काळ चालणारी प्रोसेस आहे काय ?

अनंत गोष्टीशी सांधे जुळवून जुळवून 
 मला सांधेदुखी झालीये 
आणि ओळख आणूनही    री 
आणि भासाचे तापमान वाढवणारी 

ओळखीचा मलमली event अद्याप साजरा होत नाहीये 
आणि event  management कंपन्या 
तिला मलमात हलवून बघतायत 
तिला लाकडात रिती करून बघतायत 
तिला भिंतीत खिळे ठोकून बघतायत 

ओळखीच्या नावाने ओळखीचे फटाके फुटतायत गाईडट्रॅकवर 
आणि मी ओळखीचे रस्ते नाकारून 
साईडट्रकमध्ये पायवाटतोय 
आता सर्वत्र दिशाच दिशा 
आणि सर्वत्र न्हेणारी की बोर्डची तरंगी बोटं 
 श्रीधर तिळवे नाईक 


 10 to 11 FACE TO FACE
11 to 11:30 deathbedwarun
कविंच्यात राहून कविता सुचत नाहीत 
फक्त स्वतःच्या कवितेची चर्चा वाढते 

पत्रकारांच्या आणि समीक्षकांच्या बरोबर राहून 
कविता समृद्ध होत नाही 
फक्त स्वतःच्या कवितेची प्रसिद्धी वाढते 

मी नेहमीच लोकांत राहिलो 
आणि लोक कविता म्हणून माझ्यात जिरत राहिले 

मी त्यांना कधी सांगितलेही नाही 
कि मी त्यांचा कवी आहे 

लोकांच्यात लोक म्हणून जगलो 
आणि लोक म्हणून मेलो 

मी मरेन तेव्हा 
कवींना बोलवू नका 
समीक्षकांना बोलवू नका 
माध्यमांना बोलवू नका 

फक्त एकाला कळवा 
राजा तिळवे गेला 

जे येतील 
तेवढ्यांची उपस्थिती 
माझ्या चितेला पुरेशी आहे 


11:30 to 12 thod spiritual
हाडं तर शिल्लक नाहीयेत 
आणि मांस तर मेकपपुरते उगवते 

वास्तवाला दुसरी बाजू नसते 
अनेक बाजू असतात 
आणि त्या चॅनेल्स दाखवतात 

कवितेचा प्रोजेक्टर काय प्रोजेक्ट करतो 
हे त्यालाच माहीत 

आत्मा अस्तित्वात नाही 
आणि असलाच तर माणसाच्या आवाक्यात नाही 

ईश्वराचा दावा करणारे डिस्कोर्स टांगा कापून घेतायत 
त्यांना वाटते असे केल्याने त्यांना पुन्हा नवे दैवी पाय फुटतील 

बाबा लोक दुकान थाटून बसलेत 
सत्याला ह्याहून बेटर सेल्समनशिप कुठल्याच युगात लाभली नसेल 

चार्वाक तर सर्वत्र भांडवलशाहीचा चेहरा घेऊन अभिनय करतोय 

त्याला अजूनही माहित नाही धर्म आणि मोक्ष ह्यांचे नेमके काय करायचे 

तो दिवसेंदिवस अर्थ आणि कामव्यवहार करण्यात निपुण होत चाललाय 

मेटॅफिजिकल फक्त कॉस्मॉलॉजीत अखेरचा सस्पेन्स म्हणून बसून आहे 
बाकी व्यवहारात ते फक्त कर्मकांड मीटिंग पॉईंट 

मला माणूस बनणे शिकवले गेले 
आणि मी निष्णात जनावर बनलो 

आरश्यात मला आताश्या माझा चेहरा दिसत नाही 
त्याजागी दुसरा फुटका आरसा दिसतो 

लोकांच्या अपेक्षा मी कधीच पुऱ्या केल्या नाहीत 
नम्रतेच्या टॅब्लेट्स माझ्या अहंकारावर लागू झाल्या नाहीत 
आणि मी उष्ण कटिबंध वाटत 
विटेवर उभा राहिलो 

पशुवत स्पंद आणि इन्सानियतकी धडकन 
लोकहो दिल मतलब कोकोकोला असेल 
तर माणूस मतलब क्या ?

मी फ्रेश नाहीये 
शिळेपणाची मश्रूम्स रोज माझ्या केसातून उगवतायत 

मला मरायचे नाहीये 
आणि जगायचेही 

असा माणूस फक्त स्वतःच्या खुनाची 
वाट बघू शकतो 

मी माझ्या किलरची वाट पाहतोय 
माहित नाही तो कुठे विश्रांती घेत बसलाय ?

THE END


No comments:

Post a Comment