Tuesday, October 31, 2017

8 to 9 mobaila MOBAILA
मोबाईला मोबाईला 

।। छत्तीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 

ते त्यांच बोलण संपलं की 
कधीही तुमच्यापर्यंत येऊन पोहचतील 
असं समजू नका की तुमचे कान 
त्यांच्या फिल्डमध्ये समाविष्ट नाहीत 
वाचक आहात म्हणून काय झालं 
मी थोडीच तुमच्या सिक्युरिटीची गॅरन्टी घेतलीये 

तेव्हा ते कधीही त्यांच बोलणं संपवून 
तुमच्या कानापर्यंत पोहचू शकतात 

Everything is written off you know ?

।। सदतिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 

ते पुन्हा पुन्हा स्वतःची नियती निवडतायत 
शब्द निवडताना 
वाक्ये निवडली जातायत 
वाक्ये निवडताना 
परिच्छेद निवडले  जातायत 
प्रकरणं निवडताना 
प्राक्तनं निवडली  जातायत 

शब्दांना वाटतय 
ते बाहेर हाकलले गेलेले गुन्हेगार आहेत 
आणि माणसांना वाटतय 
शब्द आयुष्याच्या केंद्रस्थानी आलेत 

मोबाईल 
शब्द आणि माणूस 
दोघांना जोडतायत 

त्यांना Anthropometry 
poetry सारखी बनवायचीये 
आणि कविता 
त्यांच्या मिशनमध्ये 
आपण केवळ भुतासारखे दिसू म्हणून 
संपाट होत चाललीये 

मोबाईल बोलतायत 
आणि शब्द 
सुरवातीलाच शेवट निवडत 
वाक्ये तयार  करतायत 

।। अडतिसावा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत 

उबट 
रानव 
फझबक 
रौपौझोवोउ 
तलटफलट 
टिगीझिमीपीहीक्षी 
खेनेवेज्ञे 
क्षोऊकौटाबक 
लो 
दो 
गॅटपॅकॅव 

बुमबुमझुमझुम
शकशकशाकालाका 
शब्द म्हणती शब्द  म्हणती 
झवण्यापूर्वी माझ्यात वाका 

।। एकोणचाळिसावा शेवट ।।

मोबाईल बोलतायत 
काळ्या रंगात विधुर  आवाजात 
पांढऱ्या अंगात संन्यासी  टोनमध्ये 
निळ्या शब्दात निस्तब्ध सळसळीत 
लाकडी गळ्यातून मेटॅलिक जंगलात 
धृपद पायात निष्कंठ शांकरीत 
मॉडिफाईड माणसात पाशवी डरकळ्यात 
सर्वनाशी प्रोसेसमध्ये खराब रस्त्यावर उभे राहून 
रेस्टलेस चिंतनात चिंतेचा उच्चार  करता 
भारदस्त थ्रिलमध्ये  कूल चील चिल्लाहाटीत 
गोल्डन थॉटच्या स्वस्त सुंदर टिकाऊ सुवर्णमध्यात 
गाणे नाणे बहाणे पहाणे सोसत 
जगण्याच्या शॉकमध्ये फुलप्रूफ जॅकेटमध्ये 
बुलेटप्रूफ 'आजटिकण्याची गॅरन्टी देत नसताना 
ध्वनी ध्वनी खूनी होताना 
जागृती झोपेची वाट पाहतिये तरीही 
निसर्ग टीका  करत नसताना  
कयामातीच्या शेपटावर पाय ठेवत 
त्यांच्याशिवाय जग शक्य आहे हे माहीत असताना 
त्यांच्याशिवाय ते कसं अशक्य आहे ह्याची जाहिरात करत 
प्रत्येक प्रत्येक सुद्धा सुद्धा 
पॉज  घेता क्लॉज  टाकता 
पॉश 

।। चाळीसावा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत 
माणसे मरून गेल्यानंतर 
ती निदान आपण बोलल्यानंतर  जिवंत होतील 
ह्या आशेने 
व्हाईसमेलमध्ये धाडले गेलेले 
पण माणसांच्यापर्यंत  पोहचवलेले सर्व भाषाळ 
गोळा करत 
माणसांना  जिवंत करण्यासाठी ते माणसांत धाडत 
मोबाईल बोलतायत
।।एक्केचाळिसावा शेवट ।। 
आता सर्व ठीक होईल 
मोबाईल सर्व ओके करतील 
शब्द हरवणार नाहीत 
व्यवस्थित पोहचतील 
हरवले तर रेकॉर्ड रूममध्ये सापडतील 
माणसे ठीक होतील 
भाषा ठीक होतील 
O: K होईल बिलकूल ठीक 
देर आये मगर  दुरुस्त मोबाईल आये 
ठीक ठाकठीक एकदम ......  


।। बेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
सर्वत्र 
माणसांच्यावर ट्रक घालून - त्यांना सपाट करत 
ज्याच्यावर लिहलय 
Horn O.K. Please 
आता आज नाहीतर उद्या 

।।त्रेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
त्यांचा आवाज माझ्या काळजात प्रेग्नंट होतोय 
मला ते मान्य नाही 
माझे हात कानावर हात ठेवून ओरडतायत 
"नाही "
गर्भ फिक्स झालाय पण रक्त लोकेशन बदलतय 
मी गाडी चालवता चालवता 
एफ एम ऐकता ऐकताच 
बहुधा बाळंत होईन 

।।चव्वेचाळीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
फोकस डीकंस्ट्रक्ट होत 
भाषा चालू ठेवतोय 
त्याला त्याची गद्दारी फील होतीये 
एका सुरा - भाषेत Hidden 
सर्व कनेक्ट करतोय 

।।पंचेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
ह्याचा अर्थ असा नाही की 
माणसं बोलत नाहीयेत 
पण माणसं मोबाईलवरून बोलतायत 
आणि मोबाईल बोलतायत 
ह्या दोन वाक्यात फरकय 
जसा की 
श्रीधर तिळवे कविता लिहितो 
आणि  कवी श्रीधर तिळवे कविता लिहितो 
ह्या दोन वाक्यात फरकय 
मी डोळे बंद करून झोपेत जातोय 
मी डोळे बंद करून झोपी जातोय 
मी डोळे बंद करून झोपेत चालत जातोय 

।।छेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
 मला ते समजायला 
आयुष्याची तीस वर्षे लागणार आहेत 

।। सत्तेचाळिसावा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत 
ते बोलणाऱ्या माणसाचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत 
ते माणसांच्या बोलण्याचंही प्रतिनिधित्व करत नाहीयेत 
ते फक्त मत तयार करतायत 
किंवा असं म्हणता येईल 
तयार झालेलं मत मांडतायत 
किंवा असंही म्हणता येईल 
की ते बोलून 
स्वतःचं मत काय आहे 
ह्याचा अंदाज घेतायत 
किंवा ते आपल्याविषयी दुसऱ्याचं मत काय आहे 
ह्याचा अंदाज घेतायत 
मोबाईलची बॉडी लँग्वेज होतीये 
आणि मोबाईल दर पल्सला स्क्रीन बदलत 
माणसाचा गेस्ट अपिरियन्स धारण करत 
नटांसारखे धोरणी बोलतायत 

।। अठ्ठेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
गेस्ट किंवा 
घोस्ट किंवा 
गोष्ट किंवा 
गोश्त 

।। एकोणपन्नासावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
चड्डीत 
जंगल जंगल पता चला है 
चड्डी  पाहणके फूल खिला है 

।। पन्नासावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
गोल्डन ज्युबिली 
***

9 to 10 INTIMATE INTILIGENCE CHALHWALA KARYKARTA ELCETRA
बुधवार                          ईन्टिमेट इंटीलीजन्स

.
गायब 

माझ्या आसपास चान्सचं दारिद्रय 
अंगावर अभावाची भूछत्रे 
ठीगळोठीगळी 

माझं दारिद्रयाचं स्वतंत्र शेत नाहीये 
माझ्या शेताला  स्वातत्र्यंच नाहीये 

मी भूमीगत नाही 
माझ्या गाडलेल्या भूमीला अवगत करत 
लापता आहे 

मला हद्दपारी ठोठावली गेलीये 
पोलिटिकल हातोडे मारून मारून 

ज्या जजने दिलीये सजा त्याच्या  हाताला सूज आहे 
मात्र मला तुरुंगात परतण्याचं स्वातत्र्यं आहे 
त्याने शांतता प्रस्थापित होईल 
अशी सरकारला आशा आहे

कंडिशन एकच 

मी सरकार विरुद्ध काहीच करायचं नाही 
मी डॉन बनलो तर सरकार 
मला अदृश्य 'ना हरकत प्रमाण पत्र ' द्यायला तयारय 

पण आजकाल डॉनही 
सरकारची भडवेगिरी करतात 
हे मला माहित आहे 

कॉमरेडगिरी करणारे शतक संपलय 
कम्युनिस्ट पक्ष सरकारशी फेथफुल आहे 
ही गुड फेथ की बॅड फेथ हेही कळणं 
कठीण  होत चाललय 

मी परतत नाहीये 
आणि सरकार माझ्यावर 
परतण्याचा गुन्हा दाखल करता येईल का 
ह्याचा विचार करतंय 

परतण्याचा 'स्टेज इव्हेंट ' मॅनेज करायला 
इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या तैयार आहेत
मटेरियलिझमचं मटेरियल संपत चाललय 

"मोक्षाबद्दल तुझा काय विचार आहे ?"
बापू विचारताय अध्यात्मिकतेचीं  नक्कल करत 

मी सिवील सुसाईडबद्दल मौन पाळतोय 
च्यायला
आयुष्य हे फाऊंडेशन आहे 
की चीट फंडाने पुरवलेला चानसिकल फायनान्स ?
च्यायला - च्यायला  की मायला की आयलां ?

जो लपू शकतो 
तोच तगू शकतो 
इतका प्रॅक्टिकल झालाय काळजातील 
डायलेक्टिकचा भुगा 
तो फुटत नाहीये फुटायच्या डेली सोप गोळ्या देऊनही 
कदाचित तो प्लास्टिकचा आहे 

ग्लोबलवॉर्मिंगनंतर कदाचित ह्या भुग्याचं 
प्लास्टिकच वाचेल 
किंवा कदाचित ह्या प्लास्टिकचा फुगा बनवून 
तो अंतराळात सोडण्यात सायंटिस्ट यशस्वी होईल 


सगळ्यांनाच नर्वस ब्रेकडाऊन झालाय 
मात्र सर्वजण पाठीच्या  कण्याला ब्रेक लावून बोलतायत 

'शहाणपणाचा 'डीलेमा ''

रिपीटिशन आणि ओरिजन्यालिटी 
ह्यात अधिक मानवी काय ? किंवा अधिक सोयीस्कर काय ?

प्राचीन शिलालेख शेवटच्या प्रयत्नासारखे 
थकलेले दिसतायत 

मार्क्सवादी बनण्याची केविलवाणी धडपड 
करणारे कवी 
बुटके बनत चाललेत 

देव सडतायत स्वतःच्या बुटात 
माणसं सेक्समध्ये शोधतायत वॉकेबल दैवी डिस्टन्स 

जो तो विचारतोय तुला मानवी आवाजात 
सेक्समधला कामदेव 
आणि त्याचा स्किनी मोबाईल नंबर 

फिलॉसॉफी कॅरीकेचर होत चाललीये तुझी 
आणि तुझी माणसं 
पोकळपणाच्या कीबोर्डची 
भरीव अक्षरं दाबत आयकॉनिक आई डॉल 
श्रीधरा 
आता काय काय डिलीट होईल ?
आणि त्यासाठी काय काय करणे देण्यात येतील ?
सत्ता 
सत्य गाडून स्क्रीनवर इतिहास रचतीये 

बातम्या दरतासांनी रिकंम्पोज होत 
शेवटी  डीकम्पोजिंगला मिळतायत 

कवी अडकलेत आत्माविष्कारात 
तत्वज्ञानी ह्या युगाला आत्मा कसा द्यावा 
ह्या पेचाचा  पंचा नेसून 
कवितेच्या डोक्यावर नाचत 

एकुलती एक घटना घडण्याचे दिवस संपतायत 

सामान्य माणूस हॉरिबल बनलाय 
की हरीबल बनलाय 
समजत नाहीये

आयडियॉलॉजिची हनीबल आयडिया गहाळ - मुंग्यासकट 

वॉरमशिन्स सर्वच ऑन
 normality चा बुरखा चढवून 

त्यांना चकाचक शूट करणारे कॅमेरे 
लपालप  ऑन 
सातत्याचा पंखा हवेअभावी बंद 

सत्तेचा ग्लोबल प्रोजेक्ट 
फेल गेला काय ?

अमृताशी पैजा लावणारे 
मम्मी फीकेशनच्या क्लासेसना 
रेगुलर जातायत काय ?

एकविसाव्या शतकाचा चिअरफूलनेस काय ?
चांगुलपणाचा डोस  देत फिरणाऱ्या लोकांची जात 
कुठल्या साथीत मरून गेली ?

आळस हा दुर्गुण नाही 
प्राप्त केलेली चैन आहे काय ?

निष्ठेची विष्ठा कधी होते ?
आणि ढुंगण तुळस लावण्याइतपत पवित्र अंगण 
कधी होतं ?


प्रेमानं नवा आकार कसा धारण करावा ?
प्रेमाची नवी टर्मिनॊलॉजी कशी तयार करावी ?
प्रेमाचं नवं मटेरियल कुठल्या देहाच्या टाईपात शिजवावं ?

रक्ताचं डाइलेस्टीक संपून 
अंगभर मल्टिलेक्टिकची काळीजबांग 

हा कोंबडा आर  तोय 
की चिकनखान्यात जमा होणार म्हणून 
कोंबडी लिंगपरिवर्तन करतिये ?

बोटांना चढतीये जिलेटची धार 
आणि हात 
स्तनातून आंबे पाडत  
अहोरात्र फॅन्टा 

मी तिच्याशी संभोग केलाय ते नक्की 
पण मी तिच्याशी कम्युनिकेशन केलंय का ?

मराठी माणसं जिथं सलग 
चोवीस मिन्ट देत नाहीत वाचायला 
तिथे तू लिहितोयस 
सलग चोवीस तास कविता 

तू एक्झीक्यूट   करतोयस 
की तू स्वतःलाच फाशी देतोयस 
हे कळत नाही ज्या मॅनेजमेंटल अरेजमेन्टमध्ये 
तिथं तू टिकवू पाहतोयस 
तुझ्या आयुष्याच्या 
प्रत्येक क्षणी गायब होण्याऱ्या   फोटोकॉपीज 

बांगडा खावून भांगडा करणारे तुझे 
गोवन पाय 
आता पाळतायत 
मांसाहार खाता मांस जिवंत ठेवण्याचं व्रत 

टीएसएलियट चवीपुरता शो करणारे एलीट 
आसपास 
आणि त्यांचा एलियट बॉक्स 
इलिटपणा साधण्यासाठी 
 ईडीयटगिरी चढत
ईडीयट  बॉक्समध्ये 
कुठलं बॉक्साईड सापडणार आहे 
तुझ्या खाणी शोधणाऱ्या बुलंद हातांना 
बावन्नखणी आणि बावन्न चॅनेल्स 
ह्यात काय काय फरक करणारयस ?

मटेरिअलची गुंतागुंत सर्वत्र केस सोडून उभी 
आणि लोक ह्यातच खुष 
की शाम्पू अफोर्डेबल आहे 

श्रीधरा 
आयुष्य अनमास्क करणाऱ्यांचे 
चेहरे नष्ट होतायत 
आणि तू आहेस की 
आरसा स्वच्छ ठेवण्याचा मनसुबा बाळगत 
येणाऱ्या जाणाऱ्याला  वटारलेले  डोळे वाटतोयस

तुझ्या खून करण्यासाठी आलेल्यांना 
काय विचारतोयस 
त्यांच्या  मेलेल्या रक्ताचा ब्लडग्रुप ?

हद्दपारी स्वीकार 
आणि शाबूत ठेव 
तुझी अनलिमिटेड अनमेजरेबल अनबेअरेबल रेंज 

श्रीधर तिळवे -नाईक 

 10 to 11 FACE TO FACE

                  गावातून आलोय म्हणून मूर्ख समजू नका मी एका हाताने लॅपटॉप चालवतो एका पायाने ट्रॅक्टर वा नांगर कम्प्युटर येणाऱ्यांना अडाणी म्हणता मग नांगरणी येणाऱ्यांना आम्ही काय म्हणावे ? की आम्ही पिकवलेलं अन्न तुम्ही म्हणालात म्हणून मार्जिनलाईज करायचं केवळ तुम्ही चिन्हसृष्टीची प्रिस्क्रीPSHन्स देता म्हणून ? तुमच्या औषधांनी बरे झाले नाहीत आमचे आजार आणि आता वेळ अशी आलीये की औषधे आयुष्यापेक्षा महाग होतायत फुल्यांपासून  शरद पाटलांपर्यंत कित्येकांनी दिली तुम्हाला Black Corner Notice पण तुमचे इंटरपोल असे भक्कम फेक खांबाचे की शेतकऱ्यांच्या  डेड बॉडीज ओळखूनही ओळखता ते चालत राहिले false identity चे पाय घेऊन इन्वेस्टीगेशनच्या तरंगत्या डिस्कवर आता  किती काळ मांडायची ही बैठकीची लावणी
              Farming आणि Pharming ह्यांच्या दरम्यान चालून चालून थकत चाललेत आत्महत्या आमच्या आयुष्याच्या हा फायनल ड्रॉफ्टही वाचायला तुम्हाला वेळ नसेल तर काय गांडीत घालायची  तुमची टाईम मॅनेजमेन्ट
              तेव्हा मायबापहो
              काहीही करून तुमची आय घाला
             आणि ऐका
             
              शेतकऱ्यांच्या भाषा कळत नाहीत तुम्हाला
              म्हणून तुमच्या कॉस्मो भाषेत बोलतोय
               ही cool light फार काळ cool नाही रहायची
               एकदा Heat दार झाली
               की कानासकट बॉडी जाळंल
               तवा दमानं
               दोन घास खाता खाता
               कान इमानानं इतकं करा.ऐका .

             नाहीतर शाहिस्तेखानाची बोटे कापली
             तुमची  . . . . . . . . . .
         


11 to 11:30  डेथबेडवरची स्वगते 

भर चाळिशीतही ज्याचा स्ट्रगल संपत नाही त्याने चाळी पाडल्या काय किंवा बांधल्या काय ? एन्थुसियझमची सियासत संपुष्टात  येऊन आता त्याचं फक्त अँथम वाजतय हे तर स्पष्टच दिसतंय अपयशाच्या कारणमीमांसेत पहिला चेहरा आपल्या अहंकाराचा दुसरा आपल्या टॅलन्टची भीती वाटणाऱ्या पाट्याटाकू रोजनदारांचा आणि तिसरा सवतीमत्सराच्या चाबुकाचा आपण पोहचण्याआधीच पोहचल्या आपल्या विषयीच्या अफवा हवा स्पीन करायला गेलो तर श्वासांची बोटे जखमी मूळ स्टोरीज ऐकवल्या तर लोक म्हणाले ह्याची हॉलिवूड सीडी कुठली ? चोऱ्या करायची सवय झालेले हात आपले ओरिजनॅलिटीची डिमांड करणारे  नशिब लिहित राहिले आणि आपण आपली क्रिएटीव्हीटीची खाज रायटर्स असोसियेशनमध्ये जाऊन  फक्त रजिस्टर करत राहिलो
एक लगान आली  तर त्याचे टायटलक्रेडीट बळकावून माजला एक मराठी गुडघा  आणि आपण माधवराव  पेशव्यांच्या दरबारी मुजरा का प्रस्तुत केला नाही अशी विचारणा करणारा फतवा काढला इंडस्ट्रीने. आपली सचोटी पूर्णच पराभूत झाली. दोस्तांच्या गैरवापरनाम्यात आणि त्यांनी यशासाठी आपापसात केलेले तह पाहून वाटाघाटीच्या टेबलाखालून निमूटपणे निघून गेली. आपली बॉडी आपल्या परमिशनची वाट पाहता
                 आईला एक साधं सुखाचं लुगडं पुरवू शकले नाहीत आपले हात केवळ दोनचार दिवसांच्या भेटीत फॅमिली सेटिंग करून आपण टाकत राहिलो ह्या महानगरावर आपल्या चिन्हसृष्टीचं अनेकदंतीय जाल पण आपल्या वाट्याला आली फक्त कॉस्मॉपॉलिटीन हवा 
                  कुणास ठाऊक आपल्यासारखे किती आले ह्या ग्लॅमरयुगीन फिल्म्शैलीत स्वतःची सही घेऊन पण ऑनलाईन फेक आयडेंटिटीने सवांचीच जिर  ली मान 
                 आता ही छाती पिचलेली म्हणायचेही त्राण उरलेलं नाही आपल्या फुफ्फुसात आता फक्त जेल पेन विकत घ्यायचे ह्या इनजेलसिटीत आणि इनव्हिजिबल रहात पहात बसायची सक्सेलफूल माणसाच्या कव्हरस्टोरींची मुखपृष्ठ 
                हे तसं बरंच की आपला जन्म मलपृष्ठावर झाला ह्या संस्कृतीच्या 
                हे तसं बरंच की आपण जन्मलो तेव्हा आपल्या आईबापांच्या आकाशगंगी सक्सेस नावाचा तारा नव्हता 
               हेही तसं बरंच की आपल्याआधीच्या आपल्या बारा पिढ्या मातीतच वारल्या होत्या आणि आपल्या जन्ममूठीतून उठून गेली होती हिरवी शाई 
               आता हे इथं असं स्वतःचं प्रेत दहन होताना पाहताना थोडं व्याकूळतय आत काहीतरी
                मित्रांनो, चाललो बाबांनो 
                पण जाताना ती राख नीट गाडा किंवा फेका पाण्यात चुकुन धुगधुगली तर नवं टॅलेन्ट घेऊन उगवेल आणि फळं मोडता मोजता तुमची बरगडी मोडेल 
                 मेल्यानंतर टँलेन्टेड माणसं आधीक बदतमीज होतात असं म्हणतात म्हणून सांगतोय.
11:30 to 12  थोडं स्पिरिच्युअल 

भोवळ येऊ देता मी चाललोय एका गॅजेटीग रोलर कोस्टरमधून लाथ मारेन तिथे पाणी काढेन म्हणणारा पाय अचंबित पाऊल पडेल तिथे गॅजेट उगवताना पाहून माझे डोळे थेट CACNA 1A मधून प्रक्षेपित होतायत familial hemiplegic migrane ची संध्याकाळ सर्व शरीरभर पसरलेली ह्या गॅजेट्स मला फाडून खायच्याही आहेत  आणि पचवायच्याही आहेत डिप्रेशनचे करडे फुल आणि त्याचा अगतिक गंध टेक्नॉलॉजी इनिशियेट करणारे हात गुलाब घेऊन येतायत मला कळत नाहीये माझी कबर झालीये की खबर ? नेसेसरी चा 
नार्सिसिझम आरश्यात आणि माझा टेक्नोफेस त्यात फेशियल करत migraine सांभाळत
         भोवळ येतीये पण ती सांभाळत मी निघालोय मॉलचा दरवाजा ओलांडून सूर्यास्ताच्या दिशेनं 
         एक सौन्दर्य लालचुटुक ओठांनी मावळतय आसपासच्या बायकांच्या लिपस्टीकच्या कांड्या कडाकड मोडत निसर्गदत्त 
         फोटो घ्यावा की हा सूर्य तसाच सोडावा
          पझेसिवनेसचा डिजिटल कोपरा ढुश्या मारतोय हातातील डिजिटल कॅमेऱ्याला !
          सगळं कॅमेऱ्यात कैद करणारा तुरुंगाधिकारी उगवतोय भोवळ हलतीये मी बीचवर थोडासा भेलकांडतोय 
          हा क्षण जगावा की हा क्षण शूट करावा
          मोबाईल बीप करत नाहीये नेटवर्क गायब 
          ही रात्र आता विदाऊट टेक्सट आणि मेसेजशिवाय 
           गॅजेट्स मरत चाललेत सूर्य मावळत  चाललाय मी जो भोवळत चाललोय migraine दुरुस्त करत निरोप देतोय- मलाच - जो ऍडिक्ट होऊन मॉलमधून बाहेर पडला होता. डिजिकॅमची बॅटरी संपत चाललीये 
           लाटा वाजतायत सूर्याला निरोप देत 
          " ह्या क्षणी हा सूर्य जगण्यासाठी मला फक्त डोळे आणि कान 
          आवश्यक आहेत "   
          मी - सू र्या स्त - तो  
          मी सूर्य जगतोय 

******************************************************************





No comments:

Post a Comment