Tuesday, October 31, 2017

12 to 1 FROM WORKPLACE
वर्कप्लेस फेस टू फेस 
                     कार्पोरेट कल्चर उराशी घेऊन चौघेजण बोलतायत एकमेकातल्या बेडशी चौघांनाही अंदाज येत नाहीये बाई 
ग्लोबल आहे की लोकल 
नागडी आहे की कापडी 
वेश्या आहे की विश्य 
प्रत्येकाचं काळीज टोलजंग मनोरा बांधतय जो कळत नाहीये 
झुलता आहे की कलता 
पिसाचा आहे की पैश्याचा
                    प्रत्येकाला माहीत आहे की समोरचा समलिंगी आहे पण हे स्पष्टच होत नाहीये की जो समोर आहे. तो 
मिसप्लेस्ड पुरुष आहे की मिसप्लेस्ड स्त्री 
प्रत्येकाला ओरडून सांगायचय की तो समलिंगी आहे पण कुणालाच कळत नाहीये हे बोलणे 
मिसप्ले होईल की डिसप्ले 
                  प्रत्येकजण नजर रोखून आहे 
                  प्रत्येकाचा डोळा ओशाळलेला 
                 टेबल टकामका पाहतय  संगमरवरी अंगाने प्रत्येकाचे नाक जे कळत नाही 
श्वासात बुडालय की वासात 
                चहा कपातून उठून हवेत चाललाय त्याला कळत नाहीये त्याचा चॉईस 
कप की हवा 
                चेअर्स सहन करतायत मानवासन जे कळत नाहीये 
बलात्कार आहे की प्रीती 
                 सगळं कसं गोंधळलय अनिश्चित लिंगचाचणी आणि चाचपणीत 
                 आणि पृथ्वी हा सगळा गोधळ निमूट  
                                      सोसत 
स्वतःला प्राप्त होणारं नपुंसकलिंगत्व  
                                                           आउट होतीये.     
***
1 to 2 लव ऑपेरा in j s hall
मी व्यास झालो तरी
द्रौपदीची पाच पतीपासून सुटका झाली नसती
तू गार्गी असतीस तर
वेदच शिकावे लागले असते
तर मी व्यास होत नाही
तूही गार्गी होऊ नकोस
त्यापेक्षा द्रौपदीची पाच पतीपासून मी सुटका करतो
तू वेद पाठ करायला नकार दे

आता बघ
व्यास आंबेडकरांच्या बरोबर बुद्ध डिस्कस करतायत
आणि
गार्गी गेम थेरी शिकवत आयुष्य टाईप करतीये
मात्र हे आता नको विचारू
व्यास आणि गार्गी ह्यांच्यादरम्यान काय होईल ?

कदाचित ते आपल्याप्रमाणेच एकमेकाच्या प्रेमात  पडतील
किंवा कदाचित  त्यांनाही
एकमेकाचं काय करायचं हे कळणार नाही.
***

शंभर बहाण्यांचा रच डाव
फेक रमीतील फेक दिलफेक पत्ते
सकाळचं दूध संध्याकाळी ताक होईपर्यंत
प्रतिक्षा करव
दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता
दहा काट्यांच्या घड्याळात वेगवेगळ्या मुद्रा धारण कर
जॉब धर जॉब सोड जॉब मुठीत पकड मूठ मार बॉसवर

रच शंभर डाव
फेक दिलफेक पत्ते
संध्याकाळी प्रतीक्षा
दहा वाजता मुद्रा धारण कर
जॉब मुठीत पकड मार बॉसवर

रच फेक पत्ते
संध्याकाळी मुद्रा धारण कर
जॉब मार बॉसवर

फेक मुद्रा धारण कर
संध्याकाळी मार

फेक संध्याकाळी
मार

फेक मार
फेक
***

पाण्यात पाहिलं तर सोमवार होता
कॅमेऱ्यात पाहिलं तर मंगळवार
चित्रात पाहिलं तर बुधवार होता
फोटोत पाहिलं तर गुरुवार
कवितेत पाहिलं तर शुक्रवार होता
आरश्यात पाहिलं तर होता शनीवार
कंटाळून पाहिलं तर  सर्वत्र रवीवार
आणि स्वतःत पाहिलं तर काळच नव्हता
शेवटी
तुझ्या डोळ्यात पाहिलं तर सुट्टी होती
आणि तू डोळे मिटलेस तेव्हा सुरु झाला
माझ्या जगाचा  अंत
तुझ्या जगाची सुरवात
***

2 to 4:30 cinema
4:30 TO 5:30 songs and poems
सॉंग्ज अँड पोएम्स 

.
सर्वत्र माणसे
स्वतःला नष्ट करतायत
त्यांना हरायला जागा मिळावी म्हणून
मी कविता लिहतोय

मी ती अस्तित्वात आहेत
ह्याचा पुरावा लिहितोय.
***
जो अलग है वो गलत है
जो सही है वो दही है
प्रत्येक फुटावर फुटेज खाणारा हा नार्सिसीस्ट खेळ आसपास विखुरलेला अभिनयाची दिवाळी साजरी करत स्वतःत सक्रांत सोसणे उफ ये लाई गे आहेस तर गे रहा मित्रा
मी हेट्रोसेक्चुअल आहे तरी माझा तुला पाठींबा आहे
मात्र  गे  होणे ही साथ आहे हा तुझा दावा मला अमान्य दादागिरी बहुसंख्याकांची असो वा अल्पसंख्याकांची मला अमान्य Bad Boss होऊ नकोस हे बॉक्समध्ये अलंकारिक जगणे युनिवर्सल नाही केबीन म्हणजे सेक्युअल सत्ता नाही तुझ्या श्वासांची रिऍलिटी ही  माझ्या फुफ्फुसाहून नाहीये वेगळी तुझ्या  रक्ताचा ह्रिदम माझ्या हृदयापेक्षा नाही आगळा पण लिंगाच्या खाजगी जागा वेगळी वेगळी खाज मागतात त्याला मी काय करू ? मला पुरुष attract करत नाही त्याला मी काय करू ? लैंगिकतेच्या इलाक्यातील भय मायाळू असतं तसं पायाळूही असतं तेव्हा हा माझ्या चेहऱ्यावर रोखलेला पाय होल्ड कर गे असणे म्हणजे फार क्रांति कारक वगैरे बाळबोध लिंगसमज माझ्याजवळ नाहीयेत मी मला जसा परवडतो तसाच असतो मॅसीव कनफ्युजनचा तुझ्या चेहऱ्यावरचा हा पिसारा स्वतःत वाकून बघ आणि सोड मला वाऱ्यावर
माझ्या हेट्रोसेक्सुअल हवेत.
माझा श्वास घ्यायला.
***

Desire is the error in creativity
पर क्या करे
creativity has the desire for reality
कम्बख्त
Reality is a Myth
Good यार
We assume Quyamat & it happens

झुमरी तलैय्या
था था थैय्या
या खुदा !
ना
ये खुदा खुदको कितना बुलन्द करू ?
ना
ये, खुदको कितना बुलन्द करू ?
ना
कितना बुलन्द ?
ना
कितना बुन्द ?

ना
 बुन्द ?

ना
बुन ?

ना
बू ?

Correct

5 :30 to 6  interview
मुलाकात 

श्रीधर तिळवे ह्यांची educationist शी बातचीत
An interview with an educationist

S: Why don't you resign your post ?

E: You mean Postmodernism 

S: Postmodernism is dead !

E: But our student have to learn it ?

S:Why we teach dead things ? 

E: Only dead things can be educated ?

S: To give education means to teach how to live 

E: All things ultimately reach to textbooks 

S: Postmodernism is outspaced in India. We should provide them an alternative 

E: An alternative to dead things ? Contradictory to your initial things!

S: Yea ! Agree !

E: We should apply this new system in Indian education system 

S: Message ?

E: Approach !

S: Concrete ?

E: Multi formal 

S: What do you mean ?

E: Brick by brick, Construction. 

S: But today we are weaving brick to brick meganets 

E: Why are you texting expiry date ऑफ postmodernism 

S: To kill it. It's the only way to make it out of date. 

E: Fashionable murders don't stand in textbook of history 

S: History is dead. It's the time of post nets. 

E: Education is always posthings 

S: Is it state of mind ?

E: Yes. Mind setup. production of mind set up !

S: Internet is new grand narrative or i can say grandnettive or I can say grandnettive which is open & yet live. We should teach it. 

E: How can we get teachers for it ? Internet can't teach Internet 

S:  Internet can teach Internet

E:You mean techeducation ?

S:Not only tech but techview

E:But it can be fake 

S:All educational systems are right now fake. 

E:It's bold statement. I can't take it.

S:Then leave it. 

E:OK. I am leaving. 

S: I don't mean program

E: भाडमे जा Bhadmein Ja !


6 to 6:30 chauthi navta
मी फक्त बोलत सुटलोय मी बोलतोय मी जीभा वाजवतोय मी तरंगत्या जिभेत मेंदू  वाजवतोय मी गोठलेल्या जिभेत काळीज पेटवतोय माझ्या सगळ्या अवयवांना आताशा माझ्या जिभेचा वास यायला लागलाय
                  मी बोलतोय मी मोबाईल आहे म्हणून बोलतोय मी इंटरनेट आहे म्हणून बकतोय माझ्यातला मेल इमेल होत चाललाय स्क्रीनवर -मेसेज फडफडतायत त्यांच्या आवाजातून मी बोलत सुटलोय I have thousand e-tongue to shake hand I have one ehand to shake thousand tongues खुलं जा सीम सीम म्हणत मी सीम कार्डच्या गुहा बदलत खोलतोय- बोलतोय मी भाषिक डेसिबल्स Hot & cold करत बोलतोय टल्ली भाषेचा मिल्क शेक उडवतोय माझ्यातून हजारो झल्ली कारंजी शब्दात बदकं पोहतायत मेसेजमध्ये राजहंस पोहतायत एमएमएसमध्ये कावळे पोहतायत फक्त चिमण्याच दिसत नाहीयेत त्या माझ्या मोबाईलमुळे उडून गेल्या काय? की माझ्या मोबाईल टॉवरने त्यांचा चारा पळवून न्हेला ? त्याच्या पिलांचा  मी -खुनी आहे ? चिमण्यांनो कुठे आहात ? माझा  मोबाईल तुमचं अन्न का तयार करू शकत नाहीये आणि तुम्ही परत फिरायला तयार नाही? मी मिसकॉल देतोय तुमचे रिकामे  घरटे पहात आणि तुमचा रिप्लाय नाही. मी तुम्हाला मिस्प्लेस केलं काय ? की मोबाईलधारी हाच ह्या सृष्टीतील रॉंग नंबर आहे

e - नसलेल्या चिमण्यांनो बोला 

मी बोलतोय 
आणि ऐकायला चिमण्या नेटवर्क रेंजमध्ये नाहीयेत 

*************************
लोक लोकांच्याच प्रेमात इतके मशगुल आहेत
की त्यांना त्यांच्या एकांताचा शोध पुन्हा लागायला
थोडा वेळ लागेल
पण मला खात्री आहे की
ह्या गर्दीतला प्रत्येक माणूस
कधी ना कधी स्वतःच्या एकांताकडे वळेल
तिथे मग त्याला स्वतःचा खोलात जाऊन
शोध घ्यावासा वाटेल
त्याच्या त्या शोधाच्या आरंभी
मी माझ्या कलाकृती ठेवून दिलेत

कदाचित त्या त्याला शोध घ्यायला मदत करतील
कदाचित त्या त्याला सांगतील
त्याचा एकांत माझा एकांत
वेगळे आहेत
तो वेगळ्या कलावंताचे वेगळे एकांत चाचपेल
त्याला कदाचित त्यांच्यात त्याच्या एकांतासारखा एकांत मिळेल

मला त्याचा आनंदच आहे
आणि मला खात्री आहे
की ह्या जगात जे माझ्यासारखे आहेत
तेही माझ्यासारखेच त्यांच्या कलाकृती निर्माण करून
त्याची वाट पाहतायत

तो येईल
आम्ही सर्वच वाट पाहतोय
आपल्या आपल्या जागी
आमच्या एकांताच्या वधाची

एकांत जो लोकात बसूनच लिहिला गेला होता.
......................................................................................................................................................................................................................................................................................................................................

***
पेन्टींगमध्ये थांबलेली रियॅलिटी 
मोडून काढ 

चित्रपटातील दिसेनाशी झालेली गतिमानता 
मोडून काढ 

टीव्हीतील चॉकलेट्स आणि केक वाटणारी बाळबोधता  
मोडून काढ 

ह्यांच्यापुढे मोडून पडण्यापेक्षा 
ह्यांनाच मोडीत काढलेल बरं 

तर 
किती चिल्लर हाताशी लागली 
युग मोडून 
***

6:30 to 7  internet
Regular Internet 

The world              is sold out                    In words 
                               or may be                    actually 

Who knows 
Laden               is  more powerful than Masses 

And Bush 
Who Knows 

Barbarist are using Technology  cluelessly

Teachers in

                                                                                  Q 
                                Watching Their Videos 

Dear friends just give me a call                      And tell me 
What's fanatic                      and                      What's fantastic 

The wall of my screen                                    is just broken. 


*********************************


7 to 8 love in dahisar soap

लव ऑपेरा इन दहिसर
ज्यांना मृतांनी खाऊन टाकलंय 
त्यांच भक्ष्य होण्याची माझी तयारी नाहीये 

अनिरुद्ध काय आणि आठवले काय ?
एका rational impulse नं तू त्यांना जाऊन भेटतीयेस 
आणि परततीयेस ते घेऊन 
जे मृत आहे 
मी फोन उसना घेतला म्हणून संतपणारी तू 
आता काय काय उसनं घेतीयेस 
की मी घेतला  तर ओझं 
तू घेतलास की पतंग

Double coding चा हा डबल क्रॉसिंग फ्लॅश 
वारवांर दूखावतोय माझ्या रक्ताला फ्लशमध्ये 
तुझ्यामुळे गरम होणाऱ्या नसेत 

तुझ्या politics ला माफ करेल असं प्रेम तुला हवं आहे 
आणि मी ते देऊनही 
अंतिमतः तू त्या प्रेमाचं  crystallization करणार ह्या शंकेने अस्वस्थ 

मशिदीत बसून फतवे काढणारे 
आणि स्वतःची वेळ आली की त्यांची मन मुरगळणारे इमाम 
आणि तू 
ह्यांच्यात काय फरकय ?

तुझ्यापुढे आरसा धरला तर तू चेहरा फोडण्याचाच मागे लागणार 
मिळाला तर माझा 
नाही मिळाला तर स्वतःचा 

एक Bluff master गिळत चाललाय माझा तुझा आदिम वास 
आणि एक जंगल निर्माण करू पाहणारी वनस्पती 
under observation 
छोटी छोटी होत शेवटी मायक्रोस्कोपखाली श्वास घेत 

फ्रीज्ड झालेल्या ओठांवर मी खेळवतोय कीस 
आणि तुला आलेला कंटाळा बर्फात जांभई देतोय 
किस द्यायचा नसला की बायका नसलेल्या गोष्टी शोधून किस पाडतात 

तू अखंड संतापत स्वतःचच रक्त फाडतीयेस 
आणि मी कागदी बोटी सोडत 
त्यातून पार 

मला गोष्टी जशा माझ्या टेबलवरून दिसतात 
तशा तुला तुझ्या टेबलावरून दिसत नाहीत 
अशावेळी टेबलावर येऊनही 
वाटाघाटी काय होणार ?

कारण कुठलंही टेबल निवडलं तरी 
ते एकतर तुझं 
किंवा माझं 

दोघांपासून बनलेलं टेबल कुठून आणू हे टेबलीके

तेव्हा उबव खुर्ची 
आणि ज्या आधीच मृत झाल्याने तुला सर्वशक्तिमान समजतात 
अशा आणखी काही खुर्च्यांना जन्म दे.   
***


No comments:

Post a Comment