Tuesday, October 31, 2017

शुक्रवार                                                 श्रीवाहिनी 

              आरंभ 
आपण वास्तवाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा मुसक्यात बांधतो
             फुटेज देणारा फुटेजमध्ये येतो आणि वास्तवाला स्वतःचे फूट देऊन मर्यादित करतो 
               न्यूज ऐकणारा स्वतःच्या कानाने आवाज मर्यादित करतो आणि मग त्याला जे मर्यादित ऐकू आले तेवढेच सांगतो
               तर आम्ही मर्यादाचिंन्होत्तम आहोत हे धान्यात घ्या बातम्यावर विश्वास आणि अविश्वास ठेवा आणि मगच त्या पहा
               न्यूज  चॅनेल किंवा न्यूज ही जिच्यावर अंधश्रद्धा ठेवावी इतकी महान गोष्ट नाही. ती एक माहिती आहे म्हंटली तर आवश्यक म्हटली तर अनावश्यक 
***


7:30 to 8 :30 news
आजच्या ठळक बातम्या 
              मार्क्सवादी पक्षाने नेते श्री. स्वामी ह्यांनी पत्रकाराने जी Fake story रचली त्यामागे संपूर्ण भांडवल शाही असल्याचे सांगितले यश आणि यश ह्यांनी ही भांडवलशाही पछाडून टाकते आणि मग यशासाठी माणसे कुठल्याही टोकाला जातात. पत्रकार रचविहार बिहारी ह्यांचे हे  कृत्य म्हणजे यश मिळवण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ  इच्छिणाऱ्या भांडवलशाहीचाच अवतार आहे असे  म्हंटले त्याला उत्तर देताना उद्योगपती सुटाटा ह्यांनी भांडवलशाहीने ही दीक्षा समाजवाद्यांच्याकडून  घेतल्याचे सांगितले. रशियाने  माध्यमांचा वापर करून हजारो कुंभाडे रचली आणि त्यांचा पत्ता लागायला कित्तेक वर्षे लागली. भांडवलशाहीत निदान असे कुभांड कुणी रचले तर त्याचा पत्ता आठवडाभरात लागतो असे ते म्हणाले
                काल कुरेशी ह्यांनी जे प्रतिपादन केले ते इस्लामच्या विरोधी असून अल्लाह एकच आहे ह्या तत्वाला बाधा आणणारे आहे असे प्रतिपादन दिल्लीचे इमाम बुरीन ह्यांनी केले. त्यांच्या मते Pluralismला इस्लाममध्ये स्थान  नाही अल्लाह एक आहे प्रॉफेट एक आहे कुराण एक आहे आणि  जगातले सर्व मुस्लिम एक आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. "हँ आमचे शत्रु मात्र अनेक आहेत आणि त्यांच्या बाबतीत plurality  आम्हाला मान्य आहे " असे ते म्हणाले. श्री सैय्यद बंडा ह्यांनी "मुस्लिम समाज हा सध्या धुक्यातुन चालला आहे " हे मान्य केले. इतर धर्मियांनी जशी Modernity स्वीकारली तशी मुस्लिम समाजाने स्वीकारली नाही त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झालेत असे ते म्हणाले. ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडण्यासाठी जसा मार्टिन ल्यूथर जन्मला तसा  मुस्लिम धर्मात कुणी जन्मणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  दुर्दैवाने मुस्लिम धर्मात मार्टिन ल्युथर निर्माण होण्याऐवजी ओसामा बीन लादेन निर्माण झाला असे ते म्हणाले. बाबरी मशीद पाडली जाणे ही  एक प्रतिकात्मक घटना आहे. एका अर्थाने तुम्ही तुमचा धर्म पाडून नवा इस्लाम धर्म उभा केला नाहीत तर आम्ही इतर धर्मीय तुमचा जुना धर्म पाडू असा तो इशारा आहे असे ते म्हणाले.  
            सुपरस्टार जानू खान ह्यांनी प्रिया नार्वेकर ह्यांच्या वक्तव्यावर प्रथम प्रतिक्रिया घ्यायला नकार दिला मात्र फारच छेडले असता ते म्हणाले की कुणी कितीही बोंबा मारल्या तरी presence हीच खरी सत्ता असते. अभिनेते हेच presence असतात राजकीय नेते भांडवलदार, पोप मौलवी हेच presence असतात आणि Text हीही presence च्या आधारेच interpret केली जातात तेव्हा प्रिया नार्वेकरसारख्या absence नशिबात असलेल्या लेखकांचा त्रागा हा वांझोटा ठरणे अटळ आहे
             श्री विचित्रवीर्य कौरवे ह्यांनी चुंबनावरून चाललेल्या गोंधळाबाबत आश्चर्य व्यक्त केले ते म्हणाले की मूळ चुंबन नाहीसे झाले असून आता आपण टीव्हीवर जे  पहातो ती त्या चुंबनाची व्हिडीओ रिऍलिटी आहे. मूळ चुंबनाशिवाय अस्तित्वात आलेली चिन्ह चुंबने असे त्यांचे स्वरूप आहे. अशा चिन्हीय चुंबनावर चर्चा करण्यात आपण आपला खराखुरा वेळ  वाया घालवावा का ? ज्यांना टाईमपास करायचा असेल त्यांची गोष्ट वेगळी आहे. आज प्रत्येकाच्या  घरी टीव्ही आहे आणि प्रत्येकाच्या  टीव्हीवर प्रत्येक चॅनेलने सादर केलेलं चुंबन आहे एका अर्थाने प्रत्येकाच्या घरी तीस चुंबने किमान आहेत. पूर्वी असे नव्हते चुंबन झाले की ते संपून जायाचे आता त्याच्या प्रती चिन्हप्रती ह्या अशा फिरतात पूर्वी इतर लोक हे चुंबन पाहूच शकायचे नाहीत त्यामुळे ह्या चुंबनाचे interpretation करायला भाडोत्री समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ लागायचे आता प्रत्येकाच्या घरी तीस तीस चुंबनप्रती तर ह्या मध्ये उगवणाऱ्या भाडोत्री विचारवंताची गरजच काय ? ज्याला त्याला त्या चुंबनाचा अर्थ लावू दे ना आणि ज्याला त्याला ठरवू द्या त्यांनी भर रस्त्यावर चुंबन घ्यायचे की नाही
                    श्री रवीबाबा आज भक्तांना म्हणाले की, Life is a play to achieve the goal of purpose. Life is a chance to design yourself without any hierarchy. Life is a silence full of language. Life is a unfinished performance Life is deconstruction of your ego for creativity Life is the decentring of your presence Life is breaking boundary of all texts dispersing every semantics & rhetorics Life is something depthful with beautiful surface combining & shattering meanings & interpretations, signigiers & singnified, doubts & certaintities. 
                  भक्त म्हणाले, "बाबा थोर आहेत. ते जे बोलतात त्यात खूप काही असतं. तो आशीर्वाद असतो. "
                  ज्योतिषी . वा. भट ह्यांनी "मी ला subject ला तू जो काही आहेस तो planetary effect आहे हे समजावून सांगण्याचे शास्त्र म्हणजे ज्योतिष " असे आज सांगितले. "ज्योतिषशास्त्र हे postmodernism ला planetary dimension देतं ते postmodern science कसं फंक्शन करून शकेल ह्याचा एक आदर्श नमुना पेश करतं " असे ते म्हणाले. ह्यावर शयाम देव ह्यांनी postmodern science ही भानगड scientific नसल्याने लोकांनी ज्योतिषाच्या जाळ्यात फसू नये असं सांगितलं
               श्रीधर तिळवे ह्यांनी पुन्हा एकदा पोमोचा मृत्यू झाला असं घोषत केलं. ते  म्हणाले
               "ज्यांना भाषेच्या बाहेर कधी जाता आले नाही जे भाषेत कैद झाले अशा भाषिक आणि भाषूक लोकांचे भाषाचाळे म्हणजे  पोमो होय. भाषेबाहेर ना relativity असते ना universality ना certainty असते ना uncertainty. भाषा प्रत्येक गोष्ट सापेक्ष वा निरपेक्ष करते भाषा एखादी गोष्ट निश्चित वा अनिश्चित करते पण आयुष्यातील सत्ये ही भाषेत कैद असणाऱ्या माणसांना सापडत नाही जे भाषेबाहेर पडू शकतात तेच खरे क्रियेटीव लोक इतर भाषेत निर्माण झाले आहे त्याचे फक्त भाषिक अनुकरण करतात. पोमोला काही निर्माण करायचेच नव्हते म्हणून तो फक्त जे निर्माण झालं त्याला deconstruct करत राहिला त्यातून काही भाषांतर्गत सत्ये त्याला प्राप्तही झाली. जोपर्यंत भाषा आहे तोपर्यंत ह्या सत्यांचे महत्वही राहील पण उद्या भाषा नष्टच झाली तर ही भाषिक सत्येही नष्ट होतील. भाषातित सत्ये मात्र पुन्हा शोधली जातील आणि कदाचित नव्या
भाषेत मांडले जातील. तेव्हा हे असे दळभद्री तत्वज्ञान भारताने आयात जरूर करावे पण त्याचा वापर करताना विवेक सोडू नये. विवेक जो reason शिवाय शक्य नाही विवेक जो फक्त reason मुळे अस्तित्वात येतोच असे नाही"


8 :30  to 9:30  fashion shopping kitchen
         फॅशन किचन 

          केस उगवतायत निरंतर अथकपणे 
          काखेत, नाकात, भोकात
          ही मॉडेल लाईफस्टाईल पॅरीस रनवेवर पळून जाण्यास सज्ज झाल्यापासून 

          जिलेटचे खोकेच्या खोके येऊन पडतायत 
          केस एकमेकाला मोबाईल करतायत एड कॅम्पेनच्या दरम्यान श्यामली वर्गाचे फोटो पहात 

          केस डिप्रेशनची भूछत्र पहात पनीर खातायत 
          कॉन्ट्रॅक्टसची होमटाऊन पाहू देत नाहीत 
          डोळे सकाळ होण्याआधीच केसात मावळतात 
          केस कॉस्मेटिक टिप्स घेऊन रेझरतायत सुगंधतायत बीग प्लस स्मॉल प्लस 
          केस लोंग  डिस्टन्स मॅरेज बांधून ठेवतायत एका बैलाला जो मुझे मार म्हणत नाही
         केस ब्लॉन्ड होत एजन्सीमध्ये जातायत निळ्या  डोळ्यांनी 
         केस वाढतायत वाढतायत 
         आणि आख्ख पॅरीस आयफेल टॉवर बांधून  उडवतायत 

          केस होमसीक होऊन मुंबईत परततायत आणि कपड्यांशी  निगोशियेट करतायत 
         कपडे म्हणतायत 
         बॉडी दे 
         केस म्हणतात कशी  मी देऊ ?

          केस डिवोर्स घेतायत पहिला दुसरा तिसरा 
          केस रिकोर्स करतायत पहिला दुसरा तिसरा 
          केस फुलांप्रमाणे उमलतायत 
          केस ज्यांनी ग्लॅमर पाहिलं नाही 
          केस जे सर्वांच्यापासून लपवले गेले 
          
          केस ज्यांना शरीराच्या  चोरवाटा आणि पोलीस वाटा माहित होत्या
          सांगतायत 
          गळत गळत 
         स्वतःच निर्माण केलेल्या सैतानांची कहाणी 
         मोडकळीला आलेल्या जिभेने 
         
         केस पांढरे होतायत आणि कुठल्याही रंगात मिसळून 
         नाहीशे होतायत 
         केस 
         जे फक्त कपड्यांना दिसले
         आणि कपड्यांनाच कळाले 
         शरीरावर उगवून
***


9:30 to 10 college KATTA
college college                                         

पहावे त्याच्या हातात मोबाईल निघाला
भाषेला कैद केल्याचा फील आला

क्लासरूम मध्ये मधूनच रिंगटोनचा आवाज
डिस्टर्बन्स प्रत्येकाला सवयीचा झाला

स्क्रीनवरतीच आता चढणे अन उतरणे
हायकिंग सपाट झाले हिमालय टची झाला

आय लव यू म्हणणे फारच पुचाट झाले
प्रत्यक्ष सेक्स हाच एक्सप्रेशनल झाला

मेसेजचे ढग सर्वत्र पोहचले
नदी झाला माणूस प्रदूषणही झाला

गुगलचे वर्गात बागडणे सुरु झाले
हा व्हिजीटींग प्रोफेसर मेन प्रोफेसर झाला

आम्हास वाटले ह्याने ज्ञान मुक्त केले
मुक्तिदाता समजलो ज्यास तो जेलर निघाला

*********************************************************************************


हे राजकारण आहे
कि नवे वळण आहे

हत्ती नाहीसे झाले
सिलॅबसात त्यांच्यावर प्रकरण आहे

घोडा अडीचमध्ये संपला
घौडदौड फक्त आवरण आहे

प्याद्यांचे कुणास काय
ते तर आजन्म शरण आहे

उंटांनी तिरके चालून वाळवंट गाठले
डोईवर चंद्रग्रहण आहे

वजीर पोट सुटून वजनदार झाला
जागीच खिळून अंत:करण आहे

शेवटी दोन राजे उरलेत
पाहू कुणाच्या नशिबी मरण आहे

*********************************************************************************

10 to 11 LOVE OPERA 1 love in ruia college
तुझ्या भाषेतला चिन्होरा भुंगोरा बनून फिरतोय कानाच्या श्रवणकमळात

 I love you 

तीन शब्द 
शब्दांचे जनेटिकclance  उगम पावतायत मायग्रेटरी हिस्टरी भुंजाळत 

तीन शब्द उच्चरताना ओठांचे उमललेले डिटेल्स प्रोसेसतायत पुन्हा पुन्हा फेक आणि रिअल ह्यांच्या दरम्यान 
            आसपास अविश्वासाचे जागतिकीकरण आणि संभ्रमांचा पोपटपंची विस्तार संशयाचे बागुलबुवा बिगुल वाजवत वर्ल्डवाईड रिमिक्स होतायत बाई आताशा वाजवूनच घ्यावी लागते कायदे इतके कडक होतायत कि शासन लैंगिक होत चाललंय माझ्या बेडरूम मध्ये किंवा असं म्हण कि लिंग शासकीय होत चाललंय कोर्ट कचेऱ्यातप्रेमाचं ओरीजीन विसरून कायद्याचे प्रोटोकॉल पाहत करावे लागतंय स्पर्श कायदा एका हाताने स्वातंत्र्य देतोय दुसऱ्या हाताने हिसकावतोय माझा Y क्रोमोझोम वायझेड होत नाही आताशा पिपासेत वासनेच्या मेट्रोकाँड्रियल X मध्ये चाचपत राहतो आग किती आणि फुफाटा किती ? सॅम्पल सप्लायही डेंजरस होत चाललेत एकीकडे एड्स दुसरीकडे पोलीसी  शेडस
          असं समजू नकोस कि माझा अटेन्शन स्पॅन संपलाय किंवा मी कॉन्सन्ट्रेशन क्रायसीस मध्ये भंजाळलोयनाती डोळ्यातील सल्फ्यूरिक अदा विझू नको देऊ 
मिसहप्पेनिंग सायरन इतक्यात नको वाजवू
         तू जे बोललीस त्याचा ब्लॅक इम्पॅक्ट ओसरू दे 
ऍम्प्लिफाय झालेली कातडीची अटीतटी फोकसू हृदयाच्या अग्रावर 
हा उग्रतेचा जश्न रिस्की आहेपोरी 
तुझे कोवळे सेन्सॉर सेन्सीबल कर आणि मग हि स्किनव्हिलर ढकलत ढकलत ये 
सेल्फ डायग्नोसिसच्या रस्त्यावर
        माझी फोर व्हीलर डोअर उघडून वाट पाहतिये तुझीच 
अन्गझायटी अटॅकच्या लॅम्पखाली 
हि कुठली मांसल ग्रॅव्हीटी आहे पार्वती जी बेन्ड करतीये माझ्या तुझ्या कण्यातील स्पेस 
पृथ्वीचा सरफेस कधीपासून करतोय तुझा चेहरा धारण करण्याचा प्रयत्न 
पण कधी तुझं नाक माझ्या दुर्बिणीपुढं नाक घासायला नकार देतं 
तर कधी डोळे सोल्यूशन  सापडल्याने हवालदिल सेपरेशनमध्ये डिस्टर्ट होतात
         रिस्टार्ट क्लीक करून करून थकून गेलेत माझ्या क्रियेटिविटीची बोटं 
तू बाई आहेस कि युनिव्हर्स?
रिकोलॅप्सिन्ग अवोईड करण्यासाठी किती काळ पंक्चरणार आहेस माझे रंग 
काळाला ना आदि आहे ना अंत 
त्यामुळेच त्याचा मध्यातला ब्रश 
तुझ्या ओठातील गॅलक्सीज निर्मळमध्यम सापडाव्यात म्हणून 
शोधतोय तुझं अंतिम वर्जन
        तुझ्या प्रत्येक लाईट हार्टेड भेटीचं पोट्रेट लाईटपेक्षा अधिक वेगाने धावून मी पकडतोय पण माझ्या हातात येतंय तुझं फक्त नकली गंगावण
          गंगावतारणाचा बिग बँग केसांना मुकतोय आणि पाण्याचा ड्रॉपलर इफेक्ट कॅनव्हासची डेन्सिटी पातळ करत डार्क मॅटरकडे पावले टाकत सरकतोय भरदुपारच्या कागदी कैलासपर्वतावर
        मला तुझ्या शरीराची एक दशांश अमाउंटही पुरेशी आहे तुझं फेशियल करण्यासाठी 
  तुझ्या दोन कानात दोन सोलर सिस्टीमची डूल अडकवून मला पाहायचाय तुझा धांदरट चेहरा.
 अवयवांचे लोअर एस्टीमेट मी कधीच काढत नाही 
मला आपादमस्तक बाई लागते परमेश्वराशी स्पर्धा करताना
        तेव्हा हो सारी शटर्स डाऊन करून स्टॅन्ड अप ! कसलाही स्टॅन्ड  घेता !
        बघ कसलाही आविर्भाव  आणता रेडीओसोर्स जमा करताय तुझा चेहरा
        आणि तुझं शरीर 
        माझा प्रत्येक स्ट्रोकला चिमटे काढत 
        माझ्या काळजाला प्रकाशमान करत
        स्वतःलाच कॅनव्हासवर मुद्रित करत चाललंय 

        ऐक 
        आणि कानासकट नष्ट हो माझ्या डोळ्यात
---------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------
मी निमूट ठेवतोय माझं गरम झालेलं sarcastrophic रक्त
फ्रिजमध्ये
आणि तू कम्प्युटरसमोर
गेमच्या psychodramatic पसाऱ्यात
पिसारा फुलवत screenjacked

तू
फक्त उत्तेजक वास
Pouring
किती वर्ष गाडलं होतंस जमिनीत स्वतःला
अशी फूल टू वाईन होण्यासाठी

दहशतवादापासून वाचलेला रेड
धार लावत धारावतोय
एक शांतता आहे  प्रत्येक थेंबात
गळ्यात तहान  आहे
आणि तिला तुझंच स्वप्न पडलं होतं

वयात येताना
पार्क हो
माझ्या समशितोष्ण हातात
रंग उडत चाललेल्या माझ्या प्रेमावर
हा शेवटचा मार
शिंतोडे उडवत नको येऊस
रक्ताचा accelerator दाबत
तुफान वेगाने नागव
ये
आणि ग्लासात अडकलेल्या माझ्या स्क्रिप्टचा
The End लिही.
------------------------------------------------------------------------------------------

     मे टायर्स आर टायर्ड Please Horn ! Blow your horn ! please ! go .........
अटेंड युवर अटायर्डस मी जाऊ देतोय ..... तर जा ना त्वचेचा झगमगाट थोडा चुंबनाची मिठाई पुरवणार आहे किस इज किस बेबी टच इज टच ! नाही तर नाही ! हो तर हो ! सिंथेटिक स्किन आणि रिअल स्किन ह्यांच्यात फरक कुठे राहलाय ? तुझ्याच विरहात जळाली त्वचा आणि मी ती बदलून घेतली. ये ! आती हैं तो खंडाला नहीं आती हैं तो खड्डे में डाला ! रोडरोमिओ अदा ! फिदा हैं तो बोल ! खोल तुझा झोल ! नाहीतर जा ना मी जाऊ देतोय ..... माझ्या काळजावर चढलय पिवळं प्लास्टिक पण तरीही ते कंडक्ट करतं वासनेची हिरवी इलेक्ट्रिसिटी तुझे डोळे आणि त्यातला रेडिएटरी निळा कम्पोनन्ट पाहून ! माझं मांस हायब्रीड आहे क्लोन आणि मूळ ह्यांचं म्हणून काय झालं ? तेही प्रोसेस संपलं कि सेन्सुअस होतं तुझ्या तळव्यात उमलत. रेषा रेषा वाचली जातीये हेडलॅम्पच्या जळजळाटात. एक जेल मॅट्रिक्स थरथरतंय त्वेche च्या खाली! बोटांचा पिसारा दूर क्षणी उमलतोय स्तन भेटीत! तरीही जायायचं ब्रासकट तर जा ना मी जाऊ देतोय..... बघ हात मिठी ट्रान्सपोर्ट करायला उतावीळ  होतायत एक एक स्किन लेअर स्टिम्युलेट करतीये वासनेची वाढ झाडं   लागतायत बिन फळांची येऊ का उमलून ? बर्फात गोठलेली फुले शिशिराच्या गाडीत बसून आहेत. किती काळ पार्क करू तिला बॉडीत ? पार्किंग झोन वॉक आऊट होत चाललेत ट्रॅफिकवाले येतील गाडी उचलून न्हेतील
      गेली !
      गाडी गेली !
      आता बस हा रिकामा रस्ता  
      दोन हातांनी बोंबलवत !

*********************************************************************************

11 to 12 sports
SPORTS

               पब्लीक इमेजीस वाजवत चाललाय माझा डिजिटल ऑर्केस्ट्रा
डयरसिटीचं मल्टीविजन
 सिटी सिटी मिठीमध्ये
 तुंतूचां टेक्सटाईल सेक्टर शोधत नाही कपड्याचं मूळ
शेतकऱ्यांच्या आत्महत्या फॅशनपर्यंत पोहचवण्याचं तंत्र कापसाला अवगत  नाहीये.
              मॅच सांगताच ओपन केली गेली ओपनर्स कमिटीनेच निवडले आपण दाखल झालो मैदानावर हिरवळ हुंगत खेळाइतकं मानवी काही नाही
              मरताना बाऊन्स बॅक झालो खिळ्यात अडकलो तेव्हा गुप्त पाण्याने खळखळाट केले बॅकफूटवर जाताना आख्ख रक्त मागं व्हेलं हेअरस्टाईल सेक्युअल केल्या चटके लागणारे फटके मारले हटके करत मजल दर मजल शतकापर्यंत पोहचलो आणि ज्याला नो बॉल समजलो तो यस बॉल निघून आऊट झालो
            अंगावर स्पॉन्सर झालेले कपडे आणि प्रत्येक डोळ्यात आपली इमेज
             शतक मारूनही ही बदक अवस्था कसली ? मॅन ऑफ मॅच मिळूनही हा हात हातघाईला का ?
             आपणच निर्माण केलेल्या रनांचा प्रचंड डोंगर चकाचक फ्लॅश आणि आपण  ह्यातील एकही धाव पहायला एकही झाड  नव्हतं म्हणून अस्वस्थ
            उद्या पुन्हा हिरवे मैदान
            आणि वाळलेला विक्रमी हात
***  


12 to 1 FROM WORKPLACE
1 to 2 LOVE OPERA love in j s hall
एक्सपोजरची दहशत वाटावी
एतकीही एक्सपोज नको होऊ
प्रत्येक x पोज घेत आलं की
माझा y मोस्ट वॉन्टेडमध्ये झळकायला लागतो
हे थिरथिरणारं  पाणी
ही थिरथिरणारी आग
निथळत निथळत कशाचा मांडव घालणार आहे
मांड्यात
निळसर स्वीमवेअरचं हे गांडवनृत्य
कुठल्या कुठल्या पांडूलिपींना
दांडवणार आहे दुर्बोधतेच्या दंडकरण्यात
हे खरं आहे की
खतऱ्यात आहे माझी लीव इन रिलेशनशीपची हॅट
पण मग ते कळताच वादळ निर्माण करणारं
हे लव इन इंटिवेशन इतक्या सत्वर ?
माझा फुगा अद्याप फुटलेला नाही
आणि माझा भ्रमाचा भोपळा अजून तरी  रिऍलिटी पुरवतोय
Previous आणि Next
ह्यांच्या दरम्यान बाकी आहे माझ्या प्रेयसीची
कित्येक view more body
स्लाईड शो शेअर करण्याचा आमचा रेट थोडा खालावलाय
पण अद्यापही तडकण्याआधी काचा एकमेकाचा फेस दाखवतायत
माझ्या जॅकेटमध्ये अद्याप तरी तिचे पॅकेट आहे
ही Live wire
improve होण्याचा chance आहे
आणि advance होण्याचाही
तेव्हा एअरहोस्टेस आहेस म्हणून सांगतो
तुला जिथं लॅण्ड व्हायचय तिथे माझी भूमी  नाही
तेव्हा ह्या पाण्यातून थेट तुझ्या घरी जा
तूर्तास  तरी तुझ्या तहानेचा अंत हा संत नाही.
------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------
                मेरे अंदर दस दिल है एक कातील एक मवाली एक कवी एक चिकित्सक और और और
                तू कुठल्या काळजात अडकलीयेस आणि कुठल्या काळजातून निसवतीयेस ? माझं चरित्र कधीच फेमवर आधारलेलं नव्हतं बदनामीच्या पायथ्याशी बसूनच मी नामवंत कवी झालो तुला माझ्यातलं काय नकोय ? कलंदरपणाचा कलंक ? मूडी असणारा झक्की स्वभाव ? काहीही कधीही कुठेही बडबडणारं मूल ?
              माझ्याजवळ कम्युनिकेशनचे कित्येक प्लान्स आहेत तुला  कुठला परवडतो ते तू बघ प्रेम करताना हजार एमएमएस पाठवण्यासाठी आणि फेस करण्याची कपॅसिटी माझ्या मुद्राभिनयात आहे मी स्टँडीग पॉज घेऊ शकतो आणि मोबाईलही माझ्या आऊटगोईंग ऑरगॅझममध्ये हजारो व्होल्टचा झमझमाट असतो मी इंकामींग कॉलरचा घाम काढतो
                कॉलर आयडेन्टी सोडण्याचा माझा स्वभाव नाही आठवणींचा मला अनरोमॅण्टीक तिटकारा आहे. त्यामुळे त्या प्लॅशफॉरवर्ड करण्यात माझा मेंदू वाकबगार आहे. मात्र त्या कवितेचा स्विंग येतात तेव्हा मी मैदान सोडून देत नाही शब्दांचा योग्य तो  फटका मारून मी त्यांच्यातून रन्स जमवतो.
                तेव्हा बघ
                 हातात सूरी घेऊन आलीस तरी माझ्या सायको शरीरात तुझं स्वागत आहे आणि फुले घेऊन आलीस तर सेंटली श्वासाश्वासात सेंटीमेंटल सुस्वागत.
----------------------------------------------------------------------------------------------------
2 to 4:30 cinema
4:30 TO 5:30 songs and poems
SONGS ANG POEMS
माझ्या कवितेत ना भक्ती रस होता ना रोमॅंटिक भावभावना
मी  मॉर्डन सिझोफ्रेनिक अवस्थांना पडलो नाही बळी 
        मी फ़क्त इन्टेंसिटीजच्या सिटीज उभ्या केल्या सेमीओटिक ग्लोबल गावाच्या पारावर ज्याला पाया नव्हता पण पारे होते चढणारे उतरणारे गाणारे मी जातींना शरण गेलो नाही मी सिद्ध केले की जातीच्या पल्याड उभे राहूनही लिखाण करता येते दोन पायावर उभे राहण्याची शिक्षा सोसत बसायला सीट मिळत नाही म्हणून रिझर्वेशन मागणाऱ्याताला मी नव्हतो मी उभाच राहिलो एकटाच शिष्यहिन गुरुहिन देवहिन खिळे ठोकले तरी मी घातली नाही देवाला आस्तिक साद मला बोलायचे तेच बोलत राहिलो बसलेल्यांशी 
      मी हा माझा तो परका हा स्व तो उपरा असा भेदही केला नाही भेटणारा शूटर असो संत मी सगळ्यांशी हात मिळवला आणि तरीही पाची बोट निर्मल ठेवली शाबूत सहीसकट ह्या ग्लोबल व्यवस्थेंनं  नेहमीच मागितला माझा अंगठा म्युझियम मध्ये ठेवायला पण मी सगळ्या कॅमेऱ्यातल्या अदृश्य द्रोणाचार्याना उघड़ उघड़ ठेंगा दाखवला। 
      माझे मोबाइल मी कधीच इन्शुअरड केले नाहीत की माझे पाय मी कधीच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले नाहीत  मी कधीच becoming नव्हतो त्यामुळे माझे दोन्ही आउटगोईंग आणि इनकमिंग झंझाळत राहले मध्ये मी घात करणाऱ्यांना घातांक कधीच कॅलक्युलेट केला नाही किंवा कॉम्प्लेक्स निवासस्थान म्हणून निवडला नाही। 
     मी फ़क्त झुमलो बराबरमध्ये आणि ग़लतीत कालगती काढता गतीत तोलदार वेग ठेवत आयुष्य बिनमुराद ड्राईव्ह केले। 
    माझ्या तळहातावर यश नाही म्हणून काय झाले माझ्या अपयशाचा पारा अवघे विश्व रिफ्लेक्ट करतो हे काय कमी आहे?

*********************************************************************************


5 :30 to 6  interview
एका चष्मे आणि गॉगल विकणाऱ्या विक्रेत्याची मुलाखत बाय श्रीधर तिळवे 


विक्रेता : साहेब गॉगल घेणार का गॉगल 

श्रीधर : All postmodernist were poets. They dont understand science.

विक्रेतासाहेब गॉगल घेणार का गॉगल

श्रीधर : अरे बाबा तुझा interview घ्यायला आलोय मी श्रीधर तिळवे दिग्दर्शक कधी कधी documentries                       बनवतो

विक्रेता : साहेब त्या पेक्षा गॉगल घ्या ना

Cameraman Sebi : पोस्टमॉर्डेन रंगीबेरंगी गॉगल म्हण म्हणजे साहेब घेतील साहेबाना बुद्धीचा फार शौक                                         आहे

श्रीधर : सॅबी , आधुनिकांनी चष्मे लावले , उत्तर आधुनिकवाल्यांनी रंगीबेरंगी गॉगल्स

विक्रेता : साहेब मग चष्मे देऊ का?

श्रीधर : किती खपतात रोज

विक्रेता : चष्मा एखाद दुसरा पण गॉगल वीस पंचवीस 

श्रीधर : किती सुटतात ?

विक्रेता : साहेब खरं सांगू ...... पोटापुरतं सुटतात ....... 

श्रीधर : सॅबी , आधुनिकवाल्यांनी चष्मे लावले उत्तर आधुनिकांनी कलरफूल गॉगल्स  आपणही तेच करणार                  असू तर त्यांच्यात आपल्यात फरक काय राहिला  

विक्रेता : पण साहेब फरक कशाला राहायला हवा ? तुकाराम महाराज म्हणून गेले भेदाभेद अमंगळ 

श्रीधर : भेद आणि फरक ह्यांच्यात फरक आहे थांब हँ कि फरक आणि भेद आहे ?

विक्रेता : कायबी म्हणा पण भेदाभेद अमंगळ साहेब 

श्रीधर : हा अशोक केळकरांच्या भेदविलोपनाविषयी बोलतोय का?

विक्रेता : नाही साहेब तुकारामांविषयी बोलतोय 

श्रीधर : दोघंही एकच बोलतायत 

विक्रेता : इचारू नये पण केळकरांना काही एक्सपिरन्स होता का साहेब कि उगी आपली तंगातंगी 

श्रीधर : You are impossible 

विक्रेता :म्हंजी काय सायेब साहेब ते सोडा म्या सांगतो ते ऐका 
              गरज असलं तर चष्मा वापरा 
             इम्प्रेशन माराय गॉगल 
श्रीधर : आयला हीच तर कवितेची पहिली ओळ 
विक्रेता :म्हनजे बगा सायेब तुमचं आमचं जमलं कि नाय ? येक गॉगल घ्या पन येक सांगतो येरव्ही आपलं जगताना थेट डोळं -भेदक !मग काय द्यू ?
श्रीधर :shot ! सॅबी close अप लाव . हा ग्रेट माणूस आहे
----------------------------------------------------------------------------------------------------

6 to 6:30 chauthi navta
6:30 to 7  internet
----------------------------------------------------------------------------------------------------

ON INTERNET

Me : Dear Honey
        I like your blasphermerical smell of skin when u are in ghoogat ( I cant say burqa as I am                  surrounded by purers )

You : Shayar?

Me : मेरे पागलपनका तुझपे दिल गया
        अब खुदा जाने कि ये रिअलिटी है या रिऐलिटी शो है।
        I like harmoney in Utopia ! तुझ्या श्रद्धेवर माझी श्रद्धा आहे ! सबकुछ अपनेही दिमागका दही है।  मै                ईश्वरको बुलाने ड्यूटीपे गया
        दरवानने कहा He has resigned
You : मतलब
Me : मतलब ईश्वर के  दरवानको  किसने रिझाईन किया पता नहीं
        मगर यहाँ डॉ लागू  बार बार कह रहे है।  ईश्वरला रिटायर करा।  मग म्हटले जाऊन तरी बघू                              ड्युटीवर ब्युटीवर येतो की नाही।
You : इस्माइल कहाँ है।
Me : आखातातून ईस्माईल आला। ढेर सारा पैसा।  मदरसा खोलूंगा वो भी वहाबी बोल रहा था।  तेरा नाच गाना           कैसा चल रहा है? शेख लोग महाशेखी आणि ! पैसा हजम बात ख़तमऔरत हजम बात ख़तम।                       दोनों में क्या फर्क गिरता है।        
         Internet may be an escape from reality but for internetter it is reality when he internet. नहीं                   करता।
You : वैसे उनके आँखोंके सिवा दुनियामे रख्खा क्या है
          writing इस सदीका सबसे बड़ा धोखा है।
Me : थोड़ा हल्का होके आता हूँ।  रूक !
         हल्का होना बहोत जरुरी है।
         माँ कह रही है।
         उस रंडीके साथ क्या बात कर रहे हो ?
You : Chod !
Me : I m involved I am engulfed in your heart country which is now in gulf.
You : फिर इंग्लिश ?
Me : मै फालतू में अंग्रेजी झाड़ता हूँ।  सही कहती है।
        look right now we are in same text and that is enough
You : Enough ?
Me : Market तेरे मेरे प्यार को कंट्रोल कर सकता है क्या ? तुझे उसने दुबई में बिठा दिया तो क्या ? वापस नहीं लौटेगी क्या ?

*********************************************************************************

7 to 8 love in dahisar soap
तुझी Negative बॉडी हाच  एक वब सस्पेन्स होता जो फुटत चाललाय कलिंगडासारखा आपल्या ह्या रिअल स्टफ्ड बेडरूमध्ये जे  कलिंगा वॉर चाललं होतं तुझ्या माझ्यात तुझा wordrobe च्या अष्टोप्रहार 
च्या wordrobe मध्ये स्पायडरमध्ये ते आता झालंय थेट नागडं स्क्रीनवर त्वचांची कुलुपं स्पायडरमध्ये फुटलेत मला जाणाययच काय स्पीन होतय तुझ्या त्वचेच्या आत ? स्पॅम की फ्लेम ? Emotions की Emoticons
           मी उत्सुकतेने पाहतोय आंघोळीसाठी तू उघडत असलेलं तुझं शरीर ! किती सहजपणे भिरकावले जातायत उड्डाणरिटर्न कपडे
प्रथम आपण खूप लपवतो म्हणून भांडलो
आणि आता
काहीच लपून राहिलेलं नाही म्हणून भांडतोय

तू पॅंटी ब्रा काढतीयेस आणि उत्तेजित करत नाहीयेस तू उत्तेजित होत नाहीयेस आणि बोलतही नाहीयेस
ऑफिसमध्ये जे काही झालं ते कधी एकदा तुला सांगते
 ते
 ऑफिसात तुला सांगण्यासाठी काही घडलेलं नाहीये पर्यंत
तुझी भाषा बोलून बोलून कंटाळलीये

जे उबदार होतं ते  आता उबवतंय
जे पिकत होतं ते आता पकवतय
तुझी मिठी इतकी कंटाळवाणी
केवळ सवय म्हणून तू शांततेत्वाया वाटाघाटीत किस घेऊन आत नहायला गेलीयेस
वयात येताना एक्सायटमेंट ताणणारी तू किती फॅटब्यूल होतीस !
आता सवयीत येताना फक्त फॅन्टसीचा ताण येतोय मग ताणाताणी आणि तीच क्रोधात  डिक्लेअर झालेली आणीबाणी
shop grifting ची सोय नसलेली

कुणासाठी नाचतीयेस ? अपसॉफ्ट होत
जंगल डीसप्लेस करून मिसप्लेस
विंडो ओपन करून ?


तू घराबाहेर निघून गेलीयेस सायबरवाटेने
आणि मी तुझी कोणत्याही क्षणी खबर मिळून
तू परतशील म्ह्णून
ह्या खैबरखिंडीत स्वतःलाच गाठतोय
NET लावून
***
विशीत फाटलं जातीवरून म्हणून काय झालं तिशीत गाठेन माझ्या वर्गाचा झालास की आणि त्यावेळी दुसरीचा असलास  तर पन्नाशीत गाठेनच तुझ्या भाषेत.......
                कॉमासुद्धा विचारपूर्वक टाकणारी तू शेवटच्या पत्रात विरामचिन्हंच नव्हती.
                आणि आता हा  इमेल ज्ञ अमेरिकेला गेल्याचं कळल्यावर ड्रीप इरीगेशन नेहमीच फायद्याची ठरतात असं नाही हे  तर तुझ्याच फार्महाऊसवर तू सांगितलं होतीस क्रॉप तर ड्रॉप मोजणारे तुझे वनस्पतीजन्य डोळे मोठे करत
                 माझी मुळं रिकामीच राहिली खोलवर पाण्यात ती हातात घेऊन मी स्क्रीनसमोर बसलोय तुझा हा इमेल टेकहोम मेसेज की लीवहोम मेसेज ? "Why you talk to Tare " टॉकसुद्धा बिट्रेयल वाटायचा तुला आणि मी इतर पोरीशी बोलणंही टाळून फक्त तुझ्याबरोबर मैलमैल जायाचो बोलत आणि डोलत
                तुझ्या बॅकपॅकेटमध्ये मी नेहमीच असायचो नंतर तुझ्या मंगेतराशी बोलताना  माझं लक्ष्य कायम तुझ्या त्या खिशावर. प्रतिक्षा दीर्घकाळ ताणून शेवटी मी तोडली तुझ्या लग्नात उपवास तोडावा तशी आणि मग दीर्घकाळ जो समोर आलं ते अधाश्यासारखं  खात राहिलो. तुझी त्यावेळची निषेधपत्रे फक्त डोळ्यातच झळकत राहिली किंवा Dear Dendroctunus एवढंच चिठ्ठीत लिहून थांबली आता त्या चिठ्ठयाही वयाबरोबर उडून गेल्या.
                 प्रेमात immune system  नसतेच When I think & feel about love, I think about capacity not about capacity not about an abstract idea. Hardware Not software मी कळवळून बोलतोय आणि तू "Our love is first generation Wealth" म्हणून मख्ख. नुस्तीच इंद्रियजन्य संवेदनखोरी कधीच केली नाही आपण. Methodological chemistry च्या मैदानात काळीज आणि मेंदू समाजन त्वेषानेच भडकवले आपण आणि तरीही ही दोस्ती की हे प्रेम हे कोडं सुटलं नाही प्रत्यक्ष संभोगातही आणि आता हा मेसेज प्राणाचा अंत पाहणारा
                 "तिलाही तू कळालास. तू कुणाचाच नाहीस. माझाही."
                  "माझाही " काय आहे ? प्रेम ? ग्रेट रिलीफ फंड ? फंडामेंटल एक्स्क्यूज ?

               tricky & testing game of conversation.
               पुन्हा सुरु ? काय सुरु ? उत्तर देऊ की प्रश्नात सोडू ?
               हात माऊसमध्ये सळसळतायत
               आणि तू ईमेलामधून थेट येतीयस
               कॅटवॉक करत.
---------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------
*********************************************************************
     


    जो प्रेमात पडायला उत्सुक कोवळया स्पर्शांच्या सेन्सरी मध्ये तो अचानक असा सेल्फसेन्सारड का झालाय ग्रीनरीच्या भरगच्च अंगप्रत्यगात? ज्याला रोज बाई लागायची तो हा हात अचानक राखीबद्ध का? ज्याच्या बोटावर उघड्या अंगाने पाठ नाचली ज्याच्या तळहातावर स्तनांनी निधड्या छातीने अराजकी राज्य केले तो असा राजकीय संन्यास घेऊन कुठल्या भगव्या स्क्रीनवर आयकॉनलाय? कॉईनींग करत ज्याने नाणी छापली दोन मांडयात त्याची टांकसाळ आज का आटवतीये आसक्तीची टांगसाळ?  
        हा कोणता स्पेशल इफेक्ट आहे जो माझ्या रक्ताची फिल्म रिलीज होऊ देत नाहीये तुझ्या रक्तात? हा ऍक्शन मोड आज अचानक डिफेक्टिव मुड़मध्ये का चाललाय?
       तब्येतीचे नखरे मी कधीच खपवून घेतले नाही तरी हा हेल्दी अंगताठा का काटा मोडून पडतोय काळाच्या मोडकळीस आलेल्या घड्याळात 
       तू प्रेमाचा इजहार करुन निघून गेलीयेस आणि मी नेहमीसारखा समशितोष्ण होण्याऐवजी ही कोल्ड कॉफी पित बसलोय एक वीस वर्षाची मुलगी आपल्या प्रेमात पडलीये ह्यविषयी कसलाही उत्सूकपणा बरोबरत नाहीये माझ्या मध्यमवयीन पेशीत 
        तू मला आवडतीये  पण त्या आवडीचे स्वरुप लैंगिक नाही तुला आशीर्वाद द्यावा इतकाहि बुजुर्गपणा दणकट नाही तळहातात एक सांजउदासीच व्याकुळलीये ट्यूबलाईटच्या आर्टिफिशीयल प्रकाशात वेग आवेगाचा पायाच्या अंगठ्यात मग्न आहे आणि मला माहित नाही आयुष्याला उदास करत कोण माझ्यातला उठून तुझ्याकडे पाठ करुन ह्या खिडकीतून चालता झालाय ?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

***  


No comments:

Post a Comment