6 T0 7 to prayers and
7 TO 7 :30 initial talk
All Buddhas are giving only one news i.e.
nirvana exists . All their other talks are decoration around this news and
remember each news creates gossips . All religions are gossips around this one
news i.e. Nirvana exists
गुरुवार
श्रीवाहिनी श्रीधर तिळवे नाईक
आरंभीचा टॉक
न्यूजरूममधून
आम्ही तुम्हाला जे फुटेज दाखवतो ते तुम्ही कसे पहाल ? हे पहा तुम्ही ते अनुभवाल होय ना ? तर हा अनुभव ! तो सर्वाना येतो पण यापेक्षा आम्ही जास्त काय पोहचवू शकतो का ?
तुम्ही म्हणाल अनुभवाचे म्हणून काही उन्नत रूप असते का ? तर होय ! अनुभूती ही अनुभवापेक्षा आधीक थेट आधीक टोकदार ! आम्ही तुम्हाला अनुभव देऊ शकतो पण आता तुमच्या आसपास पहा तुम्ही आणि तुमचे जग ह्यांच्या दरम्यान कुठले फुटेज आठवणींचे रेंगाळते का ? रेंगाळते ना ? तर हे फुटेज मधेच बाजूला गेले आणि थरारलात ना ? तर ही अनुभूती मात्र अनुभूतीत थोडे फुटेज मनातले बरं कडमडतेच
पण हे फुटेज आतले आणि बाहेरले सगळेच नाहीसे झाले तर ! सगळे तुम्ही थेटच अनुभवले तर आली ना प्रचिती ? आली ना ? नाही ? पण संताना मात्र ती येते बरं का ? किंवा निर्वाण प्राप्त झालेल्या बुद्धांना
तर ह्या आमच्या फुटेजचा अनुभव घ्या.
पण प्रत्यक्ष जगाची मात्र प्रचितिच घ्या.
7:30 to 8 :30 news
आजच्या ठळक बातम्या
सर्व गोष्टी सापेक्ष असतात आणि त्यांचा अर्थ तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून काय हवे आहे ह्यावर अवलंबून असतो असे पिटर जेफरसन म्हणाले. ज्या पत्रकाराने फॅब्रीकेटेड स्टोरी रचली त्याला त्या गोष्टीपासून निश्चतपणे काहीतरी हवे असणार तर ते नेमके काय हे जोपर्यंत समजत नाही तोवर ही घटना उलगडणे कठीण असे ते म्हणाले. ह्याच घटनेच्या संदर्भात श्री वाहीनी भेटल्यावर चंद्रबाबा "आपण एखाद्या गोष्टीला काही देतो हीच एक दंतकथा असल्याच " म्हणाले. आपण अर्थ देत नाही तर त्या गोष्टीला अर्थ प्राप्त होत असतो आणि आपण जे काही ह्या घटनेविषयी बोलू त्यामुळे ती गोष्ट अर्थ प्राप्त करत जाईल असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्ट एका संदर्भ चौकटीत जन्मते, वाढते आणि मरते. ही गोष्ट रचलेली होती तर ती एका विशिष्ट संदर्भ चौकटीतच रचलेली असणार आणि आज ती एका संदर्भातच वाढत आहे आणि एका संदर्भातच तिचा मृत्यू होईल असे ते म्हणाले.
समाजशास्त्रज्ञ एन. कुरेशी ह्यांनी बाबरी मशिदी बाबत वेगळाच मुद्दा उपस्थित केला. जगाच्या इतिहासात मुसलमान समाजाने जेवढी मंदिरे तोडली व मुर्त्या फोडल्या तेव्हा तो तो समाज इतका निराश झाला नाही पण एक मशीद पडल्यानंतर मात्र मुस्लीम समाज प्रचंड निराश आणि उदास झाला. हे असे का झाले ? की मुस्लिम समाज एकंदर आयुष्याबद्दल निराश आहे आणि ही निराशा तो बाबरी मशिदीच्या घटनेतून व्यक्त करतोय ? मुस्लीम समाजाच्या ह्या निराशेला जबाबदार कोण ? प्रत्येकवेळी इतरांच्याकडे बोट दाखवून ही निराशा नाहीशी व्हावी म्हणून इतका उतावीळ झाला आहे की तो आता काहीही करायला तयार आहे. त्याची ही तीव्रता चांगल्या गोष्टीकडे वळवली जायला हवी आहे आणि हे असे वळवणे हेच योग्य पण मुसलमांनानी
मात्र निगेटीव थिंकिंग चालवले आहे इतर धर्मिय Pluralism चा स्वीकार करता असताना मुस्लिम समाज मात्र Monolism चा प्रचार करण्यात गुंतला आहे. हे चित्र नवीन पिढीचा मुस्लिमच बदलू शकतो त्याने आता आऊटडेटेड झालेल्या म्हाताऱ्या पिढीला फेकून Pluralism चा स्वीकार करणारा नवा मुस्लीम समाज घडवावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रिया नार्वेकर ह्यांनी सर्वांनी मिळून सत्य निर्माण करण्याच्या संकल्पनेचा निषेध केला. सत्याची सामूहिक अंबलबजावणी सुरु आहे. सत्याचा सामूहिक शोध सहज शक्य आहे पण सत्य सर्वांना एकाच जागी एकाच वेळी सापडेल ह्यावर माझा विश्वास नाही असे त्या म्हणाल्या. ते एकाला सापडेल व तो नंतर काही सेकंदातच ते दुसऱ्याला सांगेल त्यामुळे सत्याचा प्रसार प्रचंड वेगाने होईल आणि कदाचित ते सत्य संपूर्ण तासाभरातच संपूर्ण जगाचेच होईल पण म्हणून तासाभरात संपूर्ण जगाने ते सत्य शोधले असे म्हणणे हे मूळ सत्य शोधून काढणाऱ्यावर अन्यायकारक होईल असे त्या म्हणाल्या. टेलिव्हिजन हे आजकाल तासाभरात जगभर सत्य पसरवते असं त्या म्हणाल्या अभिनयाचा आणि सत्याचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले शास्त्रज्ञाचा अभिनय करणाराअभिनयपटू व प्रत्यक्ष शास्त्रज्ञ ह्यांच्यात जो फरक आहे तोच फरक अभिनय व सत्य ह्यांच्यात आहे असं त्या म्हणाल्या.
काल चुंबनतंज्ञाच्या झालेल्या परिषदेत श्री. शैव तांत्रिक ह्यांनी '' हल्ली काही लोकांचा "सत्य construct केले जाते " ह्यावर विश्वास असल्याने हे लोक आपआपली सत्ये construct करत आहेत '' असा दोन्ही गटावर आरोप केला. ''मीडियातून दिसणारे चुंबन हे सत्य नसून ते constructed
सत्य आहे आणि ते कन्स्ट्रक्टेड सत्य सत्याविषयीची अनेक सत्ये construct करतय '' असे ते म्हणाले. माध्यमातून सध्या ह्या जोडप्याच्या चुंबनाविषयी जी सत्ये प्रक्षेपित होतायत ती पाहिली कि भोवळ येते. प्रत्यक्ष संभोग करून झाल्यानंतर जेवढी ग्लानी येणार नाही तेवढी ग्लानी ही सत्ये ऐकताना व वाचताना व पाहताना म्हणजे अनुभवताना येते असे ते म्हणाले. ह्या सगळ्यांवर माझ्या तोंडाची वाफ सॉरी माझ्या देहाची वाफ दवडवण्याऐवजी मी घरी जाऊन माझ्या बायकोचे चुंबन घेतो असे ते हसत हसत म्हणाले. त्यांच्या ह्या कृत्याने चुंबनतज्ञाच्यात मात्र संताप पसरल्याचे कळते.
रवीबाबा ह्यांनी आज ''मी माझ्या भक्तांना कुठेच कधीच कसलेच सत्य दिलेले नाही कारण सत्य हे असे कधी देताच येत नाही ''असे सांगून खळबळ उडवली. ''दिल्लीत भेटायला आध्यात्मिक पुरुष म्हणजे काही राजकीय व्यक्ति आहे का ? '' अशीही पृच्छा त्यांनी केली. सध्या जग हे एक सपाटभूमी बनलेली आहे आणि ह्या सपाटीवर एखाद्या सत्याने हजार वर्षे टिकाव धरणे हेच मुळी अशक्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी भक्तांना आज "जय सपाट व्हा अफाट "
असा नवा मंत्र दिला.
महाराष्ट्र ज्योतिषमंडळाचे प्रमुख श्री. अ. का. कुलकर्णी ह्यांनी ज्योतिष हे 'कृपा' असल्याशिवाय शक्यच नाही असे आज सांगितले . वि. ना. कुलकर्णी ह्यांनी कृपा ही out of
fashion असल्याने ज्योतिषशास्त्रासारख्या Postmodern science मध्ये कृपेला काहीच स्थान नाही असे प्रतिपादन केले. postmodern निराशेत ज्योतिष हीच लोकांना एकमेव आशा उरली आहे. किंबहुना postmodern frustration मध्ये आशेला comeback मिळवण्याचे माध्यम म्हणून ज्योतिषाकडे पाहिले जावे असे त्यांनी प्रतिपादन केले. कला, विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञान ह्यांचा योग्य तो मिलाप करून ज्योतिष शाबूत राखता येईल असे ते म्हणाले.
श्रीधर तिळवे ह्यांनी आज पुन्हा एकदा पोमोचा मृत्यू घोषित केला युरोपात जन्माला आलेल्या पोमोचा इंडियात मृत्यू घोषित करण्याचे प्रयोजन काय ह्या प्रश्नावर ते म्हणाले, "पोमोने विज्ञानाचा व वैज्ञानिक दृष्टीचा अंत घोषित केला आहे हे आपण नीट पहिले पाहिजे. आज भारताला विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीची किती गरज आहे हे आपण जाणतो. विज्ञानाची मर्यादा जाणणे आणि विज्ञानाचा मृत्यू घोषित करणे ह्यात फरक आहे. वस्तुस्थिती अशी आहे. की आईनस्टाईनच्या Theory of Relativity व हायझेनबर्गच्या Theorey of Uncertainty मुळे अंतिम एकच एक सत्य शोधणाऱ्या पारंपरिक, सृष्टीय, क्षेत्रिय विज्ञानाचा मृत्यू झाला पण ह्याच दोन्ही सिद्धांतामुळे नवीन प्रतिसृष्टीय विशीय विज्ञानाचा उदय झाला त्याचे काय ? ह्या नवविज्ञानाचा उत्सव साजरा करण्याऐवजी पोमो हा मृत्यू पावलेल्या जुनाट विज्ञानाचा मातम करण्यात धन्यता मानतो म्हणूनच पोमोचा मृत्यू गेली काही वर्षे मी जाहिर करतोय. खरेतर नव्या विज्ञानाने आपणाला दोन गोष्टी शिकवल्या.
१) सत्य हे सापेक्ष असते निरपेक्ष असे सत्य असत नाही - सापेक्षता !
२) आणि ज्या जागी उभे राहून तुम्ही जे सापेक्ष सत्य बघता तेही अनिश्चित असते- अनिश्चितता ! सापेक्षता आणि अनिश्चितता पोमोने ह्या दोन गोष्टींचा गौरव करायला हवा होता पण त्याऐवजी मातम केला म्हणूनच पोमो इज डेड Let it die.सापेक्षता आणि अनिश्चितता ही युनिव्हर्सल सत्ये आहेत का हे आपण काळजीपूर्वक तपासायला हवे असं ते म्हणाले
************************************************************************
8 :30 to
9:30 fashion shopping kitchen
फॅशन
हे त्वचाळ युग हा वाचाळ काळ हे वखवखलेले क्षण हे वचावच करणारे धर्म हे वणवणणारे व्रण हे सेलिब्रिटीज शोधणारे सण हा जाम करणारा तामझाम हा फ्लॅश होणारा फियास्को हा उरावर नाचणारा डिस्को.
दुःख होणाऱ्यासाठी नाही रडण्याकरता जागा
आसवे ढाळू पाहणाऱ्यांसाठी नाहीत एकांत देणाऱ्या बागा
आहे ते फक्त सेलिब्रेशन
वांझोटे आणि गलेलठ्ठ
फ्लश कर स्वतःचा गडगडलेला डोळा कमोडमध्ये
आणि चकाचक बेसिनमध्ये हात धुवून
जाऊन बस त्या डान्सफ्लोअरच्या वाटीत
जिथे तुझी दहाही बोटे
तूपतूपलेली असतील
घीचा स्पेशल इफेक्ट घेत - देत
निदान दिसतील.
***********************************************************************
9:30 to 10 college KATTA
कॉलेज कॉलेज
महेंद्रसिंग धोनीचे श्रीधर तिळवेच्या आवाजातील स्वगत श्रीधर तिळवे नाईक
स्मॉल टाऊन फिनॉमिनो
आडदांड जंगलांनाही आडवाटेला न्हेऊन किस केलं आता ह्या तुमच्या कॉस्मापॉलिटिन बागेची भीती काय दाखवताय ? साप हाताळणाऱ्याला बरणीतल्या विषाचं माहात्म काय सांगताय !
तुमच्या ह्या बिल्डींग्ज मला फाडून खायला मी थोडाच अरुण कोलटकर आहे ?
आम्ही गावातली उंच माणसं निर्णय करणारी
जेजुरी कवितेत नाही काळजात जोजवतो.
हे अख्ख महानगर दहा घासात पचवेन
स्वतःचा एकही दात पडू न देता
आणि तुमची ही मुंबई नावाची रांड
प्रतिव्रता करूनच
माझ्या प्लेटमध्ये नांदवेन.
तुम्ही म्हणा
स्मॉल टाऊन फिनॉमिना
आणि बातम्या द्या
10 to 11 LOVE OPERA 1 love in ruia college
लव्ह ऑपेरा इन रुईया कॉलेज
वाढदिवसादिवशी
छातीत शून्याचे शिंग खुपसून जखमातून उडून जातायत यमराजी उच्छवास ! बकालीचा पासपोर्ट कुणीच काढत नाहीये तरीही ही पेशीपेशीत हतबलता ! सगळे पासवर्ड टाईमपासवर्ड ! भाषा ही गांडू आहे एवढच कळतय हजारो कविता लिहून ! होणाऱ्यांना होतायत प्रसूतीच्या वेदना आपणाला ऐन प्रेग्नसीतही गर्भनिरोधक गोळ्यांचे भास.
पोकळीला मिश्या काढून निघून चाललय हे शहर !हलक्या कापसाचाही घण पडतोय उशीतून ! आजच्या झोपेचं शरीर सेक्सी आहे कि म्हातारं ? तिच्या ऍनकाँडावॉकमध्ये जेनिफर लोपेझचे घाटदार नितंब आहेत कि ननिर्मिती सावंतचे ज्योक ? तिच्या टुरटुरीत कुरबुर आहे की कुजबूज ? स्वप्नांचे होते आहे डॉल कन्स्ट्रक्शन की मॉलकन्स्ट्रक्शन ?
झोपेविषयी अंदाज करता येतात मात्र ते खरे की खोटे ह्याची आजमाईश होत नाही डोकं दुखतय म्हणजे झोप मेंदूत पादली बहुधा. ती सुगंधित करायला अनासिन घ्यावी की सॅरीडॉन ?
उठून कुठं जावं ? कांदिवलीत कल्पनाकडं की बाँबे सेंट्रलला सतीशकडं की मंगेश बनसोडच्या हॉस्टेलरूमवर ? अभिधात आपलं व्यंजनात्मक प्रेत विखुरतय. प्रेतानंतरही पोकळी उरतेच ! जन्मल्यावर खंत करावी की सेलिब्रेशन हे एवढ्या वाढदिवसानंतरही कळत नाहीये. मर्ढेकरांचा आणि आपला बर्थडे एकच त्याचाही मानसिक फायदा झाला प्रतिसादाच्या अभावाला तोंड देताना ! शेंबडा पोस्टमॉडर्निझम आता बोलायला लागलाय आपण त्यालाही धूप घातली नाही . इंग्रजांची सही तशी आपल्याला कधी मानवलीच नाही त्यांनी दिलेले काही चेक कॅश करताना मात्र मजा आली भविष्यशास्त्राचा तळहाताला मिळालेला असाही फायदा ही बोटे टिकवताना आपण ब्रश विकले नाहीत हेही कमी नाही.
चला वर्ष संपलं पूर्णविरामाचा पारिजातक होत नाहीये
पण खोलीभर दरवळतोय श्वासाश्वासाला कॉमा देत समाधानाचा परफ्युम !
तो आज वाढदिवसादिवशी नेमका कुणी आणून सोडला हे ३६५ वेळा त्याच्यात भटकूनही कळत नाहीये.
तो टोटल मारून टटोलतोय वाढदिवसाचे नवे कपडे
आणि आपला ३६६ वा नवा पाय
जुन्या ३६५ पायांना कापत
चालून येतोय.
************************************************************************
11 to 12 sports
क्रीडा स्पोर्ट्स
विजयी खेळी खेळून नाबाद परतल्यावर : सचिन तेंडुलकरसाठी
त्याच्या केसातून मांजरे उडत होती म्याव म्याव करत
त्याचे कपाळ स्क्रीनवरचे सगळे आयकॉनस मिरवत
त्याच्या त्वचेची चमकदार पब्लिसिटी करत होते
त्याचे डोळे दोन मोबाईल्स चमकवत
ऑडियन्सशी सर्वांगाने बोलत होते
त्याचे कान अंड्यातून कोंबडी बाहेर यावी तसे मेंदूतून
बाहेर आले होते.
त्याची नजर आनंदाने दुनिया गिळत होती
त्याचे दात पांढरे हिरे चमकवत सफाई पसरवत होते
आणि त्याने पाणी पिण्यासाठी उचललेली बॉटल
ढगाखाली नाच करत होती
त्याच्या नाकपुडया सर्वशक्तीमानता झाडत फुगत होत्या
त्याची जीभ भाषेत तरातर चालत इंटरव्यू देत होती
त्याचे तोंड खेळलेल्या खेळीचा च्युईंगगम चघळत होते
त्याचे ओठं बँकेत चुंबन डिपॉझीट करत होते
त्याचे हास्य +ve
thinking ची नोट सवांना वाचून दाखवत होते
त्याची डोकेदुखी लांब टांगा टाकत पळून जात होती
त्याच्या दातदुखीने विजय पेनकिलर म्हणून पचवायला सुरवात केली होती
त्याच्या पायदुखीने स्टॅमिना नव्या कॅल्क्युलेटरवर मोजायला आरंभ केला होता
त्याचे खेळीचे विश्लेषण मोटार इंजीन लावून पळत होते
त्याची मान पैलवानकीचा अंदाज घेत होती
त्याचे हात मधून आकाशात घुसत ग्लोवज नाचवत होते
त्याच्या भुवयाखालून मध रेंगाळत चालायला लागला होता
त्याचे हॅण्डशेक तरणेबांड रक्त वाटत होते
त्याची बोटे मजबुतीच्या खांबाखाली हातात उभी रहात होती
त्याचे तळहात नशिबला हसत हसत होते
त्याचे अंगठे डील साईन करत होते
त्याची छाती काळजातले आईवडील आणि गुरु expose करत होती
त्याचे हृदय आयुष्य हाताळत रक्तात ठेवत होते
त्याचे स्तन घड्याळांना नव्या खेळीसाठी सेट करत होते
त्याचे खांदे शॉटसची धार हवेत उडवत होते
त्याची बेंबी वल्डक्लास क्षमतेची तंबी देत होती
त्याचे वृषण त्रिकोणाचा त्रिभुज प्रदेश समृद्ध करत होतं
त्याची कंबर सात अंबरे शिलगावत होती
त्याचे पोट चिंतामुक्तीचे ढेकर देत होते
त्याच्या मांड्या अवघे मैदान कॅरी आउट करून ते हिरवळवत होते
त्याचे पाय पृथ्वी वाजवत तिला भक्कम करत होते
त्याचे गुडघे अलगद सॉफ्ट हालचाली आठवत झांजा वाजवत होते
त्याचे लिगामेन्ट्स सेंटीमेंटल होत फुले मसलत होते
तो आणखी एका विजयाची खात्री देत
टीव्हीत वितळत चालला होता
आणि त्याची बायको कालपासून सांभाळायला दिलेला
त्याच्या आत्मविश्वासाचा श्वास
स्वतःच्या चिमटीत प्राणांतिकपणे पकडून
त्याने दिलेल्या सुईवर
रुक्मिणीसारखी उभी होती
*******************************************************************************
12 to 1 FROM WORKPLACE communist party office
कॉम्रेड्ससाठी आणखी एक कविता
कॉम्रेड्स
तुम्ही एका अश्या झाडाची वाट पहात होता
ज्याला मुळे न्हवती
आणि जे आकाशापासून सुरु होऊन
आकाशातच संपले होते
अश्या झाडाला फक्त ढग येतात
तुम्हाला ते ढगदार दृश्य ढंगदार वाटलं
आणि तुम्ही ढगात गेलात
पोस्टमॉडर्निझम म्हणजे रूटलेस असणं
तिथून सुरु झालं
आता ढगांना स्थिर आकार नसतोच म्हणून
फॉर्मलेस सुरु झालं
इतकं प्रभावी झाड इतिहासात प्रथमच जन्मलं
आणि ते इतिहास वारण्याऐवजी
इतिहासच त्या झाडात वारला
आता History Is Dead अशी घोषणा
भांडवल शाहीने दिली म्हणून
शेखचिल्लीच्या फांदीवर बसून का रडता आहात कॉम्रेड
उठा आणि उतरा
सगळे कॉम्रेड ह्या झाडावरून उतरले कि
ह्या झाडाचे आभास आपोआप नाहीसे होतील
मारा उड्या
एक.
दोन.
तीन
हिटलर , मुसोलिनी , स्टॅलिन आणि माओनंतर
जी गांड फाटून हातात आली
ती गांड म्हणजे पोस्टमॉडर्निझम कॉम्रेड
उलट्या पावलांनी मार्क्सवाद.
चालवला म्हणजे
स्टॅलिन माओ सुलट होतील
असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय कॉम्रेड
Text is created by text
म्हंटल म्हणजे
author नष्ट होईल काय ?
हे साम्यवादाविरोधातले
साम्यवादीच फ्रस्टेशन आहे
ह्याचा उमज पडेल काय ?
ऑथर टेक्स्ट जन्माला घालत नसून
टेक्स्ट ऑथरला जन्माला घालते
आणि माणूस व्यवस्थेला जन्माला घालत नसून
व्यवस्था माणसाला जन्माला घालते
असं म्हणणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
हे तुम्हाला कळत नाही का कॉम्रेड
एक सेमिऑटिक कम्युनिझम आहे
तर दुसरा मार्क्सिस्ट कम्युनिझम
हे उमजून घ्यायचंय का कॉम्रेड ?
व्यक्तीला नष्ट करण्याची
ही गांडू मोहिम कितीकाळ
चालवणार कॉम्रेड ?
मार्क्स आता पांडू हवालदारसारखा
दिसायला लागलाय
इतकंही स्पष्ट सत्य
दिसू नये का कॉम्रेड
इस्लामी टेररिस्ट आणि तुम्ही
ह्यांच्यात काय फरक राहिलाय कॉम्रेड ?
तुम्ही दास कॅपिटलचे दास
आणि ते कुराणाचे आभास
टेक्सट्स क्रियेटेड बाय टेक्स्टस ?
असं पुस्तक बनू नका कॉम्रेड
असं पुस्तकाचा विस्तार बनू नका
आपण माणूस आहोत
आपण हरलेलो नाहीये
आपलं पुस्तक आऊटडेटेड झालंय
भांडवलशाही विजयी झालेली नाही
तिचे पर्याय हरवलेत
या
पुस्तकातून बाहेर या
या
झाडावरून उतरून खाली या
आपण माळी आहोत
आणि जंगल निर्माण करणे
आपल्या डाव्या हाताचा मळ आहे
या
माणूसकेंद्री सृजनशील हातांनी
******************************
1 to 2 LOVE OPERA around j s hall
वाढदिवसादिवशी natraj hotel पबमध्ये
ही नेटवर्क रिलीफ कीट घेऊन कुठ चाललीयेस अक्सेस नसलेल्या ह्या शहरात ? इथे बायकांना सक्सेस मिळतं इंटरफ्लोटिंगच्या गॅरन्टीवर ! जिथे इंटरनेटही जडशीळ होऊन पडलंय तिथे तुझ्या त्वचेतून उसळणाऱ्या त्सुनामी नॉनअप्लिकेबल आहेत. एक व्हर्टिकल टेक ऑफ घेऊन एका पुरुषांत लॅण्डिंग करण्याचे volantor दिवस संपले पोरी. नजरांचा खेळखंडोबा जागर करतोय व्हर्च्युअल साफसफाईत !स्पीडकंट्रोल गुंग असताना डिरेक्शन कंट्रोल सुटला आत्मभानाचा आणि अहंकाराच्या अटीट्युड टेस्टस काईट फ्लाईंग करत राहिल्या माऊसभर.
bolero करता करता तमाशात घुसणारा महापुरुष तुला चालत नाही तर मी काय करू ? तुणतुणं वाजवणाऱ्याला कायं तुणतुणं वाजवतोय म्हणून उठता बसता खुळ्यात काढणाऱ्या तुझ्या फालतू मैत्रिणी !
त्यांच्या टोन्टसचा मॉडरेट टेम्पो तुला extremist वाटतोय हाही माझाच गुन्हा काय ? बीथोवेनच्या
Bolero a solo Wo D 158 बद्दल मलाही आदर आहे पण स्वतःच्या अभंगबाज चेहऱ्याचा द्वेष करायला मी अद्याप शिकलेलो नाही.
ही vishing ची व्हिशीयस प्रॅक्टीस सोडून दे म्हंटल्यावर क्रेडीट कार्ड्स चाळवत चाळवत राग कशाला देतेस ? प्रेमाचं व्हेरीफिकेशन करणारा नमुना अद्याप कुणाला सापडलेला नाही १ हे इनफर्मेशन चघळणारे ओठ चुम्बनी करायला मला किती चुंबक लावायला भाग पाडणार आहेस हे दख्खनखणी फिल्डिंगगुणी बये ?
रक्ताचं राजकारण करणारं हे शहर आणि रक्त सेलिब्रेट करणारा हा माणूसदाणा पब
एकटीच आलीयेस तर दुकटी हो माझ्याबरोबर
ह्या प्रकाशाच्या क्रिमीनल कोनफीगरेशनखाली दबून जाऊ नकोस फक्त हा हात ठेव माझ्या खांद्याच्या बाल्कनीवर आणि तुझ्या काळजाचा बाल्कन प्रदेश माझ्या काळजाच्या वल्ड पीस सेंटरमध्ये कायमचा भाषांतरीत कर नाचता नाचता तडफदार बेभानीत
बघ एक बुद्ध त्याच्या आवाजाची कॉईन पाडत येतोय शांततेचा निर्वाणवटीत
त्याला ह्या शहराचा PIN विचारून क्षुल्लक करू नकोस
काही राजवटी राजधानी शिवायही चालू द्याव्यात पोरी
माणसाचं वैभव फुलातही टिकू द्यावं
थांब !
नाच !
उमलं !
**************************************************************************
2 to 4:30 cinema
4:30 TO 5:30 songs and poems
सॉन्ग्ज अँड पोएम्स
एक गाण कळलं की एक माणूस कळतो
एक माणूस कळला की आख्खी मानवजात
एक मानवजात कळली की एकच एक एकम
अहो रूपमाचा ध्वनिमार आणि रोज कोसळणारा कवितांचा पाऊस
फ़क्त मोबाईलच बदलतोय त्याचं रूप
आणि आपला ग्लोबल म्हणवणारा पाय रोमिंग रोमिंग करत
त्याच घराच्या भाड़ोत्री चिखलात
स्वत:च स्वतःला कधी कळलो नाही
स्वतःत कधी संपूर्ण जळलो नाही
गाण्यातला साधा नखाएवढा शब्दहि
सॅटेलाइट लावूनही उजळला नाही
दुर्बोधतेच्या मिश्किल स्माईलीज
आणि एसएमएस मधून येणारे रोजाना छाटपुट जोक्स
बत्तीस दात दाखवून
थोडीच परतणार आहे ट्यूबमधून बाहेर पडलेली पेस्ट ?
हा पेशंसचा डाव एकाच खेळीत मिलियनभर पत्ते टाकणार
आणि आपण दोन डोळ्यांनी वाचणार
आंधळ्या डोळ्यांनी टाईप केलेला आपला ईमेल अड्रेस
ज्या माणसाला दोस्ताना कळला नाही
त्या माणसाला कसे पावावे हे हितसंबंध वळवत बसणारे गूगलबाज शहर
कैंडल्स जळतायत कीजच्या
आणि आपल्या आयुष्याचं मेण
शेण खात
भारनियम पाळत
विझलेल्या दिव्याचं क्षेत्रफळ मोजतय
वेळ अशी आलीये
की का लिहितोय तेही कळत नाहीये
कदाचित म्हणूनच कवी म्हणून शाबूत आहे
आपलं गावरान
हा जांगड़गुत्ता हा रंगबाजार हा रंडीसत्ता हा शेअरमटका
हा प्रेअरझोल हा पैश्याळ नवस हा सेलेब्रिटीफंडा हा गंडीवफशीव दंडा
जर गणपतीही मागतो कार
लायकी बघून भक्ताची
वा रोलक्स घड्याळ प्रभोदवीत
तर फ़क्त दोन पाय शाबूत असणाऱ्या भक्ताने
कुठली वेळ साधावी
बंद पडलेल्या घडीत
जीभ कापून माझी
रेकॉर्डिंग रुमकड़े चाललेल्या माझ्या नॉनकॅमेरेबल शब्दानो
गा, ब्लॉगा, ब्लब्लागा
पण उघड्या डोळ्यांनी, नागड्या कानांनी ह्या आर्टिफिशल इंटीलीजीन्सच्या बागेत
तुम्ही जिवंत आहात ही खबर कानोकान पोहचलीच पाहिजे
सारे कान्स फेस्टीवल्स पार करुन
*********************************************************************************
5 :30 to 6
interview
श्रीधर तिळवे ह्यांची पर्यावरणतज्ञाशी बातचीत
S : ही वादळापूर्वीची शांतता आहे का?
A : शांतता हेच सर्वात मोठे महावादळ दुर्दैवाने ते फारसे कुणाला प्राप्त होत नाही. तिच्यात
ब्रह्मांड अनहत आवाजात घोंघावतं
S : मी झाडांना हात दिले
काटणारे मानवी हात रोखण्यासाठी
A : जमाना ' आज रोख ' चा आहे आणि झाड़े अनेकांना उधारीची गोष्ट वाटते ती उदया परवा
पुन्हा लावू आज रोख कशात तर झाड़े काटन्यात मग झाड़े कटणारच
S : मी पक्ष्यांना मेटलिक स्किन दिली
मानवी हव्यासाच्या पसाऱ्यापासून वाचवण्यासाठी
A : त्यांना त्यामुळे उड़ता येणार नाही आणि स्थलांतर न करणारे फारसे टिकू नाही शकत ह्या
आजच्या जगात
S : मी वाघांना उडण्याची शक्ति दिली
शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी
A : पण उडाले तरी भूक लागणारच ना ? मग उडून येणार कुठं ? मानवी वस्तीत ! म्हणजे
शिकाऱ्यांच्यातच ! म्हणजे उडाल्यामुळे ते माणसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता
जास्त
S : हे सर्व इंटरनेटवर घडलं फोटोपेजमध्ये
A : मग ठिकय पण त्याने झाडांना, पक्ष्यांना, वाघांना फायदा काय ?
S : आता मी वाट पाहतोय
इंटरनेट माणसावर कधी चालून जातं ह्याची
A : इंटरनेट माणसावर चालून आलं काय
किंवा माणसं इंटरनेटमधे चालत गेली काय
त्याने नामशेष होणे थोडच थांबणार आहे ?
S : त्याला फ़क्त माझ्या कवितेला टच करायचय
मी वाट पाहतोय त्याला मांसल बोट फुटण्याची
जे माझ्या कवितेला टचटचीत टच करेल
A :
What an hot rounder style !
S : कविता इंटरनेटच्या पोटात
सुहागरात्रीची वाट पाहतिये
A : म्हणजे कवी आणि कविता एकुणातच निरोपयोगीच म्हणायचे झाडांच्या, पक्ष्यांच्या,
पशुंच्या, संरक्षणाच्या संदर्भात
*********************************************************************************
6 to 6:30 chauthi navta pub
6:30 to 7 internet yes
IRREGULAR INTERNET
Me :
What I thought as great appearance
was just guest appearance
You :
Indian English Is simulacra
to cover up the absence to
appropriate English
Me :
Why is boobing boobs honey
Waiting for sugarcane?
You :
Everything is fabricated. It means fabric is real !
Me :
Staggering In Web?
You :
Signs Everywhere
but lack of signature
Me :
Sense of inarticulateness
be polite and patient
You :
You mean polish ?
Me :
Weightless body of silent accents
moving moving moving and die
You :
But I am not talking
Me :
Dyeing?
You :
Its killing man
Me : I
mean on websheet
I mean it's webshit on websheet
I webmean its webshit on websheet
I webmean webit's webon websheet
Webi webmeans webit's
webshit webon websheet
*********************************************************************************
7 to 8 love in dahisar soap yes
कित्येक गोष्टी अंधुकश्या दिसतायत टिव्ही आल्यापासुन
प्रेयसीचा स्तन आईचे मन भावाचा धन बहिणींचा फन भाचीचा रन भाच्याचा
मित्रगण
सगळं अंधुक होत चाललंय धाकधुक शाबूत ठेवत
बायका सोप ऑपेरा पाहतायत आणि अधूनमधून जेवणही
वाढतायत
पुरुष फेस्टीवल्स आणि कास्टिवल्स दोन्ही अटेन्ड
करतायत
पोरं कार्निवल्स आणि हॉर्निवल्स दोन्हि एन्जॉय करतायत
जे जाहिरातीत आहे ते घरी कधी येतंय ह्याची वाट पाहतायत
सगळ्यांचे डोळे
जी सोप ऑपेरात आहेत ती सारी भांडणे प्रत्यक्ष घरात कधी
एन्ट्री मिळतीये ह्याची वाट पाहत दबा धरून आहेत
कौन बनेगा करोडपतीतच मौन आहेत करोडो पती
फक्त एक जीभच आहे जिला आपल्या जागी स्वस्थ बसता येत नाहीये ती तिला मिळेल त्या जागी
जाऊन बसतीये आणि फॅड काढून वाट बघतीये
तिचा डंख हीच इंटरवल
किंवा स्पिरिच्युअल ब्रेक
*********************************************************************************
प्रेमाची अँटिक गॅरंटी देण्याइतकं टिकावू नाही माझं तारुण्य !फेस बदलताच फेज बदलणारं
हे फॅन एज !
माझ्या त्वचेवर शिगेशिग उगवतय रक्ताचा नायगरा उभा करणारं व्हायग्रा रिलोडेड!
मॅट्रिक्समध्ये संभोगाचं डिस्नेवल्ड !
मी बारा गोळ्या खाऊन thokकतोय आणि तू मरत नाहीस.
व्हायग्रालाही दमवणारी हि टिकावू शरीरपद्धत तू कधी आतमसात केली हे ट्रीपलएक्सीनी?
तुलाही माहित आहे कि काही क्षणांनी फिरवणार आहोत आपण एकमेकांकडे ही प्रयत्न
करूनही लिजेंडरी न झालेली पाठ !तरीही व्हायग्राची मदत घेऊन लांबवतोय आपण हे क्षणभंगुर अमरत्व ! असं नाहीये कि मला ताठ होता येत नाही पण दीर्घकाळ कणे मजबूत करणारी हि इन्स्टंट उपाययोजना आता सवयीची बनतीये आणि सोयीचीही
तू उफानत ब्लॅक होल खोलतीयेस आणि मी तारकांचे पुंजे हातानी तुझ्या स्तनावर ओतत
गुरुत्वात रक्ताच्या तहानपिसाट स्ट्रिंग्ज एक आकाशगंगा बनवत पांढऱ्या स्पंदानी तिला तुझ्यात घुसवतायत.
खुलासा! झकास! पासपास!
आपण एकमेकांचं मृत्यूपत्र एकमेकांच्या नावाने करून एकमेकांची बॉडी इस्टेट एकमेकाला
देत दिवाळखोर होतोय
एक जुनं जंगल संपतंय एका दिवाळीत
आणि एक नवं जंगल उगवण्याची तयारी करतय
अनयुज्ड व्हायग्राच्या निळ्या कुंडीत
*********************************************************************************
पाठसुद्धा हाताशी लागत नाहीये
ह्या पाठलागात सभोवताली करोडो खाणाखुणा आणि
लक्ष्यावधी मार्ग
प्रत्येक खुणेवर दहा ट्राफिक
माग काढावा तर कसा काढावा हातमार्गानी.
काय चेस करतोय तेही कळेनासं झालाय वेगाची किक अस्थेटीकली चढतीये
स्टेशने
आरश्याला लटकतायत
पण थांबावेसे वाटत नाही
पायच झोलरकोस्टर झालेत आणि टायरमध्ये झिरपलेत
ड्रायविंग ड्रिंकमध्ये मिसळून ड्रायवर सीटवर बसलेले अंग
बोलत राहतं मोबाईलवर अव्याहत
ड्रिंकिंग, ड्रायव्हिंग, टॉकिंग,
कळूनसवरूनही वेगळे काढता येत नाहीयेत
अपघात, गाडीवर सतत टांगते
पण हि टंग आणि आसपासच्या टग्ज
एक ऑटोमनेजमेन्ट करणारी चावी हवी आहे काळजाला.
सेफ ड्राइविंगचे जाहिरातबोर्ड मेंदूत नीट नाचवणारी एक फिट नर्तिका हवी आहे
डोळे शब्द वाचतात
आणि अलगद भाषेत सोडतात
माणूस भाषा आहे म्हणणारे लोक सर्वत्र आणि भाषेची बेइज्जत
सार्वत्रिक जगण्याचं कॉस्ट इफेक्टिव्ह सोलुशन शोधणारे रक्त कटकटीत
ब्रेस्ट कॅन्सरशी लढतंय
दिव्याखाली बसून वायरलेस प्रकाशात व्हाव्या ब्लूटूथ
दातही किडायचे थांबत नाहीयेत
मग आयुष्य काय थांबणार?
भुकेची रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेयंटीफाय होत नाहीये
बस ताठणाऱ्या गोष्ट ताठतात
क्या कुल है हम म्हणत
फ्रिजमधले पाणी इंटरवल म्हणून पीत जे गाडीत गरम झालय.
चेस चालू आहे
चेस खेळतोय
पाठलागाची ना पाठ दिसतीये ना तोंड
तरीही पिच्छा पिच्छा पुरवतोय
सोंगळ्या घेऊन
I am driving while talking now. I will call you later when I talk
to destination correctly.
बाय हनी
भाषा संपवून घरी परतेन
******************************************************************
4
बघता बघता टेलिफोन बूथ घरी आला
बघता बघता प्रिंटर घरी आला
बघता बघता थियटर होम थिएटर झालं
बघता बघता होम डिलिव्हरी झाली फूडची फर्निचरची बँकेची
घरी आला नाही फक्त तोच
जो ह्या साऱ्यांचे हफ्ते भरायला
घराबाहेर गेला होता
No comments:
Post a Comment