Tuesday, October 31, 2017

8 to 9 mobaila MOBAILA yes
मोबाईला मोबाईला                     
एकावन्नवा शेवट 

मोबाइल बोलतयात 

जे शब्द त्यांना पुरवले गेले 
ते उच्चारत 

ते माणसांना अर्थ देतायत 

जे अर्थ माणसांनी त्यांना दिले होते 

प्रत्येक वाक्य 
आसपासच्या वाक्यांना अर्थ विचारत
आणि अर्थ पुरवत प्रकट होतंय 

 भाषा सर्व अवतार पहात 
चकित होतीये 
आणि तिचं  चकीत होणही
नविन वाक्ये  प्रकट करतय 

शब्द ब्लर होतायत ब्ला ब्ला होतायत 
ब्लू ब्लू होतायत ब्लो ब्लो होतायत

ब्लॉ ब्लॉ होतायत ब्ल ब्ल होतायत
ब्ली ब्ली होतायत ब्लौ ब्लौ होतायत
ब्लै ब्लै होतायत ब्लै ब्लै होतायत
ब्ल ब्ल होतायत blah blah  होतायत 

त्यांना अहम ब्रम्हास्मि व्हायचय
आणि ते अहम ब्लम्हास्मि होतायत
त्यांना कळत नाहीये
हा दोष त्यांचा आहे की मोबाईल्सचा

भाषा मॅनेज केला गेलेला इवेंट होतीये
किंवा eVENT होतीये किंवा EVENT होतीये
किंवा event होतीये किंवा evEnt होतीये
किंवा EVeNT होतीये किंवा VNT होतीये

कुणालाच माहित नाही
हे Eventure कुठं घेऊन जाणारय ?

मोबाईल मोबाईल बा मोबाईल बामोईल
मोईलबा मोईबाल बाल बाईल बा मो मोब, मॉब, बाई
मोबाईल मोमो बोबो ईइ लल
बोलतायत

।। बावन्नावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
त्यांना कळत नाहीये की
ते इफेक्टीव बोलतायत की डिफेक्टीव

आजकाल डी ह्या अक्षराचा महिमा
असा काय वाढलाय
की लोचक 'डी' गॅंगला घाबरायला लागेलत

Deconstruction- Decast- Demand
Destable- Distraction- Denude

मेम्बर्स वाढत चाललेत

त्यामुळे जे Defective आहे
तेच effective ही वाटायला लागलंय

माणसे युद्ध जिंकतायत- केवळ D इफेक्ट आणि स्पेशल D इफेक्टच्या आधारे
आणि एकटीच घरी परततायत

माणसे नवरा / बायकोशी बोलताना एकटी होतायत
माणसे आईवडिलांशी बोलताना एकटी होतायत
माणसे मुलाशी बोलताना एकटी होतायत
माणसे मित्राशी बोलताना एकटी होतायत 
माणसे नातेवाईकांशी/ बॉसशी/ नोकराशी
कुणाकुणाशी  बोलताना एकटी होतायत

माणसे
जी प्रत्यक्षात एकमेकाशी नीट बोलू शकत नाहीत
मोबाईलवर एकमेकांशी बोलून
नीट होण्याचा प्रयत्न करतायत

मोबाईल बोलतायत
Faceless, Voiceless, Senseless, Selfless, 'I' less
Topless, Bottomless, Headless, Heartless
Lessless.

।।त्रेपन्नावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मी आणि बाई
लागलेत
........ e .............

।।चौपन्नावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मोरूचा
बा
बोलतायत

।। पंच्चावन्नवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
पंचा
पंच
पंचीग
पंचांग
त्यांना पंचावनवा शेवट
सापडत नाहीये

।।छप्पनावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
"अबतक छप्पन"

।।सत्तावनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
'सत्ता ' शेवट करावा म्हणून

।। अठ्ठावनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
अठ्ठा सट्ट्यावर लावत

।।एकोणसाठवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
घाबरून
त्यांना आता लवकरच 'साठी' लागेल म्हणून

।।साठावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

कळत नाही कॉल्सनी कधी गाठली साठी
स्क्रीनकपाळावर नाही तरी शब्दांची आठी

बोलणे संपले आहे असे बोलताना वाटते तोच
आणखी काही कॉल्स लागतात आमच्या पाटी

मोबाईलवर बोलणाऱ्यांनी गझल लिहावी की नाही
उत्तरआधुनिकता उमटली नाही पुरेशी ललाटी

ज्याने कॉल केला तो तर मरून गेला
मोबाईल शोधतो आहे त्याच्यासाठी ताठी

इतके लिहून झाले तरीही कळत नाही
की हा साठावा शेवट की ही शेवटांची साठी

।।एकसष्टवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
तुम्हीही बोला

हॉट कूल कोल्ड बोल्ड थ्रीशोल्ड

आईशी बाईशी शाईशी ताईशी घाईशी खाईशी 

पाईपाईची वसूली कर

फुगीर बधीर अधीर गंभीर काफीर फिरा

अडथळे गोतवळे श्रोतावळे आवळे विळे भोपले पार करत
प्रवास वनवास हव्यास सुवास मधुवास साजरे करा

टांगात फाका वक्षात वाका दारूत झोका काळजात  ठोका

बोला आणि खोला बोला आणि डोला बोला आणि टटोला

प्रिपेड पोस्टपेड हाफपेड फुलपेड झाडं लावा

।।बासष्टवा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत
बोलता बोलता विचारतायत
"जागृती झोपेपेक्षा खरोखर श्रेष्ठ का ? का ?"

"इतिहास अस्तित्वात कशाला हवा "
"वर्तमानातच जगायचंय हे कळाल्यावर ?"

"Drafts, Mystry
Installation of fame
Under the falame
or  Under the blame ?
or Framed "

।। त्रेसष्टवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
माणसांचा ड्रेस घालून
Fashion of Nothingness Passion for Everything Buddhas without God writs that God is unnecessary evil with civil intentions intensifying batchlorhood in wood celebrating in utter peace or piece or in awe of paw

Who is in exile                Mobile ?
Oh Not Again                  This bloody pain
Out of Order                     Disorder
Arrange this means disarrange everything than  this
forget yaar                        Bliss ! Bliss ! Bliss !
bliss of talking
oh Fuck me Oh Oh Oh
Hold it Behold it Suck Fuck Chuck Aha !
At Last- Aghast !

।। चौसष्टावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
श्रद्धेने
श्रद्धा ठेवा
श्रद्धा सगळं घडवते पर्वत हलवते
आणखी काय काय हलवते?

बस्स श्रद्धा ठेवा
श्रद्धा कामाला येते
श्रद्धेमुळेच कामे होतात

अर्धा डझन श्रद्धा
एक डझन श्रद्धा
श्रद्धा श्रद्धांशी बोलतायत
शब्द ही अंतिमतः श्रद्धा  आहे
म्हणून तर देवाचे शब्द प्रेषितांचे शब्द

श्रद्धेने वाचले पाहिजेत
श्रद्धेने ऐकले पाहिजेत
श्रद्धेने बोलले पाहिजेत
शब्द संशयास्पद झज्ञले तर
देव संशयास्पद होणारे नाहीत काय ?
श्रद्धा ठेवेल
त्याला देव हवा तसा मोबाईल पाठवेल

त्या मोबाईलवर हवे तेवढे बोला
अनलिमिटेड टॉक टाईम
पेड बाय देव

मोबाईल बोलतायत

।।पासष्टावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
माणसे त्यांना खिश्यात घालून फिरतायत
माणसे शाबूत आहेत

।। सहासष्टावा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत
त्यांना कवींची नावे माहित नाहीत, त्यामुळे काही बिघडतय असं त्यांना वाटत नाही त्यामुळे त्यांचे काही बिघडतानाही दिसत नाहीये 
गर्भपात, इराक अमेरिका वॉर, टेलिव्हिजन, हिंदी सिनेमे, शाहरुख खान, ऐश्वर्या रॉय, सानिया मिर्झा, मॅकडोनॉल्ड, इंडिया इज शायनिंग, कंट्री विथ मेनी गॉड्स बट विदाउट  वन कनफर्म गॉड, बॉस, साईबाबा, बालाजी, टक्कल, बोलायला चिक्कार विषय आहेत.

मोबाईल त्यावर बोलतायत
त्यांना कवी कुठेच दिसत नाहीत
कवी इराकमध्ये नाहीत 
कवी ट्वीन टॉवर्समध्ये नव्हते 
कवी जागतिकीकरणाची policy ड्रॉफ्ट होत होती तेव्हा नव्हते 
कवी इवन निरुपद्रवी दहशतवादीही बनताना दिसत नाहीयेत
कवींच्यावर काय बोलायचंच ?
इंडियात काही त्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होत नाही
अजून पिक्चर्स पाहून संपत नाहीत
मग कवी कधी वाचायचे ?
जे देखे रवी  ते देखे कवी
कवी  ज्यांना बायकोचं  काय चाललय तेही कळत नाही ते सूर्य काय पाहणार ?

                     कवींना एकतर ह्या युगात टोप्या घालता येत नाहीयेत किंवा कवी पूर्वी टोप्या घालायचे आणि लोक फसायचे आता लोक शहाणे झालेत त्यामुळे ते कवींच्याकडून टोप्या घालून घेत नाहीयेत.
कवीनी नवीन युगात टोप्या घालण्यासाठी सेल्समन शिपची नोकरी करायला हवी
              
           कवींना बहुधा मोबाईलवर त्यांच्या कविता बोलता येत नाहीत
म्हणून Poets are replaced by Mobiles
मोबाईल्स बोलतायत किंवा
असे म्हणा
मोबाईल्स कविता वाचतायत   

।। सदुष्टाचा शेवट ।।
मोबाईल बोलतायत - माझ्याशी

मै और मेरा मोबाईल अक्सर ये  बाते करते है 
हम और दुनिया एकसाथ सायबरटेनिक हो जायेंगे तो ये होता वारे होता या वो होता एक साथ होते तो इस इलेक्ट्रॉनिक बाजारमे शांती को प्रोग्राम करके हम बिसलरिका पानी पिते पीते नदीकी शुद्धता को छूते Back to Nature का ड्यूयेट song . आर. रेहमानसे कम्पोज करवाके सेमिऑटिक जंगलमे गाते इंटरनेटसे दुनिया जंटल बनाते और हंसते
मगर ये हो   सका
और अब ये आलम हैं कि 
दुनिया, दुनिया का गम और उसकी जूस्तजूभी नही
गुजर रही है जिंदगी कुछ इस तरह
इसे किसी माउसकी आरजुभी नही
मी आणि माझे मोबाईल
अक्सर ये बाते करते है

।। आडुसष्टावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत - बोलू देत
आपल्याजवळ मोबाईल नाही म्हणून काय झालं ?  
माझ्या जवळ M. TV. साठी लिहिलेल्या घोस्ट रायटिंगचे पाचशे रुपये आहेत.
चाळीस रूपयाचा आटा घेऊ. वीस रूपयाची भाजी, गवारी मला आवडते. तुला ? ठीक ! भेंडी घेऊ. पंधरा रुपयाची उडपी फिल्टर कॉफी पिऊ. शंभर रुपयाचा कवितासंग्रह. तुझी हरकत नसेल तर. शंभर रुपये ज्याच्यासाठी टाकावे असा कवी  कुठे आहे ? आहेत आहेत. ऐकीव माहितीवर  विश्वास नको ठेवू, बेस्टसाठी वीस रुपये. वेटरसाठी टीप सोडूया का ? मराठी माणूस टीप सोडत नाही अशी अफवा आहे ती  मोडायला ? अफवा मोडणं हे कवींच  काम आहेसॅंडवीच मागवू का ?  चौदा रुपये ! थोडा थोडा चिल्लर खूप उरतीये ती उरते, वाजते आणि त्रास देते. पास संपलेले नाहीत अद्यापहे बरंच. एक पिक्चर टाकूया  का ? अरे हो विसरलोय  केबलवाला बाकीये  उरलेले त्यालाच बघ मोबाईलशिवायही दिवस जगलोच ना त्त ?
जगलो ना ?

9 to 10 INTIMATE INTILIGENCE CHALHWALA KARYKARTA ELCETRA गुरुवार                            इन्टिमेट इन्टिलेजन्स - 
अदृश्य 

माहिती म्हणजे काय ?
माहित होणं म्हणजे काय ?
माझ्या विषयाची माहिती म्हणजे काय ?
'मी' ही केवळ एकगठ्ठा माहिती ?

सिंग्युलर वासांचे रेग्युलर ऑकेजन्स 
नाकांना आढळत नाहीयेत स्वतःत 

श्वास आढळतायत 
पण ते अढळ नाहीत 
ही त्यांची मर्यादा आहे

आयुष्य कायम हवेच अकाउंट उधळत नाकेले 
आणि आपण बॅलेन्स कधिही संपेल 
म्हणून एक्सपायरी डेट हुसकावत फुफ्फुसबंद 

नग्नता ही आदिम 
की माणसांच्या कपड्यांचा साईडइफ्फेक्ट ?
मृत्यू हा नग्न 
की माणसाचा शेवटचा कपडा ?

फिलॉसॉफी हीही जिथे फॅशनेबल 
तिथे कालातीततेचा आऊटडेटेड स्टॅमिना 
कुणाला कमवायचाय ?

क्षणभंगुरतेची शक्तिहीनता 
बोचत नाही आताशा बोच्याला 

त्यापेक्षा आपल्या ढुंगाणाच्या स्किन टोनबद्दल काय वाटेल 
ह्याचीच नग्न होतांना काळजी 

स्किन रिन्यू करता आली तर काय बहार होईल ?

माणसाला ट्रेस करेल असा प्राणी नाही आसपास 
जंगलातील घटना ना मौखिक ना लिखित 
फक्त क्षणिक

माहित नाही का पण मला 
प्रत्येक गोष्टीचं वाईटच वाटायला लागलय 

पराभव दुःखदच असतात कुठल्याही काळात 

खरंतर मला विजय मिळवायचा होता 
की लढण्याची स्पॉन्सरड खाज भागवायची होती 
हे अस्पष्टच 

क्रांतीची आखरी मुद्रा लोपामुद्रा 

मी पॉलिटिकल आहे की    PASSIONATE ?

Tackle Tackle little star 
How I  know what you are ?

universal तृष्णेचा दांडगा प्रपंच 
की common भीतीचा  दांडगट दडूंका ?

Every land is political gland 

तुझा  सातबाराचा उतारा इतक्या स्त्रावानंतर 
कसा राहील करकरीत कोरा ?

पडलेल्या दातांच्या  चॅम्पियन माणसा 
तुझी व्हॅलिडिटी 
शेवटी जर कॉस्मोपॉलिटिन सिटीच अप्रूव करणार असेल  
तर गावाचं  वेड 
exhumanate कर  
आणि नावगाव बदल 

जमिनीचा प्रोलिटरीयन आराम 
हराम करणाऱ्यांना 
जन्नत दिसतीये 

तुही बघ - आंधळ्या डोळ्यांनी 
किंवा मग बायोपॉलिटिकल नक्सलाईट हो 

सगळा निसर्ग इन्वेस्टमेन्ट झालाय 
हे ज्यांना कळतं 
त्यांना काय पर्याय आहे 
भांडवलशाहीच्या जागतिक विजयात 

मनुष्यजात कवटाळायला 
मार्क्सवादी कशाला व्हाव लागतं ?

नुस्त नीटनेटकं मनुष्य असणं पुरतं 
काळीज असणं पुरतं 
कवी असणं पुरतं 

हल्ली रात्री मी फक्त कैद्यांना भेटतोय 

दिवसा स्वातंत्र्याच नाटक करणाऱ्यां कैद्यांना 
पकडता येत नाही 
पण रात्री पबमध्येही कैदी कैद दिसतात 

गरीब decision maker होणार नाहीत 
हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ होत असताना 
कुठल्या साबणाने मी आंघोळ करावी ?

गरिबांनाही गरीब माणूस सहन होत नाही आजकाल 
श्रीमंत व्हायला मदत करू शकणार नाहीत त्यांना 
तेही दाखवतात त्यांच्या दारिद्र्याचा 
असहाय्य गवगवा  मजबूत  ठेंगा 

माझ्या कविता फेटाळतायत अर्थव्यवस्थांचे  शेवट 
सुरवातीच्या  मुळाशी असलेल्या 
बुद्धत्वाच्या शक्यता 
विझू विझू 

श्रीधरा ,
जागा हो झोपलेल्या मनुष्यजातीत 
आणि स्वतःलाच आग लाव 

श्रीधर तिळवे नाईक 



yes
 10 to 11 FACE TO FACE before rev party
11 to 11:30 deathbedwarun
बघता बघता हा Planet Humanet केला आपण
बघता बघता पृथ्वी Humiliate केली

स्वतःचं  गुरुत्वाकर्षण  मोजणं  विसरून
आपण पंक्तिप्रपंच   केला जगाच्या 
ह्याच्या त्याच्या गुरुत्वाचा

एकमेकाचे चंद्र एकमेकाच्या गळ्यात टाकून
स्वतःला सूर्य समजणारे आपण

आपणाला कळतही नाही
जो बल्ब आपण तयार केला
तो बल्ब आता विझत चाललाय

आणि घटकाभर ऑन असलेल्या खटक्यावर
मटका लावून 
नंबर मोजत 
आपण जगत चाललोय

मित्रहो
तुमच्या वीजनिर्माणतेवर जंगले जगत नाहीयेत
ती पृथ्वीच्या महाजालावर जगतायत
आणि तुम्ही पृथ्वीला झालेल्या कॅन्सरसारखे
पृथ्वीच्या  नैसर्गिक अवयवात प्रसार पावतायत

तुम्हाला दिसत  नाही
व्यक्ति मेली
कि तिच्या आतला कॅन्सरही मरतो
हे साधे सरळ सत्य
***

11:30 to 12 thod spiritual
womenpause

extra poems for love opera in dahisar
रक्त उपसुन संपलं तर ह्रदयपुरवठाच सुरु झाला थेट 
आता ज्याला रक्तहिन क्रांति करून निर्वाणाला पोहचायचय
त्याने काय हमामा खेळायचा

मेंदूला कोऑपरेटिव चळवळी कधीच झेपल्या नाहीत 
त्याने फ़क्त अवयव कॅपीटल म्हणून वापरले आणि त्यांची उपयोगिता  भाड्याने देऊन तो सामाजिक झाला.

काउंटरवर साक्षात परमेश्वराला ठेवून 
जो सिटीस्कॅन स्कीनमधून अवघे विश्व उलाढालतो 
त्याच्या ढोलतमाश्यात 
तुमचा रोल 
ढील देणाऱ्या हाताच्या दयेवर चालला तर आश्चर्य ते काय ?

पायापुढे  हायवे नव्हते म्हणून लोवे उपलब्ध  होतायत काय
डोळ्यापुढे बिगशॉट्स नाहीत म्हणून स्मॉलशॉट्स अवेलेबल होतायत काय
नाकापुढे डीपब्रीदिंग नाही म्हणून झीपब्रीदिंग हवेतून सरकतय काय ?

हे आयुष्य सरतेशेवटी साऱ्यांनाच गंडवून जाते आणि मागे उरतात ते फक्त गंडे आणि तावीज

आपला भूतकाल आणि बंगाली जादू करणारा बाबा ह्यांच्यात चष्मदीद फरक काय
कोई लौटा दे मेरे मरे हुए दिन ही भानगड काय आहे
भविष्य नसणाऱ्यांनाच फक्त भूतकाळ सुचतो काय

रात्री वनस्पती कार्बन डाय ऑक्सॉईड सोडतात म्हणून तर रात्री झाडावर भुते असतात 
आता प्रत्येकाच्या नशिबी रात्री प्राणवायू सोडणारा पिंपळ कसा लिहायचा
नवजात अर्भकाला रिप्लेसमेंट म्हणून गाईचं दूध चालतं
पण गायीच्या वासराला रिप्लेसमेंट म्हणून कुणी माणसातील आईचं दूध पाजलंय काय

इकोफ्रेंडली गप्पा गॉसिप वाटण्याचा काळ आलाय 
आसपास आता फक्त फॅशनचा तामझाम आणि चार दिवसाची चांदणी


मच्छरदाणी ओढून घे

हाताच्या अंतरावर आहे तुझ्या हृदयाची वाट लावणारा डास

****************************************************************** तुला माझे असे वाढणे अवजड वाटत चाललय
कॉन्टॅक्टचा फायदा हवा पण कॉन्टॅक्टची जबाबदारी नको

मी निसर्गतः केबल वाढवत कनेक्शनस  वाढवत वाढतो  आहे
आणि तू
कनेक्शनस काटणाऱ्या स्पेशलिस्टाच्या शोधात
मुंबईला एका मेजरची घरी
येत जात आहेस

मला तू शरीर भिड़वतीयेस असा  संशय आहे
आणि तू 
मी टीव्ही असल्यासारखा
माला ऑन ऑफ़ करत

तुझा मेजर आपल्या रिलेशनशिपची बोर्डर निश्चित
करतोय
आणि तू तुझी फाळणी करत
दोन्ही ठिकाणी झेंडावंदन करतीयेस
 ***

**************

कुणाचा खून झालाय माहीत नाही
पण एका कोल्ड वॉरची सुरवात झालीये हे निश्चित

आपल्या घराचा आकार 
जसा हवा होता तसा घडत नाहीये

भिंती निष्कारण गरम होतायत
आणि फरश्या विनाकारण थंड

काहीतरी आहे जे रक्तात दाखल झालंय

अवशेषांना पहिल्यासारखा तुझा मधुर वास नाही
इतिहासात ती जुनी तुझ्या चेहऱ्याची निरागसता नाही

लोकशाहीच्या करारावर अचानक उगवतायत
इंदिरा गांधींच्या आणिबाणीतील दहशतवादी सह्या

प्रेम अंतिमतः हुकूमशाहीच बनतं का ?

पॉवर गेम इलेक्ट्रिसिटी खातायत

सेफ पॅसेज काढायला जावं तर फेक रिलीजन वाट अडवून उभा
श्रद्धेचा फाटफटपसारा वाढता

आपल्या ह्या घराचे भविष्य सुरक्षित आहे का ?

आपण एकमेकांच्या हातांकडे संशयाने पहायला लागलोय

आपली बोटे empirical short comings
आणि vatic conclusions नी त्रस्त आहेत

आपल्याच घरात आपण isolate होतोय

कम्युनिझम मागणाऱ्या  हालचाली
आता भांडवलाच्या व्यवस्थापनात मग्न होतायत

त्यांनीही स्वीकारलीये समाजवादाच्या मृत्यूची संहिता
घरात दाखल झालेली

उदारीकरणाचा अर्थ एक कोकोकोला शेअर करत पिणे
एवढाच काय ?

भूतकाळाच्या आठवणी ओरिजन्यालिटी देऊ शकत नाहीयेत
समकालीन वास्तवाला

वास्तवस्त्राव सुरु आहे
कुणाचा तरी खून झालाय
पण कुणाचा

मॅनिफेस्टो सेट करून करून गात्रांना येतीये ग्लानी
वसंत गांजा पिऊन प्रत्येक फुलाची अफिम बनवण्याच्या चक्करमध्ये

हे मिशनही impossible आहे
हे तुला आणि मला पुरत ठाऊक आहे
नशेच्या आधारे राजकारण उभं राहू शकतं
प्रेम नव्हे

present बद्दल प्रॉब्लेम हाच आहे की
ते Live telecast असते
Nuclear Terror आसपास
Nuclear Weapons दोन्ही पार्ट्यांकडे
नागासकी हिरोशिमा वर बॉम्ब टाकणाऱ्या देशात
तुला जायचं आहे

जा

हात कुणाचेच बांधले गेलेले नाहीत - पायही

माणूस म्हणजे वाळवंटातला  गव्हाचा दाणा

तू मला शोधणार कशी ?

इंटरनेटच्या  वाळूच्या बडेजावात
जे बदलायला तयार नव्हतं
ते बदलण्याची इच्छा करत दबा धरून
जनावरांच्या पावलांनी किंवा माणसाच्या पावलांनी
Application नुसार

दंतकथा मरण पावलेत- लिजेंड होण्याआधीच
दातापासून दाताकडे जाण्याची शक्यताही संपत चाललीये

सात दिवस दे
फक्त एक महिना दे
फक्त एक आठवडा

मी तुझ्याकडे  काळ मागतोय
मी समाजाकडे  पैसे मागतोय
दोन्हीही मिळत नाहीयेत
म्हणून फसवणूकीचा गोरखधंदा काढून बसावं का ?

माझे  नकारमासे तुझ्या फिशटॅकला सहन होत नाहीयेत

पूर्वेकडून येणारे प्रकाशही
आता फेंगशुई  मागतायत

फक्त माहितीचा साठा साठत

ह्या साठ्यांच काय करायचं ?

पुरवठा - साठा - पुढे काय ?

फक्त फीडबँक  पुढे काय  ?

दगडात शिकार मॅनेज करून मध मिळेल काय ?

मानवतावाद म्हणजे स्वतःला केंद्रीय स्थानी आणण्याचे राजकारण
आपण मानवतावादी होतो आहोत काय ?
होतो काय ?
आपण मानवतावादी काय ?
आपण काय ?
पण..... ..... काय ?

पण

Archaeology नेही recover नाही झालो आपण
फुको फुकाचा खटाटोप
फुंक आली उडून गेला

संध्याकाळी उदास इतिहास
शुभ  प्रभातची expiry date उंबरठ्यावर उभी

मार्कर नसलेलं मार्केट
आपणाला घाई नव्हती
पण तरीही त्या भेटीची मृत्यू झालाय

झपाटाच असा की 
कोसळफन बाजारात तुम्हाला उलथी पाडणारी
उठा, विकासा आणि विकत घ्या
कमॉन फास्ट

माझ्या घरात ह्या मार्केटची A B C D ही नव्हती
आणि तुझ्या घरात थेट CD

बाप कम्युटर इंजिनिअर असल्याचा कॉस्मो फायदा

वायदेबाजार वाकबगिरी

"पोकळ शाश्वतेबरोबर वाहात जावू काय ?"
====================================================

थोडं अध्यात्मिक 

फेस टू फेस डेस्कटॉपसमोर 



बघता बघता उंदीरच डोंगराएव्हढा झाला 

आता प्रत्येक घरात टेबलवर एक उंदराएवढा डोंगर 
आणि त्याला सत्राशेसाठ खिडक्या आणि गुहा 

ज्याला मेडिटेशन करायचंय 
तो गुहेत जातो 
मेडिटेशनविषयी वाचतो 
आणि परततो 

ज्याला जग जाणायचंय जिंकायचंय 
तो खिडकीत जातो 
जिंकण्याचे प्लॅन घेऊन परततो 

चाव्या आणि बोटे 
आता एकत्रच एकमेकात नांदतात 
आणि कुलुपं उघडतात 

ज्याला जगायचंय 
तो प्रत्यक्ष जगात उतरतो 
ज्याला काळातून फक्त टाईमपास करायचाय 
तो जगणे सपाट करत 
त्यातच खातोय पितोय नाचतोय 

एक भूकच काय ती अस्सल आहे 
एक तहानच तेव्हढी वास्तव आहे 

बाकी वासनाही पोर्नोफिल्म्सकडे गहाण पडत चाललीये 
आणि घरे डोंगराच्या संरक्षणासाठी बनवली जातायत 

खिडक्या इतक्या दयावान 
कि त्या रोग पाठवून 
माणसांना त्यांच्या जिवंत असण्याचा फील यावा म्हणून 
इस्पितळात अधूनमधून दाखल करतायत 

मी ना खिडक्या टाळतोय ना गुहा 

फक्त डोंगराला वॉल बनवून 
मी बोधीधर्मासारखा त्याच्यापुढे बसतोय 
आणि माझ्या नाथसंप्रदायी घराला 
शाओलीन टेम्पल बनवतोय 

मला खात्री आहे 
एक दिवस 
माझ्या आतला डोंगर उमलेल 
आणि मी चीनी होईन 

तोवर आहेच 
हा डोंगर 
आणि साखर नसलेला  चहा 

श्रीधर तिळवे नाईक 

*****************************************

No comments:

Post a Comment