Friday, September 18, 2026

 परंपरा म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक 

परंपरा म्हणजे काय ह्या प्रश्नाचा विचार करायचा असेल तर सर्वात प्रथम स्मृती या प्रोसेसचा विचार करावा लागतो कारण स्मृती ठेवण्याची प्रोसेस आपल्या मेंदूमध्ये जिवंत आहे म्हणूनच आपण परंपरेचा विचार करू शकतो . आपल्या परंपरेचे मूळ आपल्या स्मृती ठेवण्याच्या मेंदूच्या सवयी मध्ये आहे.

माणसाच्या स्मृती विषयी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत पण आता मुळातच या संदर्भातले जे विज्ञान आहे तेच प्रमाण मानले जाते आणि मानायला हवे 

सर्वसाधारणपणे आता स्मृतीच्या सहा प्रोसेस आपण स्वीकारायला हव्यात आणि त्यापैकी काही स्वीकारल्याही जातात पहिली चिन्हीकरण म्हणजेच माणसाला जे जे इंद्रियांच्या द्वारे प्राप्त होते ते सर्व तो किंवा त्याचा मेंदू पूर्णपणे स्वतःमध्ये चिन्हीफाय करतो कोडीफाय करतो हे फाय होताना नेमके काय काय घडते हे सांगणे मात्र अलीकडे अधिक गुंतागुंतीचे आणि अजूनही विश्लेषणाला खुले आहे .

दुसरी प्रोसेस अर्थातच अर्थनिर्णयन आहे या प्रोसेसमध्ये जे सर्वच्या सर्व आलेले आहे किंवा इंद्रियांच्या द्वारे किंवा मज्जा संस्थेच्या मार्फत प्राप्त झालेले आहे त्याचे अर्थ निर्णयन केले जाते आणि काय साठवायचे काय नाही कशासाठी साठवायचे का साठवायचे यासारख्या अनेक प्रश्नांचा आदमास घेत आलेला डाटा साठवला जातो अनेकदा त्या डाटावर प्रोसेस सुद्धा होतात जे साठवणे जगण्यासाठी गरजेचे नाही असे मेंदूला किंवा मेंदूतील नियंत्रकाला (मी याला इंग्लिश मध्ये कंट्रोल सेटर म्हणतो) वाटते ते फेकून दिले जाते .

तिसरी प्रोसेस अर्थातच साठवण आहे यामध्ये पूर्णपणे जे जे आवश्यक वाटते ते ते सर्व काही साठवले जाते. साठा करून ठेवणे ही माणसाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच माणूस अनेक गोष्टींचा साठा करत असतो यामध्ये कळत नकळत भविष्यकाळ फार महत्त्वाचा होत जातो कारण साठा हा नेहमी भविष्यकाळाची तरतूद म्हणून केला जातो आपण एखाद्या व्यक्तीची स्मृति जेव्हा साठवतो तेव्हा त्यामागचा उद्देश एकच असतो तो म्हणजे भविष्यात त्या व्यक्तीशी डील करताना व्यवहार करताना भावविवाह करताना आपणाला निर्णय घेता यावेत. माणसाला शेवटी निवड करावी लागते आणि निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला काही गोष्टींची निवड करावी लागते आणि काही गोष्टी सावडून सोडून द्याव्या लागतात . सिलेक्शन ऑफ चॉईस ही एक अपरिहार्य अशी माणसाच्या आयुष्यात असलेली स्थिती असते आणि ती मेंदूमध्ये आणि स्मृतीमध्ये कार्यरत असते . तसे तिला कार्यशील व्हावे लागते . सर्वसाधारणपणे दुःख देणाऱ्या स्मृती या सावधगिरीसाठी म्हणून कधी कधी जिवंत ठेवल्या जातात पण त्या फक्त सावधगिरीला गरजेच्या असलेल्या अंशात्मक भागांना सामावून घेतात आणि ज्या ताप देतात त्यांना फेकून देतात .

चौथी प्रोसेस ही अर्थातच स्मरण किंवा आठवण आहे जर का एखादी गोष्ट समोर आली की आपण ती यापूर्वी आपल्या स्टोरेज मध्ये आहे का नाही याचा पडताळा करतो आणि जर का ती स्मरण साठ्यात असेल तर तिचे कनेक्शन ताबडतोब समोरच्या गोष्टीशी जोडतो त्यामुळे जगण्यात अनेक प्रकारचे येऊ शकत असलेले अडथळे आपणाला टाळता येतात उदाहरणार्थ आपल्याला गोष्टी ओळखणे फार गरजेचे असते आता प्रत्येक वेळेला व्यक्तीसमोर आली की नवी ओळख निर्माण करणे हे अनेकदा वेळ घालवणारे ठरते त्यामुळे साहजिकच असा आपला वेळ जाऊ नये आपले आयुष्य वाया आज जाऊ नये म्हणून मेंदू प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र स्वतःमध्ये आपल्या पद्धतीने तयार करतो त्यामुळेच आपणाला चटकन स्मरण होऊन आपणाला त्या गोष्टीची ओळख ताबडतोब पटते आणि आपण त्याप्रमाणे आपल्या वागण्याची पद्धत ठरवतो 

पाचवी प्रोसेस स्मरणरंजन आहे अनेकदा आपण एकांतात बसलो की आपणाला चांगल्या आणि सुखद वाटणाऱ्या गोष्टींचे स्मरण होते आणि आपण स्वतःच्या सुखद गोष्टींचे रंजन करत बसतो स्मरण सुख आणि स्मरण दुःख यादेखील दोन प्रक्रिया कायमच ऍक्टिव्ह असतात आणि आपण अनेकदा त्यांना कुरवाळत राहतो विशेषता हे एकांतात घडत असते मात्र ते एकांतात घडत असले तरी अनेकदा लोकांच्या लोकांतात सुद्धा स्मरण रंजन नावाचा प्रकार असतो इथे आपण कळत नकळत स्वतःच्या सुखासाठी म्हणून त्या आठवणी कुरवाळत बसतो . कारण ते आपल्याला गोड फील देतात . सार्वजनिक गोड फील आणि गुड फील हा कळत नकळत उत्सवाचा भाग असतो .

याशिवाय स्मृतीची पडताळण ही सहावी प्रोसेस सुद्धा कधी कधी ऍक्टिव्हेट होते कारण आपण नेटवर्किंग करत असताना अनेकदा होते काय की आपला निर्णय चुकलाय असे आपल्या लक्षात येते आणि हा निर्णय का चुकला किंवा हा निर्णय का बरोबर आला किंवा आता पुढचा निर्णय कसा घ्यावा या संदर्भामध्ये ज्या घटना घडून गेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या आपण स्मरणात आणून त्यांची कनेक्शन्स इंटर कनेक्टिव्हिटी या सगळ्यांची पडताळणी करतो या सगळ्याला पडताळण असे म्हणतात उजळणी करताना सुद्धा अनेकदा आपण पडताळणच करत असतो किंबहुना उजळणी केल्याशिवाय पडताळण करता येऊ शकत नाही .

स्मृती ही या सर्व प्रोसेसची बनलेली असते आणि ती बायोलॉजिकल असते जैविक असते आणि त्यामुळेच स्मृतीचा विचार हा सर्वाधिक महत्त्वाचा विचार होय .

स्मृती ही जीवनावश्यक आहे हे एकदा कळाले की मग तिचा विचार करताना आपणाला अनेक गोष्टींचा विचार करता येतो .

माणसाला ज्याप्रमाणे जगण्यासाठी स्मृती आवश्यक असते त्याचप्रमाणे संपूर्ण त्याच्या गणाला स्मृती आवश्यक असते का हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे माणसाला जगताना फक्त स्वतःच्या स्मृतीच नाही तर अनेकदा इतरांच्या स्मृती सुद्धा उपयोगी पडतात म्हणूनच तर आपण अनेकदा दुसऱ्याचा ऑपिनियन दुसऱ्याचे मत विचारतो . विशेषतः काही लोक आपल्याला आपल्यापेक्षा जास्त शहाणे आहेत असे वाटते आणि त्यामुळे आपण त्यांचे मत विचारात घेतो एका अर्थाने ही सुद्धा पडताळणी असते पण या पडताळणी मध्ये आपण इतरांचे स्मृति सहाय्य घेतो आणि त्यांचे अर्थनिर्णन सुद्धा निर्णय करताना विचारात घेतो 

यातूनच मग सामूहिक स्मृती नावाची गोष्ट निर्माण होते आणि खरा गोंधळ तिच्यामुळे चढतो कारण कुठलीही गोष्ट सामूहिक झाली सामाजिक झाली की तिच्या स्वतःच्या म्हणून काही सत्ता तयार होत जातात आणि या सत्ता अनेकदा तुमच्या वैयक्तिक स्मृतींना आणि स्मृती समृद्धींना हानिकारक ठरू शकतात अनेकदा सत्ताधारी या सामूहिक स्मृतींच्या जीवावरच समाजावर राज्य करायला बघत असतात आणि म्हणूनच आपणाला आपल्या स्मृतीचा जितका विचार करावा लागतो तितका सामूहिक स्मृतीचा सुद्धा कधी कधी विचार करावा लागतो .

प्रश्न असा आहे की यांचे स्वरूप नेमके काय आहे तर त्यासाठी आपणाला सामूहिक स्मृतींची कालिक बाजू लक्षात घेतली पाहिजे 

जगामध्ये आत्तापर्यंत ५ महायुगे होऊन गेली आणि यातल्या प्रत्येक महायुगाने स्वतःचे सामूहिक स्मृती म्हणून काही स्मरण जागे ठेवलेले दिसते आणि अनेकदा तर या जागे ठेवण्याची विशिष्ट पद्धत बनलेली दिसते 

यातून अनेकदा काही गुंतागुंतीच्या गोष्टी तयार होतात मुख्य म्हणजे माणसाची वैयक्तिक स्मृती आणि त्याच्या आसपास असणाऱ्या त्याच्या गणाची म्हणजेच राष्ट्राची किंवा जगाची समृद्धी स्मृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का की त्यांच्यामध्ये अद्वैत आहे की द्वैत आहे की पूर्ण भेद आहे ?

माझ्या मते सर्वच्या सर्व अवस्थांची शक्यता असते म्हणजे अद्वैत अभेद विशिष्ट अद्वैत ,विशिष्ट अभेद , युग्म, द्वंद्व भेद ,पूर्ण भेद वगैरे वगैरे ज्यांची चर्चा मी मार्गी आणि देशी या ग्रंथांमध्ये केलेली आहे 

सामूहिक स्मृती आणि वैयक्तिक स्मृती यांचे संबंध कधी सौख्याचे तर कधी ताणलेले राहतात आणि त्यातूनच कधीकधी व्यक्तीचे समाजाशी खटके उडायला लागतात 

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण अधिक परंपरेचा विचार नीट करू शकतो 

स्मृति म्हणजे परंपरा असे मानले जाते काय हा पहिला प्रश्न आहे माझ्या मते परंपरेवर ज्यांनी ज्यांनी गांभीर्याने चर्चा केलेली आहे त्या सर्वांना स्मृती वेगळी आणि परंपरा वेगळी हे मान्य केले आहे 

जर या गोष्टी भिन्न आहेत तर मग त्या नेमक्या काय आहेत असा प्रश्न आपोआपच यातून निर्माण होतो 

माणसाच्या होमोसोपियन या रूपाची उत्क्रांती कशी झाली ते आता तुम्हाला उत्क्रांतीच्या कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळेल आपण याला आदिम महायुग असे म्हणू शकतो आणि त्याची सुरुवात होमो इरेक्टस पासून करू शकतो त्यानंतर मग तो होमो सेपियन म्हणून विकसित झाला आणि ज्याला आता आपण आदिम कालखंड किंवा प्रागेतिहासिक कालखंड म्हणतो तिथे येतो या कालखंडामध्ये आपण असे म्हणू शकतो की चिन्ह व्यवस्था माणूस तयार करायला लागला . एका अर्थाने हा चिन्ह मानवाचा कालखंड आहे जो एकमेकांशी संदेशवहन करत एकमेकांची कॉपी करत एकमेकांना चिन्ह गोष्टी द्यायला शिकला उत्क्रांत होऊ लागला एक प्रकारची संवेदनज्ञानशिलता त्याच्यात विकसित होत गेली आपल्या आजच्या स्मृतीचे मूळ या कालखंडात आहे माणसाच्या आजच्या स्मृतीचे बीज या कालखंडात प्रामुख्याने रुजत गेले . पूर्वीही ते होते परंतु त्याची उगवण्याची क्षमता खूप अल्प होती पण चिन्हव्यवस्थेच्या उदयामुळे हळूहळू गोष्टी लक्षात ठेवणे तो शिकला आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टी इतरांना द्यायला ही शिकल्या .

या आदीम महायुगात त्याला स्वतःची कल्पनाशक्ती सापडली आणि कलेचा उदय झाला कलेमधून हळूहळू शहाणपण , श्रद्धा आणि सत्ता प्रणाली उदयाला आल्या आणि पुढे मग याला शह देण्यासाठी म्हणून मोक्षयुग आले या मोक्ष युगाने श्रद्धांना आव्हान दिले पण राजकीय सत्तांना मोक्ष धोकादायक वाटायला लागल्यामुळे त्यांनी हळूहळू पुन्हा एकदा धर्म नावाची राजकीय विचार प्रणाली निर्माण करून मोक्ष बळकावला आणि श्रद्धा तर त्यांच्याच ताब्यात होती 

यातून एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कला ही स्वतःच परंपरा आहे का ? आणि कला ही जर स्वतःच परंपरा असेल तर मग कलेचे आणि परंपरेचे नाते अद्वैती मानावे का ? 

मोक्षाने केवळ अनुभवाला महत्त्व देण्या ऐवजी विद्यांना सुद्धा महत्त्व द्यायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक विद्या उदयाला आल्या या विद्यांना अनेकदा भारतामध्ये भगवान शंकर जबाबदार आहेत आणि त्यांचा अत्यंत समर्थपणे वारसा चालवला तो त्यांच्या मुलाने ज्याचा उत्सव आता आपण साजरा करणार आहोत आणि तुम्ही लोक सुट्टीवर जाणार आहात 

त्यामुळे साहजिकच जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा आपल्याकडे परंपरेचा विचार अधिक होतो . कारण गणपती हा काही फक्त परंपरेचा देव नव्हे तो विद्येचा देव आहे . साहजिकच गणपतीच्या नावाखाली तुम्ही वाटेल तेवढी बौद्धिक चिकित्सा करू शकता किंवा हाच एक असा काळ असतो ज्या वेळेला भारतामध्ये काही विचारमंथन होण्याची शक्यता असते . त्यामुळेच बापटांच्या सारखे काही विद्वान परंपरेच्या विषयी आपल्याला प्रश्न विचारू शकतात मी पहिल्याच व्याख्यानामध्ये परंपरा शिकणे का आवश्यक आहे ते सांगितले होते याचे कारण परंपरेचा प्रश्न कायमच उत्सव जेव्हा येतो तेव्हा तेव्हा निर्माण होतो 

याचे कारण उघड आहे कारण उत्सव हा नेहमीच परंपरेतून निर्माण होतो 

प्रश्न असा आहे की मग स्मृति वेगळी आणि परंपरा वेगळी असे जर असेल तर इतिहास वेगळा आणि परंपरा वेगळी असे आहे का तर या प्रश्नाचे सुद्धा उत्तर होकारार्थी आहे 

सर्वसाधारणपणे आपण कालखंडाची जेव्हा मांडणी करतो तेव्हा इतिहास पूर्व , प्राचीन, मध्ययुगीन ,अर्वाचीन, आधुनिक आणि उत्तराधुनिक असे युरोपियन लोकांनी स्पॉन्सर केलेले कालखंड आपल्याला सहज माहिती असतात तुमच्यापैकी इतिहास शिकलेल्या लोकांना हे कालखंड नक्की माहिती असतील 

यातील जो उत्तर आधुनिक आणि आधुनिक कालखंड आहे त्याने प्रामुख्याने परंपरेचा विचार पुढे आणला हा विचार का पुढे आणला गेला 

या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला गेलो तर आपण आणखी एका ज्ञानाच्या महायुगात पोहचतो याला ज्ञानाचे महायुग किंवा विज्ञानाचे महायुग म्हणता येते याचे कारण त्या कालखंडाच्या केंद्रस्थानी विज्ञान आहे या विज्ञानयुगामध्ये सुधारणावादी , प्रबोधनवादी , पुरोगामी आणि उत्तर पुरोगामी असे चार कालखंड येतात 

आणि याच कालखंडामध्ये सामूहिक स्मृतीची रचना वैज्ञानिक पद्धतीने करण्याची पद्धत उदयाला आली जिला आपण आता इतिहासाची पद्धत किंवा इतिहास म्हणतो . वैज्ञानिक पुरावे मिळत नाही तोवर त्या भूतकालीन गोष्टीवर किंवा स्मृतीवर विश्वास ठेवायचा नाही असा दृष्टिकोन इतिहासामध्ये असतो . यावर माझे एक पुस्तकच आहे त्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही . चौथी नवता : नवअनियतकालिकांचा इतिहास यामध्ये मी इतिहासाचा सांगोपांग विचार केलेला आहे 

तर परंपरेचा विचार मी अलीकडेच रंगभूमीच्या रंगवाच्या नावाच्या एका नियतकालिकामध्ये मांडलेला आहे तोही तुम्ही पाहायला हरकत नाही 

इतिहासाला शह देण्यासाठी म्हणून आधुनिकतेने परंपरेची संकल्पना पुढे आणली असे म्हटले जाते इतिहास आणि परंपरा यांच्यामध्ये एक मोठा फरक असा असतो की इतिहास भूतकालीन असतो तर परंपरा ही आत्ता वर्तमानात उपस्थित असते जिवंत असते सळसळत असते किंबहुना इतिहास नेहमी मेलेला असतो आणि परंपरा नेहमी जिवंत असते हाच या दोघांच्यातला फरक आहे . विठ्ठल हा इतिहास नाही ती महाराष्ट्राची परंपरा आहे भगवान शंकर हा इतिहास नाही ती भारताची परंपरा आहे कारण वर्तमान काळात सुद्धा ती उपस्थित आहे 

प्रश्न असा आहे की परंपरा काय आहे किंवा हा इतिहास काय आहे याबाबत आधुनिकता असे सांगते की या सर्व कन्स्ट्रक्शन्स आहेत रचना आहेत आणि हा दृष्टिकोन खूप क्रांतीकारक होता याचे कारण असे की आत्तापर्यंत आपण असे समजत होतो की इतिहास म्हणजे वैज्ञानिक सत्य असते. प्रत्यक्षामध्ये आधुनिकतेने आधुनिक इतिहासकारांनी हे सिद्ध केले की प्रत्यक्षात जे जे पुरोगामी कालखंडात इतिहास लिहिले गेले ते सर्वच्या सर्व कन्स्ट्रक्टेड होते रचले गेलेले होते आणि रचणाऱ्या लोकांनी ते अत्यंत पद्धतशीरपणे स्वतःच्या हितसंबंधांच्यासाठीच रचले होते . आपल्याकडे या गोष्टीचा अजूनही पुरेसा प्रभाव पडलेला नाही . आपण इतिहासाबाबत अजूनही पुरेसे आधुनिक झालेलो नाही किंवा उत्तर आधुनिक झालेलो नाही .कारण हे गृहीतक स्वीकारले तर मग फुले आणि आंबेडकर यांनी निर्माण केलेला इतिहास रचलेला इतिहास ठरतो किंवा सावरकर प्रबोधनकार ठाकरे यांनी निर्माण केलेला इतिहास रचलेला इतिहास ठरतो आणि असे रचलेले इतिहास असतील तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात या प्रश्नांना तोंड देण्याची नैतिक ताकद आपल्यामध्ये नसल्यानेच आपण असे प्रश्न उभा करत नाही आपण पुरोगामी वादामध्ये जास्तीत जास्त घोटमळत राहतो आणि इतरांना सुद्धा तसेच घोटमळत ठेवतो आधुनिक तिच्या दृष्टिकोनातून मात्र हे सर्व इतिहास रचलेले इतिहास आहेत आणि असे सर्व रचलेले इतिहास विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधातून निर्माण होतात अशी आधुनिकतेची धारणा आहे साहजिकच या लोकांनी आपले इतिहास रचले तेव्हा त्यांचे काय प्रकारचे हितसंबंध गुंतलेले होते ते हे आता तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे पण अशा प्रकारचे धाडस दाखवले जात नाही याचे कारण फुले किंवा आंबेडकर यांची अशा प्रकारची आधुनिक चिकित्सा कोणीही करू इच्छित नाही सर्वजण पुरोगामी होण्यातच धन्यता मानत आहेत .

साहजिकच भारतामध्ये आता परंपरेचा विचार करताना ही परंपरा नेमकी कशी रचली गेली कोणी रचली तिच्यामध्ये कसे कोणी कोणी कसे फेरफार घडवले यामागे कोणाकोणाचे कसे हितसंबंध गुंतलेले होते अशा प्रकारचे प्रश्न आपण उपस्थित करत आहोत . परंपरा ही जर कन्स्ट्रक्टेड असेल तर मग अशा प्रकारचे विश्लेषण अपरिहार्य आहे .

एका अर्थाने संपूर्ण परंपराच आपण विश्लेषणाच्या चौकटीत आणू पाहतो आहोत चौकटीत आणायला पाहतो आहोत कारण आता आपण एका उत्तर आधुनिक कालखंडामध्ये जगत आहोत . उत्तर आधुनिकता इतिहासाच्या केवळ रचनेकडे फक्त लक्ष देत नाही तर ती त्या इतिहासाची त्या भूतकाळाची त्या स्मृतीची विरचना करते आधुनिकता रचना असेल तर उत्तराधुनिकता विरचना आहे. साहजिकच खंडी खंडी करणे खांडोळी करणे हे वीरचनेच्या तत्त्वांमध्ये बसत असल्याने ते आता खूप प्रचलित होताना दिसते आणि आवेशगिरी वाढताना दिसते .

प्रश्न असा आहे की रचनेमध्ये वैज्ञानिक सत्य असते की नाही तथ्य असते की नाही असले तर त्याचे काय प्रमाण असते हे आपण पाहणार आहोत की नाही की वैज्ञानिक पुराव्यांच्याकडे पाठ करून आपण परंपरांची फक्त खोटी कन्स्ट्रक्शन तयार करणार आहोत ? चौथ्या नवतेमध्ये आता फक्त आधुनिक रचना आणि उत्तर आधुनिक विरचना येत नाही तर वैज्ञानिक चिकित्सा पण येते इतिहास सुद्धा पुन्हा येतो जो इतिहास मेलेला होता तो चौथ्या नवतेने पुन्हा जिवंत केलेला आहे मात्र जिवंत करताना जे रचले गेलेले इतिहास होते ते नेमके कोणी रचले कसे रचले का असले यांचे विश्लेषण करावे लागते हे करत असतानाच त्या सर्व इतिहासांच्या मध्ये जे जे वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे सिद्ध होणारे आहे त्याला स्वीकारण्याची तयारी आपण केली पाहिजे असे चौथी नवता सांगते. इथे इतिहास एक जालना आहे . म्हणजेच आता वर्तमान काळामध्ये आपण हळूहळू इतिहासाकडून रचनेकडे रचने कडून वीरचनेकडे आणि वीरचने कडून आपण चौथ्या नवतेमध्ये जालनेमध्ये आणि उत्तर जालनेमध्ये दाखल झालेलो आहोत . 

स्मृतींचा मुख्य उद्देश हाच मुळात कनेक्टिव्हिटी जिवंत ठेवणे हा असतो . त्यामागे सुरक्षिततेचा उद्देश असतो . प्रत्येक मेंदू स्वतःला आणि स्वतःच्या जीवाला शाबूत ठेवण्याची धडपड करतो आणि त्यामुळे या धडपडीचा एक भाग म्हणून स्मृती अस्तित्वात येते त्याचप्रमाणे सामूहिक स्मृती सुद्धा यासाठीच अस्तित्वात असते एक तर पिढ्यान पिढ्या आपण आपल्याला मिळालेले शहाणपण आपल्याला मिळालेले दर्शन आपल्याला मिळालेले तत्त्वज्ञान आपल्याला मिळालेले विज्ञान पुढच्या पिढ्यांना देऊ इच्छितो आणि साहजिकच त्यामुळे स्मृती आवश्यक बनते तशीच इतिहास ,परंपरा आणि जालना आवश्यक बनते 

म्हणजे एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की इतिहास हे सुद्धा एका अर्थाने स्मृती सारखे सहा प्रोसेसने बनलेले आहे त्याचप्रमाणे परंपरा ही सुद्धा या सहा प्रोसेसने युक्त आहे आणि आता जालना सुद्धा या सहा प्रोसेसने युक्त आहे त्यांना कुणाला टाळता आलेले नाही म्हणजेच एका अर्थाने आपण परंपरा पाहतो म्हणजे स्मृतीचे नव्याने अर्थनिर्णयन करतो आपण ते आपल्या स्मृतीतून सामूहिक स्मृतीतून बाहेर काढतो तिचे वैज्ञानिक पद्धतीने अर्थनिर्णयन करतो तिला ज्ञानाच्या नव्या प्रकाशात पुन्हा रचतो पुन्हा एकदा नीट आठवतो मग आपणाला असे म्हणता येईल का इतिहास असो की परंपरा या दोन्ही गोष्टी म्हणजे स्मृति नव्हे तर स्मृतीसमृद्धीचे केलेले मानवी अर्थनिर्णयन आहे चिन्ह निर्णयन आहे. 

याच्याही पुढे जाऊन मग असे म्हणता येईल का की या सर्व गोष्टी चिन्ह सृष्टीत घडतात म्हणूनच त्या फक्त चिन्हसृष्टीतच रेंगाळत राहतात आणि माणूस हा चिन्हसृष्टीतच रेंगाळत असल्याने त्याच्यासाठी त्या सर्वात महत्त्वाच्या बनत जातात . 

म्हणजे एका अर्थाने परंपरा रचल्या जातात . त्या विरचीत होतात . जालीत होतात आणि विजालीत होतात . वर्तमान काळात त्यांचे रूपांतर जालनामध्ये होते . 

श्रीधर तिळवे नाईक 

( मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकॅडमी मध्ये ७ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ दिलेल्या व्याख्यानाचा आणि प्रश्नोत्तरांचा एक तुकडा )


Wednesday, September 16, 2026

प्रबोधनकार ठाकरे ,ब्राह्मणी हिंदुत्व विरुद्ध क्षात्र हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक 

प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिवस ! साहजिकच मग त्यांच्या या जन्मदिनी त्यांनी मांडलेल्या विचारांची चिकित्सा केली जाते 

ठाकरे नेमके कुठून आले याची चर्चा त्यांच्याच पुस्तकामुळे जास्त झाली आणि ते स्वतः उत्तर प्रदेशातून आले होते अशा प्रकारची मांडणी पुढे आली . याला उत्तर म्हणून मग ठाकरे यांचे मूळ आडनाव पनवेलकर होते किंवा धोडपकर होते अशी मांडणी आली . माझ्या दृष्टीने ते कुठून आले महत्त्वाचे नाही उत्तम मराठी त्यांनी आत्मसात केली की नाही हा खरा प्रश्न आहे आणि याबाबत ठाकरे यांची भाषा पूर्णपणे स्वतंत्र आणि ब्राह्मणेतर चळवळीचेच प्रतिनिधित्व करणारी आहे जी /जे अजूनही अनेक ब्राह्मणांना डायजेस्ट होत नाही . असो.

त्यांच्या भाषेशी नाते दलित चळवळीतील अनेक साहित्यिकानी जुळवून घेतले आणि नामदेव ढसाळ यांनी तर नंतर सरळ सरळ शिवसेनेत प्रवेश केला याचे कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरे नीट वाचले होते. अनेकांना अजूनही त्यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना स्वीकारणे कळालेले नाही त्यांना असे वाटते की प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व हे संघाचे हिंदुत्व आहे प्रत्यक्षामध्ये असे नाही आणि हे कळालेले पहिले दलित नेते म्हणून नामदेव ढसाळ यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षामध्ये ठाकरे यांचे हिंदुत्व हे पूर्णपणे भिन्न हिंदुत्व आहे आणि जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत ढसाळ आणि श्रीधर तिळवे कळणे शक्य नाही अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हळूहळू ठाकरे यांच्या हिंदुत्वात रूपांतर होत आहे आणि त्याला ब्राह्मणी हिंदुत्व ठामपणे विरोध करत आहे . खरे तर आज ना उद्या हे होणारच होते आता त्याची सुरुवात झालेली आहे . माझा अंदाज चुकला नाही तर भविष्यकाळ हा ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आहे . प्रश्न फक्त इतकाच आहे की हे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामुळे भारतामध्ये प्रचार पावणार आहे की शिवसेनेमुळे ते प्रचलित होणार आहे ? सध्या तरी भागवत गोंधळलेले दिसतात एकीकडे त्यांना प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाच्या आकर्षण आहे तर दुसरीकडे संघामध्ये ब्राह्मणी हिंदुत्व असणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्याने त्यालाही सांभाळायचे आहे त्यामुळे फार मोठा गोंधळ उडालेला दिसतो आणि भागवतांच्या वक्तव्यामध्ये भाषणांच्या मध्ये फार मोठी तारेवरची वैचारिक सर्कस सुद्धा बघायला मिळते . त्यामुळेच आपणाला प्रबोधनकार ठाकरे काय म्हणत होते हे नीट समजून घ्यावे लागते. मुळात या हिंदुत्वाची पार्श्वभूमी 19 व्या शतकामध्ये मांडत असलेल्या भूमिकेत आहे .

१९ व्या शतकातले हिंदुत्व हे पूर्णपणे ब्राह्मणी हिंदुत्व होते आणि चिपळूणकर हे सांस्कृतिक तर टिळक हे राजकीय हिंदुत्व ब्राह्मणी पद्धतीने ब्राह्मण्य पाळत मांडत होते विसाव्या शतकात मात्र सावरकर यांचे वेदांती हिंदुत्व आले आणि त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे यांचे क्षात्र हिंदुत्व आले . दोघेही बुद्धीप्रमाणवादी असले तरी दोघांच्या मध्ये एक फरक होता तो म्हणजे सावरकर स्वतःचा ब्राह्मणी चेहरा पूर्णपणे कधीच दूर करू शकले नाहीत त्या उलट प्रबोधनकार मात्र स्पष्ट आणि स्वच्छ पणाने ब्राह्मणी हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यामुळेच त्यांनी क्षात्र हिंदुत्व मांडले. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर आमचे हिंदुत्व शेंडी मध्ये आणि पंच पळी मध्ये नाही हे उद्धव ठाकरे यांचे उद्गार! त्याची प्रेरणा स्पष्ट आणि स्वच्छपणाने प्रबोधनकार ठाकरे आहेत . त्यांची ब्राह्मण धर्मावर अशी टीका" शेंडीने कापलाय गळा" या त्यांच्या ग्रंथामध्ये आलेली आहे ते म्हणतात,"शेंडी, जानवे, आणि कर्मकांड याने माणसाची उंची ठरत नाही—विचार आणि कृती ठरवतात. धर्माच्या नावाखाली माणसाला गुलाम बनवणं म्हणजे देवतेचा अपमान !"

परंपरेबाबतचे सुद्धा त्यांचे विचार फार स्पष्ट होते ते म्हणतात , "विचारशून्य परंपरा म्हणजे समाजाच्या गळ्याला शेंडीने फास घालणं. अंधश्रद्धा हीच खरी गुलामगिरी आहे."

साहजिकच मग त्यांची धर्माची व्याख्या बदलते ते म्हणतात ,"जात-पात नष्ट करून माणूस म्हणून उभं राहणं हेच खऱ्या धर्माचं लक्षण."

त्या बदललेल्या व्याख्यानुसार साहजिकच मग ब्राम्हणत्वाची व्याख्या ही बदलते ते म्हणतात,"ब्राह्मणत्व म्हणजे ज्ञान आणि सेवा, जातीय गर्व नव्हे."

येथे आपणाला विवेकानंदांनी जी चार युगांची संकल्पना मांडली होती तिचे नवे रूप दिसते आणि ब्राह्मण आणि क्षात्र या गोष्टीकडे जाणीव म्हणून पाहिले जाते मी माझ्या स्वतःच्या टीका हरण या ग्रंथामध्ये चार जाणीवांचा हा विचार फार पुढे नेला होता पण नंतर तो राहुल कोसंबी यांच्याप्रमाणे काही लोकांनी या विचाराचा इतिहास माहीत नसल्याने तो भरकटवत नेल्याने पूर्णपणे मी बाजूला केला. मात्र १९५० पूर्वीच्या इतिहासाचा विचार करताना मला अनेकदा आजही आपल्या जाणिवांचे प्रकार ब्राह्मण जाणीव क्षत्रिय जाणीव अशा तऱ्हेने दिसते . याचे कारण उघड आहे आपले आजही जाणिवेचे असणे हे वर्णग्रस्त असते अलीकडे तर काही जणांच्या बाबतीत ते चक्क जातीग्रस्त सुद्धा झालेले दिसते यांच्या विरोधात अर्थातच शैव धर्मातली समाज एक संकल्पना वावरत असते ज्याची मांडणी मी नेहमीच आतापर्यंत करत आलेलो आहे .

पण नवीन काही मांडायचे असेल तर प्रबोधनकार म्हणतात ,"समाज सुधारायचा असेल, तर रूढींचा भंग करावा लागतो.जुनं म्हणून सोनं मानणं म्हणजे विवेकाचा अपमान"

अर्थातच ज्याला नवता मांडायचे असते त्याला प्रश्न विचारायला लागतात . प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ,"ज्याला प्रश्न विचारायची भीती वाटते, त्याला उत्तर मिळण्याची पात्रता नसते."

या काळामध्ये धर्मचिकित्सा हीच खरी चिकित्सा असे मांडणारा आरंभीचा पुरोगामी वाद खूप प्रचलित होता साहजिकच त्याला प्रत्युत्तर म्हणून "धर्मचिकित्सा हीच खरी धर्मसेवा. माणसाने स्वतःच्या विचारांनी जगावं, दुसऱ्याच्या कर्मकांडांनी नव्हे.शेंडीने गळा कापला जातो तेव्हा विचारांनी तो वाचवता येतो" असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात .

त्यामुळे साहजिकच वर्णव्यवस्थेला ठाम विरोध आहे आणि तो अनेक प्रकारच्या लिखाणांमध्ये वारंवार व्यक्त होताना दिसतो .

आंबेडकर यांच्या नादाला लागून अनेक फुलेवादी बहुजनवादी लोक महात्मा गांधी यांचा द्वेष करायला लागले तर संघाच्या नादाला लागून अनेकदा महात्मा गांधी यांच्या संदर्भात सुद्धा वादग्रस्त विधाने खुद्द ठाकरे कुटुंबाकडून आलेली आहेत. प्रत्यक्षामध्ये प्रबोधन ठाकरे मात्र फार वेगळे होते . ते महात्मा गांधी यांच्याकडे कसे पाहत होते ?

प्रथम ते महात्मा फुले यांच्या संदर्भात काय म्हणतात ते पाहू .ते म्हणतात,"

एकीकडे केवळ व्यापारी, दुसरीकडे तुंबडीबाजीची पर्वा करणारे परके इंग्रज सरकार, आणि तिसरीकडे अनाडी रयतेच्या अज्ञानावर चरण्यास सवकलेला धोरणी बाण्डगुळ्या भटवर्ग. अशा तिरंगी सामन्याला तोंड देउन, जोतीबाला जेवढे काही देशकालानुसार करता आले,तेवढे त्याने केले. पण, अखेर त्याची शेतकरी आणि कामगार वर्गाच्या जागृतीची चळवळ बाण्डगुळ्या पांढरपेश्या भटानी आणि भटेतरानी चिरडून टाकली. 

चालू घडीच्या राजकारणात शेतकरी आणि कामगारांचे महत्त्व क्रान्तीचे स्फोट कसकसे उडवित आहे, हे पाहिले म्हणजे ज्येतिबाच्या बाबड्या बोलाच्या खेडवळी चळवळीचे मर्म आणि महत्त्व जितके स्पष्ट होते तितकेच चिपळूणकर टिळक प्रभृति बाण्डगुळ्या गुंडांच्या शहरी चळवळीचे नासके धोरण नागडे उघडे पडते. बाण्डगुळ्यांच्या राजकारणात मामलदार मुनसफीच्या वाढत्या जागा, कौन्सिलातल्या खुर्च्या इत्यादि बाबी कितीहि असल्या तरी घोंगड्या शेतकरी, आणि त्याची मरती शेती या बाबीना त्याच्या ओसरीवरहि जागा नसे. ज्योतिबाची चळवळ शेताच्या बांधावरची. ती या शहरी शहाण्याना क्षुद्र कां वाटू नये ? पांढरपेशांची उखळे पांढरी झाली कीं, स्वराज्याचा स्वर्ग हाती आला, एवढ्याच अनुभवाची या वाण्डगुळ्यांची परंपरा. भटांना पेशवाई मिळाली की भटभोजनातल्या खरकट्या पत्रावळींच्या उकीरड्यालाहि ‘मराठी साम्राज्य’ नाव द्यायला यांची तयारी. 

अशा मुर्दाड मनाच्या माणसानी ज्योतिबाची चळवळ पाळण्यातल्या पाळ्यात कितीही ठेचली, तरी गांधींनी तीच चळवळ पुन्हा जिवंत करताच तिच्यापुढे टिळक चिपळूणकरी बडव्याना पगड्या पागोटी घासताना आपल्या नाकांच्या अणकुचीदार बोंड्याहि थबकटून घ्याव्या लागत आहेत, हा काळाचा महिमा खरोखरच रम्य आणि चिन्त्य आहे."

ते महात्मा फुले यांची ब्राह्मणवादाकडून पाळण्यातच ठेचली गेलेली चळवळच पुढे महात्मा गांधी यांनी पुनर्जीवित करून पुढे चालवली असे मानणारे होते आणि यामागचे स्पष्ट आणि स्वच्छ कारण म्हणजे महात्मा गांधी हे शेवटी ब्राह्मणेतर वर्गातून आलेले होते . ते म्हणतात , " गांधीजींनी हरिजनउद्धाराचा कार्यक्रम हाती घेतलाय म्हणून ऑर्थोडॉक्स लोकांचा संताप उसळून आलाय "

(प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय :खंड पहिला)

ज्योतिबा फुले यांना ब्राह्मण धर्माविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सोबत मुसलमान असणे फार आवश्यक वाटत होते काहीसा हाच विचार नंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेला आहे त्यामुळेच ते म्हणतात ,"शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता ?

मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून, तिला रसातळाला नेण्याचा यत्न करणे, हा तर प्रत्येक मनष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्रस्वातंत्र्याचा धर्म उद्दिपित करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय. शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे होते. महाराष्ट्र म-हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? म-हाठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी म-हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्त्वाकांक्षेने बालवयातच फुरफुरलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणा-या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारीकडे काग्र लक्ष ठेवून, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्यप्राप्तच होते. त्याने अफझुलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय. अफझुलखानाच्या स्वारीचा उद्देश, त्याने विजापुरास मारलेली पैज. येताना वाटेत केलेले अत्याचार, आणि शिवाजीविरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. अफझुलखान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित अदिलशाही सत्तेने फेकलेला बांबगोळाच होय, ही त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच, शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच, त्याच्या डावाशी प्रतिडाव खेळला, आणि अखेर अतुल्य प्रसंगावधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद करून, शिवाजीचा महाराष्ट्र – स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहजगत्या टाचेखाली विझणारी ठिणगी नव्हे, "

-प्रबोधनकार ठाकरे

(दगलबाज शिवाजी या ग्रंथामधून)

थोडक्यात काय महात्मा फुले यांची ब्राह्मणे तर सामाजिक चळवळ, महात्मा गांधी यांची राजकीय चळवळ आणि हिंदुत्ववादी लोकांची धार्मिक चळवळ यांचे नेटवर्क प्रबोधन ठाकरे जमवतात आणि त्यामधून आपले क्षात्र हिंदुत्व व्यक्त करत राहतात . प्रश्न असा आहे की ते हे सर्व काही करताना बहुजनांचे हिंदुत्व मांडतात का ?

माझ्या मते या दिशेने त्यांची वाटचाल झालेली स्पष्टपणे दिसते महात्मा फुले यांच्याप्रमाणे त्यांनी सुद्धा बहुजन लोकांचे देव वेगळे आहेत असे स्पष्टपणे सांगितले होते आणि हे देव कोणते हेही सांगितले होते . बहुजनांचे खरे देव खंडोबा ज्योतिबा तुळजाभवानी हेच आहेत अशीच त्यांची मांडणी होती पण विरोधाभास असा होता की त्यांचा आवडता संत मात्र समर्थ रामदास होता आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना तो वारकरी संप्रदायापेक्षा अधिक मिशनरी वाटत होता जे त्यांच्या काळामध्ये ख्रिश्चन मिशनरींचे मिशनरी कार्य सर्वत्र दिसत असल्याने त्यांना महत्त्वाचे वाटत होते . खुद्द त्यांनी स्वतः स्वतःच्या पद्धतीने एक मिशनरी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या या हिंदू मिशनरी संकल्पनेतूनच आत्ताची शिव सैनिक ही संकल्पना विकसित झालेली आहे दुर्दैवाने तिचा जितका विकास अजून व्हायला हवा होता तितका तो झाला नाही आणि त्याचे फार मोठे तोटे शिवसेनेला झालेले आहेत .त्यामुळेच अनेकदा समर्थ रामदास यांचे त्यांनी समर्थन केलेले दिसते कारण समर्थ रामदासांनी अशा प्रकारची चळवळ महाराष्ट्रात उभी करून दाखवली असे त्यांचे म्हणणे होते प्रत्यक्षामध्ये आता नवीन जे पुरावे आलेत त्यावरून स्पष्ट दिसते की शिवाजी महाराजांच्या चळवळीशी समर्थ रामदासांचा काडीचाही संबंध नव्हता परंतु नंतर शिवाजी महाराजांचे जे वारस आले त्यांच्याशी मात्र रामदास पंथाचा फार खोल आणि व्यापक संबंध होता . या समर्थ चळवळीमधूनच प्रेरणा घेत आणि त्याची सांगड मिशनरी ख्रिश्चन लोकांच्या बरोबर घालत त्यांनी हिंदुत्वाच्या मिशनरीची संकल्पना मांडली पण हे समर्थन करताना कळत नकळत रामदास अनेकदा वर्णव्यवस्थावादी होतात हे त्यांच्या लक्षात आलेले नाही . त्यामुळे मिशनरी वर्क पण आहे पण कोणासाठी आहे तर ब्राह्मण धर्मासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी आहे असाच निष्कर्ष आपणाला समर्थ रामदास यांच्या बाबतीत काढावा लागतो त्यामुळे त्याचे उदाहरण आता एकविसाव्या शतकात आपण घेऊ नये हेच बरे . मात्र या हिंदुत्ववादी मिशनरीच्या संकल्पनेचा प्रभाव बहुदा हेडगेवार यांच्यावर पडलेला असावा आणि त्यातूनच मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण झाला असावा .

प्रबोधनकार यांची शाहू महाराजांच्या बरोबर असलेली मैत्री सुद्धा अशाच प्रकारच्या मराठ्यांचा वर्ण कोणता याच प्रश्नाच्या अंगाने आलेली आहे . आणि पुरावे गोळा करताना इतिहासकार सोबत असावेत म्हणून महाराजांनी त्यांना बोलावले आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण खटल्यामध्ये त्यांना मदत केलेली दिसते . ही मैत्री शेवटपर्यंत टिकली . या खटल्यामध्ये कळत नकळत मराठे क्षत्रिय आहेत की नाही हा प्रश्न होता . माझ्या मते हा संदर्भच वेगळा असायला हवा होता पण या काळामध्ये ब्राह्मण धर्माची चौकट हीच हिंदू धर्माची चौकट बनल्याने साहजिकच सर्व प्रबोधनाचा विचार हा वर्ण विचार होऊन गेला . वास्तविक मराठा हा पूर्णपणे वीर समाज आहे आणि तो शैव आहे त्याचे कुलदैवत खंडोबा किंवा तुळजाभवानी आहे. भारतामध्ये शैव समाज स्वतंत्र समाज म्हणून अस्तित्वात असतो हेच त्या काळामध्ये कोणाला मान्य नव्हते त्यामुळे साहजिकच प्रत्येक गोष्टीचा विचार करताना आपण ती गोष्ट वैचारिक चौकटीत बसवताना वर्ण चौकटीत बसवली पाहिजे असा काहीतरी गैरसमज या काळात लोकांचा झाला होता त्यामुळे साहजिकच वीर समाज असलेले सर्वच्या सर्व शैव समाज मग ते मराठा असोत की शीख असोत की राजपूत असोत की जाट असोत स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेण्यामध्ये हळूहळू धन्यता मानायला लागले . त्याचा प्रचंड प्रभाव या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर पडलेला दिसतो त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या सीकेपी समाजाच्या संदर्भातील सर्व पाळीमुळे शोधून आपण क्षत्रिय कसे आहोत याची मांडणी त्यांनी केलेली दिसते .

प्रश्न असा आहे की हा क्षात्र हिंदुत्वाचा विचार आता पूर्णपणे बहुजनांच्या हिंदुत्वाकडे आपणाला नेता येणार आहे का ? 

माझा यापुढचा विचार असा की मुळातच ज्यांना आपण अलीकडे ब्राह्मण समजतो त्यामधील 90% लोक हे मूळचे शैव आहे आणि ते पंडित आहेत त्यांना सुद्धा पुरोगामी पद्धतीने पुढे नेत आणि ब्राह्मण हे टायटल काढून घेत आपण पंडित समाजामध्ये सामील करून घेतले पाहिजे . खुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा या प्रकारचे धोरण अवलंबलेले दिसते आणि पंतांचा म्हणजेच पंडितांचा समावेश आपल्या मंत्रिमंडळात केलेला दिसतो . फक्त त्यांनी त्या काळातील पंतांचे ब्राह्मण हे टायटल काढून घेतले नाही पण आता मात्र हे टायटल काढून घेतले पाहिजे कारण ते शेवटी वर्ण व्यवस्था पुन्हा आणते असा अनुभव आहे .

माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की आपण जे ब्राह्मण आहे त्यांना पंडित बनवावे जे स्वतःला आता क्षत्रिय समजतात त्यांना आपण वीर समाज आहोत याची जाणीव करून द्यावी जे वैश्य आहे त्यांना त्यांच्या मूळ वाणी पणी समाजाची आठवण करून द्यावी आणि संपूर्ण वर्णजात व्यवस्थाच जाळून राख करावी ही व्यवस्था हिंदू लोकांच्या हिंदवी लोकांच्या मुळावरच आलेली आहे आपण मुस्लिम आणि इंग्रज लोकांच्याकडून तिच्यामुळेच हरलेलो आहोत . त्यामुळे यापुढे जर का आपणाला टिकायचे असेल तर एकत्र करायचे असेल तर एकप्राण व्हायचे असेल एकात्म व्हायचे असेल तर जितक्या लवकर आपण आपल्या समाजातून भारतामधून वर्ण जात व्यवस्था हाकलून देऊ तितके बरे ! हळूहळू का होईना परंतु भाजपमधील हिंदुत्ववादी विचार सुद्धा आता या दिशेने जाताना दिसतो आहे आणि तो तसा जाताना दिसत असल्यानेच अलीकडे अचानकपणे ब्राह्मणी हिंदुत्व या नव हिंदुत्ववादी विचाराला पूर्णपणे मागे खेचत आहे . माझे मत असे की तुम्ही काँग्रेसवाले असा नाही तर संघवाले असा हिंदुत्ववादी असा नाही तर सेक्युलर असा भारताच्या भल्यासाठी किमान या एका मुद्द्यावर एकत्र यायला आता हरकत नाही . काही काळ आपणाला जनरल, ओबीसी बीसी दलित आणि आदिवासी असे पंचप्रवर्ग स्वीकारायला लागतील पण हे सुद्धा लवकरात लवकर जावेत इतकी आपली आर्थिक व्यवस्था प्रगत झाली पाहिजे सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली पाहिजे आणि राजकीय करणामधले या वर्ण जात व्यवस्थेचे कणे मोडून पडले पाहिजेत . जेवढ्या लवकर हे सर्व होईल तेवढा आपला विकास जास्त वेगाने होईल अन्यथा बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असे सर्व फोलाचे होऊन जाईल 

प्रबोधनकार ठाकरे यांचे अंतिम उद्दिष्ट हे जर आपणाला साध्य करायचे असेल तर आता अधिक काही नवीन बदल स्वीकारावे लागतील . 

श्रीधर तिळवे नाईक

Saturday, July 25, 2026

चॅनेल स्पिरिच्युअल ह्या

 लोक श्रीधर तिळवे नाईक 


 १


लोक खूप स्ट्रॉंग असतात 

त्यांचा उथळपणा खूप स्ट्रॉंग असतो 


त्वचा पाहणारे त्यांचे डोळे विकट असतात 

जे बिकट न पाहता 

सरसकट पाहतात 


तू त्यांचे काय करू शकतोस ?



लोक व्यवस्था बनवतात 

तिचे काहीही करता येत नाही 

लोक धर्म बनवतात 

त्याचे काहीही करता येत नाही 

लोक कार्पोरेट बनवतात 

त्यांचे काही करता येत नाही 


लोकांचे काहीच करता येत नाही 

कारण लोकांच्याकडे लोकसंख्या असते 



लोकांची शाही आली कि 

लोकांचे प्रश्न सुटतील 

असं तुला वाटलं होतं 


आणि लोक त्यांच्या शाहीतही 

देव आणि राजे वसवत राहिले 

नेते आणि अभिनेते देव्हाऱ्यात बसवंत राहिले 


लोकांच्या शहाणपणावर अनेक अफवा बेतल्या गेल्या 

आणि शेवटी गंज सापडल्यावर कळले 

मेटल्स नाहीसे झालेत 



एक आयुष्य 

लोकांच्या कल्याणासाठी वेचलेलं 

लोकांच्या मूर्खपणात वाया गेलं 


आता ह्या आयुष्याचं 

तू काय करणारेस ?



लोक 

त्यांच्यासाठी वाया गेलेल्या आयुष्याचे फोटो बनवतात 

किंवा पुतळे 


एरव्ही लोकांना त्यांच्यासाठी वेचल्या गेलेल्या आयुष्याविषयी 

काहीही देणेघेणे नसते 


लोक स्वार्थी असतात 

आणि लोकांचा स्वार्थ ज्यांना वापरता येतो 

त्यांना ते नेते बनवतात 


तुझा निस्वार्थीपणा 

हा त्यांच्यासाठी फक्त चेष्टेचा विषय आहे 

तेव्हा हे वाया गेलेले आयुष्य नीट गोळा कर 


समाधी लाव 


लोकांच्यातून 

त्यांच्या नीचपणातून मुक्त होण्याचा 

आणि त्यांच्या मूर्खपणाला माफ करण्याचा 

सर्वोत्तम उपाय 

मोक्ष आहे 


श्रीधर तिळवे नाईक 


{चॅनेल सिरींजमधील चॅनेल स्पिरिच्युअल ह्या काव्य फाईलीतून }


मोहाच्या दऱ्या खोटं बोलतात 


वासना आणि आपण यांच्यात अंतर किती 

जादूमंतर किती 


या शहरात इमारती झाडासारख्या उगवलेल्या वाटतात 


लिफ्ट म्हणजे मजले बांधणारे सरकते सिमेंट 


वासनांची निमंत्रणे धुळीसारखी 


असं नाही कि तुझ्याबद्दल माहीत नाही 

तरीदेखील त्वचेवर पाईप्स आणि काचा 

डोळ्यात गाणाऱ्या भींती आणि लिफ्ट देणाऱ्या खाचा 


मला आवरायला हवं त्वचेचं अंग पृथ्वीचे सुख 


राख होण्यापूर्वीच सावरायला हवा त्वचेचा कोळसा 


नाहीतर जंगल काय किंवा शहर काय 

वासनेच्या आगीत मैलोगणती राख 

आणि हृदयात त्यांच्या बातम्या 



निसर्गानं बाईला इतकं सुंदर का बनवावं 

कि मी पुरुष आहे म्हणून मला बाई सुंदर वाटते 


तपशिलांच्या आणाभाका घेता येत नाहीत 

डिटेल्स टेल्स सांगताना सुंदर दिसतात 


बाई कळायला सात जन्म पुरत नाहीत 

आणि आठव्या जन्मात ती आयुष्यात येत नाही 

म्हणते ,"अशा अडाणी पुरुषाबरोबर आता आठवा जन्म कोण काढेल ?"



तारुण्य मादक 

त्यात पापाचे उदक 

हंस बनते बदक 

उडत राहतो 



संभोग म्हणजे काळाला पडलेलं भोक 

बासरी वाजवणारे 

त्यातूनही गाणी तयार करतात 



तू कोणाचीतरी कोण 

येतीयेस 

पार्ले गर्ल अजूनही चेहऱ्यात शाबूत 


"मी तुला बिस्किटासारखी खाल्ली असती 

जर तू माझी बायको असतीस "


विचार येतोय 

आणि मला कळतंय हाच तो मोहाचा क्षण 

ज्यात हिमालय गडगडतात 



तुला डिवोर्स घ्यायचा आहे 

आता मी तुला काय मानावे 

विवाहित कि अविवाहित ?


संभ्रम भ्रमन्ती करतायत 

मी नवल कर झालोय 


इतक्या फास्ट असमाधान ?


असंतोषाचे काळे आरसे 

कानांच्या खिडक्या खुल्या 

दरवाज्यांची आदळाआपट 


संसाराचे ग्रीस ऑइल भाषेला पिळत 

भावनांचे पीळ आणि बिळे उंदीर लापता 


"मी ड्रेसविषयी विचार करत राहिले 

जागी झाले तेव्हा शरीर उरले होते "


संसार कायमच फुटपाथवर येतो कि काय ?

कि हे व्यभिचाराचे अरबन आमंत्रण आहे ?



"आपण टॅलेंटविषयी टॉलरन्ट असलं पाहिजे "

मी तुझ्या टॅलेंटला पहात स्वतःला समजावतोय 


तुझी बोर्डात आलेली गुणवत्ता 

आम्ही तयार केलेली नाही 


कॉम्पलिकेटेड हार्मोन्सची हार्मनी कुणाला सापडलीय ?

वासनेला सोन्याचे मुकुट घातले म्हणून ती थोडीच गोल्डन होते ?


तुझा डिव्होर्स होणार हे मला फ्लॅश सांगतोय 

मी त्याला गती द्यावी 

कि चाकांच्यातली हवा काढून घेऊन 

त्याला स्लो मोशन करावे ?



तुझ्या शरीराला एकाचवेळी चाफ्याचा आणि सॉसचा वास 

तुझ्या गालाला चांदणं पडतं 


तुझं मांस खाटकाखाली जाऊ नये 

इतकी काळजी तर घ्यायलाच हवी 


मी तुझ्या जाणिवेची जबाबदारी घेतोय का ?

कि माझ्या मोहाला मी बौद्धिक सुपारी देतोय ?


तुझ्या शरीराच्या मादकतेला कौन माईका लाल भुलणार नाही ?


माझ्या वासनेची जीभ हुळहुळतीये 

मी तिला छाटावे 

कि सावकाश रसवंती निर्माण करत 

तुलाच चाटावे ?



लस्ट बस्ट होतीये 

आतल्या आत 

ज्याला न मिळते तळणी 

त्याला पृथ्वीचे मीठ अळणी 


आग लावून गेलेली तुझी मोरपिसे 

मला मोर बनवतायत 


वाच श्रीधरा वाच आंब्यांच्या वनात वाच 

ढगांचा कापूस पिंजत बसशील 

आणि कळणारही नाही अशा जागी नासशील 


१०


ज्या दगडापासून ईश्वराची पूजा सुरु होते 

तो दगड म्हणजे बाई 


आता तो स्वतःच्या डोक्यात घालायचा 

कि देहाच्या देव्हाऱ्यात ठेवायचा 


ज्याने त्याने ठरवावे 


११


तू स्वतःच्या राष्ट्राची राष्ट्रपत्नी 

तुला राष्ट्रपती हवाय 


तू भाषेचा आरंभ 

आणि तुला सभारंभ हवाय 


तू भगत भगवतीची 

आणि सवय भागवताची 


तू नदीचे मुळाक्षर 

समुद्राची सिग्नेचर 


तू आकाशाचा प्रकाश 

काळजाची ट्यूबलाईट 


तू ज्ञानाचे फळ खाऊन 

अनुभवाला ज्ञानमुक्त करणारी रँडम इमोशन 

पुरुषाची ट्युशन घेणारी मोशन 


तू मीच 

माझ्यासारखी दिसणारी 


१२


भ्रम कुठून सुरु झालाय 

आणि प्रेम कुठून सुरु झालंय 


मी रेल्वेवर स्वार होऊन 

तिला घोडी का बनवतोय 


हे कुठले स्टेशन आहे 

जे अस्वलासारखें दिसूनही 

हिरवेगार वाटतंय ?


ही कुठली बिल्डिंग 

जिथे भाषा पुरेशी न वाटल्याने 

शरीरे भिडवावीशी वाटतायत ?


मी ओठांवर ओठ टेकवतोय 

कि वादळाला साइन करत 

वारा बाणवतोय ?


आवेगांचे किस फडफडतायत 

बाथरुममधला नळ पाण्याचा ताशा वाजवतोय 

लेझीम सत्तर एमएम सुरु 


आणि अचानक कुणीतरी आल्याने इंटरवल 


१३


हे घडायला नको होते आणि घडले 

हे घडायला नको होते म्हणून इंटरवलवर अडले 


तू मॅरीड असल्याची सणसणीत अभिव्यक्ती आदळली 

आणि सेक्स थंड झाला 


मी ओशाळा 

इथे ओशाळला सेक्स 


१४


अचानक मला जाणवतंय 

शेवटी हे चोरटे आहे 

मग ते कितीही गोमटे दिसो 


कॉमन बदनशीबी 

आणि तरीही गिल्टचे गिलोटिन नाही 

का नाही 


कि डिवोर्सचा फ्लॅश आलाय म्हणून सर्व नैतिक वाटतंय ?


१५


आवाज गमावलेल्या दिशातून दगड येतायत 

जे ढगासारखे दिसले होते 


पृथ्वी माझ्या पायात टाचा घासतिये 

मी तिला आता कोणत्या हाय हिल्स देऊ ?


१६


आपण पुढे सरकतोय पुढे सरकतोय पुढेच सरकतोय 

मी कविता लिहितोय कविता लिहितोय कविताच लिहितोय 


सनातन भगव्यापेक्षा मी हिरवी सडन डेथ का निवडली ?


कि आयुष्याने पाठवलेला हा धडा होता 

मी कानाला खडा लावावा म्हणून ?


१७


तू नाहीस 

तुझ्याबरोबरचा तो काळही नाहीये 


मी बसलोय ह्या समुद्रापुढे 

आपल्या संबंधाचे पंचांग घेऊन 


नक्षत्रांचा आपण दोघांनी मिळून केलेला चुरा 

आजही माझा फडशा पाडतो 


आपल्या संबंधाला व्यभिचार म्हणावे कि प्रेम 


कि कोणतीच फ्रेम न लावता 

त्यांना फोटो समजावे ?


एक निश्चय ध्रुव ताऱ्यासारखा माझ्यात सेटल होतोय 


ह्यापुढे मॅरीड स्त्रीशी सेक्स नाही 

जो आचार आपलं लोणचं करतो 

त्याला ताटात वाव नाही 


तू म्हणशील 

हा तर सनातन निष्कर्ष झाला 


मी म्हणतो 

आपले शरीर माझ्या ह्या निष्कर्षापेक्षा सनातन आहे 


श्रीधर तिळवे नाईक 


(चॅनेल सीरीजमधील चॅनेल स्पिरीच्युअल 

ह्या काव्यफाईलीतून )


ज्ञानाला सुद्धा लोक घाबरायला लागले 

ज्ञानात सुद्धा लोकांना फील गुड लागायला लागले


ब्रेन सुद्धा सतत फील गूड च्या शोधात 

बेस्ट मूड च्या संशोधनात 


कवी म्हणून भावना पाहायला जाशील 

आणि ब्रेनमध्ये फसशील 


तुला संत व्हायचंय 

आणि ब्रेनला फक्त जिवंत राहायचंय 


टिकण्याला धमकी मिळाली 

की तो खमका होतो 

एरवी नाही तर मिस्टर चमको होतो


सतत चुकण्याची वाटणारी भीती 

त्याला पळपुटा करते 


मोक्ष तर त्याला ठाऊकही नाही 

त्याच्या दृष्टीने ते

 ऱ्हस्वदृष्टीत दिवा स्वप्न 

दीर्घदृष्टीत सूर्य स्वप्न 

काजव्याने पाहिलेले 


अशावेळी ब्रेनच्याही पलीकडे असलेला तो शिव 

तुला कसा शिवणार आहे ?


अपयशाच्या शक्यता सावध करतात 

आणि यशाच्या शक्यता दिसत सुद्धा नाहीत 


नकळत येणारे फ्रस्टेशन 


तुला ते ट्रस्टेशन बनवायचे आहे 


हे तुझे भाग्यच म्हटले पाहिजे कि 

सविकल्प समाधी तू जन्मतःच घेऊन जन्मला होतास 

जी सुप्त होती 

आणि योग्य वेळ येताच प्रकट झाली 


पण बाकीच्यांना हे भाग्य लाभलेले नाही 

याची जाण बाळग 


मागील जन्मांचा दाखला देऊ नकोस 

लोक आळशी बनतील 


लोक मोक्षाविषयी चाल ढकल करण्यात एक्सपर्ट झालेले आहेत 

हे लक्षात घे 


ते फास्ट आहेत 

कारण ते भयग्रस्त आहेत 

ते ऑटोमॅटिक आहेत 

जेव्हा धोका चालून येतो 

ते हाय अलर्ट वर आहेत 

कारण त्यांना जगायचेय


स्वतःच्याच आयुष्याचा पंचनामा करायला 

मुळात स्वतःचे शव दिसायला लागते 


लोकांना स्वतःचे शव दिसत नाही 

शो दिसतो 


तेव्हा लोकांना स्कॅन करताना दयाळू हो 

क्षमा कर 

आणि त्यांच्या आर्टिफिशल शांतीला न दुखावता 

त्यांची तब्येत सांभाळ 


जग असे बनले आहे 

कि ताण वरताण होतात 

आणि हार्मोन्स 

फक्त लढण्याची हार्मणी 

बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वाजवतात 


आनंदाचे डोही आनंद तरंग 

ही फक्त कर्मणूक आहे लोकांच्यासाठी 

किंवा आर्टिफिशियल शांततेसाठी 


तेव्हा लोक यदाकदाचित घाबरून गोठले 

तर त्यांच्या बर्फावर स्केटिंग करू नकोस 

शांतपणे त्यांचे आईस्क्रीम बनव 

आणि त्यांना खायला घाल 


तू तुकारामाच्या आणि बुद्धाच्या जगात नाहीस 

हे लक्षात ठेव 


चान्स स्लो मोशन मध्ये 

संधी स्लो मोशन मध्ये 

चांगल्या शक्यता स्लो मोशन मध्ये 


जगात फक्त स्वार्थच असा आहे 

जो फास्ट आहे 

मृत्यूच असा आहे 

जो जलद आहे 


तेव्हा जलद जलद भरून येणारच 

पावसाळा उगवला की सूर्य दिसेनासा होणारच 


थोडा सहनशील बन 

लोक ओव्हर रिऍक्ट झाले 

तर तू अंडर रिऍक्ट हो 


अनेकदा डेंजर मिस कॉल देतात 

त्यांचा खरा कॉल उचलायला सुद्धा ट्रेनिंग लागते 


अनिश्चिततेत जन्म आपला 

अनिश्चिततेत जगणे 

कशाला निश्चित करत बसतोस 

अनिश्चित सगळे वागणे 


ही पृथ्वी म्हणजे ब्रम्हांडाने आणलेली आणीबाणी आहे 

ही उत्क्रांती तिने पुरवलेला 

दाणापाणी आहे 

तिला तातडी पुरवशील 

तर ती नको ती घाई करेल 


माणूस तिच्यापासून वेगळा नाही 

माणसाच्या घाईचा वेग 

स्वतः त बाणवू नकोस 

उगाच चिंतेच्या तणावात 

स्वतःला ताणवू नकोस 


लोकांच्यावर एक निश्चिततेचे वजन आहे 


लोक सतत चेक करतात करतील 

पुन्हा पुन्हा खात्रीची झडती घेतात घेतील 

अधून मधून पॉज घेतात टेहळणी करतात करतील 


तू थकून जाऊ नकोस 


लोक अपवादात्मक वेळी तुझी हेटाळणी करतील 

फेटाळणी करतील 


तू थकून जाऊ नकोस 


लोक शेवटी तुला त्यांच्या कर्मकांडात रिचवतील 


तू थकून जाऊ नको 


थकवा हा सुद्धा तुझ्या मेंदूचा कावा आहे 

किंवा मग तुलाही न कळालेला विश्रांतीचा बारकावा आहे 


काय आहे ते नीट बघ 


थ्रेट थेट येईलच असे नाही 

ती ग्रेट भेट असेल असेही नाही 

ती चेकमेट असेल असेही नाही 


ती कदाचित फक्त ओपन द गेट असेल 

किंवा सतत मारामारी करणारी कोल्हापूरची शिवाजी पेठ असेल 


बळी पडू नकोस 

थकून तर मुळीच जाऊ नकोस 


कर्मकांड तात्पुरती सुटका असते 

ज्ञानकांड तात्पुरती औषध योजना असतो 


भक्ती प्रज्ञा आंधळी बनवण्यासाठी 

मागील दाराने येण्याचा प्रयत्न करत असते 


तेव्हा भाव जीवंत ठेव 

पण देव मारून टाक 


धर्म लॉन्ग टर्म पॉवर ट्रॅप आहे 

जरी दीर्घकाळ टिकणारी योजना वाटत असली तरी 


तेव्हा तात्पुरत्या येणाऱ्या तरतरीवर भाळू नकोस 

जे लोक देवाला सुद्धा झोपी जायला भाग पाडतात 

ते किती डेंजरस असतील 

ते समजून घे 


हे सर्व श्रद्धेच्या नावाने चालले म्हणजे ऑथेंटिक होत नाही 


तुला मोक्ष मिळवायचा आहे 

तेव्हा यातून निसट 


हा पकडापकडीचा खेळ 

अनेक साधकांचा मेळ 

बिघडवून बसलेला आहे 


छोट्या छोट्या अनिश्चितता 

हळूहळू झेपेण्याश्या होतात 

छोट्या छोट्या आकारांना 

भय मॉन्स्टर बनवू लागते 


तेव्हा सावध 

हे सर्व तुझा वध करण्याची तयारी असू शकते 


अवधान असणे 

आणि सावधान असणे 

यात जमीन आसमानाचा फरक आहे 


अवधान ठेव 

पण सतत भय दाखवणाऱ्या दंतकथा 

स्वतःच्या दातांपासून लांब ठेव 


सर्वच गोष्टी आरोग्यदायक असतील असे नाही 

सर्वच गोष्टी हानिकारक असतील असेही नाही 


ओळखायला शिक 

कुठे भाजी कापायची सुरी

आणि कुठे मर्डर करणारा चाकू 


उगाच घोर लावून जगशील 

तर जगणारच नाहीस 

केवळ देहाला प्रेत बनवून श्वसन करत राहशील 


ज्याला चिंतांना चितेत जाळता येते 

तोच स्मशान वैराग्य सांभाळू शकतो 


शंभर टक्के खात्री शोधणारे लोक 

अंतिमतः निष्क्रिय होतात 


तेव्हा मोक्षाची खात्री टक्केवारीत मोजू नकोस 


अग्निपरीक्षा दे 

वायु परीक्षा दे 

सूर्य परीक्षा दे 

पृथ्वी परीक्षा दे 

जल परीक्षा दे 


जळ आणि जाळ 

श्वास घे आणि दे 

उन्हात उभा राहा 

आणि अंगभर अग्नी लादून घे 

पृथ्वी सारखा सहनशील हो 

सतत काहीतरी उगवत राहा त्यासाठी मेंदूची शेती कर 

पाण्यात बुड 

आणि पुन्हा हातपाय मारून 

वर ये 


या जगाचा बुडबुडा व्यवस्थित इजा न करता फोड 


हा अनिश्चिततेचा ताम्जाम नीट हाताळ 

त्यासाठी हातांना स्वाभाविक कर 

तिला सहिष्णुता दे करुणा दे 


नकारात्मक पूर्वग्रहांना फेटाळून कचऱ्यात टाक 

समाजाने मेंदूला दिलेली गटारे साफ कर 


सतत मृत्यूचे भय डिटेक्ट करणारा डिटेक्टिव्ह 

कामावरून काढून टाक 


भयाची सक्ती करून सतत जेलमध्ये पाठवणारा तुरुंग 

जेलर सकट तोडून टाक 


भयाच्या सक्तीविरुद्ध असहकाराची चळवळ पुकार 

मग हळुवार ऑपरेशन करून 

ते नको असलेल्या अवयवासारखे शरीरातून काढून टाक 


सतत कयामतीची कवायत सादर करणारे फिजिकल एज्युकेशन 

मेंदू मधून हाकलून लाव 


आयुष्य कम्फर्टेबल असो किंवा अन कम्फर्टेबल 

तू स्व

तःच्या मस्तीला 

जल्लोषात बदल 


या दलदलीतून कमळासारखे उगवायचे असेल 

तर ब्रम्हांडा इतके हृदय कर 


आपोआप उमलायला लागशील 


हे शिवांडाचे झाड फुलांच्या उमलण्यासाठी 24 तास तत्पर आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल या काव्यफायलीतून)


गर्दीत तुला सुरक्षित वाटतं ?

कसं चेंगराचेंगरीत वाटतं ?


हा असा आंधळ्यांचा जमाव 

त्यांच्या उन्मादात सुरक्षित वाटतं?


का जातोस गर्दीत जमा व्हायला 

जमा करून स्वतःला सुरक्षित वाटतं? 


की कर्माची येत नाही जबाबदारी 

या विचाराने तुला सुरक्षित वाटतं? 


गर्दीत राहून मोक्ष मिळत नाही 

की स्वतःपासून पळणे सुरक्षित वाटतं?


जो जमवतो तो सत्ताधारी आहे 

त्याच्या सत्तेत तुला सुरक्षित वाटतं? 


सोबत लोक आहेत हे फिलिंग आहे 

या फिलिंग सोबत सुरक्षित वाटतं? 


जा बाबा गर्दीमध्ये विरघळून जा 

दिसेनासा होशील सुरक्षित वाटतं? 


मॉबफोटोतसुद्धा चेहरा काय दाखवतोस 

की तिथेही तुला नगण्य वाटतं? 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: स्पिरीच्युअल या काव्य फायलीतून)

Wednesday, January 29, 2025

 चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी १


महाराष्ट्रात अलीकडे युवाल हरारी याची चर्चा जोरदार चालू आहे याचे कारण अमेरिकेतल्या पॉप लिटरेचरची एकंदरच जगभर असलेली लोकप्रियता आहे अत्यंत सोप्या भाषेत वैज्ञानिक सत्य सांगणे हे सायंटिफिक पॉप लिटरेचरचे वैशिष्ट्य असते ते हरारीच्या लेखनामध्ये ओतप्रत भरलेले आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आश्चर्यकारकरीत्या हे करताना तो व पु काळ्यांच्याइतकाच लाघवी असतो साहजिकच अशा प्रकारचे वाचन करणाऱ्या लोकांना तो एक देवदूत वाटला तर आश्चर्य नाही 


आमच्या पिढीने चौथ्या नवतेचे काही प्रश्न निर्माण केले त्यांची स्वतःच्या डाटा उपलब्धतेनुसार उत्तरेही दिली आणि हे प्रश्न आता अधिक व्यापक डाटा घेऊन दुसऱ्या पिढीत सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणे झिरपलेले आहेत हे आपणाला हरारीच्या लेखनावरून स्पष्टपणे प्रतीत होते मराठीत त्याचा अनुवाद होतो हा नेहमीच मला पॉझिटिव्ह इव्हेंट वाटत असतो याचे कारण मराठीमध्ये चौथी नवता पसरवायची असेल तर असे सर्व वैज्ञानिक पॉप लिटरेचर अनुवादित होणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्या भोवताली काय चालले आहे हे नीट समजून घेईल मला नेहमीच या गोष्टीचा आनंद होतो की चौथ्या नवतेच्या दुसऱ्या पिढीतील प्रणव सखदेव हे अत्यंत ताकतीने त्याचा अनुवाद करत आहेत


कुठलेही तत्त्वज्ञान जेव्हा उदयाला येते तेव्हा ते अत्यंत किचकट असते उदाहरणार्थ जिला आज आपण उत्तर आधुनिकता म्हणतो ती प्रथम फ्रेडरिक Nietzsche याने अत्यंत व्यवस्थित मांडली परंतु त्याच्या समकालीन लोकांना ती झेपलेली दिसत नाही कारण त्या काळामध्ये उत्तर आधुनिक विज्ञान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले नव्हते पुढे आईन्स्टाईन मुळे सर्व गोष्टी सोप्या होत गेल्या आणि Nietzsche काय म्हणतो हे अधिक नीट समजत गेले पुढे मग उत्तराधुनिकता नीट समजावून सांगणाऱ्या पॉप लिटरेचरची निर्मिती व्हायला लागली फार प्राचीन काळापासून युरोपमध्ये ही प्रथा आहे आणि सोफिस्ट लोक ती नेहमीच चालवत आलेले आहेत अलीकडे तर या लोकांचे मूळ सॉकॅटिस मध्ये आहे आणि सॉक्रेटीस हा त्यांचा आद्य पुरुष आहे अशा प्रकारची मांडणी पुढे येते आहे भारतामध्ये शैव परंपरेमध्ये हा सर्व खटाटोप पंडित लोकांच्याकडे दिलेला होता त्यांनी तो कितपत नीट पार पाडला हा एक आता मोठा प्रश्न आहे युरोशीयन परंपरेमध्ये श्रुतीमध्ये हे काम ब्राह्मण लोकांनी हातात घेतले खरे परंतु त्यांनी चक्क त्या आधारे एक धर्म निर्माण करून टाकला आणि प्रत्येक धर्म स्वतःच्या ताब्यात घेण्याचे व ताब्यात ठेवण्याचे टेकनिकच डेव्हलप केले पाश्चात्त्य देशांमध्ये असा उद्योग तिकडच्या धर्माधिकारी लोकांनी केलेला होता आणि जीजस बळकावला होता त्या विरोधात प्रोटेस्ट ठेवून प्रोटेस्टंट निर्माण झाले आपल्याकडे मात्रे अजूनही असे प्रोटेस्ट निर्माण झालेले नाहीत अपवाद फक्त बसवेश्वर गुरुनानक आणि महात्मा फुले हे शैवच आहेत युरेशियन धर्मांनी मात्र कायमच तडजोडी स्वीकारलेल्या दिसतात आणि ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य केलेले दिसते अलीकडेच कुंभमेळ्यावर ब्राह्मण धर्माने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो पण सरते शेवटी तो फसलेला दिसतो खुद्द अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांनी हर हर महादेव म्हणतच पवित्र स्नानाची डुबकी घेतलेली दिसते अशा प्रकारचे वर्चस्व पाश्चात्त्य देशांमध्ये धर्माधिकारी लोकांचे राहिलेले नाही साहजिकच तिथे वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक पॉप लिटरेचर अतिशय चांगल्या रीतीने निर्माण होते अर्थात तिथेही कधीकधी सपाट करण्याच्या नादामध्ये मूळ सिद्धांताला धक्का लागतो तेव्हा वाद निर्माण होतो

साहजिकच असे लोक निर्माण होणे योग्य की अयोग्य हा कायमच वाद आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात तो कायमच निर्माण होऊन राहिलेला आहे


युवाल हराळीचे स्कूल कुठले असा प्रश्न नेहमी मला अनेक लोक विचारत असतात माझे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे त्यासाठी आपणाला थोडे आईन्स्टाईन कडे जावे लागते उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन ची सापेक्षतेची थेरी नीट समजत नव्हती तेव्हा बर्ट्रांड रसेल ह्याने अतिशय सोप्या भाषेत ते समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषे स्पष्ट करण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला होता (एबीसी ऑफ रिलेटिविटी)आणि हा प्रयत्न यशस्वी झाला इतका की खुद्द आईन्स्टाईनने जगात फक्त तीनच लोकांना सापेक्षता कळलेली आहे आणि त्यातील एक रसेल आहेत असे सर्टिफिकेट दिले होते आणि तिथून पुढे लोकप्रिय वैज्ञानिक वाङ्मयाचे एक नवीन रसेल स्कूल निर्माण झाले हरारीचे पूर्वज निपजायला सुरुवात झाली याला मी रसेलियन पॉप लिटरेचर म्हणतो हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण मांडणी ठेवत असतात आणि त्याचबरोबर काही इन्साइटससुद्धा पुरवत असतात कारण मुळात ते स्वतः तत्त्वज्ञ असतात हरारी या स्कूलमध्ये येतो असे लोकांना गाभा समजावून सांगणारे काही सोफिस्ट लोक प्रत्येक पिढीमध्ये निर्माण होणे फार गरजेचे असते पाश्चात्त्य देशांमध्ये अशी परंपरा कायमच राहिलेली आहे आपल्याकडेही धार्मिक क्षेत्रात मोक्षिक क्षेत्रात अनेक कीर्तनकार हेच करत असतात मात्र आपल्याकडे अनेकदा मूळ गाभा अत्यंत भ्रष्ट होत जातो उदाहरणार्थ पुराणे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत किंवा वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तने आपण ऐकली तर आपणाला असे दिसते की संत तुकारामांच्या अभंगाची कधीकधी चांगली आणि कधीकधी टोकाची सोपी करण्याच्या नादामध्ये मनोरंजक विश्लेषणे झालेली आहेत विज्ञानामध्ये मात्र जितकी निर्मिती या अंगाने व्हायला हवी होती त्या अंगाने झालेली नाही त्यामुळे साहजिकच हरारीचे महत्त्व मराठीसाठी तरी प्रचंड आहे किंबहुना प्रत्येक ग्रंथालयामध्ये हा मनुष्य जाणे आवश्यक आहे कारण त्या निमित्ताने का होईना पण चौथी नवता ही भानगड काय आहे हे अधिकाधिक उलगडत जाण्याची शक्यता असते 


श्रीधर तिळवे नाईक


चौथ्या नवतेची दुसरी पिढी युवाल हरारी २


उत्तराधुनिकतेने धर्म पुन्हा केंद्रस्थानी आणायला मदत केली आणि चौथ्या नवतेमधल्या सर्व विचारवंतांना त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी पेलावी लागली हरारी याला अपवाद नाही 


माझी स्वतःची याबाबतीतले मांडण अशी होती की धर्माशी आणि धार्मिक कट्टरतेशी सामना करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी मोक्ष प्रमोट करावा लागेल धर्म हा धर्माला उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे धर्माला उत्तर द्यायचे असेल तर ते मोक्षानेच देता येते हरारीला मोक्ष उपलब्ध नाही हे त्याचे दुर्दैव किंवा असे म्हणू की झियोनिस्ट दुर्दैव ! साहजिकच तो पुन्हा एकदा ज्यू धर्माच्या सेकंड टेम्पल वार कडे जातो आणि पुढे मग झियानिजमिक राष्ट्रवाद कसा आहे हे सांगायला लागतो इतकेच नव्हे तर जू लोकांचा राष्ट्रवाद ज्यू लोकांना का नाकारला जातो असा प्रश्नही तो उपस्थित करतो ज्या भूमीवर ज्यू लोक क्लेम करतायेत तो क्लेम कसा ऐतिहासिक आहे हेही पटवण्याचा प्रयत्न करतो प्रश्न असा आहे की हे त्याला का करावे लागते? दुसरा प्रश्न असा आहे की हे हिंदुत्ववादी लोकांच्या सारखे आहे का ? म्हणजे ब्राह्मण धर्माला अलीकडे जो लोकांच्या सारखी स्वतंत्र राष्ट्राची आवश्यकता वाटायला लागलेली आहे ब्राह्मणे तर चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जर भारतात पसरली तर ब्राह्मण धर्माचे हकालपट्टी होणे अटळ आहे असे ब्राह्मण धर्मे लोकांना वाटते प्रत्यक्षात त्या तथ्य नाहीये परंतु त्यांना तसे वाटते हे मात्र खरे आहे म्हणूनच अधून मधून ब्राह्मणांसाठी स्वतंत्र राष्ट्र मागितले जाते प्रश्न असा आहे की ब्राह्मणांना स्वतःचा हा ब्राह्मण धर्म जो सरळ सरळ वंशवादी आणि वर्णवादी आहे टिकवावासा का वाटतो एवढे सगळे रामायण आणि महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा वारंवार मुस्लिम आणि इंग्रजांच्या कडून पराभूत झाल्यानंतर सुद्धा वर्ण व्यवस्थेचा हा दुराग्रह का सुटत नाही स्वतःला टॉपला ठेवण्याचा हा आग्रह का सुटत नाही हे खरे तर खरोखर अवघड होऊन बसलेले आहे एक प्रकारे हा एक वंशवाद आहे आणि तो जेनेटिकल नाहीये तर ज्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला ते ब्राह्मण अशा प्रकारच्या कट्टर व्याख्येतून तो आलेला आहे त्यात ब्राह्मण्यतरांचे स्थान हे कायमच दुय्यम राहणार हे उघड आहे पण आश्चर्यकारकरीत्या हे दुय्यम स्थान सुद्धा अनेकांना सुखकारक वाटते की काय अशी सद्यस्थिती आहे ज्यू लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाहीये कारण मुळात ज्यू च एक महाटोळी आहे अशी त्यांची धारणा आहे जिच्यात अनेक किमान 13 टोळ्या येतात असे त्यांना वाटते ज्यू आणि ब्राह्मण लोकांना आपण देवाकडून निवडले गेलेलो आहोत असे वाटत असतं ब्राह्मण स्वतःला त्यामुळेच बिनधास्तपणे भूदेव म्हणवून घेऊ शकतात खरे तर बौद्धिक पातळीचा विचार केला तर जितके क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन जीव लोकांचे आहे त्याच्या धड २% कॉन्ट्रीब्युशन सुद्धा ब्राह्मण धर्माला आणि ब्राह्मण लोकांना देता आलेले नाही याचे कारण त्यांची बुद्धी त्यांनी धर्मामध्ये वाया घालवली याउलट ज्यू लोकांनी आपली बुद्धी सायन्स व तंत्रज्ञानाकडे वळवून अनेक जागतिक दर्जाचे सायन्स आणि तंत्रज्ञानातले काम करून दाखवले आणि त्यामुळे ज्यू लोकांच्या बद्दल एक प्रचंड आदर सर्वत्र आहे अपवाद फक्त मुस्लिम लोक आहेत अशा प्रकारचे काम करून दाखवले तरी हिटलरला हे लोक शत्रू वाटावे शत्रु वाटावेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे सर्वात वाईट गोष्ट त्याचा अहंकार हा आर्य अहंकार होता आणि आश्चर्यकारकडी त्या ब्राह्मण लोकांना हा आरे असण्याचा अहंकार फार प्राचीन काळापासून आहे किंबहुना भारताला आर्यावर्त म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली होती ब्राह्मण असो किंवा रोमन कॅथोलिक असोत या दोघांच्याही मुळामध्ये मुळात युरेशियन मुळे आहेत आणि आश्चर्यकारकरीत्या ती अजूनही ऍक्टिव्ह आहेत की काय अशी मला शंका येत असते कारण हे दोघेही कायम स्वतःला वेगळे काढत असतात मुळसा ख्रिश्चन धर्म आर्यन ख्रिश्चन धर्म कसा काय बनला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा इतिहास आहे आणि त्यामध्ये रोमन अरे लोकांनी अत्यंत मेजर बजावलेला आहे असे असून सुद्धा आश्चर्यकार्यक रित्या हे दोन धर्म एकमेकाचे शत्रू होण्याऐवजी आता एकत्र येऊ बघतात याचे कारण हिटलरने स्वतःला आर्य वंशी म्हणून प्रमोट केले असले तरी स्वतःचा धर्म मात्र त्याने ख्रिश्चन असा सांगितलेला आहे तो खरंतर कितपत ऑथेंटीक आहे याविषयी मला शंका आहेत कळत नकळतपणे  प्रोटेस्टन्ट धर्मात त्यांच्या संस्थापकाचा म्हणजेच मार्टिन ल्युथर याचा जो धर्म होता त्यात जू लोकांचा जो द्वेष चालला होता तो द्वेष जर्मन परंपरेतून त्याच्याकडे चालत आलेला होता असे आता दिसते त्यासाठी लागणारे तर्कशास्त्र आर्य सिद्धांताने त्याला पुरवावे आणि हेच सिद्धांतन ब्राह्मणांना सुद्धा आपले वाटावे याहून शोकांतिका काय ? हरारी जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला हे सगळे डायनॅमिक्स किती कळलेले असते याबद्दल मला शंका आहेत साहजिकच हिटलरच्या सर्व कारवायांनी जीव लोकांच्या मध्ये ज्यू लोकांच्या मध्ये एक प्रकारे असुरक्षितता निर्माण केली आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या सर्वांसाठी आणि स्वतःच्या धर्माच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज भासायला लागली ही परिस्थिती आपण जर का हिटलरच्या काळात गेलो तर आपण नीट समजून घेऊ शकतो आणि ज्यू राष्ट्राला मान्यता ही देऊ शकतो त्यामुळे भारताचा इस्त्राईल या स्वतंत्र राष्ट्राला असलेला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा भारताने कायम स्वरूपात ठेवलाच पाहिजे कारण नैतिकदृष्ट्या तो योग्य आहे पुन्हा कोणी ज्यू विरोधात काही करणारच नाही याची कसलीही खात्री माणसाच्या संदर्भात देता येत नाही आता ही जी इनसिक्युरिटी आहे ज्यामधून इस्त्राईल तयार झाला त्याच्याबाबतीत ऑब्जेक्शन कोणाचे आले तर आश्चर्यकारक लिहिता हिटलर यातून सुटला आणि मुस्लिमांना आता इस्त्राईल नकोसे झाले आहे साहजिकच इस्त्रायल पासून मुस्लिम आणि मुस्लिमांच्या पासून इस्त्राईल आता इन सिक्युअर झालेले आहेत आणि त्यातूनच आत्ताच्या गाजा पट्टीचा प्रश्न आलेला आहे 

प्रश्न असा आहे की ब्राह्मण लोकांच्या मध्ये ही जी इन सक सिक्युरिटी आली आहे तिचे मूळ नेमके कशात आहे आणि  कुठून आली ?

 

वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जी प्रचंड ज्यू लोकांची हिंसा केली तशीच हिंसा काश्मीरमध्ये पंडित लोकांच्या वाट्याला आली त्यामुळे साहजिकच एक प्रचंड भय ब्राह्मण धर्मी लोकांच्या मध्ये निर्माण झालेले आहे साहजिकच आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावेच लागेल ही एक प्रखर जाणीव ज्या मागे खुद्द त्यांचे धार्मिक टेक्स्ट आहे सतत जो लोकांच्या मध्ये जशी  वाढत गेली आणि शेवटी इस्त्राईलची निर्मिती झाली  तसे काही भारतात झाले आहे का महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये अचानक ब्राह्मण लोकांच्यावर हल्ले झाले ते खरोखरच इतके तीव्र होते का की ज्यामुळे ही इन्सिक्युरिटी निर्माण व्हावी ? की ब्राह्मण लोकांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी लोक ते गप्प बसतील त्यांनी प्रतिकार करता कामा नये कारण ब्राह्मणाची हत्या करू नये असे ब्राह्मणांच्या धर्मात सांगितलेलेच आहे प्रत्यक्ष मध्ये ब्राह्मणे तर लोक हे पाळतात असे नाही त्यामुळे मग ही इन्सिक्युरिटी आली आहे का भारतातले ब्राह्मण लोक आणि त्यांचा ब्राह्मण धर्म हा अनेकदा ज्यू लोकांच्या धर्मासारखा आहे असे ब्राह्मण लोकांना वाटत असते आणि म्हणूनच त्यांना इस्त्राईलबद्दल आणि ज्यू धर्माबद्दल प्रेम वाटत असते त्यामुळेच हरारीच्या अनुवादाला आपल्याकडे अनेकदा हिंदुत्ववादी प्रचंड प्रमाणामध्ये उत्तेजन देताना दिसतात कारण शेवटी हरारी फिरून फिरून गंगावेस या म्हणीप्रमाणे ज्यू धर्माकडे परततो 


प्रश्न असा आहे की ज्यूधर्म हा काही आंतरराष्ट्रीय धर्म आहे का? तर नाही ! त्यामुळेच एकीकडे हरारी स्वतःची मांडणी आंतरराष्ट्रीय असे आहे असे मानतो आणि दुसरीकडे झियनिझमचे पूनरागमन झाले पाहिजे असेही म्हणतो चौथ्या नवतेत ही सक्ती झालेली आहे कारण शेवटी इस्लामला पर्याय म्हणून कोणता धर्म द्यायचा हा सर्वांच्या पुढेच प्रश्न ठाकला आहे आणि याचे कारण इस्लाम हा पसरत चाललेला आहे धर्म नाकारला की धर्म येत नाही अशी एक पुरोगामी समजूत होती त्या समजूतिला पूर्ण छेद इस्लामने दिलेला आहे आणि याचा दबाव युवाल हरारी वर आहे मला स्वतःला वैयक्तिक रित्या शैव धर्म निवडण्याची सक्ती झाली याचे कारण आत्ताची इस्लामने आणि ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली परिस्थिती आहे मी बौद्ध धर्म निवडण्याचाही प्रयत्न केला होता परंतु ते शक्य नाही हे माझ्या लक्षात आले विशेषतः भारतात तर ते अजिबात शक्य नाही पण जिथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे तिथे बौद्ध धर्माची शक्यता नाकारता येत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की आज ना उद्या चीनला बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल जापान ने तो आधीच स्वीकारलेला आहे भले त्यांनी त्याला झेन हे नाव दिले असेल याला पर्याय नाही कारण ब्रम्हांडाशी आणि निसर्गाशी नाते जोडणे हे माणसाला आवश्यक वाटते त्याची ती एक मूलभूत गरज आहे आणि ती अन्न आणि वस्त्र यांच्या इतकीच खोल आहे अशा वेळेला तुम्ही एक तर काल्पनिक नाते जोडू शकता किंवा खरे नाते जोडू शकता मोक्ष खरे नाते जोडतो धर्म काल्पनिक नाते जोडतो यापैकी काय निवडायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे याबाबतीत माझे म्हणणे असे की काल्पनिक नाते निवडायचे असेल तर निदान मग असा धर्म निवडावा जो अधिकाधिक शैक्षणिक दृष्ट्या ओपन असेल सहिष्णू असेल ज्याने पुरोगामी वाद पचवलेला असेल आणि भारतात असा धर्म शैव धर्म असल्याने मी शैव धर्माची निवड करतो आता कोणी त्याला हिंदूशैव म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही कारण टायटल पेक्षा माझा मुख्य भर हा आशयावर आहे 

हरारी याच्यापुढे असलेला पेच हा काँग्रेस पुढे असलेल्या हिंदू मुस्लिम प्रश्नासारखा आहे त्यामुळेच पाकिस्तान द्यायचे की नाही असा जो प्रश्न होता तसेच पॅलेस्टाईन द्यायचे की नाही असा हा प्रश्न आहे पॅलेस्टाईन नंतर आलेत आणि तरीही ते स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र क्लेम करतात हा क्लेम हिस्टॉरिकल आहे की नाही हा खरा मुद्दा आहे गमतीचा भाग असा आहे की सांगितले जाते ते सर्व दंतकथात्मक आहे धार्मिक आहे आणि ती श्रद्धा आहे असा मांडण केला जातो साहजिकच मग भारत पाकिस्तान युद्धासारखी ज्यू पॅलेस्टाईन युद्ध चालू राहणे अटळ आहे कारण मूळ भूमी आमची आहे अशी ज्यू लोकांची श्रद्धा आहे तर नंतर आलेल्या मुस्लिम लोकांनी आमची भूमि का मागावी आणि तीही एका दंतकथेच्या आधारे असा त्यांचा प्रश्न आहे वास्तविक इस्त्राईलसाठी स्वतंत्र राष्ट्र ही सुद्धा धार्मिक दंतकथा आहे तर प्रत्यक्षात देवाने असे प्रॉमिस दिले होते की नाही हे कोण ठरवणार ? शेवटी हा सारा खेळ श्रद्धेच्या प्रदेशात जातो आज ना उद्या हरारीला मोक्षाकडे वळावेच लागेल किंबहुना अलीकडे जू-धर्मामध्ये हादिस हा एक संप्रदाय कळत नकळत मोक्षाच्या दिशेने जातो की काय अशी शंका येणे इतपत वाटचाल करतो आहे त्यामुळे आज ना उद्या हरारी या दिशेने जाईल पण सध्या तरी तो ही धार्मिक चौकट घेतो आहे आणि त्या आधारे इस्त्राईलच्या काही गोष्टींना प्रमोट करतो आहे आणि काही ठिकाणी रिव्हॅल्युएशन मागतो आहे 

पुढे जाऊन मग अर्थातच टेररिझमच्या संदर्भात मांडणी करणे अटळ बनते उत्तर आधुनिकतेने दहशतवाद हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक प्रश्न म्हणून पाहिला पण चौथ्या नवतेमध्ये मात्र तो इतका झिरपला की तो वैयक्तिक आयुष्यात आला माझ्या बांधकाम चालू आहे या काव्यसंग्रहामध्ये यासंदर्भात अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि चॅनेल लव हॉरर अँड टेरर या काव्यसंग्रहात सुद्धा अनेक गोष्टी आलेल्या आहेतच वेगवेगळ्या प्रसिद्ध प्रकाशित काव्यसंग्रहात काही कविता आहेतच कारण चौथ्या नवतेमध्ये दहशतवाद ही फक्त धार्मिक गोष्ट राहत नाही तर मुळात ती वैयक्तिक होत जाते मोहम्मद अली जिना यांनी पुरोगामी दहशतवाद मांडलाा आयातुला खोमेनी यांनी उत्तराधुनिक दहशतवाद मांडला आणि आता अल कायद्याने चौथ्या नवतेचा दहशतवाद मांडलेला आहे यामध्ये सर्वात गाजलेला अमेरिकेवरचा ट्विन टॉवर अटॅक होता ज्याचे जगभर पडसाद उमटले आणि साहजिकच सर्वच विचारवंतांना त्याविषयी चर्चा करणे आवश्यक बनले माझ्या कव्हीं या काव्यसंग्रहात त्यामुळेच आयातुला खोमनी आणि ट्वीन टॉवर वरचा अटॅक या दोन्ही घटनांच्या वर कविता आहेत 

पुरोगामी दहशतवाद हा पुरोगामी राष्ट्र निर्माण करण्यासाठी केला जातो जिना यांची स्वतःची अशी खात्री होती की हिंदू हे अत्यंत मागासलेले असून ते पुरोगामी नाहीत उलट पुरोगामी वादाला इस्लाम हा जास्त पूरक आहे जी त्यांची गैरसमजुत होती अगदी अशाच प्रकारे धार्मिक तत्वावर आधारित आपणाला इस्रायली ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेले दिसेल बहुतांशी उत्तर आधुनिक विचारवंत हे ज्यू असल्यामुळे साहजिकच इस्त्राईलच्या निर्मितीला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला कारण त्यांची स्वतःची सिक्युरिटी त्यामध्ये होती हरारी ही याला अपवाद नाहीत परंतु कळत नकळत अमेरिका ही ज्यू लोकांची सेकंड ज्यू भूमी असल्यामुळे ती इस्त्रायलला नेहमी प्रोटेक्शन देत असते उत्तर आधुनिकता त्यामुळे नेहमीच ज्यू धर्माला पूरक राहिलेली दिसते भारतात ब्रााह्मण धर्माला अशा प्रकारचे प्रोटेक्शन क्षत्रिय वर्ण देतो अगदी वैचारिक पातळीवर सुद्धा सदानंद मोरे यांच्यासारखे लोक स्वतःला क्षत्रिय घोषित करून ब्राह्मण धर्माालाा व वर्णाला व्यवस्थित संरक्षण देत असतात या नात्यामुळे साहजिकच चौथ्या नवतेत शैव धर्माची पुन्हा एकदा नवीन मांडणी करायची वेळ आली आहे. त्याची पार्श्वभूमी अर्थातच पुरोगामी कालखंडामध्ये शैव धर्माने जे केले त्यात आहे ह्या कालखंडामध्ये मात्र शैव धर्म पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिलेला होता कारण त्यामागे बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराज संभाजी महाराज होळकर आणि महात्मा फुले यांचे अथक प्रयत्न होते हरारीला आधुनिकतेसंदर्भात असे काही करण्याची गरज भासली नाही त्याला ऑलरेडी आधुनिक आणि उत्तर आधुनिक ज्यू वारसा आहे त्यामुळे साहजिकच तो अधिक स्पष्टपणे चौथ्या नवतेची भूमिका खुलेपणाने मांडू शकतो मात्र बेसिक कडे जाण्याची गरज त्यालाही भासते 

मुळात जी भूमी एकेकाळी  डायनासोरची वस्तीस्थान होती ती आता पॅलेस्टाईन आणि ज्यू यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे अशी मांडणी करत तो पुढे सरकत असतो कारण त्याला हे आता हमास आणि इस्त्राईल यांच्यातील युद्ध संपुष्टात यावे असे वाटत असते कळत नकळत आत्ताचे वातावरण हे कट्टर धार्मिक आहे असे त्याला वाटत असते आणि तो काही मधला मार्ग काढता येईल का ते चाचपत असतो शांती प्रस्थापित कशी करता येईल ते चाचपत असतो प्रश्न असा आहे की संपूर्ण चौथ्या नवतेचाच हा लोच्या आहे काय? 

कारण एकीकडे कट्टर धार्मिक उन्माद आहे आणि दुसरीकडे नव्याने निर्माण झालेले चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान आहे यातील ज्यांना चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान निवडायचे आहे त्यांच्यापुढे जो पेच निर्माण होतो तो स्पेशल चौथा नवतेचा पेच आहे यावर एक उपाय म्हणून संपूर्ण नास्तिकता स्वीकारत धर्म संपूर्णपणे नाकारत पुढे जाता येते परंतु हे पुढे जाणे  नकळत इस्लामवादाला प्रोत्साहन देते जरा सर्वच धर्मावर चौफेर हल्ला झाला तरच हा धर्माविरोधात असलेला हल्ला यशस्वी होऊ शकतो पण आपल्याकडे काही अतिशहाणे पुरोगामी लोक सेक्युलर दृष्टिकोनातून मांडणी करताना इस्लामची बाजू मांडत बसतात आणि ते मांडताना अल्पसंख्यांक वादाला ते उत्तेजन देतात त्यांच्या अधिकारांना उत्तेजन देतात त्यामुळे हा मार्ग अंतिमता इस्लामच्या इस्लामीकरणाला पूरक ठरत जातो आणि यामुळेच अधिक सावळा गोंधळ वाढलेला आहे किंबहुना पुरोगामी लोकांची जी दिशा आणि दशा झालेली आहे ती यामुळे झालेली आहे लोकांचा पुरोगामी लोकांच्यावर विश्वास उरलेला नाही कारण ते इस्लामच्या मागे ठाम उभे आहेत अशी त्यांची समजूत आहे किंवा कदाचित लोकांचे बरोबर असलेले आकलन आहे पुरोगामी लोक हे सर्व काही स्पॉन्सर केलेले आहे असे म्हणून मखलाशी करत बसतात आणि सामान्य माणसं ही काहीतरी बिनडोक असतात आणि हिंदुत्ववाद्यांना ती मॅनेज करणे फार सोपे जाते वगैरे गैरसमजुती बाळगून आपला डिस्कोर्स रेटत असतात प्रत्यक्षात लोकांनाच इस्लामचे भय वाटत आहे हे यांच्या लक्षात येत नाही आणि हे भय त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेले असते याची ते साधी दखल सुद्धा घेत नाहीत त्यांना वाटते की गोळवलकरांची पुस्तके वाचून सामान्य माणूस बिथरला आहे 

इस्त्राईल बाबत असे काही होत नाही त्यामुळे एका अर्थाने हरारी काही गोष्टी साफ बघू शकतो मांडू शकतो एका अर्थाने चौथी नव्हता जितकी भारतामध्ये धर्मामुळे डागाळली जाते तितकी इस्त्राईलमध्ये डागाळली जात नाही आणि त्याचा फायदा कळत नकळत हरारीला मिळतो 

श्रीधर तिळवे नाईक

 चॅनेल ज्ञा 

तुझ्यासाठी लायक बनण्याची प्रक्रिया 

आणि तिचं प्रेशर 

प्रत्येक हाडावर 

तळमळीचा स्टॅमिना टिकवत 

मी धडपडतोय 

तुझ्या डोळ्यातील त्या होकाराला 

जो फक्त माझ्यासाठी असेल 


आयुष्याच्या अँप्युटेशनचे प्रयोग माझ्या फोकस्ड चालण्यात 

मुंबईचे आयझोमर्स सर्वत्र 

जाणार तरी कोठे ?

आयुष्य थोडंच पायमोजा आहे 

सुपरइम्पोझिशन एक सारखं असायला ?


बिल्डिंगा किंचाळत नाहीत आताशा 

कान पेनिट्रेट करणारी किंचाळी थाटून मॉडेलसारख्या बसतात 


मी हात उंचावतोय होकाराचा 

समोरचा नकार डाऊन करत 

शटर तोंडावर मारत 


"निदान घरात ऑफिस घेऊन येतो म्हणून भांडायला 

ऑफिस कमव"


मी जिथे जातो तिथे शून्य निर्विकारपणे हाकलले जाते 


ह्या देशाला मुमुक्षु फक्त आश्रमात हवेत 

ऑफिसमध्ये नकोत 


जुन्या गोष्टी निगुतीनं मरायच्या 

नव्या थेट युजलेस म्हणून फेकल्या जातात कचऱ्यात मरायला 

नव्या जागा ह्याही अशाच 

तात्कालिक कॉन्ट्रॅक्टवर कितीकाळ काम करणार 

आणि कचऱ्यात कितीवेळा जाणार ?


बुद्धिमान माणसं कुणालाच नको असतात ह्या देशात 

ज्याला त्याला दास हवेत 

सरंजामदारी मानसिकता 

आधुनिक कपड्यात 

कार्पोरेट फेफड्यात 


मी फाफडा खात खात फाफडतोय फाफलत 

कफल्लत 


घरी परतावंसं वाटत नाहीये मला 

पण रस्त्यावर थांबून तरी 

कोणता समुद्र कमावणार आहे ?

 

मी घरात शिरतोय फ्लॉप चेहरा घेऊन 


तुला वाटतंय 

मी बूट पुरेसे झिजवलेले नाहीत  


मी झिजलेले पाय तुला दाखवत नाही 

बुटात लपवतो 


श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )