Wednesday, January 10, 2018

श्रीवाहिनी रविवार श्रीधर तिळवे पुढे


              


।। एकशचारवा की एकशेचौथा शेवट ।।

मोबाईल बोलतायत 

ग्लोबिश ऍण्ड बुशीबुशी 
टोटली मिसफिट 
टोटली मिसप्लेसड

मी अमेरिकेच्या  अध्यक्षाला फाट्यावर मारतोय 
आणि लोक 
हा कोणता नवा फाटा म्हणून 
माझ्याशी माझा काटा काढत 
मोबाईल बोलतायत 

।। एकशेपाचवा शेवट ।।

मोबाईल बोलतायत 
त्यांना वाटतं की हे नवं कुरुक्ष्रेत्र आहे 
मला समजत नाही
त्यांना वर्तमान कसं खेचायचं ?

१००+ = १०५
ते गणितात अडकलेत 

एक spelling queen मला वारंवार 
crossroad वर बोलवतीये 
आणि एकता कपूरच्या सोप आवाजात 
सल्ला  देतीये 
k बेटा
Lucky k 
महाभारत हीट झालं कारण 
महर्षी व्यासांनी रणभूमीला k ह्या अल्फाबेटवरून 
सुरु होणारं Kurukshetra  हे नाव दिलं 

मी विचारतोय 
पण  मग k फॉर कौरव विजयी व्हायला हवे होते 
ती म्हणतीये 
पण k for Krishna पांडवांकडे होता ना 
मी विचारतोय 
पण मग k फॉर Karna कौरवाकडे होता त्याचं काय  
ती म्हणतीये 
म्हणून तर k फॉर Krishna ने 
k फॉर Kapatnitine मारले 

k कडे कपट पाहिजे कुटील पाहिजे 
म्हणजे ते विजयी होते 

ती मोबाईलवर बोलतीये 
मी मोबाईलवर बोलतोय 
आणि मोबाईल बोलतायत 
k फॉर Kolhapuri आवाजात करत 

।। एकशेसातवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 

शब्दांपासून काहीसे दूर 
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून 

दूर शब्दापासून काहीसे 
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

काहीसे दूर शब्दापासून 
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

दूर काहीसे शब्दापासून 
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

काहीसे शब्दापासून दूर 
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

दूर काहीसे शब्दापासून 
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

शब्दांपासून काहीसे दूर 
शब्दाच्या अंतरावर राहून एकमेकापासून 

शब्दांपासून काहीसे दूर  
राहून अंतरावर शब्दांच्या एकमेकापासून 

शब्दांपासून काहीसे दूर 
एकमेकापासून अंतरावर शब्दांच्या राहून 

शब्दांपासून काहीसे दूर  
एकमेकापासून अंतरावर राहून शब्दाच्या 

शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून राहून अंतरावर शब्दाच्या 

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या राहून अंतरावर एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या अंतरावर एकमेकापासून राहून 

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दाच्या राहून  एकमेकापासून अंतरावर 

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या एकमेकापासून अंतरावर राहून 

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या एकमेकापासून राहून अंतरावर 

शब्दांपासून काहीसे दूर
राहून अंतरावर एकमेकापासून शब्दाच्या 

शब्दांपासून काहीसे दूर
राहून शब्दांच्या एकमेकापासून  अंतरावर

शब्दांपासून काहीसे दूर
राहून शब्दांच्या  अंतरावर एकमेकापासून


शब्दांपासून काहीसे दूर
राहून  अंतरावर एकमेकापासून शब्दांच्या 
  


शब्दांपासून काहीसे दूर
राहून  अंतरावर शब्दांच्या एकमेकापासून  

शब्दांपासून काहीसे दूर
राहून एकमेकापासून  शब्दांच्या अंतरावर

शब्दांपासून काहीसे दूर
राहून एकमेकापासून अंतरावर शब्दांच्या 

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर राहून एकमेकापासून  शब्दांच्या 

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर एकमेकापासून राहून शब्दांच्या 

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर एकमेकापासून शब्दांच्या राहून 

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर  शब्दांच्या राहून एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर  शब्दांच्या एकमेकापासून राहून 


शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून अंतरावर  शब्दांच्या  राहून 
                      Unending 
                       Tending towards/ infinity 
                       > or immeasurable or Zero or One 
                       > or beyond my accountability 


।। एकशेआठवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
Language time कधी expired होतीये 
ह्याची वाट पहात 

।। एकशेनववा शेवट ।।
THE END 

पाटी टाकली ना ? मग कविता संपली असं समजा !
सिनेमाला अशी पाटी पडली की  सिनेमा  संपला 
म्हणून निमूट उठता  ना ?
मग कवितेला सिनेमाचा न्याय का नाही ?
तर 
THE END 
चालू लागा 
कुणाचा मोबाईल  वाजला बरे 
च्यायला ! इथेही मोबाईल बोलतायत !

।।एकशेदहावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि कवी कविता लिहितोय 

कविला मोबाइलवरच्या कवितेचा शेवट 
काय करावा  ते सुचत नाहीये 
कवी शेवटामागून शेवट लिहितोय 
आणि कविता आहे की 
स्वतःचा  शेवट सापडू  देत  नाहीये 

कवी वाचकांकडे  चाललाय 
कदाचित वाचक हाच कवितेचा शेवट आहे 

।। एकशेअकरावा शेवट ।।
वाचकहो 
शेवटी  आलोच 
शेवटी तुमच्यापर्यंत तुमच्यापाशी यावंच लागलं 
मग काय करूया  ?  कवितेचा शेवट तर झाला पाहिजे ना ? मला तर जे सुचले ते सारे शेवट मी लिहिले आणखीही काही लिहिले असते पण  ते लिहिल्यानंतर तरी कवितेचा शेवट झाला असता का की प्रत्येक शेवट हा केवळ शक्यता असल्याने कविता अपुरीच राहिली असती  ? असो. तर तुम्हाला काय वाटतं ? मी शेवट काय करावा ? किंवा लिहिलेल्या शेवटांपैकी कोणता निवडावा ?

एक काम करा वाटलं तर आता कळवा किंवा थांबा 
विचार  करा आणि कळवा 
माझे मोबाईल नंबर आहेत ९८९२२२९७३०९८२४५००००२ह्यातील एक फेक आहे ते  उघडच आहे पण  कवितेत मोबाईल अनेकवचनी आहे ना म्हणून दुसरा  ऑडीशन टाकला मोबाईल बोलतायत ना ? मग ! मोबाईल बोलतोय असं असतं तर एकच  दिला असता असो तर पहिला अस्सल आहे दुसरा फेक आहे तेव्हा पहिल्यावर कळवा किंवा टाईमपास करायचा असेल तर दोन्हीवर शेवटी हेही  मोबाईल  बोलके आहेत त्यामुळे ते बोलतायत हे सांगायला  नकोच - तेव्हा 
                                माझेही मोबाईल बोलतायत 
(ह्या शेवटात कुणाला काही भर घालायची असेल तर ती खुशाल घालावी त्यासाठी कवीच्या अनुमतीची गरज नाही मात्र जो कोणी भर घालेल त्याने त्या भरीखाली स्वतःचे खरे  नाव  पत्ता जोडावा)  
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

        आरश्याबद्दल माहीत नसलेलं कुत्रं आरश्यातल्या कुत्र्यावर दुसरं कुत्रं समजून भूंकतय. मी कुत्र्यातला माझा जन्म आठवत तुझ्याविषयीच्या माझ्यातील कल्पनात 
         हे  किती विचित्र आहे मला माझे मागील जन्म आठवतायत  आणि तुझं काहीही आठवत नाही शिवायकी तुझा चेहरा आलिशा चिनॉयसारखा दिसतो. जेव्हा चिनॉय पडद्यावर दिसते तेव्हा  मला तू आठवतेस 
         खरंतर जिच्याबरोबर आपण झोपलो ती आख्खी आठवायला हवी पण माझी ही गृहतिकल्पना खरी होत नाहीये फिक्शनने भारावलेल्या ह्या काळात आरसा पुरवणारं पाणी आटत चाललय आणि तू तर बिसलरी पाण्यासारखी कधीच आर्टिफिशियल क्लीन नव्हतीस कुठलीच क्वीन क्लीन नसतेच म्हणून तर तुला क्लीन चिटचा हव्यास स्वतःच्या पायात वाकून पाहण्याच धैर्य तुझ्या प्रवासात कधीच नव्हतं म्हणून  त्यानं शोधली स्कॅण्डल्सची सॅण्डलस आणि सिंड्रेलाच्या अलेक्झांड्रियाज 
          नुकताच हात वाळवून नशीब निघून गेलंय रेषावर जखम होती तिथे हळद सापडलीय तुझ्याशी रत होणार ते रक्त कुठं गायब झालंय लोकांना वाटतय की ही हार्टअटॅकपासून सुटका आहे आणि मला माहीत आहे की माझ्या जखमा  कविता ओलांडतायत
         खरंतर खूप असंबद्ध वाटतय तुझी योनीही आठवत नाहीये जिच्यावर मी स्वार झालो तिचं इतकं विस्मरण? मग आपलं प्रेम म्हणजे होतं तरी काय ? शब्दांची शारीरिक निष्पत्री ? भाषेची मांसल उत्पत्ती ? चिन्हांच्या रक्तवाफा ह्या फक्त भूलथापा होत्या काय ?
         खूप निघून आलोय तुझ्यापासून दूर - डिस्टन्स कॉलही पुकारत नाहीत तुझ्या श्वासगर्भ सुवासाचे लोकल फुलांच्या बागा तुझ्या ओठातील पाकळ्यांचे स्मरणपत्र लिहित नाहीत 
          मी स्वतःच चकीत आहे ह्या विसराळू जिद्दीला पाहून तू मेलीयेस आणि  माझ्या हाताला तुझ्या खुनाचा वासदेखील नाहीये माझ्या हातांची  पाठपोट बोटे पश्चातापाची किंवा  विरह दुःखाची वाट पाहतायत  आणि  माझ्या त्रयस्थ तळहातावर उमलतोय फरफरत तळवाटा जो विचारतोय 
    "अश्रू म्हणजे काय श्रीधर 
       और ये कम्बख्त "आह " किस चिडीया का नाम है ?"
        तो उडून  जाऊ नये म्हणून त्याच्यावर कोणता पेपरवेट ठेवू ?
***
         
        आरश्याबद्दल माहीत नसलेलं कुत्रं आरश्यातल्या कुत्र्यावर दुसरं कुत्रं समजून भूंकतय. मी कुत्र्यातला माझा जन्म आठवत तुझ्याविषयीच्या माझ्यातील कल्पनात
         हे  किती विचित्र आहे मला माझे मागील जन्म आठवतायत  आणि तुझं काहीही आठवत नाही शिवायकी तुझा चेहरा आलिशा चिनॉयसारखा दिसतो. जेव्हा चिनॉय पडद्यावर दिसते तेव्हा  मला तू आठवतेस
         खरंतर जिच्याबरोबर आपण झोपलो ती आख्खी आठवायला हवी पण माझी ही गृहतिकल्पना खरी होत नाहीये फिक्शनने भारावलेल्या ह्या काळात आरसा पुरवणारं पाणी आटत चाललय आणि तू तर बिसलरी पाण्यासारखी कधीच आर्टिफिशियल क्लीन नव्हतीस कुठलीच क्वीन क्लीन नसतेच म्हणून तर तुला क्लीन चिटचा हव्यास स्वतःच्या पायात वाकून पाहण्याच धैर्य तुझ्या प्रवासात कधीच नव्हतं म्हणून  त्यानं शोधली स्कॅण्डल्सची सॅण्डलस आणि सिंड्रेलाच्या अलेक्झांड्रियाज
          नुकताच हात वाळवून नशीब निघून गेलंय रेषावर जखम होती तिथे हळद सापडलीय तुझ्याशी रत होणार ते रक्त कुठं गायब झालंय लोकांना वाटतय की ही हार्टअटॅकपासून सुटका आहे आणि मला माहीत आहे की माझ्या जखमा  कविता ओलांडतायत.
         खरंतर खूप असंबद्ध वाटतय तुझी योनीही आठवत नाहीये जिच्यावर मी स्वार झालो तिचं इतकं विस्मरण? मग आपलं प्रेम म्हणजे होतं तरी काय ? शब्दांची शारीरिक निष्पत्री ? भाषेची मांसल उत्पत्ती ? चिन्हांच्या रक्तवाफा ह्या फक्त भूलथापा होत्या काय ?
         खूप निघून आलोय तुझ्यापासून दूर - डिस्टन्स कॉलही पुकारत नाहीत तुझ्या श्वासगर्भ सुवासाचे लोकल फुलांच्या बागा तुझ्या ओठातील पाकळ्यांचे स्मरणपत्र लिहित नाहीत
          मी स्वतःच चकीत आहे ह्या विसराळू जिद्दीला पाहून तू मेलीयेस आणि  माझ्या हाताला तुझ्या खुनाचा वासदेखील नाहीये माझ्या हातांची  पाठपोट बोटे पश्चातापाची किंवा  विरह दुःखाची वाट पाहतायत  आणि  माझ्या त्रयस्थ तळहातावर उमलतोय फरफरत तळवाटा जो विचारतोय
    "अश्रू म्हणजे काय श्रीधर
       और ये कम्बख्त "आह " किस चिडीया का नाम है ?"
        तो उडून  जाऊ नये म्हणून त्याच्यावर कोणता पेपरवेट ठेवू ?
***
       
           तू अमेरिकेत निघून चाललीयेस हे तसं बरंच की ! अपयशात उजाड झालेला हात का पत्करावा  बोर्डात मेरिटमध्ये झळकलेल्या हाताने माझा काळजाचा पापुद्राही चाळता तू वाचत बसलीस माझ्या टॅलेन्टमध्ये तुझ्या यशाची इन्शुअरंस स्कीम सिक्युरिटीला तनमधन अर्पण करणारा दर्पण तुला हवा होता आणि माझ्या काचेवर तर पारा चढला तो फक्त रागाचाच ह्या आरश्यात तू तुझ्या डोळ्यात चाललेलं बुद्धिबळ पाहणार होतीस हे कधीच कळंल नाही माझ्या अधूर्त बुद्धीला माझ्या मित्रांचाही वापर तू शाह म्हणून केलीस आणि मला  चेक देता देता स्वतःच मेट झालीस
        कारणमीमांसेचे खोदकाम आता काय कामाचे ?
         तू बाईच अशी जीला ashtoprahar   स्वार्थ ग्रासलेला स्त्रीमुक्तीचे  लांबलचक गाभारे देवत्व भरत नाहीत बाईत ज्यांना सत्ता सत्ता खेळायचंच त्यांना स्त्रीमुक्तीही एस्क्युज म्हणून वापरता येते आता तर तू म्हणतीयेस की तुझ्या पोटातलं पोरही माझं नव्हतं. आता हे कुठलं राजकारण बाई ? की नवा बॉयफ्रेंड मिळाला म्हणून जुन्याचं झालेलं पोरही नाकारायचं ? आता काय मी तारखांचा हिशेब मांडून स्वतःलाच तारे  दाखवू ? की तुझा बॉयफ्रेंड मूळचा माझा मित्र म्हणून त्याच्यावर स्टॅबिंगचा आरोप ठेवू ? चाकाकतं ते सारं सोनं नसतं तसं चकाकता तो सुराही नसतो.
          वारामागून वार करत तू कुणाला जखमी करतीयेसस्वतःला  की मला ? अनऍडजेस्टेबल टेबल  अनबेअरेबल बेअरींग अनऍडप्लेबल ऑप्शनस घेऊन कुठे जाणार आहेत हे झंझावती पाय ? त्यांचा अंतिम मुक्काम काय ?
          कधी कधी फार दया येते बघ
          सुईवर नाक अंथरून त्यात नथ घालू पाहणाऱ्या बाई विषयी आणखी काय वाटू शकतं ?
           तुझे तुझसे है वफाकी उम्मीद
           और तू नही जानती वफा क्या है ?
आता मी काय म्हणू ?
           या इलाही ये माजरा क्या है?
शिवशक्तीचं लोणचं घालून आपण कधीच ठेवून दिलं ते नजरेआडच्या बरणीत कविता काय अशा जगता येतात का ? शब्दांचं काय फुलले तर  फुलते भाजले तर पापड

तुझ्या आयुष्यात आलेल्या पुरुषापैकी एकाला तरी तू धड समजून घेतलंस काय ? की बुद्धी बुद्धी खेळत इमोशनल  पिपासा रचलीस अश्रूप्रधान मीमांसेत ? एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे..... चरित्राची चेन की चैन ? मग सतत बैचेनीची आत्मपरेड कशाला ? की सिडक्शनचा तोही आमंत्रित करणारा अंतिम देखावा? शेवटचा पण The End ची पाटी पडणारा ? तुला कॅमेऱ्यात कधीच टीपली नाही मी. एक आख्खी हजारभर पानांनी कादंबरी लिहिली होती पण तिच्याविषयी साधा उच्चारही मला कधी करावासा वाटला नाही तू मत्सरशीलच ह्याची  पानोपान खात्री कानोकान खबर  इतक्या अविश्वासानीशी मी तुझ्यावर प्रेमच केलं कविता लिहिणाऱ्या हातांनी काठ  कधी माठ झाले तर कधी उतू गेले कंटाळा आला तरी टाळा लावला नाही भाकरी शिळी झाली तरी पुरणपोळी समोर असतानाही तीच खाल्ली.
      मी इमानदार  राहिलो आणि असमर्थ श्वान समजलीस माझ्या निष्ठेची प्रखरता एका आर्टिफिशीयल झगमगटापुढे फिकी पाडून तू निघून गेलीस एका गौरकाय डिमारकडे आणि मी हायहॅलो करत सोसत राहिलो पृथ्वी ची अंधेरी ठासून मारणारी एक विचित्रवियी प्रकाशकळ तू  काय करतीयेस हे तुला पक्कं माहित होतं तुझ्या पलायनाच्या खाणाखुणा तीव्र करता  येतील अश्या सर्व संध्या तू साधुमुखाने खुबीदारपणे वापरल्यास प्रसंगी जनावरही झालीस माझ्या  कानात नखं खुपसताना नेलपॉलीश लावता लावता 
       तुझ्या संतापाचे  असंख्य चावे माझ्या अंगभर ठणकतायत तुझा राग शांत व्हावा  म्हणून मीरारोड स्टेशनवर एवढ्याने कंठलेल्या रात्री आता अंगावर येत नाहीत उदास करतात मी एकदाच प्रेम केलं आणि ते एका लायकी नसलेल्या बाईवर केलं
      हा साक्षात्कार आहे की संताप ?
       हा विवेक आहे  आत्मप्रतारणा ?
      लोक येडझव्यासारखे काहीही बोलतात  प्रेमाबाबत ! प्रेम नसतंच. ते नाहीयेस. असतात त्या फक्त सोयी आणि गैरसो वापर  आणि गैरवापर 
       दोन माणसे एकमेकाबरोबर राहून एकमेकाला बदलू  शकत  नाहीत तर हा समाज काय डोंबल बदलणार ? आपण कुणाला फसवतोय ? स्वतःला की इतरांना ?
       शरीर सुद्धा  लाच म्हणून देणारे लोक आणि क्षण एका भाड्यापोटी एक रात्र वाटणारे रक्त आपण सर्व काय लायकीचे लोक आहोत ? ज्ञानेश्वर तुकारामाचं नाव घेण्याची तरी लायकी आपल्या वागण्यात आहे का ? झ्याटूकभर तृष्णात शरीराचं थोटूक करणारे आपले  सिगरेटी चरसी हात
      चल जाऊ दे झालं ते बरंच झालं माझ्या हातावरून एक बदक  उडालं तू म्हणालीस "हा राजहंस माझा " आणि मग तुला  कळालं हा पांढरा पोपट आहे
      तुझ्या तळहातावरून एक घार उडाली मी म्हणालो "ही गरुडीण माझी " आणि  मग मला कळालं ही तर काळी पोपटीण आहे 
       शेवटी आपलाही सफ्रेम पोपटच झाला 
       बिनमाहितीच्या पिंजऱ्यात
       राणीच्या कॉस्मॉपॉलिटिन  बागेत 
       उडता उडता 
***

झल्लाळ होताना ओरखडे उमटले सही  करताना गायब झाले चेक  अफ़रातफरीत आख्खा बँक वटवली गेली अकौंऊंट पहायला गेलो तर आपले नाव पूर्ण गायब फक्त कवी अशी कागदोपत्री नोंद तुझ्या दिलेनादान काळजात- बाकी उरलेलं मरा हुआ कौआ ये आशिकका जनाजा है धूम से निकले 
वर्ना लाश पिघलकर खुदा बन जायेगी 
रुह ढुंढते  ढुंढते हो गयी सुबह 
रातभर बदन चकमा  देता रहा 

ये नही रंजीश की दिल टूट गया 
रंजीश यही रही कम्बख्त तेरे सामने बिखरा नही 

हे उद्घाटन ही घाट घातलेली  नदी घातक पाणी आणि चातक वाणी राणी नसणाऱ्या पत्यांनी  काय  गुलाम घेऊन आयुष्यभर हिंडायचे दिवस असे गेगुजरे 

ह्या आपाधापीत यावी तुझी वेड लावणारी आठवण ? तुझी ?
शहरभर माझ्या प्रेमाची  होर्डींग आणि आज स्वप्नात तू - चारचारदा !मला वाटलं विसरलोय तुला निश्चित शेवटच्या भेटीत नसलेला मुक्काम एकत्र केला आपण सफर जगलो नाही आपण पाय जगलो पाया जगलो छत नसलेल्या घरात छातीठोक प्रेम केल फोफश्या कातर वेळात नंतर सोयीस्कर  रित्या कुठल्याच मुलाखातीत माझं नाव नव्हतं तुझ्या आशिकांच्या यादीत मी कुणी नव्हतोच तुझ्यासाठी हे तू कुणाला सांगत होतीस ? स्वतःला ? मलाआईला ? की तुझ्या नेक्स्ट आशिकाला ?

फसवणूकीचा पापखेळ निष्पापपणे खेळणारे तुझे फलंदाजी हात त्यांना प्रत्येक मॅच फिक्स  लागायची आणि मी तर पल टू पल जगणारा कलंदर संत माझे पाप हेच की मी तू सांगितलेला जादूनामा लिहिला नाही. चल ! मार कल्टी ! गिल्टीगिल्टी !गिल्टी ! गलतीका नतीजा क्या ? अंगभर फसांद नराची मांदीला साद मादीची नराला साद
वाद घालतानाही केलं प्रेम 
फुलस्टॉप दिला रिकाम्या स्टेशनवर 
अमेरिकेला चाललेल्या इंडियन  बये 
हा अखेरचा  दंण्डवत गण्डवता 

तुझ्या पावलांना स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याखाली फ्रीडम मिळो 
जळतायत हात तुला पहात हातोहात जुळवताना 
विलग विलग अलग अलग कुठल्या डिवोर्सचा ड्रेससोर्स कळतो ह्या कातडीला ही अंधेरी ट्रेन चर्चगेटहून सुटलेली मीरारोड झालेली विरारात विराण 
आरसा फुटतोय प्रत्येक तुकड्यात तुझं नाक 
माझ्या काळजात श्वास घेणारं 
***

FACE TO FACE 
फेस टू फेस टू डेथ 
उडत चाललेलं वय 
उडत चाललेली त्वचेची चकचकी
उडत चाललेला  स्टॅमिना 

प्रत्येक गोष्ट उडत चाललेली 
आणि आपण पश्चातापदग्ध 
की आयुष्यात कधीच उडता आले नाही 

कित्येक गोष्टी आपल्याविषयीच्या 
आपल्यातून इतरांतून उडत होत्या 

स्मृति, गॉसिप्स, इमेजिस 
आणि तरीही आपण विमनस्क 
की आयुष्यात कधीच उडता आले नाही 

आयुष्यभर आपण उडतच होतो 
तुकड्यातुकड्यात 
माणसांत झाडांत प्राण्यांत 
आणि तरीही आपण उदास 
की आयुष्यात कधीच उडता आले नाही 

आता हा शेवटचा क्षण जवळ येतोय 
आणि आपण संपूर्ण उडून जाणार आहोत 
हे कळून चावरेकावरे 

आता कळतय 
की  आयुष्य ही बसून राहण्याची शिक्षा होती 

आता कळतय की 
हे कळणे 
हीच उडून जाण्याची आद्य अट आहे 
मी उडतोय 
"मी" उडत चाललाय 
----------------------------------------------------------------------------------

डेथबेडवरून 
मला मरावंच लागणार आहे 
म्हणून मला मरायचं नाहीये 

मी लग्न करावं का 
म्हणजे मी माझ्या मुलात अमर होईन ?
की माझे क्लोन मी जन्माला घालून अमर व्हावे ?

क्लोन माझ्या बजेटमध्ये बसत नाहीत 
मुलं माझ्या बजेटमध्ये बसत नाहीत 

मग म्या गरिबाने करावे काय ?

कविता लिहून अमर होता आले असते  
तर किती बरे झाले असते 

कवितेत बायलॉजिककल काहीच उतरत नाही 
कविता अमर होण्याच्या संदर्भात 
पुरेशी बायोडेटेड नाहीये 

मी बघता बघता आऊटडेटेड होत चाललोय 
मी - जो टाईमलेस होण्याची स्वप्ने पहात होता 
Biocomputer हो 
माझी expirydate मला कळवा 
मारताना माझं दारिद्र्य आणि ही कविता 
नीट सोबत घेऊन मरावं म्हणतोय 

आणि हो 
इंटरनेटवरची ही सगळी जाळी 
शेवटच्या क्षणी मला दिसतील 
अशी ठेवा 
एकांताशी लढताना ती सोबत होती 
आता शेवटच्या एकांतिक एकांतात  
ती माझ्या सोबत असू देत 

हा शेवटचा श्वास 
हने हवेच्या महाजालाने पुरवलेला  !
क्रॅप ! बाय ! Please, don't use slow time craft !
निर्जलिक ! बाय ! Oh death, क्लिक मी  आऊट ऑफ लाईफ !
क्लक

थोडं आध्यात्मिक 
                 फेकून दिलेला संन्यास पुन्हा दारात हजर सौ बिल्लीया खाके शेखचिल्ली शेवटी चिलीमला कंटाळत जागा होतोय त्या झाडावर ज्याच्या फांदीचा मूलभूत रंग भगवा आहे पाचोळा बायकांच्या शरीराचा बायका नागड्या केल्या रे केल्या की वाजायला सुरु वसंताचा डिमडिम वाजण्याआधीच फुलांच्या शक्यतेतून घुमजाव अनबेलेबल वॉरंन्ट मिळालेला सेक्स अचानक बेलेबल होईल हे कुठल्या अलबेल्या मौसमधुळीत पाहिलं होतं आपल्या ऑसम डोळ्यांनी ? ऑटम आणि आयटम दोन्हीतही बॉम्ब पाहणारे आपले सेक्सबॉम्ब त्वचेचे बोंबील तळतानाही आपण बोंब ऐकली ती मादक कानांनी लोक म्हणाले लिंगपिसाट आहेस पण आपण म्हणालो ज्यांना साधत नाहीत ते नीतिसाधू बनतात ह्या पोकळ हिंदू समाजशाहीत आपल्याला साधतं आणि पोरी साधन बनायला आणि बनवायला तयार आपल्या छातीवर आपण नेहमीच उघडे टाकले ना हरकत प्रमाणपत्र जिथे वफादार राहिलो तिथे फेफे उडाली जिथे निष्ठेची गॅरन्टी दिली नाही तिथे मिळाली व्यभिचारी रात्र आपली  प्रामाणिकता कुठल्या बाईने कधी कबूलच केली नाही त्याला आपण काय करणार  ? तशी तर आपल्यालाही पत्नीव्रताची साखळी आवडलीही असती कदाचित पण आपली तकदीर अशी गांडू जिथे एकनिष्ठता वाहिली ती आपल्याला पांडू समजून चुकलो पत्नीव्रत आऊट ऑफ डेट डेटिंगचा डेटॉल घेऊन मग हिंडलो प्रत्येक परवडेबल बेसिनवर आणि लिहीत राहिलो तो सीन ज्याचा एन्ड आपल्याला माहित होता
             आता अनिश्चित होत चाललेल्या ह्या मँच मध्ये ना त्या कॅचची प्रतिक्षा आहे ना क्लिनबोल्डचा इंतजार पोरी येतायत पण आपल्यालाच चढत नाहीये झिंग लगबग लगबग चालणं आता मॉडेलत नाही आपल्या काळजात स्तनांचे उभार घनभार देत नाहीत कुठल्याच नाकातील नथ उतरवून वाटत नाही तिच्यातून आता तीर मरावासा 
          ह्या क्षणभंगुर सफाचोट सुखाचा हा का कंटाळा ? त्वचेत बुडून जाणाऱ्या नाकाला का पडत नाही नकली श्वास कापण्याचा मोह ? अनंताचा निर्वाणाचा मोह संपला असं डिक्लेरेशन दिल्यानंतर हे कसलं रिनोवेशन होतंय आपल्या बॉडीमॉलमध्ये ? कुठं आग लागलीये आणि त्यात काय काय जळतय ?
        ह्या  सिटीनं शिकवलेली ऍडलटरीची शिट्टी आता का वाजत नाहीये आपल्या तोंडातून ? हा ब्रम्हचर्याचा पलंग कुठल्या मलंगा कडून मांडला जातोय आपल्या भणंग लिंगात ? यम नियम प्राणायाम आसन  धारणा ध्यान एकेक पैलू शरीर उजळतोय आणि राजयोगाचा आत्मज हिरा नखशिखांत गायब आपला भोग ही आपली एकटिंग होती काय ? "तुझं मूळचं पाणी संन्यासाचं आहे " हे तर आपल्या आजोबानं दहाव्या वर्षीचं बजावलं होतं तरीही मग आपण भोगपालटी का घेतली ? समोर एक सुंदर स्त्री नागवी उभी आणि आपण देहाच्या गावाचेच नाही असे दाखवत तिच्या बॉडीतील आज्ञाचक्र चाचपत
         आता समूळ विच्छेदाच्या शवविच्छेदनात न्यावं का आपण  आपलं हे नव्यानं परतलेलं शैशव
          झाडांनो पुन्हा वाजू लागल्या त्याच कालातीत तेच्या सूक्ष्म झांजा 
         कदाचित मीही पाऊस पडून गेल्यानंतर होईन तुमच्यासारखा चित्तथरारक हिरवा
***