Friday, July 7, 2017

श्रीवाहिनी मंगळवार

प्रथम आजच्या ठळक बातम्या एक मेसेज आलाय तो असा :

''म्हणजे बघा आयुष्याला center असतंच
म्हणजे बघा आपण हगायला जातो ना तेव्हा गुदद्वार हेच center असतं किंवा मुतायला तेव्हा फोकस मूत्रफेकू अवयवा वर असतोच म्हणजे बघा असं असतं की ह्या सर्व ठिकाणी आपणच असतो म्हणजे हगताना, मुतताना, झवताना आपण असतोच म्हणजे आपणच center असतो म्हणून तर आपण आपल्यासाठी काम करतो म्हणून तर आपण हगायला जातो मुतायला जातो फिरायला जातो आपल्याजागी आपल्यासाठी काही कुणाला हे करता येत नाही संपूर्ण आयुष्याचे आपण सेंटर नसतो पण आपल्या आयुष्याचे संपूर्ण सेंटर आपणच असतो. आपल्याला वाटलं की आयुष्य उथळ आहे तर ते उथळ आहे. कदाचित सगळं आयुष्य उथळ आहे आणि कदाचित आजच्या माणसाला ह्याच दुःख आहे म्हणजे बघा की आपण समजतो एखाद्या गोष्टीला की ती खूप खोल आहे तिला अनेक अंतस्तर आहेत आणि मग अचानक काही काळाने कळते की अशी काही डेप्थ नाही  मग होत काय की आपल्याला फसल्यासारखं वाटतं. आजच्या काळातील सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज हीच आहे की आयुष्य उथळ आहे मग करायचं काय ? तर आयुष्याला आपण खोली पुरवायली हवी. आपण कलेत किंवा तत्वज्ञानात ना हे असं काही खोली डेप्थ  पुरवण्याचं काम करतो सगळी संस्कृती ही आयुष्याला नसलेली खोली (depth) पुरवण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपण चालू ठेवलाच पाहिजे. माणसाचं माणूसपण हे त्या प्रयत्नात आहे कारण माणूसच असा प्राणी आहे की ज्यानं आयुष्याला ते जिथं आहे जसं आहे तिथं न ठेवता तसं न ठेवता ते आहे त्या ठिकाणाहून ते जसं आहे तिथुन वर न्हेण्याचा प्रयत्न केलाय तर हा प्रयत्न थांबता कामा नसे. हा प्रयत्न यशस्वी  झाला तर मला  खात्री आहे कि आयुष्य माणसाला म्हणेल, धन्यवाद, निदान  त्या धन्यवादासाठी तरी आपण हे करायलाच हवं. ''
                    आज श्रीवाहिनीला जॉन देरिदा हे असा मेसेज कसा पाठवू शकतात अशी संतप्त विचारणा करण्यात आली. देरीदा ह्यांनी ते अद्याप जिवंत असल्याने ते असा मेसेज  पाठवू शकतात असे श्रीवाहिनीला सांगितले. ते पुढे म्हणाले "पहा मेसेज हीही भाषा न्यूज हीही भाषा " ह्याचा नेमका अर्थ काय हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. श्री. रसविचारी बिहारी ह्यांना मात्र पोलिसांनी आज अटक केली पोलीस कमिशनरांनी मात्र हि अटक सिम्बॉलिक नसते असे म्हंटले त्याला आमच्या एका दर्शकाने मग पो. मो. ह्यांनी प्रत्येक अटक ही सिम्बॉलिक असते असे म्हंटले आहे ह्यावर आमच्या चॅनेलच्या दर्शकाने पो मो  जोशी ह्यांना पोलिसांनी सिम्बॉलिक नसलेला दंडु मारावा त्यांची चार हाडे तोडावीत म्हणजे त्यांना अटक ही सिम्बॉलिक नसते हे नीट कळेल अशी प्रतिक्रिया नोंदवली.
                  भा. ज. प नेत्यांनी मात्र बाबरी मशीद व राम मंदिर प्रश्न हे पौराणिक, पारंपरिक व ऐतिहासिक असल्याचे सांगून हिंदूंच्या सातत्यावर भर देऊन हिंदूंचा इतिहास कधीच मरत नसतो तो फक्त पुनर्जन्म घेत नवे नवे शरीर धारण करत असतो असे सांगितले हिंदुत्वासाठी नेहमीच काळ मुबलक असतो पण हे जग सात दिवसात बांधले गेले अशी कल्पना करणाऱ्यांना ते कधीच कळणार नाही असे त्यांनी सांगितले.
                 अभिनेते राम खान ह्यांनी प्रिया नार्वेकर ह्या सिरीयल लिहित असल्याने आणि सिरीयल करणाऱ्या सर्वांनाच अधूनमधून आपण वेड्याच्या इस्पितळात वावरत असल्याचे वाटत असल्याने त्या जे काय म्हणतात त्याला सिरीयलच्या तावडीत सापडलेल्या लेखकाचा वेडाचार मानून  त्यावर प्रतिक्रिया देऊ नयेत असे अभिनेत्यांच्या मेळाव्यात सांगितले.
                काल पॉवर रोड येथे घेतलेल्या चुंबनावरून संपूर्ण मुंबईत दोन गट पडल्याने स्पष्ट झाले. एका गटी च्या मते सॉरी माफ करा एका गटाच्या मते चुंबन हे पूर्णपणे नैसर्गिक सुंदर वैयक्तिक अनुभवाचे रसपान असल्याने व भारतात सद्या उदारमतवादी राजवट असल्याने  ह्या जोडप्यावरील कारवाई ही व्यक्तीच्या खाजगी ओठावर आक्रमण आहे असे सांगितले तर दुसऱ्या गटाच्या मते हे चुंबन बौद्धिक ताळतंत्र सुटलेले  स्वतःच्या सामाजिक जबाबदारीचे भान नसणारे होते अशावेळी सर्व समूहाने त्यावर कायद्याच्या आधारे कारवाई केली तर त्या चुकीचे काही नसून उलट ओठ हे खाजगी जरूर आहेत पण पब्लिकमध्ये घेतलेले चुंबन हे मात्र खाजगी नसून Public Act असल्याचा मेसेज ह्यातून नव्या पिढीला जाईल असे प्रतिपादन करून कारवाईचे समर्थन केले.
              काल चंद्रदेवबाबा ह्यांनी रवीबाबांच्याबरोबर बसू नये हे सांगण्यासाठी त्यांच्या अनुयायांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला खाना  झाले.
               सर्व ज्योतिषांनी ज्योतिष हे postmodern science असल्याने त्यावर शासनाने बंदी घालू नये अशी मागणी केली
                काल श्रीधर तिळवे ह्यांनी बहुतांशी सर्वच Postmodernist हे डाव्या विचाराचे आहेत हे दाखवून डावे लोक postmodernism चा प्रतिवाद करतात ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले ते म्हणाले ,   ''१९५० नंतर कम्युनिस्टांच्या एकाधिकारशाहीचे Reason च्या आधारे युरोपमध्ये समर्थन करणे जड जाऊ लागले म्हणून ह्या unconsciously छुप्या असलेल्या कम्युनिस्टांनी वेड्यासारखे अत्याचार करणाऱ्या जगभरच्या समाजवादी व साम्यवादी राजवटींच्या अत्याचारांच्या समर्थनासाठी reason ला नाकारणारे, विज्ञानाला फेटाळणारे आणि individual चा पाया subject is dead असे म्हणून जाणीवपूर्वक नाहीसे करणारे हे तत्वज्ञान जन्माला घातले ह्या राजवटी आता कोसळल्याने पोमो डेड झाला आहे .  एकाधिकारशाहीविरुद्धच्या चळवळी मग त्या फ्रान्समधल्या हुकूमशाहीविरोधातील असो  किंवा भारतातल्या इंदिरा गांधीविरोधातल्या असोत त्या अंतिमतः फ्लॉप झाल्याने postmodernism ने ह्या एकाधिकारशाहीचे विश्लेषण करत असल्याचा बहाणा करत प्रत्यक्षात  मात्र त्यांचे समर्थनच केले ''
 भारतीयांनी त्यामुळेच पोमोपासून सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण सावध राहिलो नाही तर आपली लोकशाहीही आपल्या आसपासच्या राष्ट्राप्रमाणे नाहीशी होऊन मुशर्फसारख्या स्टायलीश हुकूमशहा किंवा खोमेनीसारख्या केवळ स्पेशल साउंड इफेक्ट निर्माण करणाऱ्या धर्मशहाच्या हाती जाईल असाही त्यांनी इशारा दिला. भारतीयांनी "त्यांना मिळालेली लोकशाही ही त्यांना चणे शेंगदाणे खाता खाता मिळालेली नाही तर काँग्रेसने अनेक वर्षे चालवलेल्या अहिंसक चळवळीतून ती आकाराला आलीये " ह्याचे भान बाळगावे  असे त्यांनी सांगितले.

कीचन मधून 
             हा देशच असा की मसाला इथे सारे सांभाळून घेतो आणि चुकलेली गोष्ट ऐन वळणावर ठीक करतो मी चाललोय तिखट कमी असलेल्या अंगात दालचिनी टाकत काजू नसेल तिथे शेंगदाण्यांना चालवत
            हळद जखम भरतीये आणि चवीची जरबही कोतमिर कोत्या गोष्टींना प्रिव्हेन्टीव मेजर म्हणून तोल देतीये तर मिठाला जास्त झालं कि सांभाळतोय लिंबू बिघडलेल्या चहात वेलची सुवास घडवतीये.
            मी चाललोय अनेक पायांनी चवीच्या पिगपोंग बॉल्समधून मटेरियल टंगच्या मदर टंगस पाहतायत नेहमीचं हिरवं भविष्य एकेक रेसिपी एक्सप्लोड होतीये मी थांबलेल्या घरातील किचन कट्ट्यावर  तिची कटींग एज अधिकच शार्प  करत
           मी बनत चाललोय एक सिलिंड्रिकल कूक ज्याच्या  ड्रॉईंग हॉलमध्ये सेन्टर होतय कीचन                                   आणि टीव्ही माझ्या नव्या रेसीपीच्या वार्ता साऱ्या जगाला कीचनमधून सांगतोय
             त्याच्या नेहमीच्याच खबरी टोनमध्ये
             मसालेदार आवाजात
             आजही
             मसाला सगळं नीट करेल
             ह्यावर ह्या देशातील बायकांचा विश्वास आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------कॉलेज 

१.
आमंत्रण. समुद्र. हॉस्टेल
टेल. टेल. हॉटेल
उधळण

वडा. रस्ता. स्टेशन.
एशियाटिक. साप. कोम्बीनेशन.
टुकटुक.

रन्स. मृत्यू. छोड.
घालवणी. चंद्र. रंगतोड
चल

२.
वासना : ज्योति कलश छलके - साथ साथ चलके
हात : सत्यम शिवम सुंदरम - हस्तम - मैथुनम - अंदरम
स्पर्श : इतनी शक्ति हमे दे ना दाता - फ्रेंच इत्रको मेरे मिले हलका झोका
रिगल : भगवान के सिनेमाघरमे डर नही है और अंधेरभी है
चित्रपट : संसारके फ्रेमसे भागे फिरते हो भगवान को क्या तुम डुबाओगे ?
चुंबन : ए मालीक, बंधे हम


मी. उड. झगमगाट.
सेकंद. चमचा. गाठ
विलक्षण.
ताण्डव. तामझाम. टकटक.
सैल. लोरी. झटक.
दोन बाय दोन
नको. खालती. दिनमान.
एकटक. धूळ. प्रकाशमान.
खालमुंडी.

समज. लाईट. चूल.
अतिगहन. आवेग. ढील.
कडेलोड.