Monday, May 1, 2017

श्रीवाहिनी  
सोमवार 

सत्संग
सत्संगाची सुरवात कशी करावी चॅनेलची सुरवात कशी करावी ईश्वरावर विश्वास असलेल्या लोकांनी चॅनेलची सुरवात कशी करावी ?ईश्वरावर श्रद्धा नसलेल्या लोकांनी चॅनेलची सुरवात कशी करावी ?

संत पिवळे महाराज म्हणतात,
"ईश्वरा तू असलास काय नसलास काय फरक ?
माणसाच्या नशिबातला चुकलाय का कधी नरक ?" 








आरंभीचा टॉक (न्यूजरूम )

विश्विय युगात प्रतिभाच सर्व लिहून घ्यायची लेखक हा फक्त टायपर किंवा लेखनिक होता. देव वा ईश्वर न्यूज द्यायचा आणि लेखक लिहून घ्यायचा

सृष्टीय युगात मात्र तो लेखक झाला  प्रयत्न करून न्यूज शोधणारा लेखक

प्रतिसृष्टीय युगात मात्र तो न्यूज शोधून ती राज्यकर्ते, भांडवलदार आणि धर्मगुरू ह्यांना ती पुरवायला लागला आणि हे लोक न्यूज बेंबदपणे त्यांना हवी तशी खेळवू लागले. ज्याच्या हाती न्यूजचा ससा किंवा रादर न्यूजचे
अनेक ससे तो शर्यत जिंकणारा झाला.

आणि आता आजच्या युगात आम्ही आहोत न्यूज परफॉर्म करणारे अभिनेते आम्ही आता न्यूज देत नाही. आम्ही न्यूज सादर करतो आमचा परफॉरमन्स प्रभावी व्हावा म्हणून त्यात  ड्रामा  भरतो हे News Channel म्हणजे काय हो ? News Room Drama जिथे आम्ही आम्हाला सापडलेल्या सत्यावर खटला भरतो त्या सत्याला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करतो त्या सत्याची उलटतपासणी करतो आणि मग आम्हाला वाटले तर ते सत्य निर्दोष सोडतो किंवा ते कसे सदोष आहे ते सांगतो तर पहा News Room Drama तुमच्याच पैश्याने हा पे चॅनेल तमाशा !

---------------------------------------------------------------------------------------------------

स्मॉल टाऊन फिनॉमिनो 

आडदांड जंगलांनाही आडवाटेला न्हेऊन किस केलं आता ह्या तुमच्या कॉस्मापॉलिटिन बागेची भीती काय दाखवताय ? साप हाताळणाऱ्याला बरणीतल्या विषाचं माहात्म काय सांगताय !

तुमच्या ह्या बिल्डींग्ज मला फाडून खायला मी थोडाच अरुण कोलटकर आहे ? आम्ही गावातली उंच माणसं निर्णय करणारी 

जेजुरी कवितेत नाही काळजात जोजवतो.

हे अख्ख महानगर दहा घासात पचवेन
स्वतःचा एकही दात पडू देता
आणि तुमची ही मुंबई नावाची रांड
प्रतिव्रता करूनच
माझ्या प्लेटमध्ये नांदवेन.
तुम्ही म्हणा
स्मॉल टाऊन फिनॉमिना
आणि बातम्या द्या
--------------------------------------------------------------------------------------------------------


नमस्कार
प्रथम आजच्या काही ठळक बातम्या 
माध्यमशाहीचे मुख्य प्रवर्तक रुपर्ट न्यूजरॉक ह्यांनी आज न्यूजचा मृत्यू झाल्याचे डिक्लेर केले

आपणा सर्वांना हे माहीत असलेच की बातम्या ह्या नेहमीच रचल्या जातात पण दुर्देवाने काल बातमी रचताना श्री राचविहार बिहारी ह्यांनी जी बनवा बनवी केली त्यामुळे संपूर्ण माध्यमाचाच जणू मृत्यू झालाय अशी प्रतिक्रिया रुपर्ट  न्यूजरॉक मॅकलुहान ह्यांनी दिली. श्री. रचविहार बिहारी 'दिल्लीवालेमात्र आपण जे काही केले ते उत्तरआधुनिक तत्वज्ञानानुसार केले असे ठामपणे म्हणाले. त्यांच्या मते जर आयुष्य हे भाषेचाच खेळ असेल तर मग काय खरे काय खोटे ? शिवाय मी हा जर आयुष्य हे भाषेचाच खेळ असेल तर मी जे काही केले त्याला भाषेलाच जबाबदार धरले पाहिजे. भाषेनेच जर मला खोटी न्यूज द्यायला भाग पाडले असेल किंवा भाषेनेच
माझ्यामार्फत खोटी न्यूज दिली असेल तर त्याची  जबाबदारी  भाषेवर येते.

श्री. रचविहारी बिहारी ह्यांच्या ह्या प्रतिक्रियेने सर्व उत्तरआधुनिक हवालदिल झाले असून देरीदा बार्थ ह्यांनी "आम्ही लवकरच आमच्या तत्वज्ञानाचा त्याग करत आहोत " असा मेसेज पाठवल्याचे कळते.

आज दिल्ली येथे पंतप्रधांनानी इतिहास हा  डेड झाला असूनही भाजप बाबरी मशीदीचा इश्यू उपस्थित करतय ह्या विषयी खंत व्यक्त केली.

फिल्म लेखक प्रिया नार्वेकर ह्यांनी सद्धया माध्यमे माध्यमशाही निर्माण करण्यात गुंतल्या असून मध्ययुगात वेड्यांची इस्पितळे जशी होती तशी अवस्था आजच्या चॅनेलसना प्राप्त झाल्याचे सांगितले

पॉवर रोडवर शंभर लोकांसक्षम एका जोडप्याने चुंबन घेतल्याने वृत्त नुकतेच हाती आले असून ह्यापुढे प्रेमी जोडप्यांना  पोलिसांनी काहीच करू देऊ नये अशी मागणी शुद्धता मोहितेचे प्रवर्तक रंगार ह्यांनी केली. श्री उपाध्ये ह्यांनीही त्याला पाठिंबा दिला.

श्री. चंद्रदेवबाबा रवीबाबा हे दोन आध्यात्मिक पुरुष एकाच रंगमंचावर येण्याची शक्यता श्री. भोळे  ह्यांनी वर्तवली.

शासनाने ज्योतिषावर बंदी घालावी अशी मागणी श्याम शिंदे ह्यांनी आज केली.

श्रीधर तिळवे ह्यांनी नेहमीप्रमाणे पोमोचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जागतिक भ्रमंतीसाठी  विमान पकडताना ते म्हणाले,

'' मी विमानांत चढता चढता ती दुरुस्त करतोय विमाने उडवता उडवता ती रिडिफाईन करतोय हवाच अशी आसपास की काळाने प्राण कंठाशी आणून ठेवलेत.

हा भूगोल जो डिझायनर्स बिल्डिंगांसाठी पॅरेडाईज होता आता नरकात वाटचाल करत पाताळात चाललाय लोक फॅशनकडे वळता वळता चर्चकडे वळतायत ईश्वरातील काल्पनिक दिलासे बुलंद करत चकाचक शिल्पे कोरणारे शिल्पकार पुन्हा एकदा शोधतायत फिलॉसाफर्स स्टोन जो सबस्टन्सची डिमान्ड करता करता मॉलमध्ये नाहीसा झाला होता आता चाचपडतोय शोधत श्वासाचा मूळ शरीरउगम.

ग्लोबल इंटीलिजन्सवर गप्पा मारणारे फड आता संशयीत सितार वाजवतोय आत्मशांतीच्या शोधात गॅसोलीन कट झालय  आणि रक्ताला गरम होण्यासाठी मिळालेली sanctions कुणीतरी थंड हातांनी पिळतय.

हा बदल आहे की डाऊनफॉल ?
हे नव्या धबधब्याचे सूतोवास आहे की नदीच नाहीशी झाल्याचा संकेत
बाजारात उभे राहून आयुष्याची चिंता करणारे लोक हवालदिल नजरेने पाहतायत स्वतःचे आटत जाणे Signature Confidence कमावलेले लोक पाहतायत स्वतःची सही प्रत्येक चेकवरून उडत जाताना
मी फक्त प्रस्न उपस्थित करतोय आणि लोकांना उत्तरे शोधण्यासाठी मजबूर करून नवीन विमान पकडतोय.
मला माहीत नाही इतकी विमाने दुरुस्त करून मी नेमका  कुठे लॅण्ड होणारय ?
--------------------------------------------------------------------------------------------------------


FASHION- SHOPPING- KITCHEN

"रंजना " साठी

सगळे मराठी कवी थेट जागतिक मरलीन मनरोच्या   पाहिलेल्या जागतिक ट्रॅजीडीत किंवा इन्ग्रीड बर्गमनच्या थेट साक्षीसाठी व्हाया रामदास  भटकळ ! आम्ही आपली गावरान पोरं  ! सुशिला चानी पहात मोठी झालीली जगभर मुळाशिवाय हिंडताना मलखांबात पाय  फिक्स ठेवलेली.

हे तसं बरंच माझ्या बापाने एकाचवेळी एन्टर ट्रगन शांतारामबापूंचा झुंज दाखवला प्रभातमध्ये रॉयल होत इंग्लीशमध्येही मराठीशी लॉयल रहात 

शांतारामबापूंची  संध्या डोळ्यादेखत उमा टॉकीज  म्हणून इंग्लिश पिक्चरला  विकली  गेली आणि आतील माझ्या बापाची कारागिरी नष्ट झाली नव्या  रंगप्रकरणात 

तरीही मराठी अंगप्रत्यंग न्याहाळणारा त्याचा मराठी डोळा तो मला द्यायला विसरला नाही

गोवेकर असल्यानं फर्डी इंग्लिश आणि पोर्तुगीज कोल्हापूरकर असल्यानं रावडी मराठी आणि कोल्हापुरी 

मला मराठी इनफीरियर कॉम्प्लेक्स कधी चावलाच नाही म्हणूनच तुझं मराठी चंदनी लाकूड आणि बॉलिवूड हॉलिवूड माझ्या जंगलात एकत्रच नांदलं चाईल्डहूडमध्ये

तुझं देखणखणी सुशील अंग भुरळत भुरळत निसर्गराजाला अदभूत सांगत सांगत ! माझी काळीभोर पापणी नदीच्या काठी मोहरून मोहरून तकतकली सौन्दर्याचे मराठीमोळे फ्लॅशेस चमकवत माझ्या हृदयात साठवत गेली अंगभारी स्नॅपस तुझी अभिनयकळा आणि स्त्रीच्या सौन्दर्याभोगाची पहिली उबळ रक्त भारून झिणझिणली माझ्या टिनएज मस्कूलरसिटीत 

तुझ्या तरळ त्वचेचा सरळ नाकाचा नितळ ओठाचा सूका मेवा तूच माझी ड्रिमगर्ल माझ्याकडे कुठलेच सबळ कारण नव्हते पण माझी तुझ्यावरील पडदाशीन मोहब्बत तुझ्या प्रत्येक पिक्चरवर मी झळकवत ठेवली लोक दादा कोंडकेंच्या आग भडकावणाऱ्या क्लोजअपपुढे  

तुझं गोंदणवेल  हिरवळत राहिली माझ्या असोशीच्या चालीत मला घाम फुटला तरी त्याला वास होता तुझ्या नथीचा आणि माझ्या कोलगेट पेस्टवर चकचकत राहिले तुझे ऐटबाज दात.       


.
आता मोडून पडलेल्या तुझ्या साम्राज्याची अंताक्षरी एक खुर्चित विसावलीये 

अपंगत्वाचा इतका नपुंसक नमुना मी पाहिला नाही कधी माझ्या आयुष्यात ! 

तुझ्या रूपाने आख्खा मराठी सिनेमाच रिटायर झालाय चेअरवर आणि प्रेअरवर विश्वास नसणारे माझे हात थरथर कापत तुझा भोगवटा पाहतायत

नशीब लिहिणारे हात अनेकदा आंधळे असतात त्यांना स्क्रिप्ट माहित असते पण ते कुणासाठी ह्याची मात्र काहीच कल्पना नसते. एक क्षीणसं हसू चमकवत तू गोळा करत असलेलं धैर्य अंगप्रसंगासह व्हिवळतय

अशोक सराफलाही सुदृढ वाट चालायला भाग पडवणारे पाय तू कुठून गोळा केलेस ? तुझ्या त्वचेची चानी कधीपासून वाघ बनली ? रंगाचा मुखवटा गळून गेल्यानंतर अंगाचा उरलेला अपंगपणा सोसत कुठल्या निघड्या छातीने तू साजरा कारतीयेस जिवंत असण्याचा उत्सव ?
रंजना,
अंजन डोळ्यात पडून त्यांचं भंजन होतय माझ्या नजरेत 
तुझ्या डोळ्याशी डोळे भिडवण्याची निर्लज्ज ताकद माझ्याजवळ नाहीये मी एक असा माणूस झालोय जो स्वतःतच गहाळ आहे. उचल बये तुझ्या आयुष्याचं हे विपरीत ! रीत सहन होण्याच्या पलीकडे चाललाय आयुष्याचा दुर्बोध रोग ! थांबव थांबा नसलेला हा सामना ! हा निर्घाव  षटके टाकण्याचा सिलसिला थांबव 
आणि कर 
क्लिंन बोल्ड
हे रिकामे मैदान.
------------------------------------------------------------------------------------------------------------
लव्ह ऑपेरा 
तू आलीयेस तुझ्या  लैंगिकतेची मादक  Netroactivity तीव्र करत 
माझ्या नाक़ात थरथरतय Homo dynamics 
Manodynamite फुटतात दोन मांडयात एक रेडीएशन रेडीमेड करू पाहतय आयुष्य आणि तू सांगतीयेस तुझ्या engaged प्रियकराच्या रक्तथरारक कथा.

तुझं विश्व expand करण्याचा तुझ्या मूड पसरतोय माझ्या काळजातील dark energy च्या भांड्यात ही एक आपली भेट आहे आणि मी तुला म्हणू शकत नाहीये की तू मला आवडलीयेस

प्रेमाचा cosmological constant कुणाला सापडलाय ? मात्र आपलं माणूस सापडलं की रक्तच ठराव करतं हे माणूस आपलं म्हणून तू सांगतीयेस तुझ्या पुण्यातल्या गच्च आठवणी तुझ्या गळा भरून असणाऱ्या तू दुःखी आहेस आणि सुखीही आहेस उत्तेजीत आहेस आणि निराशही आहे मला तुझा चेहरा पाहताना पार्ले ग्लूकोज बिस्कीटवरली ती निरागस मुलगी आठवतीये जी जाहिरातीपेक्षा टवटवीत वाटते.

तू बोलत नाहीयेस तू भाषा झाड़तीयेस सॉफ्ट टॉयमधून एक जंगल मुलायम शब्दात दबा धरुन असलेलं

पीरिअडची वेळ झालीये कैंटीन ओसाड पडत चाललय दबक्या पावलांनी उठत तू  चाललीयेस ऍबस्ट्रॅक्ट होत
 तू पुन्हा भेटशील भेटशील.
माझ्या त्वचेतले  सारे Hotspot हुळहुळतायत
आणि मी त्यांच्यातून तुझ्या आठवणीचं रक्त कधी येतय ह्याचा अंदाज घेत  स्वतःतच खुळखुळतोय.
------------------------------------------------------------------------------------------------

There is a chaos
There is a chance
And There is a game
Take Decision पोरी

पत्र नव्हे कविता तुझ्या हातात देऊन irrational होत चाललाय माझा हात कविता expression नाही confession आहे केऑसचं ! बूम बूम सरकत सेकंद तणावाच्या शिखरावर तुणतुणं वाजवतोय 

कुठल्या कुठल्या variable वर कंट्रोल ठेवायचा माणसानं ? 
एकमेकांची sufficient information एकमेकाला देऊन बसलोय आपण 
माझ्या  नावाचा श्वास तुझा वास घेतो 
तू नसतानाही डोळ्याचा हात तुझा घास घेतो 
तू नसताना डचमळतोय म्हणून काय झालं पण चाललोय तर तुझाच हात धरून ना ? की चेहरा

तोरा तुरतुरतोय आणि तू जास्तीत जास्त गंभीर असण्याचा प्रयत्न करत 

लबाडीचा प्रेमव्याकूळ गेम 

काय म्हणतेस 
हो कि ना
पोस्टपोनमेंट अवतरतीये भारदस्त चिंतेत 
चल उद्या  भेटू 
उत्तराच्या शोधात 
आज प्रश्न समोर ठेवला हे काय कमीय ?
-----------------------------------------------------------------------------------------------
To understand the uncertainty 
I must be certain about myself
तरंगच तरंग  उठतायत काळजांच्या झुडपातून
कणांचा कीस पाडून थोडंच कळणाराय एकमेकाबद्द्ल काय वाटतं ते
नवरा हे  काय आहे
वर्णनात्मक तपशिलातून थोडीच प्राप्त होणारय त्याच्या असण्याची पोझीशन.  

तू गटांगळ्याही खाणार आणि त्याचा गळाही पाकडणार 
आखूड होत चाललीये निश्चितता जी आयुष्य व्यापेल  असं वाटत होतं. आपल्या भेटीचं लोअर लिमिट काय आणि हायर लिमिट काय ? चुंबन ? Intellectual शेअरिंगमधून प्राप्त होणारे फतवे ? प्रेम हा सेक्सचा आडवान्स टॉपीक आहे की सेक्स हा प्रेमाचा आडवान्स टॉपीक आहे ? सनसनाटी पसरतीये आणि भीतीही चायनीज वॉलची डुप्लिकेट बनवण्यात गुंतलाय तुझा नवरा आणि तू इथे अशी भिंतीना दोन्ही बाजूंनी झोडपत

तुझा निर्णयाची वाट पहाता पहाता 
माझ्या रक्ताचा धुरळा उडत चाललाय - सर्वत्र 
थोड्या वेळाने रक्ताअभावी गडबडायला लागेल माझं हृदयं 
कंप भूकंप वाजवतायत 
होकार मागण्याच्या चरम हट्टापाशी पोहचलय मन 

मला तू हवी आहे मला तू हवी आहेस

ब्रह्मांड तैनात करून मी पहात बसलोय वाट 
आणि तू आहेस की तोंडातून ब्रही काढता शांततेचं व्हायोलीन वाजवतीयेस 
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Just Do It 
आळश्यानो, तळश्यांनो 
चालढकल पाळश्यानो    
Just Do It 

कळश्यांनो, बळश्यांनो 
सरकणाऱ्या पळश्यांनो
Make It Work 

अपयशांनो अपशहांनो 
सपसपसप जपशहांनो 
Keep In Touch 

त्वचाळांनो वाचाळांनो
युक्ता मुखी कामाळांनो
Aw Fuck It

विचारांनो आचारांनो 
येऊन जाऊन प्रचारांनो 
Fisherman Think Holistically

म्हाताऱ्यांनो कोताऱ्यांनो 
सैलणाऱ्या पोतेऱ्यांनो 
Die In Craft 

पळपुट्यांनो छळपुट्यांनो 
काळकाढू कळपुट्यांनो 
Everything Is Neted 

नेटिझन्सनो सिटिझन्सनो 
लवेबल प्रेटीझन्सनो  
Eye I It 
---------------------------------------------------------------------------------------------
क्रीडाजगत क्रिकेट 


क्रिकेट खेळता खेळता 
मला इतकंच कळतय  
There is always a chance 
To innovate a shot 
Which is not in a book 
-----------------------------------------------------------------------------------------------------
12 to 1 FROM WORKPLACE:BAR
माझ्या एकतर्फी  प्रेमात पडलेल्या बारबालेला उद्देशून 

एकतर्फी वहात येतय पाणी
आणि त्यात काळीज उतू चाललय मठ्ठ वणव्यात 

प्रेमात वनवे नसतात 
हा एक असा रस्ता असतो
जिथे दोघांच्यातला ट्रॅफिकही साउंडलेस होत एकगाण होतो

वाऱ्याचा वांझोट्या कॉस्मॉपालिटिन लाटा वाहतायत तुझ्या माझ्यात
आणि माझा श्वास
तुझ्या घड्याळ्यांच्या  काट्यात टिकटिक करत नाही म्हणून दुःखी झालेली तू.

तुझ्या अस्तित्वाच्या वातावरणाचा प्रत्येक थर  कोंडला माझ्या नकाराने
आणि मी काहीच करता येत नाही म्हणून हवाल दिल 

माझ्या अहवालात तुझी सॅलरी टाकण्याचा मोह वाहतोय
माझ्या मीडलएज सेक्सस्टोरीला
पण तुझा कॉपीराईट माझ्या त्वचेवर कायमचा उमटेल म्हणून मी घाबरलोय 

बाईला नाही म्हणणारी सही माझ्या रक्तभाषेत नाही 
तरी माझ्या काळजात तुझं अल्कोहोलिक नाव नाही

मला हे कळतय की हे जीवघेणं आहे 
पण प्रेमात एका हाताने टाळी वाजत नाही 
हे तर तू ओठांपासून बोटांपर्यंत जाणतेस 

माझ्यात  अखण्ड बुडालेला तुझा देहखंड 

मी तुझ्या त्वचेची परीटघडी कधी विस्कटली नाही 
आणि तू माझ्या सफेदपॉश सभ्यतेच्या प्रेमात पडलीस 

शायर आणि वेश्या हा तसा जुना प्रयागसंगम आहे पण तो कुठल्याच वेश्येला फळला नाही

तिची फक्त दुःखांची झाडं गद्गदली भाषेच्या पावसात काहीकाळ
आणि मग शिशिरांची वाळलेली पाने शोधत राहिली
त्या सिंहाची आयाळ
जो दुरून जंगल साजरी करत कवितेपुरताच जंगलला

खोटी आश्वासने मी तर टीव्हीवरही दिली नाहीत कधी 
जाहिरात तयार करताना 

खोट्या बटणांनी ऑन होणारी प्रेमे माझ्या रिमोटमध्ये कधीच नव्हती 

मी आहे नकली नोटांच्या दुनियेतला एक अस्सल बंदा रुपया
ज्याला आयुष्यात कधी एक ऍपलही खरेदी करता आलं नाही
तरी जो ज्ञानाबद्दल न्यूटन-न्यूट्रल राहिला

चूळबूळ चूळबूळ चूळबूळ
चेहऱ्याची चाळवाचाळव
मी कधीतरी यू टर्न घेऊन देहाकडे वळेल  म्हणून वाट पहात

तुझं हे डान्स फ्लोवर सती अनुसयेसारखं असणं 

ह्या बारमध्ये आलो की कायम एकच फिलिंग "तेरे आंचलमें मैं क्या झक मारू ?"

मी तुला बारबाला आहेस म्हणून नाकारत नाही 
केवळ पोटासाठी कुणी नाचते म्हणून नाकारण्याइतके 
पोर्नोग्राफिक नाही माझे प्रेम 

माझा प्रॉब्लेम हा आहे की तुझ्या देहाची सुई 
माझ्या काळजात नाचत नाही 

मी तुझ्या भाषेवर खुश आहे पण त्या भाषेत तू एकनिष्ठ राहण्याच्या  घेतलेल्या आयुष्यभारित शपथा  मला भुरळ पाडत नाहीत

क्लिकच होत नाहीये तो माऊस 
जो हत्तींनाही केवळ व्याकरणाने चालवून दाखवतो

मुली, हा सुगंधच असा
की दरवळला तर दरवळला 

माझ्या झळझळीत मैत्रीच्या नाजूक कोहिनूर क्षणी 
नको मागूस अमेरिकन डायमंडचा नकली प्रकाश 

नाटक केले तर मीही सूर्यासारखा दिसेन तुझ्या प्रेमाला 
पण आंधळ्या झालेल्या प्रेमावर
यानाच्या कुबड्या टेकवत 
वाटचाल करण्याइतकं निर्ढावलेलं नाही माझं 
दशमुखी चंद्रमुखी मन 

हे प्राणप्रिय  मैत्रिणे 
गफलतीच्या लाल फितीत अडकवू नकोस तुझं सरकार, तुझी पौर्णिमा 

चुकांचा चुकवटा हा भोगवट्यांनाही पागल करतो नासलेल्या प्रेमभंगात 

सखये, घे माझ्या उंबऱ्याचे दर्शनी चुंबन  
आणि पाठ फिरवुन 
जा त्या घरात 
जिथं तुझ्या काळजाला काळजाने ब्लडरीस्पॉन्स मिळेल

श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

 `-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-=`-लव्ह ऑपेरा इन जे एस हॉल 
The feeling of control  
is control 
The feeling of uncontrol 
is chaos 
World is what you feel about world. 
थोडा वेळ थोडा वेळ 
घड्याळ प्रेमाच्या मुसक्या बांधून शिंकत 
थोडा वेळ थोडा वेळ घे थोडा वेळ 

आल्हाद नावाप्रमाणे आल्हाद नाही 
मंगेश नावाप्रमाणे मंगेश 
नावाप्रमाणे तू नाहीस
एकमेकांना दिलेल्या हाका काय इंडिकेट करतात 
इंडिकेटर हरवलाय 
थोडा वेळ हवा थोडा वेळ हवा घे थोडा वेळ 

निर्णयात काहीतरी काळंबेरं रेगाळतय I want to go home oh shit What a fucking situation it is. 
खळखळ खालावतीये तळमळ चटका देतीये किती हिंसक आहे हा प्रेमाचा कबुलीजवाब
विषसूद्धा डुप्लिकेट मिळायला लागलय 
हा जगावर उपकार की हे चीटींग
माफी मागणारे हात फेक वाटतायत 
ह्या कुठल्या जगात प्रेमात पडलोय आपण 
ज्यात प्रेमात पडलोय का ह्याचीही स्वःला शंका 
अदमास घ्यावा तर 
खोलात उथळ ईश्वर 
नित्शेला प्रेमपत्र लिहित 
चल 
पाय चालून शेवटी तिथेच  पोहचले 
जिथे त्यांना पोहचायते नव्हते 
हॉस्टेल चिरायू होवो 
ज्याच्या त्याच्या प्रतिभेत 
बाय ! प्रेम करायला घाबरणाऱ्या हातांचे आभार
--------------------------------------------------------------------------------------------------------
God is surface baby 
Not root 
Religion is just part of routine
rather Godroud Infinality   
माझ्यात नको बुद्ध शोधू 
मी आयुष्याचा सारांश नाही 
मी आयुष्याचा भटकलेला paragraph आहे 
जो माझ्याच्याने complete होत नाहीये 

पॉज घे 
शब्द जड होतायत आवाजापेक्षा
गळ्यात काय बुडतय तुझ्या ?
अनसिनची गोळी ? उत्तरं आधीच शोधून ठेवण्याची तुझी लकब माझ्या सरावाची झालीये तुला तुझ्या नवऱ्याची सावली फाडून टाकता येत नाही ह्यात माझा काय दोष ?

त्याच्याकडे जाणार तर दोन्ही हातांनी जा अशी एक हात माझ्याकडे एक हात त्याच्याकडे अशी फाटून नको. तुझी सासू तुझ्या बोलण्यात अशी फडफडते की खात्री आहे ती एक अतिचांगली बाई आहे. इतकं सगळं चांगलय तर चुकतंय काय ? तुझ्या बोलण्यात नवऱ्यावरच्या प्रेमाचा सतत पंचनामा का ? की तूच प्रॉब्लेम आहेस ?

कंटाळ्याच ट्रॅडिशनल फीजिक्स कितीकाळ वापरणार व्यभिचाराच्या रिलेटीवीटीपुढं ! कामवासनेला ना कक्षा ना कण ती स्पंदत राहते थरथरत्या अंगप्रत्ययात 
जा खरंच जा तुझ्या नवऱ्याच्या घरी 
पालथ्या घड्यावर आख्खा समुद्र ओतेन 
तो फ़ुटेलच 
-------------------------------------------------------------------------------------------------------
वायरी वायरी वायरी वाढतायत 
त्यांना बॅलेन्स करणाऱ्या झेडरी झेडरी कुठून आणू 

हा वाऱ्याचा लॉगरिथम कठीण आहे. वाचणं समुद्राकाठी असं बसून 
आयुष्यात गुंतागुंत नको म्हणून भानगड केली तर त्या भानगडीचा बेभानगड झाला 
गुंतता हृदय हे गुंतवळा  गुंजतो

हॉस्टेलची टपोरीगिरी आणि टप टप पाऊस ! काय फॅब्रिकेट करतोय आणि काय प्रिंट होतंय ? तुझे आजोबा पब्लिशर होते की लेखक होते की लायब्ररीअन होते की सगळं होते हेही नीट ठरत नाहीये पुरेशी वटवट आणि कटकट करून ! हे सगळे ट्रान्झीस्टर वासून आणि आपल्या तोंडात काही शोधण्याआधीच इनवेशनचा भुगा! आता त्याने दात घासू की चूळ भरू
तुझे मनमुराद आवेग भुरळ पाडतात आणि गळही घालतात तुझ्या डोळ्यात आपण गळ्यातली घोरपड नाही ना ही शंका आणि मी ब्लाईंड लव खेळत डावामागून डाव पेटवत. माझ्याजवळ colossus नाही आणि तुझ्याजवळ cryptographic codes ची जर्मन भूतवळ हा इंडियन जर्मन काय करतोय तुझ्या आयुष्यात ? हा General Purpose की German Purpose ? फिलॉसाफीचं फिशींग करून मासे टिपता येतात काय ?

तुझा चेहरा भडकून माझ्या कानाखाली शब्द खेचतोय. ही भांडणाची नवी सुरवात ? की नवे भांडण

मी programmable नाहीच आहे 
नवरा आणि प्रियकर आणि प्रियकर 
पोरी 
हे Trinary representation थांबव 
आणि रक्त अद्वैती करून ईश्वरी काळजाने 
एकदा तरी शून्यात धडक 

जखमी होण्याच्या भयाने सपासप वार करत जाणारी ही तलवारबाजी मध्ययुगीन राणीला शोभते तीही १६ व्या शतकात 
मी प्रेमाची लोकशाही आहे 
लोकात साजरी करता येत असेल तर पुढं ये 
नाहीतर जा 
पुन्हा पुन्हा राजकीय चिंध्या फडणाऱ्या त्या बाईकडे 
जिला 
कापूस कोंड्याची गोष्ट 
प्रोग्राम म्हणून चालते 
-----------------------------------------------------------------------------------------------------------








4:30 TO 5:30 songs and poems
हा सॉलीड रोलींग स्टोन आयुष्याचा 
रॉकत राहिला अनसिडेड स्वरांच्या रॉकरॅकेटमशीनमधून 
आपल्या कानांच्या फुगडी खेळणाऱ्या पाळ्यांवर

पण आपण राहिलो 
इंडियन आणि लिक्वीड 

रॉकबॅण्डमध्येही सतार वाजवायला आपण विसरलो नाही 
विसरलो नाही तमाशाचा रांगडीझिम्मा 
कॉस्मॉपॉलिटीन तम्मातम्मात 

दोन्ही बाजूचे लोक बोंबलत राहिले 
पण आपण 
आयुष्याचा मध्य कधी सोडला नाही  

दोन्ही बाजूंच्या कबड्डीत 
दोन्ही बाजूंच्या खोखोत 
खोगो गोळ्या घेता 
आपण घसा खाकरला तोही इंडियन खोकल्यात 

जो पातळ होता - पाण्यापेक्षा - नाण्यापेक्षा - दाण्यापेक्षा - ताण्यापेक्षा

लोक म्हणाले प्रवाहपतित 
पण आपण प्रवाह सोडला नाही 

दोन्ही बाजूला त्वचा होत्या 
पण आपण मोहात पडलो नाही 
आपण काळजातून सोडली अशी नदी 
जिला धरणांची झिंग नव्हती 

एक पद्धतशीर ग्लोबल रॅकेट 
पण आपण कमालीच्या हुशारीने 
तिने फक्त डास मारले 
आणि विश्वात्मकतेच्या आर्त सादेला 
घननीळा ढग दिला 
जो उडताना 
मागे वळून पहात नव्हता 

आता ह्या गाण्यातून पाण्याचा निरोप घेताना 
आपले हात हलतायत 
एका ऍसिडिक सेण्डऑफमध्ये 
आणि आपले पाय वहात वहात 
थेट समुद्रात 
श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )


5 :30 to 6  interview
इंटरव्यू
श्रीधर तिळवे ह्यांची बिल्डरशी बातचीत

श्रीधर   : हे शहर एका झाडासारखं होतं
          आता लॅण्ड नसलेल्या
          एस्केपर सारखं दिसायला लागलंय
          लॅण्डस्केप काढणारे हात
          आता बिसलेरी पिऊन साजरे करतात
          गहाळ झालेल्या नदीचे Beautiful structure
          वाळूच्या पावलांनी चालणारे संगणक
          प्लान करतायत "राहू इच्छिणारा माणूस "
            आणि बिल्डींगधारी
            Live Colour Pattern वर खूष
            Eco city च्या वावड्या उठूनही दशक झाले
             बांधकाम चालू आहे अजूनही ऍप्लिकेबल
             नितीन देसाईच्या स्टुडिओत जाऊन राहावं म्हंटलं
             तर तिथेही धुळीला मिळवणारे
             पोझिशन्स स्वीच ऑन स्वीच ऑफ करत
             प्रत्येकजण बांधतोय स्वतःच जग
             आख्खी सिटी प्लान करायला वेळ कुठाय
         सगळं दारू चढल्यासारखं गर्दमध्ये धुंडल्यासारखं
              धुतल्या तांदळासारखे स्वच्छ राहू इच्छिणारे
            कोठाराबाहेर
            आपली बॉडी काही वैगुण्य वगैरे चाचपत
बिल्डरबी :      श्रद्धा बघता बघता उडून गेली
            बुद्धी बघता बघता उडून गेली
श्रीधर  :    ज्ञानेश्वरांची दोन गावे
            दोन्ही वसलेली
            तरी ओसाडी संपेचि ना
            हा ओसाड भोसडा घेऊन कुठे जाऊ ?
            शेवटी पोकळी बिल्डिंगानी भरली
            आणि आता पोकळीलाही जागा नाही
बिल्डर :       इतकी भारतभरातून आलेली plural गर्दी
                  ज्याच्या त्याच्याकडे  ज्याचा त्याचा सर्वे प्लान
श्रीधर  :     मग मीही बसलोच काही महिने अधून मधून
             इस्टेट एजन्टाचा धंदा टाकून - पैसे चणचणले
            तेव्हा त्याने पोट भरले
            पण pseudo style जशीच्या तशी
            अंगावर तिळासारखी
बिल्डर :     शेवटी बिल्डिंगा विकायला बांधल्या होत्या- विकल्या
श्रीधर  :   त्यासोबत हे शहर विकायला बांधले होते का
           आणि ही मुलं
           ती कुणाला विकायला बांधली  जातायत ?
बिल्डर :    Nothing is safe from crime
श्रीधर  :   बिल्डिंगा बघून
          त्यात पाहणाऱ्याचं character कळत नाही
          मग घर मतलब क्या ?
बिल्डर :    Steel walls, Glass walls,
          Multivalency In Death
          Diverse Mixture of utilities
          Everything is malled
श्रीधर  :   Mall until Death
बिल्डर :    "बाईसारखं टकाटक दिसणारं सेक्सी शहर बांधतोय
            श्रीधर तुझी तक्रार तरी कशाबद्दल आहे यार ?
             लूक ! आख्खी मुंबई सेटसारखी दिसत नाही काय ?"
श्रीधर  :   "दिसतोय अवयव सुंदर
            पण एकत्रितपणे कुरूप - जागोजागी झोपड्पट्टीने नासलेली '
            "एकदा अख्ख शहरच रिसायकल करायला पाहिजे "
बिल्डर :       "हो पण रिसायकल करताना ते टिकेल ह्याची गॅरन्टी काय पेपरसारखं                                 उडूनही                     जाऊ  शकतं "
श्रीधर  :     "मग पेपरवेट म्हणून  काय ठेवावं ? "
बिल्डर :       .. . . . . . . .  . .
श्रीधर :     " कविता ! चल आख्ख शहर बाग करू "
बिल्डर :      "पण बागा विकत कोण घेणार ? त्या फार महाग असतात यारा !"
   
श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

6 to 6:30 chauthi navta
ALAN SONKAL कांडानंतरची कविता 

फक्त शांतताच Textless असलेल्या ह्या पुस्तकी चिन्हाळू शहरात 
मी चालतोच आहे Hoax ची रहदारी असलेल्या रस्त्यावरून
emotional quotient शोधायची घाई झालीये आणि जे माझी कविताही वाचण्याची तसदी घेत नाहीत त्या लोकांच्या काळजातून  
आयुष्य हेच electrifying आणि spectacular parody बनत चाललय.

आसपासची कित्त्येक गॅजेट्स तर कळतच नाहीत ऑपरेट करताना ! त्यांची मुळे हाताशी असण्याची गरज नाही उरलेली ! सरफेसवरचा चकचकीत प्रोग्राम कचकचीत कॉन्फीडन्सनं हॅण्डल केला कि झालं ! लोक कॉन्फिडन्टली मोबाईलवर, कम्प्युटरवर, इंटरनेटवर बोलतायत त्यांच्या ऑपरेटींग प्रोसेसचा % भागही कळलेला नसून

ह्या गोष्टी का कशा कुणी केव्हा कुणासाठी काय किमतीवर कशापासून 

कुणालाच पडत नाहीत प्रश्न आणि आपण विचारले की चेहरा सपाट ! पोस्टमॉडर्नच्या थर्डक्लास चकचकीत टपरीखाली !
आपण गरम करणारे तणाव मांडतोय
आणि त्वचा A.C. च्या रंगाSHI स्वतःचा रंग मॅच होतो ह्या आनंदात 

stragglers ना पडलीये चिंता आपलं यश कोण कधी कसं स्पॉन्सर करणार
stucklers ना फिकीर आपलं यशाचं structure कोसळणार तर नाही ना
suckers      उभे लुटण्याची संधी साधू टोळी बनवत  ?
                 
ह्या शहरात तुम्हाला एकतर लॉटरी लागते luck by chance ची
किंवा तुम्ही लुटारू बनता Badluck at glace ला बळी पडून
waiting listed पाय  कंटाळल्यावर 
                 
पूर्वी धर्मात झोल व्हायचे आता विज्ञानातही व्हायला लागले
काही दिवसातच जिचा आपण कीस घेऊ ती आपली खरी बायको नसेल
आणि जिला आपण गोळी घालू ती असेल आपल्या हाडामांसाची मुलगी 

स्वतःवरचा विश्वासही संपवायला
टपून बसलेलं हे टपोऱ्या डोळ्यांचं युग 

ते तसं बरंच आहे की 
आपण कविता लिहितो 
आणि स्वतःला स्वतःचा पुरावा देऊन 
स्वतःला स्वतःत शाबूत ठेवतो
श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

6:30 to 7  internet
Regular Internet   
               
                                                          On
                                                          Press
                                                                   See
                                                                             Click
                                                                                        Surf
                                                                                      Phone
                                                                                               Choose
                                                                                                Move
                   Download
                                                                                                          Leave

श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

7 to 8 love in dahisar soap
तू तुझ्यात तू आहेस की नाही म्हणून सतत संशयी आणि मी माझ्यात असलेले अनेक मी ओवत कसे balance चालायचे ह्या विवंचनेत 

ही युगाची धूळ ''मी ''ची धूळ उडवत 
आणि मी इतका अहंकारी 
की 'मी' च्या धुळवडी साजऱ्या करत 
कायम रंगीबेरंगी 

फिल्मी होळीचं मुखपृष्ठ माझा चेहरा आणि तू ग्रॅमटॉलॉजी वाचून स्वःच्या सत्वाचे पोकळीकरण अनुभवत नसलेलं वांझोटेपण हलवत 
कुठलातरी एक युरोपियन मूर्ख काहीतरी बडबडतो आणि तुम्ही आयुष्याची साक्ष काढण्याऐवजी आधीच निघालेल्या युरोपियन पुस्तकी निष्कर्षात आयुष्य ढकलत 

पोरी हा निळाकोवळा आकाशाचा तुकडा बघ 

बघ सात शुभ्र ढगाचे निष्कलंक राजहंस 

निसर्ग बघायची विद्या विसरून गेलीस का ?
कॉस्मोपाथीच्या स्ट्रॅटेजी मला नको सांगू 

समुद्राचं टेक्नीक एकच - खुद्द समुद्र 

प्रेम नाही तर राहू दे पण हा अँटीक्लायमेक्सचा वाट पाहणारा बौद्धिक चाळा कशासाठी 

जग 
जगायला शिक 

हे श्वास कुठल्याच पुस्तकात सापडत नाहीत पोरी 
ते असतात इथे आणि आत्ता 
घे 

हवेचा धिंगाणा टिपऱ्या वाजवत येतोय 
   
मोड घड्याळ  हो कालातित 
बघ बघता बघता मनगटानं घड्याळ  फस्त केलं 

आता नको विचारू 
परतायची वेळ 

सर्वांगालाच रंगवू दे 
The End ची पाटी 
श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

ईश्वर मेला तर 
माझ्यातला माणूस जागा करेन 

माझ्यातला माणूस मेला तर 
माझ्या पेशी जाग्या करेन 

माझ्या पेशीही मेल्या तर 
मी माझे क्लोन बनवेन 

माझे क्लोनही मेले तर 
मी आख्खी दुनिया Renovate करेन 

तू मला कशीही संपव 
मी संपण्याला संपवेन 

ह्या श्वासाचा आरंभ मी नसेन कदाचित 
पण त्याचा अंत 
माझ्या रक्तानेच लिहिला जाणार आहे 

पोरी 
हा माझा रक्तावरचा फाजील विश्वास नाही 
हा माझ्या रक्ताचा स्वभाव आहे 

तेव्हा तुझ्या काळजात 
मला खेळवता आलं तर बघ 
श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***


8 to 9 mobaila MOBAILA

मोबाईला मोबाईला