Saturday, February 18, 2017

 चॅनेल : डिस्ट्रॉयरी अर्थात जागतिकीकरणात नष्ट होत चाललेल्या गोष्टी श्रीधर तिळवे नाईक
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन २५ मार्च २००९

स्वीकारल्यानंतर सर्वात वेगाने प्रसिद्ध झालेला माझा  हा एकमेव संग्रह गांगल आणि नीरजा ह्या दोघांनीही फार वेगाने काम केले त्यातील ही कविता 
कवी 
श्रीधर तिळवे नाईक 
नागड्या शरीरांचा कंटाळा आल्यावर कुठं जावं नागड्या माणसाने , ज्याने
कपडे फाडले नाहीत मजनूच्या हातांनी, फक्त उतरवले कॅसोनेव्होच्या
दिलफेक डोळ्यांनी, दृश्यकोमल ओठांनी कळमबंद उमलत, कम्बरेच्या
उम्बरात जो जळाला पाण्यात काळजाची काडी पेटवून, देहाला आग
लावत योनीच्या माचीसवर ज्याने शिलगावली काळी सिगरेट
विर्याच्या शुभ्र बर्फाला पिवळाईत भडकावत ज्याने तमाशा मांडला नाही लावण्याचा,
फक्त लावणीचा पेरणीबाज चेहरा लागवडत ठेवला, त्वचेच्या
जगातील कानाकोपऱ्यातील लोकल लावण्ण्यात.....

हे जळाले स्तन समीराचे आणि डोक्यावर मिरी वाटत काळजाच्या मिरामारावर अख्खी
पणजी जाळून शांत झाली, मीरेत मसाल्यांच्या पणजा सापडलाच नाही !

हे उजळले कार्तिकी स्तन, सावळसावळ टळटळीत दुपारीत पहाड पहाड
झांजा झाले एकमेकावर आपटत पैगंबर भेटलाच नाही

हे डोनाचे नितंबी घटश्राद्ध घटाघट घटाघटाने घाट प्यायला लागणारे, पाणी पिले
बारा गावांचे, तेरा शहरांचे, चौदा कॉस्मॉपॉलिटन सिटीचे, शिट्टी वाजलीच नाही

सुरवात स्तनांनीच झाली, प्रत्येक समभोगी सुस्नातीची, मुल होऊन जगणाऱ्या अंगुठेबाज
अंतःकरणातील प्रजातीचा अंत नाहीच झाला, संत संत वसंतले तरी !

ती आईची काळी प्रेमळ शिरशिरी, सगळ्या ब्लू फिल्मस पास करून
आदळलीच रक्तातील आरशावर सारी क्लासिक्स ग्लासीक झाली, ऐन पहाटेच्या
खलास खलाशीत, दारू पिता पिता ........

शराबी शराबी, गुलाबी गुलाबी, तळहातांनी झगडत राहिली स्तनांशी बेबंद आग
बागडतोय दाखवत ........

कुठली बागशाही, कुठली बाग, कुठली जागशाही, कुठली जाग एकमेकांत झोपताना

इकतरफ हुस्न रहा तन्हा तन्हा इकतरफ इश्क रहा रुसवा रुसवा
दोनों मे रहे दुवे कुछ ऐसे करे तो हम करे किससे शिकवा !

प्यार और मोहब्बतमे फर्क क्या ?
प्यार वही, जो हम अपने बहेनसे करते है  .....
मुहब्बत जो हम दुसरोंके बहेनसे करते है !

जरा नचके दिखा मुहब्बतमे आहसे निकले हर्फ के बर्फपर
ये जॉचकी आँच साँच नही हुई
अपनी तकदीर किसीसे मॅच नही हुई !

ढकत ढकत ढगात केकाटत राहिला निष्ठेचा अस्मानी कुत्रा, बेवफाईची विष्ठा राहिली
आसपास ठेचकाळत......
सुगंधभारी, सुवासपूर्ण गंधचूर्ण खात गंधकपर्व वाचत गांधांरातही गंधारी डोळ्यांनी
एक अफगाणी औरत बळकावली काफिरी शायरी ऐकवत इंडियन डायरी लिहीत
"औरत तुझी भूमी आहे , तिला हवे तसे नांगर " गुप्ततेने किणकिणणाऱ्या किनारी
आवाजावरच भाळलो आणि चेहरा दिसत नाही म्हणून परद्यात  नांगर
टाकून राहिलो, अखेर तहजीब फळली "तू तो अंधेरा है श्रीधर, तेरे साथ
सोकर भी कुछ दिखाई नही देता "  बोटं चाचप , चाप लाव चाफा फुलेना
चाफा फुलेना, चाफा काहीकेल्या भारतात यायला तयार होईना ! ह्युमन
ट्राफिकच्या झुंजार रात्री डिटेक्टिव झुंजार फक्त सिडक्टिव झाला मुसलमान
जब भी होता है कलेक्टिव होता है ! एवढीच कनेक्टिव्हीटी आळवत तिच्या आठवणीत

फ्राईड फ्राय करून करून तळला, तर केरळात मातृसत्ताक मासा भळभळला
"कॉम्रेडिणी  कॉम्रेडिणी कुठं चाललीस साम्यवादाच्या भोपाळ्यात बसून ? "
कॅपिटॅलिझमचा वाघ घेऊन फिरलो, जाहिरातीचा गळपट्टा लावून
कॉम्रेडीण म्हणाली, "मार्क्सवाद म्हणजे काय ?"
मी म्हणालो, "तुझी बॉडी " लुजमोशन बॉडीमोशन होत इमोशनली
बॉडी ! बॉडी ! बॉडी ! बॉडीपेठ ! बॉडीआळी ! बॉडीबोळ ! बॉडीगल्ली !
दिल्ली न गाठताच दिल दिया दर्द लिया ! सरदर्द हुआ बिना पैरका !

"जहाँ किसी हिंदुस्तानीका दिल नही लगता, वो दिल्ली
आणि जिथे केर सुद्धा 'ळ' होतो ते केरळ "

बॉडीव्हिलेज ओलांडून बॉडीसिटीत गाठली
मुकम्मल मंजील
आणि त्वचेची हिरवीगार शेतजमीन कसली घामाचा नांगर  कसमसून
व्हर्जिनिटीला फाळ लावला देहफळ न मोजता, योजने योजने
चालत भोजनं केली दोन मांड्यांत ज्या सशक्त आणि प्रोटीनयुक्त होत्या
टणाटणा वाटाणे उडत राहिले लाल स्तनाग्रांचे, योनीचा एक शेंगदाणा भेल
बनवून गरम केला आणि देहाच्या सात तुकड्यात वाटून चाटून चाटून खाल्ला

सोळा वर्षांनी अश्विनी नक्षत्रं फडकवत आली राशीला
मूळ नक्षत्र न हलवता ठाम राहिलो कुंडलीत, आईला बोलावलं तिच्या राखी बांधून
घेतली आणि मामा म्हणायला लावलं, तर दुसऱ्या दिवशी फोनवर "मानलेल्या
मामाशी लग्न करायचं नस्तं असं कुठल्या घटनेत लिहलंय ?" तिनं
कपडे उतरवले पण मी टच नाही केला, पाठ फिरवून शुद्धीवर येण्याची
वाट पहात राहिलो तर पाठीवर वाघिणीची बोटदार नखं उमटवून तणतणत........
"सोळावं वरीस धोक्याचं, स्पर्श परीस वाटतो ह्या वयात
मग वय ओसरत जाताना कळतं, ही मूलभूत बॉडीच लोखंडाची आहे
तिला ओढ मॅग्नेटिक फिल्डची " जा बाई जा पुन्हा माझ्या आयुष्यात
नको करू ये - जा......

टपटपटपाकटपटपटपाक

हातांचा मोंगरपिंजरा ओढीचा गाजरहलवा, चहाळट वाफाळ चहा श्वासांचा "ह्या
निळ्या डोळ्यांचे मोरपीस, राधे, smsची बासरी वाजली, की कसे धावत येते
नवऱ्याला चुना लावून ?" मला प्रश्न पडतोय तुझा नवरा तुझा थापांवर
विश्वास का ठेवतो ? ह्या "व्हाईट पॅंटीला गॅरन्टी नाही ह्या पांढऱ्या
ब्राला ब्र नाही तुझ्या गोऱ्या मांड्यांची तांदुळखीर एकट्या माणसाचे
उपवास डेंजरस असतात आउट ऑफ फॉर्म असण्याची भीती आणि
विकेट टिकवण्याचा स्टॅमिना मेन्टेन करण्याचा महागडा मेन्टेनस
मुंबईत एक बरंय, झाडं नाहीत, यमुना नाही, म्हशी अजून दूध देतात
हे नशीब ! माझी सर्पमुखी जीभ तुझ्यात मुखमध्य साधत रुद्राक्ष मोजतीये
द्राक्षातून झिरपणारी वाईन रस गळतो, आंबा खळखळतो, तुझा एक पाय आखूड

आहे ह्याचा शिमगा मी म्हणतो 'अंगपंचमी साजरी कर ' मसुद्यात थांबलेलं
प्रेम तू सही न करताच माझ्या त्वचेवर गुटखा तोंडात टाकावा, तशी
मला अंगाअंगात टाकत तोबऱ्या तोबऱ्याने, नारळ न फोडतात खोबरं करत .......

क्रश म्हणजे काय ? इन्फॉच्युएशन म्हणजे काय ? हे यौनमुखी

बिंदू बिंदू सिंधू मोडत, सिंधी पापडाप्रमाणे संधी सांधत संधीसाधू वधवानी

माझ्या दाढीत अढी नाही, माझ्या मिशीत कुढी नाही, माझ्या गालात गाली नाही ......
माझ्या कपाळात कपाली नाही, ह्या चेहऱ्याचा मुखवटा फाटत नाही मरणोत्तर
विधीतही! त्याला संभोगात टरकावू नकोस निर्वासित हातांनी, तुझ्या तेलकट
कटात हा छुपा रुस्तम कट कशाला ?

"हा फक्त क्रश आहे, मराठी माणसाबाबतचा "
ही म्हणजे हद्द झाली सिंधी बये
मृगजळात कस्तुरीमृग कलमडला आणि राम देशोधडीला लागला

विरामाला कुठले चिन्ह असते काय,
प्रश्नात कुठले चिन्ह झरते काय,
पूर्ण हाच विराम !

डंकेकी चोटपर चोट खाकर हम निकले
हमने जिनको ख़ुशी समझा, वो हमारे गम निकले .....

ही गमगमाट, हा झगमगाट मॉलमधल्या भेटीवर तू मला फ्री मिळशील
असं कुठल्या वस्तूवर लिहलं होतं हे देवगणी बये ? सगळे मॉल मनुष्यगणांसाठी
असतात सगळे मॉल भूतगणी असतात अदभूतगण दाखवणारा हा पंजाबी रस्ता
कुठला ? पार पालटी करून पाठीमागून पाठलाग केला कधी कधी पाठ दाखवणेही
फायदेशीर असते हे तू शिकवलंस, आता ह्या मॉलमध्ये टोलेगंज उभा असताना,
तुझे अंगप्रत्यय जोडतायत अंगसंधी ! प्रत्येक पदार्थ पुटपुटतोय प्रत्यय .......

             मॉलम                      मॉले                       मॉलानि             प्रथमा
             मॉलम                      मॉले                       मॉलानि             व्दितीया
             मॉलेन                       मॉलाभ्याम            मॉलै:                  तृतीय
             मॉलाय                     मॉलाभ्याम             मॉलेभ्यः              चतुर्थी
             मॉलात                     मॉलाभ्याम              मॉलेभ्यः              पंचमी
             मॉले                         मॉलयो                    मॉलानाम             षष्टी
             मॉले                         मॉलयो                    मॉलेषु                  सप्तमी
              मॉल                        मॉले                        मॉलानि               संबोधन

विभाक्तांना संयुक्त करणारी ही तुझी विभक्ती, त्वचेच्या भक्तीचा कुंभमेळा गात्रोगात्री भरवत
टिकटिक टिकटिक चालती है घडी ! घडी घडी मेरे दिल मे तू खडी !
घड्याळं मोडून डाळ- शिजवणी, नेत्र शिकवणी आणि नजर चकवणी
भूलभुलैया था था थैय्या
टा टाय ठुस्स! काळ विझवणी ! कुठल्याच म्हातारपणात संपत नाहीये तरुणचळ
तरीही का ही काळजात उठलीये शेषजांभई ? नकोसा नकोसाचा हा खोखो कोण
देतं  ....
कंटाळा टाळा टाळेबंदी शरीरातील नवलांची नवलाई समाप्त मोदकांतला
मोद मोद नवलकर संपुष्ठात कुठलीच स्किनझेप झ्याप  करत नाहीये
कुठलाच स्तन कॅच आउट करत नाहीये, कॅच ट्वेन्टी सिच्युएशन
मेंदूच्या उजव्या बिळातील
डाव्या वळातून वळवळत, वळत वळत, वळ उमटवत, वळखदार ड्राइव्हिंग सीटवर
बसलेलं हे कोणतं वळण ? प्रश्नांना शिस्नासन करायला लावणारं हे कोणतं ग्रहण ?
उथळ पाण्याचा खळखळाट मूल्यवान नसतो काय ?

खोलात जाऊन कुणी पाहिलंय जग
पण बुडत्याचा पाय खोलात
फक्त संभोगातच पॉसिबल नाही काय ?

रामा रामा, क्या है ड्रामा ? कृष्णा कृष्णा क्या है ये तृष्णा ?
बुद्धा बुद्धा, क्या है ये बुद्धी ?
हा टोकदार कंटाळा आणि गरमागरम उष्मा !

तोंडातलं पान जिभेला चघळतय
आणि अवघ्या भाषेला आलयं तोंड
बोलणाऱ्यानं आता कोणत्या तोंडानं बोलावं ?

कवीचं बरं असतं, ते दुतोंडी असतात.......
आपण तर कधीच कवी नव्हतो
प्रत्येक पोरगी म्हणाली "मीट श्रीधर, ही इज माय फ्रेंड, फिलॉसॉफर
अँड गाइड " कुठलीच पोरगी म्हणाली नाही, "ही इज माय पोयेट"

आपण कुणाचेच कवी नव्हतो काय ?
की कवींचा पोरींनाही फारसा उपयोग नाही राहिला ?

वाजंत्री वाजंत्री जत्रा जत्रा
कतरा कतरा सॅक्सोफोन सतरा

फिर भी भंवरेंकी गुंजन है मेरा दिल
मुलींनो,
माझे रिंगटोन तुमचे कान कायम टोनत राहोत .......

 (श्रीधर तिळवे नाईक चॅनेल : डिस्ट्रॉयरी अर्थात जागतिकीकरणात नष्ट होत चाललेल्या गोष्टी
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन २५ मार्च २००९ ह्या प्रकाशित काव्यसंग्रहातून )