Tuesday, October 31, 2017

श्रीवाहिनी शनिवार श्रीधर तिळवे  नाईक 
आरंभ                                                                                                                          
The most sexy thing about knowledge 
- Internet
The most sexy thing about experience
- News channel
Do you think we need movie, literature or serial any more? 
Reality show is an extension of news channel  
So everything is news
Read it ignore it or try to catch it
So we are here to stay so vote for option A
Long live fiction
or option B
or let live fiction
your vote is real thing for us
so don't worry about fabrication of voting.

*********************************************************************************

7:30 to 8 :30 news saturday

                                                     माध्यमशाहीचे प्रवर्तक रुपर्ट म्हणाले, " You can not step into the same news twice"  श्रीधर तिळवे म्हणाले , "Not even once , since there is no same news " मग गजेंद्र जाधव म्हणाले  , "मग पुन्हा पुन्हा त्याच न्यूज दाखवल्या जात नाहीत का?" प्रवर्तक म्हणाले, "पण प्रत्येकवेळी commentary मध्ये , न्यूज देण्याच्या पद्धतीत बदल झालेला असतो. विजय जाधव म्हणाले, "आताशा न्यूजमध्ये play , humor आणि ड्रामा शोधून तो सादरीकरणात आणणे कठीण होत चाललय " हेरॅक्लिटस म्हणाले , "युरोप हि काही शतके जगाची फस्ट लेडी होती तशी ती आता राहिलेली नाही ह्याचं मला दुःख होतं" प्रवर्तक म्हणाले , "आम्ही मीडियावाले Always use to pretend that we know everything. पण इतक्या न्यूज चॅनेल्सच्या भडिमारानंतरही न्यूज शिल्लक राहते ह्याचा अर्थ आयुष्याचा न्यूज देण्याचा स्टॅमिना संपत नाहीये" गजेंद्र जाधव म्हणाले , " Every news is arbitrary but channels place it either in center  or in etc. We channels know that there are no facts but we also know that there are news" श्रीधर तिळवे म्हणाले, " Does media think that science is searching news and news? And who will decide the factness of news? or we leave news as just news? and if we leave news as news then whats the difference between gossips and news , rumors and news? Do media intend to say that journalism is just another name for gossiping.
तसं असेल तर रचविहारी ह्यांना दोष देण्यात काय अर्थ उरतो? आणि मग न्यूज चॅनेल आणि सोप ऑपेरा ह्यांच्यात काय फरक उरतो. मूर्ख पोमोच्या नादाला लागून fact नसतात असे आपण म्हणू नये There are facts फक्त ती अनेक असतात हे आपण स्वीकारावे Facts are not yet dead!

*********************************************************************************

             काल सैय्यद बण्डा ह्यांनी केलेल्या प्रतिपादनामुळे सर्व मुस्लिम समाजात खळबळ उडाली असून इस्लाम धर्माचे Deconstruction करण्याची ही  cultural conspiracy आहे अशी प्रतिकिया अहमद अकबर ह्यांनी दिली. "मूळ बाबरी मशिदीच्या प्रश्नावरून लक्ष्य हटवण्याचा हा खटाटोप आहे" असे ते म्हणाले. श्री इरफान शेख ह्यांनी सय्यद बण्डा ह्यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाची माफी मागावी अशी मागणी केली. अल कायद्याने काही मुस्लिम विचारवंत अमेरिकन प्रचाराला कसे बळी पडत आहेत ते स्पष्ट होते अशी प्रतिकिया दिली ती पाहून श्री सय्यद बण्डा ह्यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाची , अल्लाहाची माफी मागितली. त्यांच्या ह्या माफीने मुस्लिम समाज काहीसा शांत झाला. त्रयस्थ परिषदेचे प्रवक्ते नाना खटवानी ह्यांनी ह्यावर " मुस्लिम समाजाला शांत करायचे आहे कि मुस्लिम समाजाला सुधारायचे आहे हाच मूलभूत प्रश्न आहे" अशी प्रतिकिया दिली "आपले सर्व राजकारण हे सुधारणेऐवजी शांततेभोवती फिरते पण अशा औटघटकेच्या शांतता ह्या सुधारणा घडवून आणू शकत नाहीत त्या फक्त सुधारणा काही काळ लांबवतात. आज ना उद्या मुस्लिम समाजाला इस्लामाचे deconstruction करावेच लागणार आहे " असे ते म्हणाले. ह्यावर श्री इरफान शेख ह्यांनी हिंदूंनी इस्लाममध्ये ढवळाढवळ करून अशांतता वाढवू नये असे प्रतिपादन केले. त्यावर खटवानी ह्यांनी '' जगणे हीच मुळात एकमेकात ढवळाढवळ करण्याची प्रक्रिया आहे ' हे इरफान शेखनी लक्ष्यात घ्यावे ''अशी प्रतिक्रिया दिली.            

*********************************************************************************

     प्रिया नार्वेकर ह्यांनी अभिनेत्यांनी , नेत्यांनी presence चा किती फायदा घ्यायचा हे ठरवण्याची वेळ आता आलीये असं सांगितलं सगळे नेते अभिनेते प्रथम flattering gifts घेऊन क्रिएटिव्ह लोकांना  भेटतात. प्रथम त्यांची डोकी स्वर्गाला भिडवतात आणि मग ढुवर लाथ मारून त्यांना नरकात ढकलतात, त्यांची डोकी कापून आपल्या मानेला चिकटवतात आणि रावणासारखे चालत जाऊन मिडिआ जिंकतात मग लोकांना  जिंकतात मग फेम जिंकतात मग ब्रॅण्ड जिंकतात मग पैसे जिंकतात मग सत्ता जिंकतात आणि मग दहा दहा डोक्याएवढे भ्रष्ट होतात. निर्मात्याला वितरकाला डुबवतात पुन्हा flattering gift घेऊन क्रिएटिव्ह माणूस शोधायला लागतात. अभिनेत्यांची नेत्यांची हि मुखवटेशाही Maskocracy जोपर्यंत संपत नाही तोवर आयुष्याचा चेहरा सपाट राहणे अटळ असं त्या म्हणाल्या Mask comes  , Mask looks  , Mask wins  हे कितीकाळ चालू द्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे. मी माझा प्रतिकार चालू केला आहे इतरांनी तो करायचा कि मुखवटेशरण आयुष्य जगायचं ते ठरवावं. मुखवट्यांचा अभ्यास करणारे Maskography नावाचे विज्ञान आपण develop करत आहोत अशी वार्ताही त्यांनी दिली. मास्क आणि मास्केटीयर ह्यांचा हा संबंध आता कोणता रंग आणतो ते भविष्यात स्पष्ट होईलच.

*********************************************************************************

           काल विचित्रविर्यानी दिलेल्या निवेदनावरून पुन्हा वादंग झाले. श्री उपाध्ये ह्यांनी सर्वत्र गोष्टी अशा घरून जर लोक ठरवायला लागले तर कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. कायदा म्हणजे मनुष्याने दुसऱ्यांच्या अस्तित्वाचा केलेला आदर असतो. आपण सर्वानी जर एकमेकांचा आदर केला नाही तर समाजात आदराआदरीऐवजी अनादराअनादरी माजून एकमेकात फक्त दऱ्या निर्माण होतील असे ते म्हणाले. श्री शरीरे ह्यांनी मात्र विचित्रविर्याना पाठिंबा दिला. चुंबन हा इतरांचा अनादर कसा होतो हे मला समजत नाही वास्तविक चुंबन हे स्त्रीपुरुष दोघांनी एकमेकांचा केलेला आदर असतो. ह्या आदराचा other वर विधायकच परिणाम होतोअसे ते म्हणाले. ह्या देशात क्रौन्च पक्ष्याचे प्रेम चालू असताना वाल्मिकींना तो अनादर वाटला नाही उलट ज्या पारध्याने बाण मारला त्याने ते कळवळून गेले आणि त्यातून रामायण जन्मले. उपाध्ये ह्यांना त्यांच्या अनुयायांना ह्याचा विसर पडला आहे काय अशीही पृच्छा त्यांनी केली. हे चुंबन ज्या आवेगाने घेतले गेले तो आवेग पाहता हे जोडपे अभिनंदनास पात्र आहे असे ते म्हणाले. महाभारतात अनेक ठिकाणी चुंबनाचा उल्लेख आहे पण ज्यांना महाभारत समजून घेताच केवळ हिंदूंच्या नावाने फालतुगिरी करायचीये त्यांना प्रेम काय कळणार असे ते म्हणाले. हा देश पूर्वीपासूनच प्रेमीजनांचा देश होता ' काम ' हा ज्या देशात पुरुषार्थ मानला जातो तेथे सार्वजनिक ठिकाणी एका आवेगात चुंबन घेतले म्हणून गदारोळ व्हावा हे भारतीय संस्कृतीला मुळीच साजेसे नाही असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती हि काम प्रेमाबाबत अतिशय उदार आहे. दुर्दैवाने मध्ययुगातील संतांनी ती अनुदार केली पण ती जेव्हापासून कामाबाबत अनुदार झाली तेव्हापासून मुसलमानांच्या आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेली हे तिने लक्ष्यात घ्यावे पुन्हा स्वतःच्या मूळ उदार प्रवाहात परतावे. विशेषतः तरुणांनी तिला पुन्हा उदार आणि उबदार बनवावे असे आवाहन त्यांनी केले.

*********************************************************************************

          श्री रवीबाबा  आज भक्तांना म्हणाले कि, सर्व धर्म हे एका अर्थाने स्वतःचे दात मरणोत्तरही टिकावेत म्हणून सर्व माणसांनी मिळून रचलेल्या दंतकथा आहेत. दंतकथा माणसाच्या कल्पनाशक्तीला जागा करून देतात हे खरे असले तरी हि कल्पनाशक्ती मग फॅन्टसींना सत्य समजून त्यात स्वतःचे स्वातंत्र्य ताकद शोधू लागते इथेच माणसाला त्याच्या दातांना कीड लागू लागते. माणसाच्या आयुष्यात प्रचंड गॅप्स असतात. ह्या दंतकथा त्या गॅप्स भरतात. कला हीही दंतकथांची फॅक्टरी आहे. आजच्या सगळ्या सिरियल्स ह्या दंतकथाच आहेत पण दात कोरून कधी कुणाचे पोट भरले आहे का? तुमचे पोट जर खरोखर अध्यात्मिक भुकेने तळमळत असेल तर ते एकदिवस आपल्या भुकेची तीव्रता वाढवणार. अशावेळी दंतकथा खाऊन पोट भरणे अशक्य. मग त्यावेळी जो खरी भाकरी खरे पाणी शोधायला निघतो तो खरा भक्त होय.
       भक्त म्हणाले,  "ग्रेट ! डेंटिस्टांची वाढती लोकसंख्या वाढतच का चालली आहे ते आज कळाले, "जय बाबा जय बाबा"
       श्याम देव ह्यांनी आज पुन्हा एकदा ज्योतिषावर शासनाने बंदी घालावी तसे विधेयक आणावे अशी मागणी केली. पूर्वीच्या मांत्रिकात आणि आजच्या ज्योतिषात काहीच फरक नाही असे ते म्हणाले समाजाला ग्रासलेला हा Nervous Illness असून त्यामुळे आक्खा समाज वेड्यांच्या इस्पितळा सारखा दिसायला लागलाय असे ते म्हणाले. श्री भट ह्यांनी West मध्ये reason वर जो अटॅक झालाय त्याची कल्पना श्याम देव ह्यांना नाही असे दिसते अशी कोपरखळी दिली. ज्या West मधून श्याम देव Science विषयी घेऊन आलेत त्याच West मध्ये Science विषयी काय debate चालू आहे ते श्याम देव ह्यांनी पाहावे असे ते म्हणाले. विज्ञानाला अंतिम सत्य सापडण्याचा शक्यता संपल्या असून इथल्या लोकांनी विज्ञानाला अंतिम सत्य सापडणारच असा कांगावा करून ज्योतिष शास्त्राविरुद्ध ढोल पिटणे थांबवावे असे आवाहन त्यांनी केले.

*********************************************************************************

       श्रीधर तिळवे ह्यांनी आज पुन्हा एकदा पोस्टमॉडर्निझमचा मृत्यू घोषित केला  ते म्हणाले,

  "West is always sick & seeker
They first seek something passionately
then feel inadequate and become sick
Then they start to suck it.
Behave like obedient sucker and then
just try to kill it.

First they sought God and then tried
to kill him.

Now they are behind science
They either kill science or humanity
using science as a weapon of destruction.

Are they really serious about life or
too much serious about life?

Why they want to kill?
Why they are declaring death after death?



    आज ह्याचा मृत्यू आज त्याचा मृत्यू 

अरे बाबांनो आयुष्य हे मृत्युपासुन बनलेले नाही ते जिवंत, रसरशीत, ताजेतवाने आहे. त्याचा उत्सव साजरा करा

Let's celebrate it. Postmodernism doesn't allow it. It makes even play very serious thing, very complicated and philosophical thing.
      After all postmodernism is a thought and truth is not thought. You can't think and search the truth. त्यामुळे  POMO is bound to die.
      Experience is the key of truth. Unfortunately 99% don't understand the difference between memory and experience. Experience is here and now memory is elsewhere and either in past or future so It's not easy to search the truth. You have to be language less. Language can't articulated any path for you language can articulate details of memory but memory is not truth. Memory is an imagination of combination of stored data.

                                        फेकून द्या हे ओझं 
                                         Just Enjoy यार 
आणि दुसऱ्यासाठीही आनंद निर्माण करा, जे दुखी आहेत त्यांचे दुःखनिवारण करा

                                         आनंदी व्हा 
                                         आनंद वाटा 

*********************************************************************************






8 :30  to 9:30  fashion shopping kitchen
8 :30  to 9:30  fashion shopping kitchen
"रंजना " साठी

सगळे मराठी कवी थेट जागतिक मरलीन मनरोच्या   पाहिलेल्या जागतिक ट्रॅजीडीत किंवा इन्ग्रीड बर्गमनच्या थेट साक्षीसाठी व्हाया रामदास  भटकळ ! आम्ही आपली गावरान पोरं  ! सुशिला चानी पहात मोठी झालीली जगभर मुळाशिवाय हिंडताना मलखांबात पाय  फिक्स ठेवलेली.

हे तसं बरंच माझ्या बापाने एकाचवेळी एन्टर  dragon  शांतारामबापूंचा झुंज दाखवला प्रभातमध्ये रॉयल होत इंग्लीशमध्येही मराठीशी लॉयल रहात 

शांतारामबापूंची  संध्या 
डोळ्यादेखत उमाटॉकीज  म्हणून इंग्लिश पिक्चरला  विकली  गेली
 आणि आतील माझ्या बापाची कारागिरी नष्ट झाली नव्या  रंगप्रकरणात 

तरीही मराठी अंगप्रत्यंग न्याहाळणारा त्याचा मराठी डोळा तो मला द्यायला विसरला नाही

गोवेकर असल्यानं फर्डी इंग्लिश आणि पोर्तुगीज कोल्हापूरकर असल्यानं रावडी मराठी आणि कोल्हापुरी 

मला मराठी इनफीरियर कॉम्प्लेक्स कधी चावलाच नाही म्हणूनच तुझं मराठी चंदनी लाकूड आणि बॉलिवूड हॉलिवूड माझ्या जंगलात एकत्रच नांदलं चाईल्डहूडमध्ये

तुझं देखणखणी सुशील अंग भुरळत भुरळत निसर्गराजाला अदभूत सांगत सांगत ! माझी काळीभोर पापणी नदीच्या काठी मोहरून मोहरून तकतकली सौन्दर्याचे मराठीमोळे फ्लॅशेस चमकवत माझ्या हृदयात साठवत गेली अंगभारी स्नॅपस तुझी अभिनयकळा आणि स्त्रीच्या सौन्दर्याभोगाची पहिली उबळ रक्त भारून झिणझिणली माझ्या टिनएज मस्कूलरसिटीत 

तुझ्या तरळ त्वचेचा सरळ नाकाचा नितळ ओठाचा 
सूकामेवा साठवत

तूच माझी ड्रिमगर्ल माझ्याकडे कुठलेच सबळ कारण नव्हते पण माझी तुझ्यावरील पडदाशीन मोहब्बत तुझ्या प्रत्येक पिक्चरवर मी झळकवत ठेवली लोक दादा कोंडकेंच्या आग भडकावणाऱ्या क्लोजअपपुढे  

तुझं गोंदणवेल  हिरवळत राहिली माझ्या असोशीच्या चालीत मला घाम फुटला तरी त्याला वास होता तुझ्या नथीचा आणि माझ्या कोलगेट पेस्टवर चकचकत राहिले तुझे ऐटबाज दात.       


.
आता मोडून पडलेल्या तुझ्या साम्राज्याची अंताक्षरी एक खुर्चित विसावलीये 

अपंगत्वाचा इतका नपुंसक नमुना मी पाहिला नाही कधी माझ्या आयुष्यात ! 

तुझ्या रूपाने आख्खा मराठी सिनेमाच रिटायर झालाय चेअरवर आणि प्रेअरवर विश्वास नसणारे माझे हात थरथर कापत तुझा भोगवटा पाहतायत

नशीब लिहिणारे हात अनेकदा आंधळे असतात त्यांना स्क्रिप्ट माहित असते पण ते कुणासाठी ह्याची मात्र काहीच कल्पना नसतेएक क्षीणसं हसू चमकवत तू गोळा करत असलेलं धैर्य अंगप्रसंगासह व्हिवळतय

अशोक सराफलाही सुदृढ वाट चालायला भाग पडवणारे पाय तू कुठून गोळा केलेस ? तुझ्या त्वचेची चानी कधीपासून वाघ बनली ? रंगाचा मुखवटा गळून गेल्यानंतर अंगाचा उरलेला अपंगपणा सोसत कुठल्या निघड्या छातीने तू साजरा कारतीयेस जिवंत असण्याचा उत्सव ?
रंजना,
अंजन डोळ्यात पडून त्यांचं भंजन होतय माझ्या नजरेत 
तुझ्या डोळ्याशी डोळे भिडवण्याची निर्लज्ज ताकद माझ्याजवळ नाहीये मी एक असा माणूस झालोय जो स्वतःतच गहाळ आहेउचल बये तुझ्या आयुष्याचं हे विपरीत ! रीत सहन होण्याच्या पलीकडे चाललाय आयुष्याचा दुर्बोध रोग ! थांबव थांबा नसलेला हा सामना ! हा निर्घाव  षटके टाकण्याचा सिलसिला थांबव 
आणि कर 
क्लिंन बोल्ड
हे रिकामे मैदान.
----------------------------------------------------------------------------------------------------
श्रीधर तिळवे -नाईक 
 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )


9:30 to 10 college KATTA


हे राजकारण आहे
कि नवे वळण आहे

हत्ती नाहीसे झाले
सिलॅबसात त्यांच्यावर प्रकरण आहे

घोडा अडीचमध्ये संपला
घौडदौड फक्त आवरण आहे

प्याद्यांचे कुणास काय
ते तर आजन्म शरण आहे

उंटांनी तिरके चालून वाळवंट गाठले
डोईवर चंद्रग्रहण आहे

वजीर पोट सुटून वजनदार झाला
जागीच खिळून अंत:करण आहे

शेवटी दोन राजे उरलेत

पाहू कुणाच्या नशिबी मरण आहे



लव्ह ऑपेरा  लव्ह इन बॉम्बे युनिव्हर्सिटी 

१ 
एक धग पसरतीये वाऱ्यात एक ढग पसरतोय श्वासात तुझ्या अंगाला जन्गलाचा वास सुटलाय वासनेची जीभ फड्फडतीये आपण चालतोय युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस मध्ये एज्युकेशनल डाटा भिरभिरतोय आणि आदळतोय डोळ्यावर डोळ्यातली बाहुली त्याला परावर्तित करतीये कि परतवतीये एक मदमस्त चाहूल चाल खेळतीये 
नो नो सिडक्शन 
ऍडिक्शन ऍडिक्शन 
तुझ्या देहाची धुंदी चढतीये पेशींच्या नारकोटिक्स डिपार्टमेंटला 
मी बेहोष होतोय तुझ्या चेहऱ्याच्या गर्द पसरवणाऱ्या लाटांत 
ओठात जोशमोर थुई थुई सेकसाळतोय 
मी आवेगाने खेंचतोय तुला माझ्या मिठीत दाही दिशा गच्चं करत 
चुंबनांचा लोळ गडगडत तुझ्या ओठावर विजा वेचत 
आकर्षणाचा चुंबक पृथ्वी उलटीपालटी करत क्षणभर 
आणि अचानक विद्यापीठाचा watchman  
''काय चाललंय ?''


पकडले गेल्याचा ट्रॅप 
''ही काय ईडन गार्डन आहे ऍडम ईव्हची ? हा युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे कॅम्पस इथे अश्या गोष्टी शिव शिव ''
'' द्या सोडून watchman राव ''
'' तुमच्यासारख्या scholar माणसाने असं करावं ? मग इतरांना काय आदर्श सांगणार आम्ही आजतागायात बॉम्बे विद्यापीठाच्या इतिहासात हे कुणी केलेलं नाही ! युनिव्हसिटीच्या कॅम्पसच्या भर रस्त्यात चुंबन ? जनाची नाहीतर मनाची ? काय करता ? Ph D ना   ? आणि तरीही ही तऱ्हा ? तीही पब्लिकमध्ये ?''
सार्वजनिक नजरांचा उठलेला गदारोळ 
आणि तुझा पडलेला चेहरा 
डोळ्यात '' एवढा पण कंट्रोल नाही तुझा ? आणि मी पण बहकले साला ! ही अशी गोची करतो तू माझी ! झक मारले आणि तुझ्या प्रेमात पडले !''
तुझ्या नजरेत शिवराळ लाळ आणि मी शर्मसार आणि बेमुर्वतही ! केऑटिकल कि पॉलिटिकल ?
झाडांना हिरवा रंग आणि रोमँटिक होण्यास सक्त मनाई आहे अशी अदृश्य पाटी 
मी ती मोडली म्हणून शोक करू 
कि मी तीला भोक पाडले म्हणून सेलिब्रेशन ?

काहीही होऊ शकते 
आईला आमच्या सेक्सची सत्ता विद्यापीठाच्या 
हातात ?
मी शक्यता अजमतोय 
श्रीधर तिळवे ही चुम्बने तुमच्या करिअरचा PACKUP असू शकतात 
ह्या भर रस्त्यातील चुंबनांच्यामुळे तुमचे पीचडीचे ऍडमिशन रद्द होऊ शकते 
ह्या चुंबनांच्यामुळे तुम्ही एजुकेशनल फील्डमधून कायमस्वरूपी बहिष्कृत होऊ शकता 
बोम्बलल करिअर 
मला अचानक तुझी काळजी वाटू लागलीये 
तुला काही झाले तर 
मी WATCHMANला सॉरी म्हणतोय 
पण तो आपल्या पोझिशनमध्ये ठाम 
'' काय करायचं ते हेड ऑफ द डिपार्टमेंट बघतील ''

अरुण कांबळे सर समोर उभे 
आणि आपण अधिकाधिक चेहरे पाडत 
'' तिळवे , एव्हढंच शिल्लक राहील होत काय ? कि ही पण चौथी नवता आहे ? कंट्रोल करता नाही येत ? जागा तरी बघायची ? भर पब्लिकमध्ये ?''
'' सॉरी सर पुन्हा होणार नाही ''
'' गोचीच केली हो तुम्ही WATCHMAN , किती लोकांनी बघितलंय ?''
''जास्त नाही! त्या साईडला इतकी गर्दी न्हव्हती ''
'' कुणाची काही कम्पलेन्ट ''
''अजूनतरी नाय ''
'' नशीब ! द्या सोडून ''
'' सर पुढची जबाबदारी तुमची ''
'' जाऊ दे आपला माणूस आहे आणि तिळवे पुन्हा इथे नाही ''
''हो सर सॉरी सर पण हेड ''
''ते मी सांभाळतो निघा आता ''
मी पडत्या फळाची आज्ञा शिरसावन्ज्ञ मानत तुझ्या सह बाहेर बाहेर पडतोय 
बाहेर क्षणांसाठी तयार झालेली ईडन गार्डन स्फोट होत नाहीशी होतीये 
आपण बोलत नाहीये 
आणि कुणीतरी शांततेचे बोल्ट्स अधिकाधिक पीरगाळत 
युनिव्हर्सिटी टाईट करतोय 
********************************************************************







11 to 12 sports
11 to 12 sports
Sports                                                                                                                                                      
डबल खेळणारे डबलर्स जे सिंगलमध्ये विसातही नसतात पण ग्रॅण्ड स्लॅमच्या फायनल सेमीफायनलमध्ये असतात ज्यांना जाहिराती  मिळत नाहीत तरी जे चॅम्पिअन असतात सेमीहातांचे ज्यांना सिंगलचा फायनल ड्रफ्ट कधी कधी हाताशी लागत नाही अपकमींग देशात जे सेलिब्रिटी असतात सुरवातीच्या यशाचे जे प्रार्थना करतात सिंगलमधील दोन डफर्स एकत्र येऊन खेळू नयेत डबल म्हणून अनसिडेड इतिहासाचा जे स्टॅमिना असतात ज्यांची सर्विस कधीच फिनॉमेनल नसते पण जिचा टच एक्सिस्टान्शियल असतो जे डोळ्यांनी मैदान वाटून घेत व्हिज्युअल शेअर करतात ज्यांना पहायला कैकदा सेलिब्रिटी ऑडियन्स उपस्थित रहात नाही तरी जे स्वतःचा प्रेझेन्स देऊन मैदान जास्तीत जास्त प्लेझरेबल करतात.
                                           
                                    राज्य  करता   

                                                  जग चालवतायत 


--------------------------------------------------------------------------------------

12 to 1 FROM WORKPLACE 
sharebajar
      शेअरबाजार

शेअर्समध्ये गळ्यापर्यंत बुडालेला मनुष्य
शेअर्स बुडाले म्हणून रडत चाललाय

शहरामध्ये ओठापर्यंत बुडालेला मनुष्य
शहर बुडाले म्हणून रडत चाललाय

शहामध्ये नाकापर्यंत बुडालेला मनुष्य
शह मिळाला म्हणून रडत चाललाय

रडत नाहीये फक्त तो
जो 'शू ' मध्ये डोक्यापर्यंत बुडालाय
आणि जो चालत आलेल्या पाण्यापासून
शहामृग बनवून
सर्वाना चेक देतोय

*********************************************************************************

1 to 2 LOVE OPERA love in j s hall
  II II 

         गाडीच्या ऐेसपैस जागेत पैस नाही म्हणून रेड्यासारखा काय पाहतोय
संभोगाचे प्रतिवेद तुझ्याकडून वदवून घेण्याइतपत संभोगेश्वर झालेली नाही माझी ब्लडी बीच जीभ
मी तो हजारातला एक आहे ज्याच्यात एचआयव्हीला प्रतिबंध करणारं इनहेरीटेड जनेटीक म्युटेशन आहे 
जे बाईतुन चालताना तिच्या त्वचेतलं    सिरॅमिक बॉण्डिंग जाता जाता पिघळवतं.
         हा पुरेसा वेळ पुरवणारा प्रवास 
         हि पुरेशी जागा पुरवणारी बॅकसिट 
         ताबडतोबीतही आक्खा मोर फुलवणारं जंगल माझ्या हालचालीत आहे आणि सूर्याचं ओरीजन शोधणारी निपॉनी करन्सी मी जाता जाता रक्तावतो.
        हा वासनेचा प्रकाश सहन होत नसेल तर का सोडून जात नाहीस गाडी? आरश्यातला माझा नागडीझम्मा पाहण्याची सक्ती मी कधी केली? खरी सभ्यता संभोगाला एकांतात सोडण्यात असते.
        तू मित्र आहेस आणि ड्रायव्हरही 
        मित्राकडची नोकरी म्हणजे ९०-९० फंड 
        म्हंटली तर सेवा म्हंटली तर डयुटी 
        तुझी पादाकुलक शुद्धता माझं रेडिएशन एडिट नाही करू शकत 
        जा उतर आणि रोमला विचार
        बॅकसीटवरचे संभोग हे हायजेनीक पुण्य की फील बॅड पाप?   
                                                           
                                                                    II II 

        आता तुला काय  झालं
        ज्याला जायाचं तो गाडीतून उतरून गेला आत्मसन्मानाच्या मार्गानं.
        इंजिनचं ब्रेकफील्ड पडेल दोन मिनटात बंद.
        माझ्या चेहऱ्याचे scars चुंबत कुठली बाराखडी सुरु करतीयेस
        ह्या scars मध्ये सेक्स अपील आहे की काय
       हि केअरींग बोटं इतकी डेअरींगबाज कधी झाली?
        ये ! कर ह्या गाडीची हॅंगींग गार्डन
        हा कामाचा ऑड अवर गॉड अवर कर 
        माझ्या कुठल्याच अवयवाला कसलाच ऑप्शन देता 
        तुझ्या दोन मांड्याच्या जीममध्ये करू दे माझ्या पोपटाला हिरवा व्यायाम 
       थोडीशी स्विंग हो झिंग कमी होऊ देता 

      आठवणींचं स्टोरेज मिडीयम उधळून फक्त आत्ताची हो 
     
      ओठांना दे कीसचा सडाफटिंग व्हॉइस 
      मेन्यू उतरल्यासारखी नको अवतरूस 
      एडिटिंगचा प्रोग्राम राख करून ये 

       मुक्त शॉटमध्ये टिमटिमतोय  शॉवर. धबधबतोय घाम. टमटमतायत हात. झमझमतायत त्वचेची जाजम. माजातच ये
       मुश्किलीनं जमा झालेले फ्लॉवरड्रापस उमलतायत 
       बिल्ट इन मायक्रोफोन वाजतायत 
       डीस प्ले करणारं फक्त प्ले करतय 
       ह्या पायातल्या क्रॉस ट्रेनरचा इम्पॅक्ट वाढतोय दर पावलात.

       ये ! ये ! ये !
       उडवून लाव आक्खी गाडी
       तुझ्या बॉडीत
       आणि पार्क हो
       सॅंडल काढून
       तम्मा तम्मा सॅण्डलहूडमध्ये

*********************************************************************************

2 to 4:30 cinema

4:30 TO 5:30 songs and poems
5 :30 to 6  interview
6 to 6:30 chauthi navta
6:30 to 7  internet
7 to 8 love in dahisar soap

       शत्रूबरोबर झोपायला मी काही गुप्तहेर नाही तेव्हा आधीच क्लीअर कर तू कोण
       माझ्याजवळ आहेत माझ्या कंपनीचे डिटेल्स जे तुला उपयोगी पडतील तुझं करिअर प्रमोट करायला 
        रिअल डेट आणि रील डेट ह्यांच्यातला फरक कळत नाही नुस्त्या डोळ्यांनी 
       तेव्हा काय हवय

       घरी दुधाची पिशवी येत असताना गाय विकत घ्यायला कोण मार्केटमध्ये जाईल
       बाई सिन्सीयर नसली की डीनर फालतू होतो
       फुलं घेऊ की नको
       मी बुद्धु दिसेन की बुद्ध

       पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दे हातात हात घेताना
       रॅन्डम एनकाऊंटर रॅन्सम नको बनवू 

      माझे कित्येक  वन नाईट स्टॅन्ड संभोगात पोहोचूनही प्रेमात जाऊन बसले नाहीत 
      दुसऱ्या दिवशी पुन्हा मैत्रीत भटकलेत

      हे सायबरअहमचे युग कुठल्याच खेळाला निश्चित नियम देत नाही 
     तेव्हा चेसबोर्ड उधळून माझ्या रक्ताचा पाठलाग कर
     स्टँडिंग अलोनचा मेंटेनन्स परवडत नाही माझ्या पायाला म्हणून तर ही प्रेमाकडं वाटचाल. माझ्या बॉक्स sat  Relationship Status दाखवणारी यंत्रणा नाही 

      डोळे हे फसवे गडे वाकूनी त्यात पाहू नको 


     हा उजव्या खांद्यावरचा स्पायडरमॅनचा टॅटू चुंब 
     तुझ्या केसांचे जाळे त्याच्यात विखुर 
     प्रत्येक पिढी स्वतःची लैंगिकता स्वतः शोधते 

     आपल्याजवळ आहेत ऑपशन्स आणि प्रोटोकॉल नसलेलं शरीर 
     कॅमेरे चुकव 
     मी मीडिया ऑब्सेशन आणि हायपरसेक्युऍलिटीन भारावून जाणारा च्युतिया नाही 
     शरीराच्या प्रत्येक कॉर्नरवर समाधान शोधणारा अजेंडा माझ्यातही आहे 
     तो त्वचेचं सर्फिंग करत रूम टू रुम वाच 
    सात जन्माची फेअरी टेल उध्वस्त करत येतोय तुझ्या आईबापाचा डिवोर्स 
     त्याला वळण दे.


         ये ! आनंदी आनंद नागडे
         फिंगरटीप्स वापर
         हा गरम मिठीचा फुलफ्लेश एहसास उफ हा कमर्शिअल एकांताचा निखळ अंत


        ये ! ये

        पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्या उधळ तुझ्यात आवेगात 
        Text Message Flirtation Sext Message Aleration होतंय 
        ये!
         
         सगळं संपलंय की नवं सुरु झालंय?
         आणि हे काय
         मला म्हणायचंय I Love You
         आणि मी तुला वाचन दाखवतोय
         मोबाईलवर नुकतेच आलेले दोन ज्योक

************************************************************************

माझा जीव खाऊन मला पराभूत करण्याची अहंकारी उर्मी
तुझ्या हालचालीत जागोजागी
हॅपीनेस जाऊन  फक्त हॅपनिंगच्या होपलेस झिंग्स
भांडण- घडू देतोय
करवादणं - घडू देतोय
डोळ्यादेखत सडत चाललय प्रेम - सडू देतोय
fxxk Buddies च्या Bodies
आणि त्यांच्या घुसमटणाऱ्या सावल्या
माध्यमवयीन मिलिटरीच्या कम्प्लेन घेऊन आलीये मिलिटरीन
शेवटी तिलाही तू दुःखीच केलयस
काटकारस्थानाचं पॉप कल्चर, खोटेपणाचा सोप ऑपेरा
आणि शहाणपणाचा नेहमीचा अभाव
पिसाटायच आणि केकाटायचं
प्रथम प्लॅटरिंग मग कॅटरिंग मग शटरिंग
नेहमीच्याच रिंगा आणि बदलणारे पशुवत खडे
सेक्चुअल अर्ज मधून सेल्फ एक्सप्रेशन करत
कुठं जाणार आहे physical gratification ची ग्राफीटी
कंटाळा येईतोवर झवझव
अंधार दिसेतोवर चमचम
Formless bonding चा चार्मिंग पॅटर्न
ती तुझ्यावर तिच्या नवऱ्यावर बोलतीये
माझा तुझ्यावर विश्वास नाही
तरीही तुझ्या paradoxical पातिव्रत्याच्या फिक्शनल गॅरन्टी देत
मी शांतता Nobel ओततोय लादलेल्या महायुद्धात
तिचं असमाधान बारीक पण आवाजी
"तुम्ही बावळट आहात तुमची ही तथाकथित प्रेमिका तुम्हाला
उघड उघड फसवतीये आणि तुम्ही ......... "
फसवणारी व्यक्ती कुणाला फसवते ?
स्वतःला की इतरांना
तुझी ना स्वतःवर श्रद्धा ना माझ्यावर विश्वास ना प्रियकराची गॅरन्टी
कदाचित ह्या तिन्ही गोष्टी अशक्ययत
कदाचित तुझं डेअरिंग भयावर आधारित आहे

एक विलक्षण तणाव चहाच्या वासासारखा
मिलीटरिण कावलीये
तिला हवा आहे प्रतिसादाचा साम्यवाद
जो मी देत नाहीये
नर्वस ब्रेकडाऊन झाला की ब्रेक डाऊन करून बॉडी चालवणाऱ्यांची
मला नेहमीच दया येते

मला आता ह्या क्षणी तुझी, तिची, मिलिटरीवाल्याची दया येते
हे Anti love की Antelove
हस्तक्षेप करणारे हात माझ्याजवळ नाहीयेत
मी दहाही बोटांनी फ्रीडम वाटणारा माणुस आहे

कर
काय करायचं ते कर
फुटलेल्या आरश्यात चेहरा टांगून मिलिटरीन केविलवाणी निघून चाललीये
आणि मी तुझा केलेला डिफेन्स
तात्पुरत्या प्रेमाचा डोस तयार करत
तुझ्या रक्ताला माझी कडक तलफ लावतोय

तू मला पितीयेस पेमेन्टी आवेगाने
आणि मी कान मोडलेल्या कपसारखा
असहाय्य तुझ्या हातात
उपकारफेड झेलत
**************************************************************

त्यानं पेजर घेतला म्हणून      मीही पेजर घेतला पाहिजे का ?
त्यानं दमण दीव न्हेलं म्हणून     मीही दमण दीव व्हेलं पाहिजे का ?
त्यानं पोहायला शिकवल म्हणून     मीही पोहायला शिकवलं पाहिजे का ?
त्यानं मित्राची बायको पटवली         म्हणून मीही मित्राची बायको पटवली पाहिजे का ?
                                हे कायम परपुरुषधारीणे
                                हे कायम परपुरुषधार्जिणे
जा घंटा वाजवून घे त्याच्या दगाबाज हाताकडून
आणि तो साईबाबाचा भक्त आहे म्हणून
तुही साईबाबाचा भक्त हो

तुम्हा दोघांना व्यभिचार पावो
आणि तुम्ही दोघांचीही लग्ने व्यभिचारी पार्टनरशी होवोत
शिर्डीत श्रद्धा आणि सबुरी
                          मुंबईत बाजार आणि बजबजपुरी
             
                अरे हा चंद्र कुणीतरी फाडा यार
                 भेंच्योद !

२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२

आईस्क्रीम - श्रीधर तिळवे
            आईस्क्रीमशी निगोशियेशन्स चालू आहेत
            एक ब्लॅक करंन्ट वाहतोय माझ्या जिभेत माझ्या अक्कलदाढांना बर्फाची अलर्जी आहे इंडियन हॉट समरमधील त्यांचं बालपण सध्या अदृश्य असलं तरी त्यांनी सोसलेला उन्हाळा त्यांचा पिच्छा सोडत नाही त्यांना केसर पिस्ता पलायन वाटतं भारतीयत्वातून केलेलं आनंद थुईथुई नाचतोय हे आईस्क्रीम म्हणजे दुधाचा पिसारा आणि पसारा टिकणारा परफेक्ट फॉर्म आयुष्य कितीही टिकवा सरतेशेवटी हे ह्या आईस्क्रीमसारखं वितळून जातं तोंडातल्या तोंडात.
            मला कृष्णाच्या तोंडात ब्रह्मांड दिसत नाही मात्र माझ्या तृष्णांच्या तोंडात आईस्क्रीम दिसतायत
            मी तुझ्याशिवायही शरणागत हातांनी बटरस्कॉच मागवतोय माझी शिबीरार्थी बोटे आईस्क्रीमच्या कोणाचा रिमोट मिळणार म्हणून सुसुस्कारतायत आपसात पसरलेलं मार्केट आणि रॅटरेस प्रेत्येकालाच पळायचं आहे आणि फस्ट यायचं आहे आईस्क्रीम म्हणजे साक्षात फॅटरेस काळजातले उंदीर पळवून लावणारी उंदीर पळून चाललेतसगळे शर्यत सोडून आईस्क्रीमसमोर बसतायत.
          माझ्या जिभेवरून आनंद नागड्या पावलांनी चाललाय थंड आणि गोड हुरहुरी बर्फाला बुद्धीमत्ता नसते तो पाण्यातून  शहाणपणा गायब झाल्यावर तयार होतो दूध पॉझिटीव भावनायत आईस्क्रीमचा कोन शंखनाद करतोय ज्यात शांतता प्रगाढ आहे पूर्वी व्हिलनही आईस्क्रीम खात नसत ते सिगारेट पीत आता व्हिलनही  आईस्क्रीम खातात आणि हिरो सिगारेटीच्या जाहिरातीत आईस्क्रीमचा एक तुकडा अतिथंड बहुधा त्यात हिवाळा गोठलाय एक हिजडा आइस्क्रीमला विचारतोय "मेरे आँगनेमे तुम्हारा क्या काम है ?" आईस्क्रीम खाताना दात लागत नाहीत. त्यामुळे आईस्क्रीमपुढे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असं चालत नाहीये.
          दोन मुली एकच आईस्क्रीम शेअर करतायत जिभेला हाड नाही आणि आईस्क्रीमलाही एक आराम आळसतोय दोघींच्या डोक्यात बाईला गरम करावं तसं मी गरम करतोय जिभेला आणि जीभ गरम करतीये नवा दाखल झालेला बाईट एक हळुवार सणसणी थेट गळ्यापर्यंत सगळेच आईस्क्रीम खाता खाता इनोसंट होतायत माझा निरागसपणा मला परत मिळत चाललाय मला कोल्हापूरच्या कसाटाची आठवण येतीये तसा कसाटा मुंबईत नाही सावळा आणि पांढरा कॉफीक आणि मिल्की ओरिजनल आणि फेक
          सुजीत अर्धा किलो वेनिलाची ऑर्डर देतोय भाईंदरला अजून आईस्क्रीम पार्लर नाही ते आपणच का टाकू  नये हा त्याचा प्रश्न मला तू आठवतीयेस बोरिवलीची आईस्क्रीम वारी तू, तुझा यार आणि मी तो प्रेमाचा कोन कोन आहे की त्रिकोण ? तुझ्या हालचाली शंकास्पद झालेत सुजीत एकीकडे दाताचा दवाखाना मांडतोय आणि दुसरीकडे आईस्क्रीम पार्लरचा प्लान. तुला सुजीत आवडत नाही तुला माझा कुठलाच दोस्त आवडत नाही प्रेमात पार्टनर असह्य का होतो ?
          वेनिलाचं फॅमिली पॅक सगळं नाहीस करत चाललय ती भांडणं ते रात्ररात्रभर एकटं थांबणं. ते एकमेकात बिनसणं सगळी फिस्कट फिस्कटी नाहीशी होतीये सगळं फक्त निखळ आणि निष्पाप बनत चाललंय दुधी चवीत. आईस्क्रीमला संपण्याची घाई नाहीये ते मुलासारखंच रांगत रांगत प्रवास करत रेसमधून मला गायब करत निखळ निर्भळतय माझ्या तोंडातल्या खुल्या मैदानात
          किती क्षुल्लक आहे तुला माझा विरह
          एक ढग व्हेनिलातून उडतोय उडतोय उडतोय
          मी आणि माझा व्हाईट पिसारा
           डिंगडाँग
***


दहशत   विकेटकीपर पार्टी  घरगुती
मॅन्युस्क्रीप्ट हाताळत बफीळ हातोडा
नाकतोडा गजरबंद घड्याळी तटतटनारा
भाजणी जखमा रक्तप्रवेश घनदाट
संगणकी हृद्यदाब वैकृती चलचलाट
झिम्मक फुगफुगडी जुनाव  बनाव
माध्यम   कुठले मध्य   मध्य  मादक
शिणलेले   वयात येते  चुकार   चौकारी
गाठ   पाड  ताड  माड
उंची  उंचावत   आपटधूम   तपतपाळ
केवळ  कपाळात  नाही  तर
               भाषेत  आहेत        आणि मी कायम कवितेत शिरण्याकचा प्रयत्नात कधी भाषेत            कधी आयुष्यात
             अद्वैत  घडवत
              त्या व्यभिचाराची वाट पाहतोय
              जो मला परफेक्ट कापत
              माझ्या शर्टाची पँटीची बटणे लावत
    कपड्यात एकत्र ठेवून सतत निसटतोय
     ही बटणे संपली की विखरून               मी ऑफ
               हे वीजीके
               ह्या कापडयुगातून
               ह्या कपड्यांनी बांधलेल्या नात्यातून
***************************************************
       
             तू दिलेले डिसेन्ट हुंदके आता वल्गर होऊन गुंजतायत माझ्या अनलिमिटेड कानात हे दुःख अक्युप्रेशर आहे की स्ट्रेसप्रेशर आहे तेच वाटत चाललाय आणि तू पाळलेल्या आज्ञा ह्या धुप्या अवज्ञा होत्या असं वाटतय माझ्या स्लीम होत चाललेल्या केऑसला तुझा टोन जो मसाज करतच उगवायचा कानात आता कधी एकदा मावळेल अशी प्रतीक्षा टोचवत राहतो आपल्या सिन्ड्रोम्स चघळणाऱ्या संभाषणात
           एवढ कसं भारी झालं आपलं प्रेम ? प्रभारी पोस्ट भूषवायलाच का उगवली होती सोनेरी क्षणांची आभूषणं? की नशिबानं घडवलेली ती इमिटेशन ज्युवेलरी होती ? आजही आपण पुन्हा एकदा संबंधाची प्लेसमेन्ट शोधण्यात फेल गेलोय. वैतागाला गाईड नसते आणि फ्रस्टेशनल एकवीस अपेक्षित प्रश्नसंच आपल्या घरात ही पॉलीटीकल पोस्टर्स आपण का लावतोय ? ट्रॉपिकल समस्याचं टीपीकल समाधान आपण कधीच टॉपिकल केलं नाही अगदी टॉपलेस उभी असतानाही तुझ्या ब्राविषयीच माझं अवधान कधी सुटलं नाही आयुष्याचे स्युडो मॅपस कधीच रोल डाऊन केले नाहीत आपण आणि तरीही फस्टहँड लवलेटरवर ही सेकंडहॅण्ड साईन करत आपण कुणाची समजूत घालतोय ह्या व्हरडिक्ट देणाऱ्या उलाघालीत ?
               मला संगणकाला हात लावण्याची तू दिलेली आज्ञा भयाला प्रोग्राम करत खोलीभर भिरभिरतीये तुझा चोरटा प्रियकर कुठल्या चोरआयकॉनोत लपवलायस पोरी ? तुझ्या वाहतुकीला हॅन्डफ्री ठेवून माझ्या करता मात्र हा लाल सिग्नल का ? सगळी डेस्टीनेशन्स हॉरीबल करत चाललेलं आपलं नातं नेमकं कुणाच्या जीवावर उठलय ?
             तुझा हा अश्रू अश्रू आहे की व्हिजुअल  ड्रॉप ?
             ट्रॅपचा स्वीच ऑन करून कुठं चाललंय तुझ्या लालसेचं वळण ?
             की पुरुष म्हणजे फुकटात मिळालेला नोकर समजून तू त्याच्या सचोटीचा घाम काढतीयेस ?
              तुझ्या संयमाच्या बॅटरीचं लाईफ संपत चाललय का ?
             तणतणून ताणवून ताणवून तणतणाट तणावत तू निघून गेलीयेस नेहमीप्रमाणे  तुझ्या बेडरूमच्या इंटेरियर डेकोरेशनात आणि मी आपल्या घराच्या हॉलो हॉलला स्वालो करत काहीच खाता टीव्ही गिळून गप्प होण्याच्या दिशेनं झोपत चाललोय.

***        

कानाला पापण्या नाहीत त्यामुळे ते झाकून ठेवता येत नाहीत ह्या ध्वनींनी गजबजलेल्या `शब्दाळू जगात तुझ्या आवाजाचा पुणेरी म्युझीक प्लेयर इअर ताठ करतोय तुझ्या उच्चारांचे स्क्रोलींग लिहित हे  तारे सरकतायत फ्लॅशकार्ड्स चमकवत तुझं मॅजिक संपतर आणि मेमरी उतरतीये आसपासच्या वातावरणात माझा कोल्हापुरी रस्सा डायजेस्ट नाही झाला तुझ्या पुणेरी वरणाला आणि श्वासांचा झुणका पिठलं पिठलं होत पाठ दाखवून फ्लश झाला मी पॅशनचा महागुरू कधीच नव्हतो तू बांधलेली फॅशनची आध्यपूजा नवे नवे ट्रेंड निर्माण करत राहिली आणि कपड्यात होणारी अटक चूकवत मी बेलेबल ऑफेन्स करत राहिलो मागील दाराने तुला पुढील दारी निरोप देत
                  आता झंझावाताचे ग्रीन फ्लड लाईट्स अंधाराच्या पॉजवर मान टाकून पडलेत तुझ्या हातातील बोटांचा डान्स नाहीसा झालेला बाराशे रेडिओ स्टेशन्स थम्ब ड्राईववर तुझ्या सावळ्या रंगाचे थम्स अप अनाऊन्स करतायत ज्यूकबॉक्स सेलिब्रेट करणारी तुझ्या ओठावरील वटवट सावित्री गठ्ठपणे गप्प आहे. तुझे पंचेस आठवतायत पण हसू येत नाहीये तुझ्या स्तनांचा कॉपरीक द्वीगोल मातृमुखी झाला नाही म्हणून काय झाल ? रोमान्स करताना प्रत्येकवेळी तो आईचा मदरडान्स कुणाला हवा होता ? मदरबोर्ड जोडत तोडत हाताळत राहिलीस परिस्थितीचा संगणक आणि प्रत्येक विपरीत स्थितीला मला जबाबदार मानत फार सोपे जवाब शोधात राहिलीस अपयशात मिक्स डबल खेळताना फार अंडरस्टँडिंग लागतं पोरी आणि तू तर समोरच्यावर लाईन मारत मारत माझ्यासाठी लढत असल्याचा अभिनय करत. संसार हाताच्या बोटावर ठेवायचा आणि बेस्ट ऑफ लकसाठी हातही चाचपायचा एक हरणारी लढाईच लढत होतो आपण
             आता तू निघून गेलीयेस तर सामना निसटल्याचा अर्धवट फील ! नाणेफेक करताना कॉइन तुझं होतं की माझं  ?  रिकाम्या मैदानावर पसरलीये जीव उदास करणारी संतांची शांतता 
            एक घड्याळ काडकन स्वतःची मान मोडून बंद पडत चाललय आणि काळ तुझ्या चेहऱ्याने बोलणारा तुझा मुखवटा घालून माझ्यावर चालून येतोय 
            आता ह्यापुढे सारे फेक आहे 
            चकाचक आणि चाकूच्या चकमक टोकावर 
***

मुलाकात 
धर्मगुरूशी वार्तालाप 
सत्य आहे की नाही ह्यापेक्षा 
सत्य इंटरेस्टीग आहे की नाही हे फार महत्वाचं झालंय 
सध्याचा जगात तुम्हाला काय वाटतं ?

पण ईश्वराहून अधिक इंटरेस्टींग गोष्ट कुठली आहे ?
एवढे विज्ञान आले, पोस्टमॉडर्स आले पण ईश्वर मनोरंजन 
करतोच आहे  

ह्यामागे काय कारण असावे 

एकतर इश्वर time bound नाही त्यामुळे तो कुठेही तुमचे मनोरंजन करू शकतो दुसरी गोष्ट ईश्वर शेवटी आपणच मनोरंजक बनवतो त्यामुळे जोवर आपण आहोत तोवर ईश्वर मनोरंजक बनवतच राहू 

        हे सर्व Deconstruction of reason झाल्यामुळे होतंय का ? की पोस्टमॉनिस्टाना हे कधीच कळालं नाही की प्रत्यक्षात सत्याच्या आकलनासाठी reason ने स्वतःला जाणीवपूर्वक deconstruct करून सर्व पातळ्यावरच्या सत्याला वेगवेगळ्या हातांनी कवटाळायला सुरवात केली त्यामुळे हे होतय ?
          हे पहा ईश्वरानं स्वतःला deconstruct केलं म्हणून जग अस्तित्वात आले 

          ईश्वराने स्वतःला प्रथम deconstruct केलं आणि त्यातून सैतान तयार झाला असं म्हणायचंय का तुम्हाला ?
तिळवे, तुम्ही खरोखरोखरच हिंदू आहात ना ? कधी कधी आम्हा Christans पेक्षा तुम्ही जास्त चांगलं बोलता हो Christanity विषयी !

पण आपण ईश्वराविषयी  बोलता होतो ना ?

ईश्वराविषयी बोलणं आणि ख्रिश्चनिटी विषयी बोलणं ह्या 
दोन भिन्न गोष्टी आहेत का ?
ठीक आहे बोला 
पण माझा प्रश्न तुम्ही शिताफीने चुकवलात 

मी मूळचा गोव्याचा मी जन्मावा म्हणून माझ्या आईने 
एकाचवेळी, गणपती, विठ्ठल, फादर आणि बराईमामचा 
दर्गा सर्वत्र नवस केला होता. त्यामुळे मी जन्मलो तेव्हा गणपतीपुढे दिवा, चर्चमध्ये मेणबत्ती  आणि दर्ग्यामध्ये ऊद पेटवला गेला 
हे भलतंच इंटरेस्टिंग आहे 
तर आपण ईश्वर इंटरेस्टिंग आहे ह्यावर बोलत होतो हो 
हो  
तर ईश्वराला मुळे नाहीत  कारण ईश्वर सर्वत्र आहे 
म्हणजेच सर्व सरफेस ईश्वरच आहे

प्रश्न ईश्वर कसा आहे  कसा नाही हा नाही प्रश्न ईश्वर माणसाच्या 
आयुष्यात बदल घडवून आणू शकतो का ? हा आहे 
बदल घडलेला तरी  दिसत नाही.  
   
मग आपण ईश्वरावर कश्यासाठी बोलायचं ?
आधीचे बोलत होतो म्हणून
पण त्याने जर फरकच पडणार नसेल तर ... 

आपण ईश्वर मग इतरांच्यावर  बलात्कार करण्यासाठीच वापरतो की काय ?

विचार करा ? ईश्वराच्या नावाने आपण आयुष्यात नेमके काय  करतो ?

बहुतांशी Pornography ही सबमिशनचा संदेश देते बायकांना
मी मुक्त संवाद नसते वास्तविक  sex ही अतिशय सुंदर गोष्ट पण pornography तिला  violent बनवते. धर्माचं असंच काही होतंय का ?

धर्म असं violent व्हायला सांगतच नाही मुळी आणि जेव्हा तो violent व्हायला सांगतो तेव्हा तो धर्म धर्म राहतच नाही मुळी प्रत्येक violent घटना ही मानवजातीला मागे घेऊन जाते. ती सौदंर्याचा नाश करते किंबहुना दहशत ही सौदंर्याची म्हणजे एका अर्थाने ईश्वरानी महानासाडी आहे

तुम्ही पापपुण्य मानता ?

सौदंर्य नष्ट करते ते पाप  सौदंर्य वाढवते ते पुण्य 
इतकं सगळं आहे हे मानव हाच मुळात ईश्वराचा 
सौदंर्यविलास आहे तेव्हा मानवाची हत्या करणे 
म्हणजे ईश्वराची हत्या करणे ईश्वराच्या सौदंर्याची 

* हत्या करणे होय. तुम्ही एक गोष्ट पहा युध्दे माणसाला  मागे न्हेतात. युद्धापूर्वी इराक ही developing कंट्री होती ती आता  थेट गरीब झालीये ह्याला जबाबदार कोण ? भांडवलशाही चांगली की वाईट  हे मला ठरवणे शक्य नाही कारण मी economist नाही पण भांडवलशाही नष्ट होईल ह्या भयापोटी तुम्ही जे काही करताय तो माझ्या concern चा भाग आहे भय तुम्हाला अंतिमतः युद्धखोर बनवतं तेव्हा अमेरिका काय किंवा मुस्लीम जगत काय दोघेही  भयाने ग्रासले  आहेत आणि जोवर हे भय आहे तोवर हे दोन्ही पक्ष ईश्वराचं फारसं भलं करू शकणार नाही. ईश्वर ही  काही आजच्या जगातील समस्यापासून तुम्ही पळ काढावा किंवा तुम्हाला पळ काढता यावा म्हणून बनवण्यात आलेली जागा नाही. आज धर्म हा पळपुट्या लोकांचा रस्ता बनलाय आणि खरा धर्म तर असा नाही खरा जिहाद आजच्या आत्ताच्या आयुष्यातील समस्यापासून पळून जाणे हा नाही तर खरा जिहाद आजच्या समस्या आजच्या आज कुणालाही दाखवता सोडवणे हा आहे ईश्वर इथे आणि आता आहे तो मेल्यानंतर तुम्ही काय केलं ह्याचा हिशेब मांडायला टपलेला कुणी भविष्यातला फडणवीस  नाही. त्याला तुम्ही आत्ता ह्या क्षणी काय करताय ह्यात रस आहे तर आत्ता ह्या क्षणी त्याचे सौदंर्य वाढता

S : तुम्ही खरंच ईश्वर पुन्हा एकदा इंटरेस्टिंग बनवायलाच तुम्ही स्टुडिओत आल्याबद्दल मी श्रीवाहिनीच्या वतिने तुमचे आभार मानतो ! धन्यवाद !
धन्यवाद !

Regular Internet 

I am eating it 
Me : Bite to Bite                                            You: Really 


I have ten mouths 
Me: Mouth to mouth                                    You: Really 

आख्ख रक्त तपासलं 
Me : काळीज   सोडून सगळं आढळलं                You : Oh Fuck 
*************************************************************************************************************

मोबाईला!   मोबाईला !
।। शहाऐंशीवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
माझं नरडं पकडून 

।। सत्यांऐंशीवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
ऑरनमेन्टल पारदर्शकता सर्वत्र  झगमगतीने 
ओवरस्टेटमेंट्स मार्केटिंगली करेक्ट बोलणं 
उथळपणे प्रमोट करतायत 

इनर जिओग्राफी कुणाजवळच 
शिल्लक उरलेली नाहीये 
इतिहास धर्ममातडांच्या भक्ष्यस्थानी पडलाय 

एक एक चिरा 
एकेका पणतीला विकून खातोय 

सर्वांचंच फ्युएल झालाय 
सर्वच चार्जर झालेत 
आणि मोबाईल सर्वकाही चार्जींगला लावून 
गाडीमधून बोलतायत 

।। अठ्ठ्याऐंशीवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
Party Beaten
Party Threaten 
Party Heaten 
Party 'e'aten

Party Total                    Party Portal 


।। एकोणनव्वदावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि मी चिंताग्रस्त 
किती कठीण झालय
युद्धाखालचा बुद्ध खोदून काढणे 


।। नव्वदावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
त्यांना आहे त्यांची बॉडी त्यांचे रक्त 
मला आहेत माझ्या जखमा माझे व्यत्यय 

मी बोलतोय 
मोबाईल बोलतायत 

माझे रिंगटोन विकले जात नाहीयेत 
मोबाईल रिंगटोनासकट रिंगा विकत 

मोबाईल इतरांशी इतरांचं बोलतायत 
आणि मी माझं अंडरलाईन जगणं 
व्हॅलीड करत चाललोय 

।। एक्क्यान्नवा शेवट ।।
सर्वत्र मोबाईल  आहेत 
आणि मी सर्वत्र माझ्या बॉडीचे इमप्रिंट्स काढत 
एकटा चाललोय  
मला माहीत नाही 
ह्या इतक्या साऱ्या मोबाईलांच काय होणारय
मला इतकंच माहित आहे 
जगण्यासाठी मला एक कॉल पुरेसा आहे 

।। ब्यान्नववा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
मला कळत नाहीये 
इतके सारे मोबाईल  ह्या शहरात जमा कधी झाले ?
पहिला मोबाईल घेतला तरी कुणी ?
आणि शंभरावा आणि हजारावा आणि लाखावा आणि .... 

हे शहर इतके बोलबच्चन कधीपासून झाले ?

मी अचंबितपणे प्रश्न विचारतोय 
आणि मोबाईल 
माझ्याकडे लक्ष्य देता 

शहरभर बोलतायत


।। त्र्यान्नववा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

शहर जे म्युझियमसारखं दिसायचं 
अचानक सायफीसारखं दिसायला लागलय

संवादांची सुबत्ता
परात्म करायला आत्मा कुठाय
शरीर - डांगडींग डिकाक्क करत

आर्किओलॉजिस्ट आऊटडेटेड वाटतायत
इतिहासकार कादंबरीकारासारखे दिसायला लागलेत 

सर्वत्र फॅट कॉर्नर वा फ्लॅट कॉर्नर

प्रत्येक जागी कॉर्नर पकडून
मोबाईल बोलतायत

Sexual Lightness Of Being
Muscular ! Spectacular ! Bachelor
In Conversation

।। चौऱ्यान्नवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
सर्वत्र
हात बाजूला काढून ठेवून

हात
जे मार्क्सपासून बनले होते
आणि पीटर ड्रकरने इतिहासजमा केले होते

हात सॉरी मोबाईल बोलतायत

।। पंच्च्यान्नववा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

ते किती रिलेवंट आहे
ते किती कनफ्युजड आहे
माहीत असण्याची कुणालाच गरज वाटत नाहीये
मोबाईल बोलतायत
आणि जो तो
त्याने निवडलेल्या बिलिंग प्लानच्या अक्यूरसीवर
निहायत खुश आहे

।।  शहान्नववा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि अधूनमधून सूचना देतायत
"प्रवास करताना सोबत दोन्ही पाय घ्यावेत "
"फेवीकॉलिक स्कीनपासून दूर रहा "
"smell of Email in female Aha"
"विंचू स्टॅन्ड बाय आहेत त्यांना मेन रोल  देऊ  नये "
"देवळावरून वाद घालू नका  शेवटी देव सर्वांचा आहे
जोवर तो दिसत नाही
ज्यावेळी तो दिसेल
तेव्हा त्याचा म्हणून काही चॉईस असेलच
तेव्हा तो  दिसत नाही तोवर शांतता राखा "
"च्युइंगम दातापुरताच ठेवा "-फरातफार तोंडापुरता "
"निराशा माणूसपणाचा पुरावा आहे "
"खिडकीतून भिंती  पाहू  नयेत "
ह्या  सूचना नेमक्या कुणाला दिल्या जातायत ते मात्र मला
काहीकेल्या कळत नाहीये
आशा आहे की त्या माझ्यासाठी  नाहीत

।। सत्तान्नववा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
And I love it
Decentralized Connected Con figurative Net
From Bombay To Nageshi Bandiwade
Bombay Communicates it to the walltall mallshadows
Bandiwade preserves roots of its anatomy
मोबाईल
फाडफाड फळं फाडतायत

।। अठ्ठ्यान्नववा शेवट।।
मोबाईल बोलतायत

इंडियन कन्फेशन्स गातायत
एकाच बॅण्डवर हजार गाणी - ग्लोबल  ब्रॅण्ड मार्केटबल करत

लोक  सुखी आहेत आणि दुःखीही आहेत
लोक अमेरिकन  आहेत आणि पंजाबीही आहेत

सुखात माहित नसलेले
शेवटात पुनर्जन्म शोधणारे

फुफ्फुसं कोसळतायत स्वतःच्या श्वासात जागतिक प्रवास करता करता
कान लांब होतायत आदळणाऱ्या शब्दात ग्लोबल नेट मिठीत घेता घेता

मी वाट पाहतोय
मला ही कॉल येईल

मोबाईल बोलतायत
हवा प्रत्येकाच्या डोक्यात शिरतीये. प्रत्येकजण खूप बोलतोय
मरेस्तोवर बोलतोय

आणि मी स्वतःला सायलेन्स मोडवर ठेवून
वाट पाहतोय त्या कॉलची
जो मला विश्वात्मक करत माणूस बनवणार आहे.

।। नव्व्यान्नववा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

म्हणजे काय ?
Have you any idea about this airtell talking in Net
Reliancing every prayer about share which is Mediating the Big Orange which is going to Rock ?
Rock ?  Does it mean Bhangda ? or Koli dance ? or
हे पांढरे लोक डान्सला दगडबिगड म्हणतात की काय ? संगीतालाच्यायला !

।। शंभरावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
पण हे तर सर्व हरवले  होते ना ?
आता नव्हते मग  आले कुठून ?
हे नव्हत्याचे होते झाले कुठून ?

हौशे नवशे गौशे
मोबाईल वरून बोलतायत चारहजारशे

तरी बॉम्बस्फोट झालेच
एकवण्याचा शेवटचा प्रयत्न

माणूस ऐकवण्यासाठी इतका डेस्परेट ?
चक्क ह्युमन बोंब ?

Is terrorism lifestyle of those people
Who wants to tell you something which is
Beyond your mobile- culture
Is It So ?

मोबाईल बोलतायत

टेररीस्ट मोबाईलवरून बोलतायत
त्यांना आशा आहे की
कुणीतरी त्यांना टॅप करण्यासाठी का होईना
पण ऐकेल
आणि ते पकडले जाऊन
वाचतील 

मोबाईल बोलतायत
आणि  कुणीही ऐकत  नाहीये

टेररीस्ट शेवट ऐकवण्यासाठी नवे बॉम्ब तयार करतायत 
आणि त्यांचे मोबाईल बोलतायत 
***********************************************************************

कुठे जाण्यासाठी ट्रेन नाही परतण्यासाठी  हक्काचं घर नाही ह्या मीरारोड स्टेशनवर माझं कैद  होईल आयुष्य असं कधी वाटलं होतं ? माझ्या पाठीवर तुझे चावे लिहून तू आता झोपली असशील मांजरझोपेत मोकळ्या लेखणीने झिरो कॅलरी फूडवर विश्वास दाखवणारे डास तुझ्या आसपास उडतायत आणि तू त्यांना तुझ्या रक्ताचे हवालदार बनवून मला क्रिमीनल कोर्टात दाखल केलंयस प्रेम आणि खून दोन्ही तऱ्हेवाईकच असतात ओझोन थराचा मसाज करणारी ऑक्सीजनी बोटं कुणाकडेच नसतात मात्र प्राणवायूचा बॅनर घेऊन हिंडण्यात डोखेही तरबेज
            ज्याला माझी दोस्ती सांभाळता आली नाही त्याला तुझं प्रेम सांभाळता येईल ही तुझी अंधश्रद्धा आहे की माझी नालायकी हे मला कळत नाहीये फलाटांच्या सुनसान चेहऱ्यावर माझी ओळख सांडत मी झोपण्याची बाकडं बदलतोय इंडिकेटर्स ट्रेनच्या वेळा भाजून थकून गेलेत आता एकही ट्रेन उगवणार नाही हा त्यांच्यासाठी आहे पुरषोत्तमी दिलासा माझा मेल केशंट झिरोवर घसरत चाललाय सतत रंगपट्टी देणारे तुझे डोळे आता खुनी आणि फॉर्मल  होत चाललेत. माझ्या पोटातील भूक फायबर मागतीये व्हिटॅमिन्सना स्टिम्युलेट करणारी तिची स्टाईल आताशा मालन्युट्रीशन्सना सरावलीये ही रात्र एक ऑडिशनल कोपरखळी ऑथरॉईज्ड स्टॉल्स बंद होतायत विनंती करूनही  खाणे नाकारणारी त्यांची वृत्ती शेवटी त्यांनाही झोपायचय  मी दुसऱ्यांदा विनंती करण्याइतपत दुबळा नाहीये भुकेला पॅम्पर करणारे पालक सुदैवाने माझ्याजवळ नव्हते.
             पैसे नसणाऱ्या  मेल स्टेशनवर फिमेल ट्रेनस सहसा थांबत नाहीत. तू आलीस हेच खूप. तुझी लो सेल्फ एस्टीम शक्य तेवढी मी उंचावतीय आणि तू तुझ्या मॉनिटरी उंचीनं मला खुजा दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीयेस. तुझे हॉर्मोन्स ओळखण्याची कला मी आत्मसात करतोय पण जनेटीक विषाचं काय करायचं हे मला  समजत नाही. तुझ्या वाईट वेळा विटेवर उभ्या राहून मी सोसतोय खूप डॅमेज झालय आपलं नातं मला ते दुरुस्त करता येणार नाहीये ह्याची कल्पना आहे फक्त तुला निरोप देताना तुझा गिल्ट कमी करता माझ्याविषयी कदाचित आकर्षण  नव्हतं तुला फक्त माझ्या बॉडीतील डायमंडचे  तुकडे गोळा करायचे होते किंमत चुकवता पण पोरी असं एकतर्फी पॅकेज कुठं अवेलेबल असतं दोन लेवलहेडेड माणसांत
             आपलं खरं  दुःख हे आहे की आपल्या नात्यात आता कमबॅकची  शक्यता ताटकळत नाहीये आपला भूतकाळ तर चक्क कार्टून फिल्मसारखा सपाट दिसायला लागलाय आपण आवाज बदलून तेच तेच व्हाईस ओवर देतोय त्यातल्या सीन्सना आपल्या कानात एकमेकाचा कुठलाच अल्बम बूम होत नाहीये
             हा कंटाळा नाही की आपण लावलेला  टाळाही नाहीये हे काय आहे कळत नाहीये आणि त्याचा निषेध म्हणून आपण उचलली जीभ लावली टाळ्याला करतोय. आपण करवादून करकचून नातं मारायचा प्रयत्न करतोय आणि ते मरत नाहीये मतिमंद मुलासारखं ते फक्त आसपास वावरतय.
             आता हा नात्याचा थकलेला देह घेऊन मी कुठल्या झोपेत शिरावं ? पेजरचा व्हायब्रेटर मोड ऑक्सिजन मागतोय आणि मी श्वास बंद करून काळजातल्या काळजात आठवतोय तुझा पहिला  गंध जो प्रथम दर्शनी तुझा हात पाहताना माझ्यात फ्लॅश झाला होता. हायड्रोजन सल्फाईडच्या तावडीत सापडलेला चाफा ! शेवटचे श्वास मोडणारा !
              माझ्याजवळ स्पेक्रोस्कोप नाही फक्त एक  फायरमुवमेंट आहे. आकाशात ढग जळतायत आणि मी तुझ्या वासाच्या पावसाळ्यात भिजत आलेल्या ट्रेनमध्ये चढतोय मला झोपेचे अंतिम स्टेशन माहित नाहीये आणि मी माझे पाय सलीपर्स मध्ये डुबवत घरातून निघताना आपटलेल्या  दाराचा मागोवा घेत चाललोय त्याच्या त्यावेळी झालेल्या गंधहिन आवाजात.
***

असा कंटाळवाणा हुंदका नको देऊस ही शरीराची मल्टी फ्रेनिक  भाकरी एवढ्या लवकर शिळी होईल असं  मला तरी कुठं वाटलं होतं ? वाढदिवसाची बोटं चढवलेल्या कँडल्स वाढदिवसादिव हशीच आखडून आखडून विझल्या केक डिसिनट्रीग्रेट होत नाहीसा झाला आणि हवेत मुलायम चवीचा पसरला पोलिटिकल मुलायम यादव आता  हृदयात उरलीये कन्फ्युज्ड एनर्जी आई ज्या जागी मी जायंट लिप्स घेतल्या तुझ्या शरीरातून त्या जागेची क्लायंट म्हणून उरलेली भागीदारीतील अपरिहार्य गरज
               मी लिव्हरमधून प्रेम केलं तुझ्या स्वच्छतेवर आणि टापटीपीवर. एवढ्या टापटीपीची बाई आपलं टिपटॉप शरीर कसं ठेवत असेल ह्याची एक्सपेन्सीव उत्सुकता आणि तुझ्या शारीरिक इन्फ्रास्ट्रुक्चर विषयी कोइन्सीडन्टली जागी झालेली जिज्ञासा तू प्रितिकाराच्या चेअरमध्ये बसूनही तुझी चेअरवूमनशीप का वापरली नाहीस ? की तू आधीपासूनच वाट पहात होतीस खुर्ची मोडण्याची.
                   अनॅलेसीस डिस्ट्रिब्युट करून निघून जातायत रिअक्शनरी क्षण थकवा फ्युजन एनर्जी  गोळा करतोय पण त्याचा मरगळलेला हात गळू देतोय वाळू संभोगात रिपीट टेलिकास्ट आणणारे शो मला अमान्य आहेत जिवंतपणाच्या झऱ्यांची एकमेकात तुलना करणारा कॅम्परेटीव स्टडी मी फाट्यावर मारतो मला प्रत्येक पळ हवा असतो सळसळीत आणि झळझळीत दुर्दैवाने तुझ्या अदा आता फक्त उझळनी करतायत होऊन  गेलेल्या धड्यांची तुझ्या भाषेत इतिहास वारंवार डोकावतोय तुझ्या भौतिकतेचा अँटेना तेच तेच सिग्नल्स पाठवतोय ही शिळी शांतता ब्रेक थ्रू साठी आचवलेली आणि ह्या प्लॅटमध्ये चिमन्याही शिळी कोरिओग्राफी सादर करतायत उडण्याची विद्या विसरून
                 प्रत्येक फ्रेश ब्रेड स्माईल कापल्या की बुरशीत लडवडलेल्या दिसतो तुझा फ्रीज चुकीची फिल्डींग लावतोय आणि बर्फ सेन्सरी सेल्समधल्या साउंडसना डिटेक्टच करत नाहीये. आवाजातून मूड ओळखणारी कला आपल्या श्रवणकलेतून नामशेष होत चाललीये का ?  
*******************************************************