Saturday, June 9, 2018

श्रीवाहिनी हे फेसबुकवर सादर केलेले महाकाव्य संपले सोमवार ते रविवार अश्या सात दिवसातील घडामोडी न्यूज चॅनेल प्रमाणे सादर करत २० थिम्स हाताळणे असे त्याचे स्वरूप झाले होते हे ठरवून झाले न्हवते तर लिहिता लिहिता झाले होते एखादा लेखक एखाद्या संस्कृतीला पेलत नाही किंवा त्या संस्कृतीतील साहित्याचे ठेकेदार तो पेलू देत नाही म्हणून त्या लेखकाने थांबून चालत नाही त्याने आपले काम नीट करणे गरजेचे असते मराठीत दोन्ही बाजुंनी गोंधळ असतो स्वतःला कलावादी , संरचनावादी वा सहिंतावादी म्हणवणारे समीक्षक लेखकही केवळ निखळ संहिता वाचून मत बनवत नाहीत तर स्वतःचे हितसंबंध बघून मत बनवतात तर सामाजिक बांधिलकी मानणारे लेखक समीक्षक युरोपियन प्रबोधनाने स्पॉन्सर केलेल्या विचारप्रणालीत अद्यापही रांगत आणि रंगत असतात ह्यांच्या वैचारिक बाललीला ह्या प्रचंड बोर करतात अशावेळी चौथ्या नवतेला मिळणारा अल्प प्रतिसाद हा गृहीत धरावा लागतो . ज्या मोजक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचे आभार

ह्या महाकाव्यातील मुख्य  थिम्स पुढीलप्रमाणे होत्या

१ बातम्या देण्यापुर्वीची मानसिक हालचाल आरंभ
२ फेक न्यूज ,बाबरी मशीद, जाहीर रित्या घेतलेल्या चुंबनाचा वाद , ज्योतिषशास्त्र , बाबालोक व अनुयायी , लेखन आणि अभिनय व पोस्टमॉडर्निझम  या विषयावरील सात दिवसाच्या बातम्या
३ फॅशन आणि किचन
४ कॉलेज जगत आणि तरुणाईचे स्वगत
५ रुईया कॉलेजमधील रोमान्स
६ जे एस हॉल मधील रोमान्स
७ मीरारोड दहिसरमधील लिव्ह इन रिलेशनशिपमधील रोमान्स
८ स्पोर्ट्स
९ वर्किंग प्लेस
१० चौथी नवता
११ कविता आणि सॉंग्ज
१२ मार्क्सवादी व परिवर्तनवादी कार्यकर्त्याची सात स्वगते इंटिमेट इंटीलिजन्स
१३ मुंबईत चाललेली मोबाइलवरची संभाषणे आणि त्यांचा येणारा मोबाईला फील
१४इंटरनेट चॅटिंग
१५मुलाकात INTERVIEW
१६प्रार्थना
१७सिनेमा
१८स्वतःलाच फेस TO फेस करणे
१९मृत्युशय्येवरून सात स्वगते
२० थोडं अध्यात्मिक

ह्या थिम्स सात दिवसांच्या सातत्यात वावरत्या ठेवून १९९२ ते २००७ ह्या दरम्यानची मुंबई जालनगरी व तिच्यातील नागरी जीवन  पेलणे असे ह्या महाकाव्याचे स्वरूप होते असे आता दिसते ह्या संग्रहानंतर  २००७ नंतर माझे अनुभवविश्व पूर्ण बदलले आणि त्यातून थोड्या वेगळ्या कविता जन्मल्या ज्यांना मी नेट सिरीज मध्ये टाकले आहे.

माझा स्वतःचा आणि माझ्या साधनेचा भूतकाळ हा माझ्या लिखाणात विखुरला गेलेला असा अचानक पाहावा लागतो आणि हे मजेशीर असते माझे मित्र माझ्या ह्या कविता ज्या नेटाने टाईप करून वा संकलित करून इथे टाकतायत ते तारीफके काबील ! हे लोक नसते तर माझ्या ह्या कविता इतक्या सातत्याने फेसबुकवर दिसल्या नसत्या . ते मला गुरु मानत असले तरी मी त्यांना मित्र मानतो कारण माझा गुरु वैग्रे भानगडीवर विश्वास नाही . सुदैवाने ते भक्त नाहीत अन्यथा त्यांच्यापासूनही दूर जावे लागले असते . त्यांचे आभार !

अलीकडे मी फार कमी कविता लिहितोय कारण कवितेचा फ्लो थांबलाय क्वचित एखादेवेळी झिरपणी झिरपते . एकेकाळी आपण इतक्या भरभरून कविता लिहीत होतो हेच आता आश्चर्यकारक वाटते आणि साधकाचा टोकाचा एकांत तर त्याला जबाबदार नसावा ना असा प्रश्न पडतो . असो सर्वांचे पुन्हा आभार !

श्रीधर तिळवे नाईक 

Thursday, March 15, 2018


बांधकाम चालू आहे शेवटचा भाग 
श्रीधर तिळवे 
 तुझ्या भक्तांनी 
  तुझ्या नावाची एक वीट भिरकावून 
  मला कोर्टात  उभं केलंय 
  
  मी कर कटीवर ठेवून 
  कोर्टात  उभा 

 गांडीला पाय लावून 
 मी पळून जाणार नाही 
 मी माझ्या लाथेने 
आख्खी मराठी संस्कृति उडवून लावणार आहे 

 संताना  फुटबॉल येत नव्हता 
 आणि मी तर खानदानी फुटबॉल प्लेअर 

 विठ्ठला 
 भेटणारच असशील तर 
 सॉकरच्या  पावलांनी दारात ये 

 मी वीट फेकणार नाही 
 फुटबॉल फेकेन 
 आणि फुटबॉल म्हणजे 
 चालती पळती वीज 

 ये 
 कडाडून ये 

 एकमेकात खेळू एकमेकांशी खेळू 
 आणि विटेत अडकलेल्यांना 
 पळायला लावू 


 भक्तात अडकलेले देवा 
 जस्ट कीक 

 *******
घराच्या चार कोपऱ्यात आम्ही बसलोय 

पहिला नशेत आहे
त्याला सर्वत्र देव दिसतोय 

दुसरा ज्याला देव दिसतोय 
त्याला पाहतोय 
त्याला माहित आहे ही केवळ भक्तीची नशा आहे 

तिसरा मेडिटेशन करतोय 
त्याला वाटतंय कि फक्त मेडिटेशनच नशा उतरवू शकतं 

चौथा कविता लिहितोय 
आणि पाचवा चौघांना पाहतोय 

हे घर प्रसिद्धीची प्रार्थना करत नाही 
ही ह्या घराची जमेची बाजू आहे 

पहिल्याच्या डोळ्यात आता जंगलं दारू पितायत 

तिसऱ्याचं मेडिटेशन फरश्या पकडतंय 

दुसरा माणसाला निवारा लागतो 
तसा देवालाही लागतो का असा स्वतःलाच प्रश्न विचारतोय 

चौथा शब्दांची नखं काढतोय 
भाषेचा नकाशा मिळवण्याची ही प्राचीन रीत आहे 
अशी त्याची 
अंधश्रद्धा आहे 

पाचवा आकाशाचा टॉवेल गुंडाळून 
अंघोळीला चाललाय 

ज्ञ सोबतची शांतता स्पेशल चहासारखी असते 
कडक आणि गोड 

सूर्यप्रकाश काहीतरी डिस्टर्ब् झाल्यासारखा फकफकतोय 

तिच्या हाताचा नाजूकपणा पूर्वीसारखा निर्लज्ज होत नाहीये 
उलट बांगड्यांची किणकिण सावधानत तरंगतीये 

ह्या घराचा पाया भिंती छप्पर सर्वकाही भाड्यानं घेतलेलं आहे 

पहिला डोळ्यातून निघणाऱ्या गांडूळांना पहात बसलाय 

पाचवा कुंपणावर बसून सरड्यांची आंघोळ करतोय 

तिसरा दवबिंदूतला समुद्र शब्दाच्या ढगात बांधण्याची तयारी करतोय 

ज्ञच्या गळ्यातील बागा गुलाबाचं रॅपसॉन्ग गावं कि चाफ्याचं मौन पत्करावं 
ह्याचा विचार करतायत 

एक अनएंडींग गारठा फरशीवर पसरलाय 

हिवाळा डोअरबेल वाजवावी कि नाही म्हणून दाराबाहेर संभ्रमात 

चौथा पहिल्याला विचारतोय 
जे झालं ते व्हायला हवं होतं का ?

ज्ञ कर्टन टाकतीये कि लावतीये ?

माझं स्वातंत्र्य पुन्हा अस्तित्वात येतं आहे का 
कि ही नव्या हकालपट्टीची सुरवात आहे ?

हा ज्ञानोत्सर्ग कि रागस्फोट ?

ज्ञचं सौंदर्य अलीकडे जांभया द्यायला शिकलय 

खालच्या भाडेकरूंचे आवाज भांडण विणतायत 

पहिल्याचे ढग पाऊस पाडण्याऐवजी सावल्या पाडतायत 

तिसरा मेरू पर्वत गिळत श्वास घेतोय 

मुंबईतल्या सगळ्याच बिल्डिंगा हिमालयाकडे उडत गेल्या तर 

पुरुष बर्फासारखा असतो स्त्री पाण्यासारखी असते 
ईश्वर समुद्रासारखा  असतो वासना वाफेसारखी असते 
आयुष्य नदीसारखं असतं आणि संस्कृती प्रदूषणासारखी असते 

पहिला झाडं मोजतोय 
जणू झाडं मोजल्यानं जन्गल ताब्यात येणार आहे 

वीज तर कोसळली 
पण राख काय झालंय ते पाचही जणांना  कळत नाहीये 

सहाहीजण एकमेकाच्या नजरा चुकवत टीव्ही पाहतायत 










+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

घरमालक भाभीसाठी एक कविता 

" प्रॉपर्टी है तो आदमी आदमी हैं 

प्रॉपर्टी बिना आदमी जानवर हैं भाईजान 
ये फकिरीवकीरी छोडो 
और बम्बईमे पयले घर खरीद लो "

भाड्यासाठी घर मागायला गेलो कि ऐकू येणारा टिपिकल डायलॉग 

इस्लामिक चेहऱ्यावर 
मुसलमानांना संन्यास मान्य नसतो त्यामुळे ऐकू येणारा 
मी ऐकण्याच्या मनःस्थितीत 
आणि अनपेक्षित 

" फकिरा आदमी काय का लाडकी साथम तो घरगृहस्थी हाथमे "


मिडिएटर : हिंदू भाडा चलेगा ना 


चलेगा 


आपको मुस्लिम घर चलेगा ना ?आप बोले तो जांगीड में भी देख सकता हूँ 


मी आणि ज्ञ मरणघाईत हो म्हणतोय 

आणि तुझ्या चेहऱ्यावर संतोष आशुतोष पारितोष 

तोषोनि मज द्यावे घर दान हे 


आणि मग खळांची व्यकंटी सांडत आलेली केस 


मी मुस्लिम घरात राहतोय म्हणून मुसलमानच असणार 

म्हणून केसची वाढलेली इंटेन्सिटी 
"  श्रीधर भाई लढते रहो मैं घर छोडनेको नहीं बोलूंगी  खुदाकसम  "

एका वाक्यात महाकाव्य 

पूर्णविरामात श्वास जिद्द आणि ठामपणाची आग 

"ह्या घरात सुख दुःखाची अनेक पार्सल्स आली 

पण आमच्या संसाराचा टीनएज चेहरा कधी ढळला नाही 

कधी मॅच्युरिटीचे धबधबे एका तिलीपुढे  वाफ होऊन गेले 

तर कधी एका चांदणीने आकाशगंगेचा क्लायमेक्स दाखवला 
म्हणून हे घर मी विकत नाही भाईजान "

खरंतर हे घर विकावे असे प्रसंग तुझ्या दारात हत्ती झुलवतायत 

त्यांच्या डोकयात दारू आहे 
आणि तुला पायी द्यायला ते आतुर आहेत 
पण तू त्यांच्यापुढे स्तब्ध आणि ठाम 

आणि आता खळांची व्यंकटी सांडत माझ्या केसचा  हत्ती तुझ्या दारापुढे 

आणि तू मुक्ताबाईसारखी स्तब्ध 

धुक्यावर फोकस ठेवणं सोपं नसतं 

विशेषतः आयुष्याची कम्फर्टेबल गती वियर्ड झाल्यावर 

माझी फॅमिली साईट काळीठिक्कर पडलीये 

आणि तुझा गौर चेहरा तिची एकमेव आशा आहे 

वारा फ़ाटलाय 

आणि श्वास घराला डॉलसारखे उचलतायत 
ठेवतायत 

माझ्या काळजाचा बर्फ झालाय 

आणि तो मेणबत्तीसारखा जळत रक्ताचं मेण कमी करतोय 

घरातील भांडी  रोज भयानं काठोकाठ भरतायत 

आणि तुला वाटतंय कि मी मराठीचा मिर्झा गालीब आहे 

" भाईजान तो शायर हैं और उनकी बिविभी 

शायरीकाही कूच लफडा हुआ 
ये हिंदू लोग शायरको जीने नही  देते  "

" मुसलमान कौंसे देते हैं शायरी तक्लीफ देती हैं भाडा देता हैं ना बराबर "


तुझा अडोसपडोस संवाद 


एक तारखेला यायचं 

भाडं घेऊन जायचं 

ह्या केसनं तुझ्या घरात एक विहीर खणून ठेवलीये 

आणि मी आणि ज्ञ त्यात पडलोय 

माणसाला झोपायला एक ड्राय स्पॉट लागतो 

म्हणून तर हे घर 

" चार लोगोने फिल्डिंग लागाया तब ये घर बना "


विहिर बुजावी म्हणून तू रोज एक पर्वत विहिरीत टाकतीयेस 

मी त्यांची उशी करून झोपी जावं का ?

" आपकी बीवी किसी औरके प्यारमे गिरफ्तार 

शायर होके आप इतने अंधे कैसे "

" शायर हूँ इसीलिये अंधा हूँ भाभी 

इश्क हैं आज यहाँ कल वहाँ"

"आपकी बाते मेरी समझमे नही आती 

या तो आप उल्लू हो या सुफी हो "

तुझं घराचं घरगृहस्थीचं वास्तुशास्त्र पक्कं आहे 

आणि त्यात माझं फकिरीपण बसत नाहीये 

माणसांचं जग म्हणजे घरांची उपस्थिती 

आणि त्यातील पाहुण्यांचा उगम रहिवास आणि लय 

लोकांना आधीचे पाहुणे सतावतात 

म्हणून भूतं जन्म घेतात 
ही केस म्हणजेही भूत आहे 
एका पाहुण्याचं 

माझ्या घराचं पाणी तोडण्यात आलंय 

नद्या नळात आल्या कि पाणी तोडणं बंद होईल असं मला वाटलं होतं 
पण झालंय उलटं 

वजनशून्य दहशतीचा चेहरा पाण्याच्या अभावामुळे 

पुन्हा वजनदार झालाय 

दहशतीला शक्य असतं 

तर तिने समुद्र लॉक केला असता 

प्रकाशाच्या घड्या घालत फिरणारी ज्ञची हालचाल 

पाण्याअभावी कोळसा झालीये 

" मला पाणी हवंय "


गळ्यात कोरड उगवतीये मावळतीये 


माझी गदर पार्टी काहीच गॅदर करत नाहीये 


लोकांना घेऊन येते ती लोकल 

लोकांना गोळा करते ते लोकल 

हे लोकल लोकल पॉलिटिक्स आहे 


दहशतीत रोल निभावू इच्छिणारे 


आमच्याही स्थानिक शाखेने 

कवीला घाबरवण्यात 
योग्य तो वाटा उचलला 
हे सिद्ध करण्यासाठी चाललेलं 

आमच्या सर्वत्र शाखा आहेत


मराठीची मूळं नेमकी कशात शोधायची
सह्याद्रीत कि शाखांत ?

हवेचा सेपिया टोन माझे केस विंचरतोय 

कुठला डोअर क्लिक केला कि पाण्याची खिडकी उघडेल ?

"  भाईजान मुझपे प्रेशर डाला जा रहा हैं
आपको निकालनेकेलीये  "

तुझ्या आवाजात खरखर

"घराची बॉर्डर कापसापासून बनलेली असते
म्हणून तिच्यावर जास्त विसंबून राहू नको
आमच्या भक्तिवेदांत मध्ये ये आणि राहा "

माझा भक्तिवेदांती संन्यासी मित्र मला सल्ला देतोय
त्याला मी वैष्णव बनावं असं मनापासून वाटतं

मी कायमच हिरो पब्लिसिटी  टाळून
झिरो पब्लिसिटी चेहऱ्यावर मिरवली
आणि आता मीडियाकडे जाण्याचे उपाय चालून येतायत

" अरे ह्यांना कुणीतरी सांगा
मला फक्त पाणी हवंय "

माझी नजरेची वायर पाणी नसल्याने
मलूल झालीये

अनंताचा दरवाजा उघडत नसतो
सगळे दरवाजे कोसळतात
तेव्हा अनंत सर्वत्र असते

ते सर्वत्र आहे तर पाणी का धाडत नाही


" सब्र करो  भाईजान
अल्लाह आपके सब्रका इमतेहान ले रहा हैं "

" टेररीजम अल्लाहका इंम्तेहान हैं ? भाभी प पागल हो क्या "

ऑफिसर्स पाण्याचा क्ल्यू देत नाहीयेत

सापांचा ऑर्केस्ट्रा रोज एक नवी थेरी मांडतोय
शेजारधर्म पाळणाऱ्या गायी मला डिच करून निघून गेलेत
ज्ञचे मळलेले मफलर गॅम्बलर बनतायत

खेपा घालून घालून तिचे शब्द शिणलेत

ह्या मीरा रोडमधल्या सर्व बिल्डिंगा गुलामांनी बांधलेत काय ?

अख्खे शहर मी बॉटम अप करून पिऊन टाकावे काय 


तहानलेल्या माणसाला सर्वत्र फक्त पाणी दिसतं 


हातभर लाइफला गळाभर तहान 

एक तांब्या दान कुणी करेल का ?

काळजाचा ग्रॅनाईट बनलाय चीख 

नळाची टिकटिक कुणी ऐकवेल का ?

असे वाटे नदी  झाली  रिटायर 

माझ्या आतील फायर ती विझवेल  का ?

वॉटर कम्पॅनियन रद्दीत झाला जमा 

पाय तम्मा तम्मा करून दमले का ?

ज्ञ पाण्याअभावी भूत झालीये 

आणि पंचमहाभूतांना तिने पाठवलेला लिफाफा
रॉंग ऍड्रेस म्हणून परत आलाय

चिखलांना पंख फुटण्याएव्हढेही पाणी शिल्लक नाही

पाण्याचे आभास झोपेत तरंगतायत
आणि स्वप्नात नद्या रिझ्युम होतायत

पाण्याच्या मीटरच्या चाव्या कुणी चोरल्या ?

" भाईजान कही ऐसा तो नहीं कि आपके बीवीके यारने
ये सब किया हो ऊसपे इम्प्रेशन जमानेकेलिये
बादमे चाबी देगा
और ताला खोलेगा ?"

मी हे ऐकतोय
मी हे ऐकलं पाहिजे

बायको सांभाळता न आलेला मनुष्य

माझ्या अश्रूंच्यात डिमर फ्लिकरतोय
हे बरंच आहे कि अजून डोळ्यात पाणी शिल्लक आहे

नजर अंधेरी स्टेशनवर जाते
परतते

माझी सगळ्या बाजूनं ठासली गेलीये
आणि मी निराशेच्या कड्यावरून आत्महत्या करावी
असा आग्रह सार्वत्रिक आहे

मी आंब्याची झाडं मागतोय
आणि आयुष्य गवत डिपॉझिट करून
निघून चाललंय

लोकल्स मला चिरडायला तयार आहेत
त्यांनी तसा मेसेज मला कितीदातरी पाठवलाय

मेंदूत गेलेली केसची बुलेट
काळजात शिरलेला प्रेयसीच्या व्यभिचाराचा बाण
पाठीत घुसलेला मित्राचा सुरा
पायात घुसवलेली दहशितीची पायपीट
हातांवर रेंगाळणारी चणचणीची बोटं
आणि रक्तात पसरलेले कवितेचे विष

मी अस्ताला कधीच घाबरलो नाही
फक्त तो अस्त मोक्षात व्हावा
म्हणून प्राणांतिक धडपड करत राहिलो

पाणी येईलच
जाणार कुठं ?

पाणी चिल्लर आहे
ढग नोट आहे
पावसाळा ती सुट्टी करतो
आणि पाऊस पडतो

माणूस ते पाणी ताब्यात ठेवतो
आणि मग पाण्याच्या जीवावर
इतर माणसांशी खेळतो

खेळणारा कोण आहे ?

तू परेशान आहेस
मी परेशान आहे
ज्ञ परेशान आहे

जो जो खेळाडू वाटतोय
मी त्याच्याशी बोलतोय

तू  आकांतून बोलीतीयेस
" उसके बीवीका क्या दोष
उसने शायरी लिख्खी हैं क्या
बददुआ मत लो उसकी "

बददुआ , हाय , शाप
हे भारतात कधीकधी शार्प शूटरसारखं काम करतात

तुझी गोळी बरोबर लागलीये

एक माणूस दारात आलाय

" श्रीधर भाई आपको घर छोडना होगा
वैसेभी आपका क्या बचा हैं
जो मर्द  बचाना चाहता हैं
वही लूट चूका हैं आपका
कमसे कम बीवीको तो चैनसे जीने दो  "

मी स्तब्ध

सत्यापासून पळून जाणे माझ्या स्वभावात नाही

तो म्हणतोय ते खरं आहे

प्रार्थनेने भिरकावलेला दगड माझ्या डोळ्यावर आदळलाय
पण तो नेमका कुणाचा मला कळत नाहीये

तू बुरखा घालून निघून चाल्लीयेस

मी ओरडतोय
"   भाभीजी शुक्रिया  "

तू बुरखा काढून हसतीयेस
त्याच डोळ्यांनी
जे मला कायमच सांगत आलेत

"  प्रॉपर्टी है तो आदमी आदमी हैं 
प्रॉपर्टी बिना आदमी जानवर हैं भाईजान 
ये फकिरीवकीरी छोडो 
और बम्बईमे पयले घर खरीद लो   "

मी स्माईल देतोय
जे सांगतंय
" फकिरको फकीरही रहने दो   "

तुझी पाठ हे तुझं  शेवटचे दर्शन होतं


*****************************************************************************



















" "



  रहस्य 

  पश्चाताप नाही 
 आणि चूकही नाही 

  जे होतंय ते मी आपल्या आत दुरुस्तही करतोय 
  ह्या कविता दुरुस्तीही आहेत 
 आणि माझी तंदुरीस्तीही 

 ********


  कारण 
  
  समजुदारपणाची अपेक्षा नाहीये 
  
  घड्याळानेच काळ फोडला 
  आणि मोडका क्षण 
  तुझ्या काळजात सोडला 

  लांबणीवर टाकलेला नात्यांचा केऑस 
  गारुड आहे कि गरुड 

  भूतकाळाला  एक्सपायरी डेट नसतेच 
  त्यामुळे हा क्षण परत परत परतणार 
  आणि आयुष्याच्या सिनेमात इंटरवल करत राहणार 

  पूर्वग्रहांची वीज रक्तातच खेळतीये तुझ्या 
  लाल पेशींचा अनुवाद श्वेत पेशी असतो का ?
  
  पाऊस पडला 
  आणि निमोनिया झाला प्रेमाला 
  
  आपण दुसऱ्याच्या आयुष्यात अस्तित्वात नाही 
  हाच तर प्रेमभंगाचा पुरावा नव्हे ?
  
  टेहेळणी चालूच आहे तुझी 
  आणि मी नेमके तुला हवे असलेले शॉट देत 
  तुला हवा असलेला सिनेमा देतोय 
  
  खिडक्या सापेक्ष असतात तशी घरेही 

  तुझा आवाज फिका पडतोय 
  आणि किक मारतोय 

  कर्कशता हा आपला क्रायसीस आहे 
  तू स्वतःला पॅक करतीयेस कि पार्क करतीयेस ?
  
  मला दाराशी कोसळायचं नाहीये 
  म्हणून मी घर सोडून चाललोय 
  
    ******* 



  **** पुंढचे मागचे 
  

  पुढचे काही दिसत नाही 
  मागचे काही पाहावत नाही  
  
  ही केस म्हणजे पाण्याची सावली होती 
  कि आगीची बाहुली

  बासऱ्यांनी ड्रम वाजवले  हवा ताणवून 
  तबल्याने जलतरंग पिघळवले काचा बाणवून 

  माझ्यातील आध्यात्मिक मूलद्रव्य थोड्या थोड्या कणांनी हलके होतंय 
  तू बोट  चाटुन पळून चाललीयेस आजच्या ताज्या व्यभिचारात 
  तुझे पाय/ पलायनाच्या हिप्नॉटिझममध्ये 
  गोते खात फ्लॅश करतायत 
  झोपेचा कॅमेरा 
  फोटोजनीक सक्ससमधल्या सेक्सच्या कॉपी काढत 

  शांतीनगर 
  पारदर्शक दंगलबाजीतील दुःखाचे सल्फर बनवून 
  मला अर्पण करतय सफरिंगचे धडे 
  
  डेलिकेट चंद्राचे ऑफिशीअल अवर्स  - दहशतवादी 

   किरणांचे करंन्ट इवेंट लिहितायत कन्टी कन्टी  अमावस्या 
   एकांतातील लढ्याचा  फोकस मचूळ होऊन पडतोय - आकांतात 
   
   मला लोकांतात कन्फेशन देऊन 
   नॉइज वाढवायचा नाहीये 

  फक्त कविता लिहून 
  पुन्हा जन्मायचंय ह्या सडलेल्या रक्ताच्या गर्भाशयातून 

  मी उभा आहे ओरिजनल साऊंड ट्रॅकमध्ये 
  पुढे मरणाचे ब्लॅक होल 
  आणि मागून शब्दांनी 
  गांडीवर मारलेली शेवटची किक 
  
  वरती काय आहे माहीत नाही 
  खालती काय आहे दिसत नाही 

  मी कोसळत कोसळत स्वतःला जन्म देतोय 
  किंवा हे ब्लॅक होल त्याचा शेवटचा स्पेल 
  मला आऊट करण्यासाठी खर्च करतय 
  
  अलविदा दोस्त 
  अलविदा विठ्ठला 

  फक्त कोसळल्यानंतर 
  यदाकदाचित दोन पायावर उभा राहिलो 
  तर खाली तुझी वीट असू नये 
  एवढी विनंती 

  ******   

बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे  नाईक 

प्रश्न 
संदर्भ काय ? स्पष्टीकरण काय ?
आता काय आपण निबंध लिहायचा ह्या केसवर 
एकमेकाच्या त्वचेवर ?

तुझं काळीज शिफ्ट होतंय 
हे काय मला कळत नाहीये ?

इफेक्टिवली बोल स्लो बोल वा कर्कश बोल 
रिलेशनशिपला घोडा लागलाय 
हे  कळायला 
ती गाढव विरामचिन्हे हवीत कशाला ?

क्रोकरी फोडून घराची कॉपी थोडीच सुधारणारय ?

तुझी जीभ तू घरभर पसरून ठेवलीयेस 
आत्ता मी काढता  पाय घेऊ 
कि छताला लटकू ?
***

खाणे  
आपले घर उडते 
कधीपासून  सरपटायला लागले ?

मला दहशतीचे गँगरीन झालंय 
पण  मी अजूनही चालतोच आहे 

चाव्यांच्या स्फोट होऊन 
कुलुपे तुटतायत 
पण तुझा चेहरा 
मला अडकवून  आहे 

तू म्हणजे विकतच्या दुःखांचे बॅड कलेक्शन आहेस 

माझी डरकाळी वाढतीये 
आणि तू माझा चट्टामट्टा करून 
त्या डरकाळीत ढेकर देतीयेस 
***

ज्याने केस टाकली त्याच्यासाठी एक कविता 
ही माहिती मला एग्झोस्ट करण्याचा कट आखतीये 
आणि मी माहितीच्या ढुंगणावर लाथ मारून 
तिला हवी तशी पळवतोय 

मी आध्यात्मिक अबाधित 
कायम शून्यवत 
माहिती भरायला हरदम तय्यार 

लोकांना वाटतं कि मी पुराणकाळातला हिरो म्हणून जगतोय 
मला माहिती आहे कि 
मी सर्व पुराण्या  काळावर हगतोय 

अमक्या तमक्या एन्ड ना मी कधीच भीक घातली नाही 
मी आयुष्य फ्रेशर  म्हणूनच जगलो 

तुम्ही केस टाकली 
आणि मी पुन्हा एकदा फ्रेश झालो 

महेश लोहार धन्यवाद 
तुझ्या हस्तक्षेपाने माझी बोटे वाढली
***

१९९६
मी तिकडे पोलीस कारवाईत 
तुझा्या इकडे मित्राबरोबर रोमान्स 
हा डान्स आहे कि ट्रान्स ......कि स्टान्स ?

क्षितिज विस्तारले कि घटले ?
मी लक्ष्य होतो कि भक्ष्य ?

फ्रिक्वेन्सीचे स्पेलिंग चुकलय 
आणि आपण वेवलेन्थ जुळवण्यावर 
गप्पा मारतोय 

हेमंतने काय केले हा प्रश्न नाही 
त्याच्या वाढीची कुवत मर्यादित आहे 
प्रश्न आपण  का फांद्या कापतोय ?
केसचा इसेन्स काय ?
अत्तरे उडून  चालली  ?
मी तर सुगंधावर विश्वास ठेवला होता
***

इच्छा 
माझ्या 
कॉप्यावर कॉप्या कॉप्यांच्या कॉप्या 
ओरिजनल इतकी डाऊनमार्केट झालीये 
कि मला कुणी हिंग लावून विचारत नाही 

माझा शर्ट मारला गेलाय  
आणि माझ्या शरीराला 
माझा बटण्यात राहण्याची सजा 
फर्मा्वण्यात  आलीये 

मी बटवा होऊन चाललोय  
आणि माझ्या बटव्याच्या  आत पैसेच  नाहीत  

मला फर्स्ट डेटवर  जायचं होतं 
आणि लोक मला तिचे सिम्युलेटेड फोटो दाखवतायत 

साठमारी ते एलिफंटा केवज 
मला अकारण मी ज्याच्यावर  खराखुर्रा बसलो होतो 
तो हत्ती आठवतोय 

माझ्याच वाट्याला हा भगवटा का

विटेला विकण्याचा  मला हक्क नाही का ?
मला मुळात परतायचे नाही  मित्र हो 
मला सर्वत्र फळायचे आहे 
***
आपणाला फक्त भयभीत होण्याचं स्वातंत्र्य आहे 
आणि त्यांच्याजवळ फक्त घाबरवण्याची सत्ता आहे 

त्यांना ती लोकशाही मार्गाने खुद्द लोकांनी दिली आहे 

लोकांना भयभीत व्हायला आवडतं का 
कि लोकांना अजूनही राजकारणाचे महत्व कळत नाहीये ?

आणि ते फक्त घाबरवण्याचीच सत्ता कमावतात काय 
कि त्यांना ओरिजनल काही सुचतच नाहीये 

सत्ता हि फक्त लोकांचे इमिटेशन असते का 
जे कल्पनेच्याद्वारे कमावले जाते 
आणि दंडुकेशाहीच्या आधारे राबवले जाते 

सत्तेची ओरिजिनॅलिटी कुठे आहे 
कि ईश्वरच सत्तेचा स्पॉन्सर आहे किंवा बिग बँग 

विश्व म्हणजे सत्तेचा बिग बॅंग आहे का 
जो स्वतःच्या विस्ताराच्या मोहमायेत अडकून 
विस्तार नष्ट होईल म्हणून घाबरतो 

भयच सत्तेचे आदिकारण आहे कि काय ?

सत्ताधारी हेच तर सर्वाधिक भ्यालेले लोक नाहीत ना ?

महाकवीसाठी 
माझी प्रेयसी एक लवडेबाज आहे 
पण तुम्ही कसे एवढे च्युतिया निघालात ?

आधाराला आलो  होतो 
आणि तुम्ही पाण्याच्या धारेने 
आमचे नाते कापायचा  प्रयत्न केला 

आता काय तुमचं श्याट  ऍनॅलिसिस करू ?

ज्या केसांनी गळा कापला जातो 
ते वरती नव्हे 
खाली असतात 
एवढाच महाकवी  म्हणून मेसेज काय 

मी 'केस 'ला तोंड देत होतो 
पुढेही 
आणि मागेही 

श्रीधरला काहीच कळणार नाही 
असं  वाटण्याइतपत 
माझा चेहरा कधी मूर्ख झाला ?

माझे दुःख सर्वांनीच वाढवले 
तिने 
तुम्ही 
विठ्ठल भक्तांनी 
तरीही मी शाबूत आहे सर्वांगाने 
सर्व कोसळत असताना 

तुमच्या बायकोला तिने वारंवार  सांगूनही 
मी xxx  म्हणत  नाही 
xxx ताई म्हणतो 

मी शिव आहे 
तुम्ही शिवशक्ती समावेशन लिहित राहा 
काय आहे 
ज्यांचे अध्यात्म  'चकणाआहे 
त्यांच्या दारूलासुद्धा मी उभा रहात नाही
***


एका कुल गायसाठी कविता 
कुल कुल काय करतोयस 
आणि सुपरकुलने काय होणारय ?

सपाटपणा  लपवायला का हा एसी ?

कविता कायमच रिलेशनमध्ये असते 
म्हणूनच तिला टंचाईचे प्रश्न जाणवत नाहीत 

भूक कमवून जिने आतडे कमावले 
तिला उपासाचे काय भय ?
मान्यतेचा दुष्काळ माझ्यावर सतत पडेल 
म्हणून भीती काय दाखवतोयस ?

मी उपेक्षित कांडाचा शेवटचा अध्याय आहे 

आख्ख्या  मराठी संस्कृतीने वाळीत टाकले तरी 
मी कविता लिहीनेच लिहीन 

वाचक नसतील तर नसोत 

मला स्वतःच्या कविता वाचता येतात 
आणि मी स्वतःला दाद देऊ  शकतो 

शेवटी फायनली अंतिमतः 
मला स्वतःपर्यंतच पोहचायचे आहे 
***

योगायोगाने 
योगायोगाने फेकला गेलो 
योगायोगाने वाचला गेलो 
योगायोगाने दुखावणारा झालो 

मी चुकीच्या प्रसिद्धीने 
अस्तित्वात आलो 
चमकलो  

हळूहळू हे सगळं विरत जाईल 
आणि मी पुन्हा एकदा 
सर्वांना  फाट्यावर मारणारा कवी  होईन 
***

ते 

घाबरलेले सर्व एक होतील 
आणि म्हणतील 
ते धाडसी होते 
आणि कवीच फक्त घाबरलेला होता 

बहुमत घाबरलेल्यांचे आहे 
आणि ते 
'जो धाडसी आहे '
त्याला बहुमताच्या जीवावर 
'घाबरलेला ' ठरवू शकतात 

काय करशील ?
निधड्या छातीने  विठ्ठलाविरुद्ध लिहिशील ?
कि विठ्ठलापासून  पळून जाशील ?

कुणाच्या गांडीत दम आहे 
आणि कोण गांडीला पाय लावून पळाला 
हे सर्वांच्या पुढल्या लेखणावरून सिद्ध होईल 

तेव्हा लेखनात धाडस पसर 
आणि ते कधीतरी पब्लिकमध्ये उगवेल   
म्हणून वाट बघ 

शेवटी  लेखनाइतकं पारदर्शक  काहीच नसतं 
विठ्ठल टिको ना टिको 
लेखनाची  वीट मजबूत राख 
***

मला पुरु पाहणाऱ्यांनो 
बुद्धी आणि विवेकाचे दफ्तर फेकून 
अंधश्रद्धेच्या एस्केपिस्ट शाळेत स्वतःहून  दाखल  होतायत 
नवे विध्यार्थी 

स्पर्धेची ऑफर झेपणारे 
कमर्शियलच्या प्रकाशाने  दीपणारे  
डोळ्यातील अंधारात जादूच्या अभंग आवाजाने झोपणारे 
हे नवे भक्त 

त्यांना कळून चुकलय कि 
विठ्ठल हा आत्ता  काळे युग बनलाय 
त्याच्या विटेतील वीज 
बरखास्त झालीये 

तरीही हेतुपूर्वक दिण्डी चालवत  
मंडीपासून पळत 
अभंगांनी बाजाराचा आलेला कंटाळा झटकत 
ते चालतायत 

त्यांना  ग्राहक बनण्यापासून पळायचे आहे 
आणि हे मार्केट त्यांना पुन्हा पुन्हा 
स्वतःच्या बांधकामात दाखल करतय 

ग्यानबा तुकारामाची  प्रॉमिस्ड लॅण्ड 
सेंद्रिय शेतीच्या लायकीची राहिलेली नाही 
ती चिन्ह सृष्टीची फर्टिलायझर्स खाऊन खाऊन 
थकत  चाललीये 

मुळात परतून थोडीच झाडे सुधारता  येतात ?
नीती कळाली म्हणून नियती टाळता येते ?

टेन्शनची रिस्क घेत 
मी लिहितोय विठ्ठलाच्या अगेन्स्ट जाणारी ही कविता 

आषाढाचा  क्युरेटर माझ्या वाट्याला नाही 
वैकुंठाचा फायनान्सर माझ्या खिश्याला नाही 

बाजार मेला तरी बाजार जिवंत  राहतो 
विठ्ठल वारला तरी विठ्ठल  जिवंत  राहतो 

दोघेही अमर्त्य आहेत 
कि एकाच शवाच्या दोन बाजू आहेत ?
विठ्ठल ही निगेटीव पॉसिबिलीटी आहे का ?
विठ्ठल हे  मनाचे अमर्याद कंझम्सशन आहे का ?
टाळातं ग्लोबल वोर्मिंग वाजत नाही  
पुण्य कमावणारी क्षणभंगुर शांतता वाजते 

मला  कळत नाहीये कि 
मी ह्या व्हायोलंट प्रोलिफरेशनमध्ये 
पुन्हा  पुन्हा का भटकतोय ?

तुकारामाची कंटिन्यूटी  ही सूज आहे कि वाढ ?
ही सिनीकल रॅशनॅलिटी 
कि माझा स्पिरिच्युअल कोलॅप्स ?
ही परिस्थिती आहे 
कि मी इमॅजिन  केलेली  भोवतालची स्थिती ?

वारकरी पंथ  मेला तरी भक्ती  मरेल काय ?

माहितीचे प्रवाह आणि सेल्फिश कोऑपरेशन  
ह्यांच्यातून चालत  
कुठं चाललय माझं ग्लोबल पझेशन ?



मी खोलवरात दुखावला गेलोय 
कल्चरल जॅमर्सकडून 
माझ्या काळजाचा बटाटा बटाटा झालाय 
रक्ताची अटीट्युड बॉसल राहिलेली नाहीये 
तिला सर्विस सेक्टरचे  नेट्वर्कल दांडगे 
रप्चरल धक्के मारतायत 

माझ्या लेखणीची पोझिशन  
मी कधीच कलरफूल विदूषकांनी  भरली नाही 
माझा विनोदही बुद्धाचा होता 
आणि हास्य निर्वाणाची तपस्या 

कविता कळलेले  लोक 
माझ्याविरोधात कॅम्पेन  चालवतायत 
म्हणून  मी माझा थोडाच 
कॅम्प बनवू ?

मी जमावांचा प्रोग्रामर असलो तरी
जमावाचा प्रोग्राम नाही 

तुमचा कुल बार्बारिझम 
ह्या काळाचा पर्मनन्ट मौसम झाला म्हणून 
मी थोडाच फळे द्यायचा  थांबणार आहे ?
मला पुरु पाहणाऱ्यांनो 
मी तो  आहे 
ज्याचे हात 
पुरून उरतात
***

जिद्द 
कविताच लिहिली होती 
आणि पुन्हा कविताच लिहिणार आहे 

हात वाळलाय पण जिवंत आहे 
बोटे कापली गेलेत 
पण नवी पालवीही फुटतीये 

पाय दमलेत 
पण त्यांना माहित आहे कि 
ही केस म्हणजे काही शेवटचा माईलस्टोन नव्हे 

श्वास कोंडला  गेलाय 
पण हवेचं आमंत्रण अद्याप शाबूत आहे 

मी येणार आहे 
आणि पुन्हा कविताच लिहिणार आहे 
***