श्रीवाहिनी रविवार श्रीधर तिळवे नाईक
१
सत्संग
ब्राह्मण श्रीधर तिळवे नाईक
विसाव्या शतकातील एक ब्राह्मण चालतोय पहिल्या शतकात ! त्याच्या बेबी फेसवर अहंकाराची सावली वारा घालतीये . ताठपणाच्या कुबड्या त्याने काखेत मारलेत आणि त्यांना येणारा मर्डरचा वास नाकाला येऊ नये म्हणून तो रोज देवाला फुले पाठवतोय जी त्याला माळ्याने आणून दिलेत त्याला झाडे आवडतात आणि शेती करावी असेही वाटते पण शेती फक्त कुणब्यांनी करावी अशी धर्माज्ञा त्यानेच दिल्याने तो हवालदिल झालाय आरतीच्यावेळी जो कापूर येतो तो कसा तयार होतो त्याला माहित नाही बस त्याला तो जाळता येतो आणि पाळता येतो
गाईत कोणत्या तेहतीस कोटींचे देव आहेत ते त्याला ठाऊक आहे पण त्याला आपल्या घरातल्या गाईचे दूध कसे काढायचे ते माहित नाही आणि बैलाला नेमका कोणता चारा टाकतात तेही ! तो बिचारा त्यासाठी सेवकांवर अवलंबून आहे त्याला स्वर्गाचे सारे दरवाजे पाठ
आहेत पण हे माहित नाही कि सुताराने त्याच्या घराचा दरवाजा बनवला तेव्हा कोठून लाकूड आणले आणि ते कसे तपासले आणि तासले
त्याला पापी लोकांना नरकात तेलात उकळत टाकतात हे माहित आहे पण हे माहित नाही कि नर्कातले तेल येशेल असते कि खोबरेल असते कि सूर्यफुलाचे कधीपासून तो विचार करतोय कि ह्याबाबत तेल्याला जाऊन विचारावे पण तेली समोर आला कि त्याला आपल्या अज्ञानाची लाज वाटते खरेतर त्याला कित्येकदा अशी लाज वाटते पण त्याची पोझिशन अशी आहे कि ही लाज त्याला कोळून प्यावी लागते आणि लाज कोळून कोळून प्याल्याने आपली हाडे कोळशाची झालेत असा त्याला संशय आहे . खरेतर त्याला अनेक गोष्टींचा संशय आहे
म्हणजे देव आहे कि नाही हा आणि वेदाच्या मंत्रात ताकद आहे कि नाही हाही !
त्याच्या काळजावर काळाबाजाराचे एक सुपरमार्केट चालू आहे असा आणि हाताच्या दैवीपणाच्या जागी कीड लागलीये हाही !
मालक होणे म्हणजे आपल्या आतील आनंदाची हत्या करणे हे त्याला रोज आनंदाची हत्या बघून बघून पटून गेलंय त्याच्या पायात मालकपणाच्या बेड्या मंत्रोच्चार करतात आणि सडतात खरेतर त्याला गँगरीन झालंय पण मालकाला बेड्यापासून गँगरीन होऊ शकत नाही हे तोच सांगत असल्याने हे गँगरीन सोसत तो चालतो आहे त्याला मैत्री हवी आहे पण उच्चासनावर बसून ब्राह्मणेतरांशी मैत्री करणे त्याला अलाऊ नाहीये आणि इतर ब्राह्मणांशी मैत्री करावी तर ते त्याच्या इतकेच अडाणी आणि गँगरीन झालेले
स्वतःचा संताप
अनप्रॉडक्टिव्ह आहे हे त्याला माहित आहे आणि आपल्या संतापाला वळ्या पडतात हेही आपले शाप उशाप खरे होत नाहीत म्हणून अस्वस्थ व्हावे कि त्यामुळे मिळणाऱ्या सत्तेचा उन्माद बाळगावा ह्याविषयी त्याच्या मनातं गोंधळ आहे
आपण मेल्यानंतर स्वर्गात पोहचू कि नरकात ह्या चिंतेने तो ग्रासून गेलाय त्याच्या पेशीत अमावस्या नाणी पाडतायत आणि त्यांचा काळा रंग पाहून पोर्णिमेपुढे उभे राहण्याचे धाडस त्याला होत नाही
आपण जगतो ते ऑथेंटिक नाही ह्याची त्याला खात्री पटत चाललीये पण ऑथेंटिक जगण्याचा समांतर पर्याय त्याला सापडत नाहीये आपल्या आसपासचे कुत्रे आणि मांजर हेही आपल्यापेक्षा जास्त ऑथेंटिक जगते ह्या विचाराने त्याला स्वतःची लाज वाटते आहे आणि ही वाटणारी लाज त्याच्या शरीरात लघवीसारखी तुंबलेली आहे कोणत्याही क्षणी आपण पंच्यात मुतू ह्या भयाने आपल्या गँगरीन झालेल्या पायांनी स्वतःला भूदेव म्हणवून घेत तो शतकानुशतके गतानुगतिक चालतोच आहे
त्याला आत्महत्या करावीशी वाटतीये पण त्याच्याच उपदेशानुसार आत्महत्या पाप आहे आणि तो आत्महत्या करू शकत नाहीये
तो दिवसरात्र निरर्थकपणात चालत मरतोय
आणि त्याचे शव तो ब्राह्मण असल्याने फक्त त्यालाच दिसतंय
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल श्रीवाहिनी ह्या काव्यफाईलीतून )
२
आरंभ
Make every news sexy yaar
And Sunita what r u doing go for make up
News reader must look hotter than any item girl
News reader must look hotter than any item girl
Who is going to fashion the news
He has lost the touch with new make up style
Oh Honey !
असंच राहिलं तर एक दिवस
नागड्या बायकांना नाचवतील
आन नाचता नाचता न्यूज द्यायला लावतील
Sexy news माय फूट
News Channel ह्या पेक्षा Brothel पाखडले
आणि viewer !एकानं तर SMS पाठवला एका रात्रीचे
दहा हजार देतो येतेस का ?
सगळ्यांच्या मनात हेच असतं
मटात काम करताना वाटायचं नुस्तं स्मार्ट असलं की झालं आता इथं आल्यावर कळतंय की नुसत्या स्मार्ट होण्याने काही भागत नाही हॉट पण असावं लागतं आणि दर अर्ध्या तासाला काही ना काही हॉट द्यावं लागतं
लिपस्टिक सरळ कर ! आणि चेहरा इतका प्लॅट नको ! World इज प्लॅट ठीकय पण world विषयी न्यूज देताना चेहरा इतका प्लॅट नको
We are world honey so be sexy be hot and start
नमस्कार ! श्रीवाहिनी साप्ताहिक चर्चेत आपले स्वागत !
आम्ही आमच्या काही व्यासंगी श्रोत्यांचे ओपीनियन्स इथे दाखवतोय
विषय : रचविहारी कांड
दयेन्द्र पेठे : I hold that every channel is canceled by some other
channel, so there is no point in viewing any of them
रचना : But channels are interesting and good entertainer
संकेत : Now I come to know that what I am paying for that is
actually paid to entertainment.
दयेन्द्र : Why don't we discuss the Rachbihari's
effect issue ? Is it parody or prank or mediatic stunt ?
मराठीत ह्या सगळ्याला एक उत्तम शब्द आहे बनवाबनवी ! सर्वात आश्चर्यकारक आहे तो sheer impact तिची achievement ! Everything is fair in news and views असे आता समजावे
का ?
जयंत : ह्या न्यूजमुळे ज्या D चॅनेलने ही न्यूज दिली त्याच्या जाहिराती कमी झालेत. समाजात विवेक शाबूत असल्याचे हे लक्षण नव्हे का ?
मंगेश : जाहिरातीच्या आधारे समाजाचा विवेक मोजता येईल का ? विवेक मोजावा का ? दर्शक कमी झाल्याने कदाचित हे घडले असेल. ह्या न्यूजमुळे टी आर पी वादला असता तर जाहिराती वाढल्या असत्या तेव्हा ह्याचे श्रेय जाहिरात दारांना देण्यात अर्थ नाही. श्रेय नागरिकांचे आहे. त्यांनी हे चॅनेल बघणे कमी केले.
जयसिंग : ह्या खोटी बातमी तयार करणाऱ्या कांडामुळे माध्यमांना फार बनवाबनवी ह्यापुढे चालणार नाही इतके तर कळलेच असेल एका अर्थाने हा खोटेपणा खऱ्याला प्रमोट करेल.
आल्हाद : माणसाला सत्य का हवं असतं ?
अब्दुल्ला : प्रत्येक प्रेषितानंतर शेकडो भोंदू प्रेषित अवतरतात आता पत्रकारितेतही भोंदू पत्रकार अवतरलेत त्याचा थेट पुरावा म्हणजे हे बातमीकांड आहे. एकेकाळी ह्या देशाची स्वातंत्र्य चळवळ पत्रकार वर्गाने चालवली होती आज त्यांचेच वंशज त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन खोट्या मतमीची वळवळ उभी करतात हे लांच्छनास्पद होय एका अर्थानेबरेच झाले मीडियाने लोकांचा जरा ज्यादाच विश्वास कमावला होता ह्यापुढे लोक मीडियावर अतिविश्वास नव्हे तर संशयाला जागा ठेवत विश्वास ठेवतील.
महेश : माझ्या मते खरा प्रश्न आहे की कसलीही खातरजमा न करता चॅनेलने ही न्यूज स्वीकारली कशी ? की न्यूज खात्री लायक ठरण्याची कोणतीच यंत्रणा ह्या चिन्हसृष्टीत नाही ? आणि जर अशी यंत्रणा अस्तित्वात नसेल तर मग चॅनेलचे आतापर्यंत उघडकीस न आलेले असे खोटेपणाचे किती घोळ आम्ही दर्शकांनी पहिले आणि खरे मानून पचवले ? आणि सत्य जर असे मॅनेज केले जाऊ शकत असेल तर सामान्य माणसाने सत्यावर कसा विश्वास ठेवावा ? सत्याची कसोटी काय ? authority कोण ? ती ठरवणार कोण ? आम्ही सर्व मॅनेज केलेल्या सत्याच्या मागे धावणारी मेंढरे तर नाही आहोत ना ? इतिहास आणि वर्तमान ह्या दोन्ही गोष्टींना संशयाच्या गर्तेत फेकून देणारे हे कुणी कांडधारी आहेत त्यांना ह्या प्रकारात शिक्षा होणार आहे की नाही ?
बाळकृष्ण : मी खरं सांगू का
काम ज्याने केले तो अभिनेता अव्वल दर्जाचा आहे. त्याला आपण कर करतो हे माहीत होते का ? की त्याला काही वेगळेच सांगण्यात आले होते ? त्याला माहीत असेल तर मात्र त्यालाही शिक्षा व्हायला हवी पण माहीत नसेल तर त्याला निर्दोष सोडावे. ह्या कांडाचा लेखक दिग्दर्शक
ह्याला मात्र शिक्षा झालीच पाहिजे
राजकुमार : सर्वसाधारणपणे मीडियाच्या विरोधात काय बोलणार ? मीडिया ही समाजाची सावली आहे आणि ह्या जगात कुणीच स्वतःच्या सावलीवर उडी मारू शकत नाही.
जतीन : मीडिया हा बाजारात उभा असलेला ईश्वर आहे किंवा ईश्वरात उभा असलेला सत्याचा बाजार आहे. त्याला ज्यांनी श्रद्धास्थान मानलं त्याच्या बुध्दीमत्तेविषयी मला संशय आहे. आपण मीडियाबाबत नास्तिक होणे ही मिडिआ दुरुस्त करण्याची पहिली अट आहे. तेव्हा प्रथम नास्तिक होऊया म्हणजे फसलो जाणार नाही.
शरावती : मीडिया ही विषकंन्या आहे तिचे चुंबन न घेता तिच्या सहवासात जितका भोग घेता येईल तितका घ्यावा तिचे सरफेस कल्चर हाताळावे आणि विषाचे खोल गुपीत आल्यापर्यंत पोहचणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
सुहास : असे असेल तर ह्या विषकन्येपासून मी वाचेन असा कंडोम कुठे आहे?
श्रीधर : I am myself media I am myself news
I am happy with myself
who cares about your views ?
श्रीवाहिनी: So news only newses itself. But it's
reliability should be checked by those who are not part of news. So we always
need outsiders to make our interior true and proper placed. Otherwise
appearance & it's effect can cheat anybody. In past, journalists were not
media-educated but today then need computer literacy for professional effectivity.
Shreevahini doesn't say
that journalists need crash course in ethics & philosophy of ethics but
they must learn to be ethical and true in their reporting.
Otherwise their newsvalve will get transform in nuisance value. No news without
truth.
ईश्वर सर्वत्र आहे त्यामुळे ईश्वराची सावली पडू शकत नाही सर्व धर्मांनी आपण इशेअरची सावली आहोत असे दाखवण्याची कितीही प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात ईश्वराची सावली पडणे शक्यच नाही त्यामुळे मंदिर मी मशीद असा वाद घालण्याऐवजी सरकारने ह्या जागी एक विज्ञानमंदिर उभे करावे असे आवाहन वैज्ञानिक गुप्ता ह्यांनी केले.
ह्या प्रश्नाची उकल करण्यासाठी कोणतीही वैज्ञानिक कसोटी उपलब्ध नसल्यानेच सरकार ह्या प्रश्नापुढे हवालदिल झाले आहे असे ते म्हणाले. काळानुक्रमाने जो आधी आला तो मालक अशी कसोटी लावली तर ती जागा हिंदूना द्यायला हवी तर आत्ता जो त्या अवकाशांचा मालक आहे तोच त्या जागेचा मालक अशी अवकाशात्मक
कसोटी लावली तर ती जागा मुसलमानांना दयायला हवी दुर्दैवाने ह्या दोन कसोट्या दोन धर्मांना ती जागा द्यायला सांगत असल्याने त्या दोघांचाही त्या जागी समान हक्क पोहचतो असे ते म्हणाले. अशावेळी दोघांनीही ती जागा शहाणपणाने वाटून घेणे हाच खरा तोडगा आहे पण तो मान्य करण्याच्या मन:स्थितीत कोणीच दिसत नाही. अशावेळी लोकशाहीत सामूहिक मत मागवून निर्णय घेतला जातो. हिंदू बहुसंख्य असल्याने तो निर्णय हिंदुच्या बाजूने लागणे अटळ. मुस्लिमांना ते मान्य होणे कठीण मग करायचे काय तर दोघांनाही ती जागा न देता शासनाने ती विज्ञानाला देऊन टाकावी. ईश्वर सर्वत्रच आहे. त्यामुळे तो फक्त इथे मंदिर किंवा मशीद बांधल्यानेच खुश होईल असे मानण्याचे काहीच कारण नाही उलट हा तोडगा स्वीकारून रक्तपात टाळल्यास तो अधिक आनंदी होईल असे ते म्हणाले.
गुप्ता ह्यांचा हा तोडगा दोन्ही पक्षांनी अमान्य केला दोन्ही पक्ष म्हणाले "हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे "
गुप्ता म्हणाले "मला वाटले हा ईश्वराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण सध्या कुठल्याच धर्माला ईश्वराच्या प्रतिष्ठेत रस नाही असे दिसते. ईश्वराची खरी प्रतिष्ठा माणसे मारण्यात नाही तर माणसे जगवण्यात आहे हे ह्या लोकांना जेवढ्या लवकर कळेल तेवढे बरे. माझ्या मते माणूस जगणाऱ्या हॉस्पिटलची बांधणी करणे हीच खरी ईश्वराची प्रतिष्ठा आहे आणि हे अनेकांचा बळी घेणारे प्रकरण मिटवण्याचा मार्गही आहे. "
एकंदरीत सध्या विज्ञानिकच ईश्वराची खरी प्रतिष्ठा सांभाळतायत हेच खरे"
लोकायत संप्रदायाचे प्रमुख वीर लोकायती ह्यांनी जोपर्यंत ईश्वरावर आपली श्रद्धा आहे तोवर अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणारच असे सांगितले. तरुणांनी नास्तिक तत्वज्ञान स्वीकारून त्याचा प्रचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
एकंदर आठवड्याच्या शेवटीही हा प्रश्न जिथे होता तिथेच आहे असे श्रीवाहिनी खेदाने नमूद करते.
श्री खान ह्यांनी आज प्रिया नार्वेकर ह्या madness of sadness ह्यांचा बळी असल्याने अभिनेत्यावर वाटेल तशी टीका करत आहेत असे म्हंटले. त्या जे काही म्हणतायत ती त्यांची private myth private fantacyland आहे अशी टीका त्यांनी केली.
Illusionary, fragile आणि helpless अशी ही विचारसरणी आयुष्याच्या स्फटीकीकरणाऐवजी आयुष्याच्या विघटनीकरणावर भर देते असे ते म्हणाले. आनंद कशात आहे हे कळाले नाही की माणसे अशी अघटित वागतात असे ते म्हणले
प्रिया नार्वेकर ह्यांनी
खान हे विनोदी बोलतात ह्याची मला कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या Logical Reason संपले की लोक Madness चा आश्रय टीका करण्यासाठी घेतात माझ्यात आनंद absent आहे हा खान ह्यांचा जावईशोध आहे असे त्या म्हणाल्या. ह्या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी म्हणून स्वतःचे एक रहस्य शोधून काढत असतो हे रहस्य तो अत्यंत सभ्यतेने जतन करतो पण समाजाला सांगत नाही. अभिनेत्यांची शोकांकिता अशी असते की त्यांना त्यांची अशी रहस्ये जतन करायच्या ऐवजी त्यांचे मार्केटिंग करून प्रसिद्धी मिळवायची असते. हे लोक स्फटिकीकरणाविषयी बोलतात पण प्रत्यक्षात त्यांच्याजवळ ज्याचा स्फटीक व्हावा असे काही नसतेच. दुसरी गोष्ट madness म्हणजे काय ? ह्या देशात १९४७ पूर्वी स्वातंत्र्य सैनिकांना mad म्हंटले जायाचे प्रत्यक्षात ती madness ची इंग्रजांनी sponsor करतायत का ? All meaning are impotent but humanity, sense of being human
make those meaning strong and creative. खान ह्यांना ते काही बोलतायत ह्याचा meaning तरी कळतोय का ? की हेही कुणा लेखकाने लिहून दिलेले डॉयलॉग आहेत ? मला त्यांची dialogue डिलिवरी आयडली त्यात एक strong shallowness होता पण कमर्शियल चित्रपटात तो अटळच नाही का ?
हा सगळा खेळ सत्ता कुणाची ह्या प्रज्ञाभोवती फिरतो माझा विरोध सर्व सत्ता अभिनेत्याच्या अभिनयात गदर होतीये त्याला आहे. पूर्वी
foodgathering करायचे आता powergathering सुरु आहे आपण त्याच्यापुढे झुकायचे का ? आपली सत्त्येची भूक प्रत्यक्षात आपल्याला सात्त्येची गुलाम तर करत नाही ना ? आपण Mask सारख्या काल्पनिक गोष्टीला Real Power सप्लाय तर करत नाही ना ?
माझे प्रश्न मूलभूत आहेत
त्याची उत्तरे ताबडतोब मिळावीत अशी माझी अपेक्षा नाही पण त्यांना madness नावाखाली कुणी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू नये त्याने माझे काहीच बिघडणार नाही पण कलासंस्कृतिची उंची खुजी होईल.
प्रिया नार्वेकर ह्यांच्या ह्या वक्तव्याने अभिनेते व इतर ह्यांच्या पेचदार संबंधावर काहीसा अधिक प्रकाश पडलाय असे श्रीवाहिनीला वाटते. It's kind of desubjecting of actor
हिरो कुणाचा ? ज्याने तू निर्माण केला त्या लेखकाचा ?
की ज्याने तो सादर केला त्या अभिनेत्याचा ?
नायक कोण
अभिनेता की लेखक ?
भर गर्दी रोडवर चुंबन घेण्याच्या प्रकरणाला आज अनपेक्षित वळण लाभले. हे जोडपे श्री राव व त्यांची पत्नी खेती आज स्वतःच पत्रकारांसमोर आले. त्यांच्या मुलाखतीची ही झलक
खेती : ह्या प्रकरणाला असे काही वळण लागेल असे वाटले नव्हते
१ : पण हे का घडले ?
खेती : त्या दिवशी आम्ही खरेदी करत असतानाच ह्यांची आखतातिल नोकरी गेल्याचा फोन आला हे इतके
मानसिक दृष्टा खचले कि केवळ त्यांना उभारी देण्यासाठी एका आवेगात ते माझ्याकडून घडले.
२ : तुमची डिग्निटी सुटली असे नाही तुम्हाला वाटत ?
राव : हा प्रश्न विचारून तुम्ही तुमची डिग्निटी सोडताच असे नाही वाटत ?
२ : हो पण तुम्ही सार्वजनीक ठिकाणी
राव : पण तुम्ही तर मिडिआत हा प्रश्न विचारतायत
२ : पण पत्रकारांना तुम्ही invite केलंत
राव : पण आमच्यात जे झालं ते शूट करायला तुम्हाला आम्ही बोलावलं नव्हतं
२ : तो आमच्या सुटीचा भाग आहे.
राव : खाजगी चुंबन चॅनेलाईज करेन ?
२ : ते सार्वजनीक होतं
राव : ते सार्वजनिक जागी होतं आणि सार्वजनीक जागात अनेक गोष्टी होतात लोक संडासलाही बसतात ते शूट करता का ?
२ : ती मजबुरी असते कीक असते
राव : हा आवेग होता. तो सार्वजनिक करण्याचा कसलाही हक्क तुम्हाला नव्हता.
२ : तो गुन्हा होता
राव : मग एवढा कायद्याचा कन्सर्न होता तर तुम्ही तो घडतानाच थांबवायला हवा होता ना ?
२ : तुम्ही उद्या आग लागली तर पत्रकारांनी ती शूट करण्याऐवजी प्रथम विझवावी असे म्हणाल.
राव : हो पण आग विझवणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रथम आगच विझवायला हवी ना ! आम्ही टेररीस्ट नाही की कसं थांबवायचं असा विचार यावा. जे तेव्हा घडले ते थांबवणे तुम्हाला सहज शक्य करावे.
२ : पत्रकाराने फक्त शूट करावे
राव : का ? तुम्ही नागरिक नाही आहात ?
२ : हो पण प्रत्येक नागरिकाचा उपजीविका धर्म असतो तो त्याला सांभाळावा लागतो
राव : मग आम्ही जे केले तो विवाहधर्म कुटुंबधर्म होतो. पूर्वी अशा बातम्या फक्त घरी गेल्यावर किंवा ऑफिसमध्येच कळत पण आता मोबाईल आलाय मग त्या मोबाईल होण्याचे काही सार्वजनिक परिणाम होणार की नाहीत ? व्यक्तिवाद हा घरापुरता राहण्याचे दिवस संपले महाशय. त्या दिवशी मोबाईलवर जी बातमी आली ती इतकी रचवणारी होती की हिने त्या क्षणी मला मिठी मारुन माझा किस घेतला नसता तर मला कदाचित हार्टअटॅक आला असता. त्या चुंबनाने माझा जीव निदान आरोग्य वाचवले. सार्वजनिक ठिकाणी जीव वाचवणे वा आरोग्य वाचवले. सार्वजनिक ठिकाणी जीव वाचवणे वा आरोग्य वाचवणे हा गुन्हा आहे का ?
राव ह्यांच्या ह्या वक्तव्याने ह्या प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलली गेली आहे. मोबाईलमुळे वैयक्तिकता ही सार्वजनिक ठिकाणी कशी वावरायला लागलीये हे ह्या प्रकरणावरून स्पष्ट व्हावे. अशावेळी कायदे आणि समाज ह्यांनाही स्वतःत कालानुरूप बदल करून घ्यावे लागतील हे स्पष्ट आहे. ह्या प्रकरणातील सर्वात आनंददायक गोष्ट काही क्षणापुर्वीच आमच्या हाती लागली आहे. इन्फो चे मालीक रवी मूर्ती ह्यांनी पत्रकाराला ज्या तऱ्हेने राव ह्यांनी उत्तरे दिली त्यावरून त्यांची बुद्धिमत्ता स्पष्टच दिसते हे मान्य करून त्यांना आपल्या कंपनीत नोकरी देऊ केली आहे. चुंबनाच्या चॅनेलाईज होण्यातून झालेली सर्वाधिक पॉझिटीव गोड गोष्ट असे आता ह्या प्रकरणाचे वर्णन करायला हरकत नाही.
श्री रवीबाबा आज भक्तांना म्हणाले की तिसरा डोळा आणि जिभेतली शांतता सर्व दंतकथा नाहिश्या करते दुर्दैवाने
आज आपण तिसरा डोळा आणि शांत जीभ ह्यांनाच दंतकथा बनवून टाकलय.
जीव हा फक्त तहानलेला आणि भुकेजलेला नाही त्याची भूक वा तहान ही फक्त अभावातून निर्माण होत नाही तर मुळात त्याच्या आता काम करण्याची हालचाल करण्याची उबळ इतकी प्रचंड असते की त्यामुळे जीव activate होतो आणि हे activation त्याला तहानपूर्ती व भुकपूर्तीसाठी ऍक्टीव करते थोडक्यात भूक, तहान आणि निकड ह्या फक्त अभावातून निर्माण होतात हा करून पाहण्याच्या भावातूनही त्या निर्माण होतात हा करून पाहण्याचा भाव आपण जागा करून नीट उघडणे म्हणजे तिसरा डोळ फुटाणे होय. हा तिसरा डोळा सर्व दंत कथांचा भुगा करत जातो. ईश्वर ही दंतकथाही ह्या भुगा होण्याच्या प्रोसेसपासून वाचू शकत नाही तेव्हा तिसरा डोळा उघडा स्वतःच्या दंतकथांची राख रांगोळी करा आणि मग मुक्त व्हा.
भक्त म्हणाले, "जय बाबा !"
श्याम देव व श्याम शिंदे दोघांनीही ज्योतिष ही म्युझियममध्ये ठेवण्याची गोष्ट झालीये असे सांगितले "ज्या शास्त्रात विज्ञानाचा surface ही नीट उमटलेला नाही त्याने स्वतःला शास्त्र म्हणवूनच घेऊ नये " असे ते म्हणाले. "शासनाने लवकरात लवकर विधेयक तयार करून ते दाखल करून घावे " अशी त्यांनी मागणी केली.
श्री. भट ह्यांनी "सरकार हे काही विज्ञानाने विकत घेतलेले नाही आणि जर विकत घेण्याची वेळ आली तर सरकारच विज्ञान विकत घेईल " असे सांगितले. ज्योतिषशास्त्राची वैज्ञानिकता वा अवैज्ञानिकता ठरवण्याच्या कसोट्या कोण ठरवणार अशी विचारणा त्यांनी केली. हायझेन बर्गने अनिश्चिततेचे तत्व सांगताना कण कसे वागतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे सांगितले. माणूस हा तर त्या कनापेक्षा अनिश्चित आहे. अशावेळी तो कसा वागेल हे निश्चितपणे सांगणे कुठल्यही विज्ञानाला शक्य नाही. पण म्हणून काही कुणी विज्ञानावर बंदी घालण्याची मागणी करत नाही. बुद्धीवादाच्या मर्यादा स्पष्ट होत असताना बुद्धीलाच अंधश्रद्धेचे स्वरूप देणे घातक ठरेल. ज्योतिष हे १००% अचूक भविष्य सांगते असे कुणाचेच म्हणणे नाही. माणसाचे भविष्य सांगण्याच्या शक्यता ते शोधते. त्याला बंदी घालून तो शोधच संपवणे ही बुद्धीवादी हुकूमशाही आहे. आम्ही ही हुकूमशाही मुळीच घपवून घेणार नाही आणि शासनानेही ह्या हुकूमशाहीला बाळी पडू नये असे ते म्हणाले. माणसाला सापडलेल्या गोष्टीपेक्षा न सापडलेल्या गोष्टी अद्याप असंख्य आहेत ह्याने भान ह्या दोन श्यामांनी बाळगावे असे ते म्हणाले.
सरकारकडून मात्र श्रीवाहिनीला काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. सरकार हेही सामान्य माणसा प्रमाणे ज्योतिषाला शरण गेलेले किंवा ज्योतिषाबाबत भांबावून गेलेले आहे असे दिसते.
मुळात विज्ञान कशाला म्हणायचे आणि रॅशनल म्हणजे काय हे सांगणे दिवसेनदिवस कठीण होते आहे असे दिसते.
आणि आता श्रीधर तिळवे ह्यांचे हे खास स्वगत
श्रीधर तिळवे : All
divine details are shattered
All natural details are melting down like an ice.
All human details are deised like prostitutes clothes
& All signs are becoming meaningless like नासलेले दही
So where should we go ?
To postmodernism
Or To truth
Truth without details
Detailess truth
Truth containing all details
I am not new Godman
I am not young philosopher
But I am free like Godman
इतिहास मरावा अशी तर आपणा सर्वांचीच आंतरिक इच्छा आहे पण ज्या इतिहासाने आपणाला अस्तित्वात आणले त्याला मारायचे कसे History is dead असं घोषित केल्याने इतिहास मरतो का? उलट त्याने अमुक अमुक साली अमुक अमुक ह्यांनी History is dead अशी घोषणा दिली अशी विनोदी नोंद होते मग हा postmodernism is dead असा सात दिवसांचा रतीब कशासाठी ? की हाही एक नवा स्टंट आपल्या पिढीचा ? दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या आदित्य चोप्राच्या चित्रपटात नायक नायिकेला ती वळून मागे पाहिल तर तिचे आपल्यावर प्रेम आहे नाहीतर नाहीये असं एक फिल्मी पण वेडं लॉजिक लावतो आणि तीनवेळा पलट वेळी पलटते पळून पाहते. इतिहासाला मी असं तीन वेळा पलट म्हंटल म्हणून तो वळून बघून नंतर त्या नायकाची जशी नायिका कायमची होते तसा तो माझा होईल ? मुळात मी त्याला प्रेमात पाडावं ? त्यापेक्षा तो मेलाय असं घोषित का करू नये ? फिल्मी पलटीपेक्षा फिलॉसॉफिकल डेथ जास्त अस्सल नव्हे का ? की फिलॉसाफी ही फिल्मपेक्षा खोल समजण्याचा हा elite डाव आहे ? आमच्या आधीची पिढी आता मेलेली बरी असे वाटणे कितपत हेल्दी आहे ? प्रत्येक क्षेत्रातली पिढी त्या त्या क्षेत्रात स्वतःचे सरकार चालवत असतेच आमच्या क्षेत्रातही आमच्या आधीची ही पोमो पिढी सरकार म्हणून ठिय्या मांडून होतीच आणि प्रत्येक सरकार भ्रष्ट असते ह्या न्यायाने ह्याही पिढीचे त्या त्या क्षेत्रातले सरकार भ्रष्टच होते.
खरंतर प्रत्येक क्षेत्रात खूप Renovation ची गरज आहे. बांधकाम चालू आहे उत्तरार्ध त्यातून तर आली. पण ह्या Renovation मध्ये माझा किंवा प्रत्येकाचा Role काय ? माझ्या आसपास प्रत्येकजण ह्या renovation मध्ये placement करण्यात गुंतलाय काहींना ह्या placement ची इतकी घाई की त्यामुळे ह्यांच्या बजेटपेक्षा जागा कायम महाग
काही जणांचा सूर असा की आम्ही जुन्या पिढ्यांच्या आवाजात बोलतोय मला तर नेहमीच मी माझ्या आवाजात बोलतोय असा फील !
प्रत्येक पिढीला आधीची पिढी उध्वस्त करायची असते. ही आधीच्या पिढीला खांदा देण्याची उर्मी इतकी तीव्र का ?
Postmodernism & Nativism are dead ! permanently dead ! पण त्यांना मारण्याची ही मरणघाई का? एकेकाळी माझा अमरत्वावर विश्वास होता हॉस्टेलवर असताना मी जेव्हा अ. डॉ. हॉ. का. बा. ना. सु. ना. लिहिली तेव्हा मी मराठी साहित्यात ह्या साहित्यकृतीमुळे अमर होणार असा माझा ठाम विश्वास होता पण जेव्हा बांधकाम चालू आहे वर केस झाली तेव्हा ती कादंबरी पोलिसांच्या हाती लागून नष्ट होऊ नये म्हणून मला जी धडपड करावी लागली तिला जिवंत आणि शाबूत ठेवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागले त्यामुळे माझा अमरत्वावर विश्वास उडाला. माझी पिढी ही अमरत्वावर विश्वास उडालेली पिढी आहे आणि ज्यांचा आज अमरत्वावर विश्वास आहे ते स्वतःला अमर ठेवण्यासाठी जी केविलवाणी धडपड करतायत ती धडपड त्यातले केवीलवाणेपण पहिले की वाटते ह्यापेक्षा मरण बरे निदान त्यात असे अपमानीत होणे तरी नाही अपमानीत अमरत्वापेक्षा सन्माननीय मरण कधीही परवडेल Outside your body there is murder waiting for you and
inside your body suicide is waiting. death is endless. You can't conquer
it.
पोस्टमॉडर्निझमचा मर्डर झालाय
की त्याने आत्महत्या केली
मला माहित नाही
पण तो मेलाय
हे मला नक्की ठाऊकय
अगदी सुरवातीपासून
मी आत्महत्या करणार नाही
निसर्गाने मला मृत्यू द्यावा
अशी माझी इच्छा आहे
Natural Death काय Death is always
Natural असं म्हणता येईल
पण ज्याने जन्म दिला
त्याच्या पोटात जाऊन मरणे योग्य नव्हे काय ?
I am Nature
who is
dying
ज्यांना मरायचे नसते ते क्रूर होतात
मृत्यू कौर्याला प्रवृत्त करतो
पण ज्यांना मरायचे असते
त्यांना मृत्यू मुलायम व मृदू बनवतो
आपला मृत्यू बातमीदारांना, माणसांना कळतो
पण आपला मृत्यू निसर्गाला कळतो ?
आणि त्या विश्वाला ?
स्वतःला ?
मेल्याशिवाय हे कळत नाही
आणि मेल्यानंतर हे सांगता येत नाही
The End of
knowledge
आपल्या जागी दुसरा कुणीच मरू शकत नाही
आणि मृत्युविषयीची ही गोष्ट मला आवडते
No फेकाफेकी
आम्ही जागतिकीकरणाचं खुल्या दिल्यानं स्वागत केलं.
खोटं कशाला बोला
संगणक हा आम्हाला बाईपेक्षा जास्त sexy व
आकर्षक
वाटला होता नंतर मोबाईल तर ह्याहुनही महामादक
हे एक आकर्षक पॅकेज होतं
त्याचं पॅकेज डील मात्र स्पष्ट आणि नेमकं
कुणालाच माहित नव्हतं
एखाद्या गोष्टीला मुळे नसली की
माणसे ती गोष्ट आकर्षक पॅकिंग करून तिचे मार्केटिंग करतात
त्यामुळे postmodernism विषयी
तो आकर्षक पॅकिंगमध्ये आला तरी
मी सावध होतो
चिन्हसृष्टीकरण हे ज्ञानाचे स्वातंत्र्य आहे
ह्याची खात्रीच होती मला
आणि माझ्या घरात पहिला M. A मीच
ज्ञानाची किंमत निरक्षरांना विचारा
शेती करणाऱ्यांना संगणकाचे जितके अप्रूप व कौतुक
तितके संगणक नांगरणाऱ्यांना शेतीचे नाही
हीच तर ह्या देशाची खरी महाशोकांतिका
मी दोन्ही नांगरटी केल्या
आणि एकितही लाजलो नाही
आणि एकीलाही माजलो नाही
शेती करणारा मनुष्य
postmodernist होऊच
शकत नाही
तो गांधीवादी होऊ शकतो
आता गांधी हेही
postmodernist होते
असे म्हणणारे लोक आहेतच
पण खरे सांगू
असे लोक दोन्ही बाजूंनी अडाणी
केवळ विज्ञानाला विरोध म्हणजे
postmodern का ?
गांधींचा विज्ञान विरोध हा थोडासा Tactical
थोडासा मूर्खपणा
ह्यांचा विचित्र संगम होता
गांधींनी ब्रिटिशांच्या बरोबर अनेक गोष्टींची गल्लत केली
विज्ञान ही त्यातील एक
तर पोस्टमॉडर्निझम पण मरणार
आणि मीही मरणार
पण माझ्या डोळ्यासमोर पोस्टमॉडर्निझम मेला तर अधिक बरं
म्हणजे ही माझी शेवटची इच्छा वगैरे
असं नाही
अजून चिक्कार जगायचय
पण मरण येणार ह्याचं भान ठेवून
ते तसं विचित्र की
मला मी मरताना माझ्या मरणाचं ज्ञान होणार की नाही
हे मला माहित नाही
निर्वाणात हे असं मरण वाट्याला येतं म्हणे
निर्वाण हा ह्या अर्थाने
मृत्यूचा जिवंतपणी लागलेला शोध असतो म्हणायचा
असा शोध कुणाला नकोय ?
तर ह्या स्वगताचा शेवटचा शब्द हाच
निर्वाण
आणि कुणाला आधीक मोठा शब्द ऐकायचा असेल तर
महानिर्वाण !
----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
FROM KITCHEN FASHION SHOPPING - KITCHEN
चटकदार मेदवृद्धी करणारे खाण्याची चूक
चूक होतीये. पुन्हा तीच हूतीये कळून सवरुन चूक होतीये सवयीने चूक होतीये कळून सवरून चुकक होतीये सवयीने चूक होतीये सुधारायचा निश्चय करून चूक होतीये
स्त्री समोर असून चूक होतीये
संगणक समोर असाताना चूक होतीये
मोबाईल हातात असताना चूक होतीये
शरीर फुगत bedoul बनत चाललय वजन वाढत वाढत पृथ्वीएवढं होत चाललय बोटांना चष्मा लागलाय पायाला सूज आलीये
पण चूक होतीये
चूक जी माझे लिखाण डिस्टर्ब करत नाही - होतीये
ही चूक कुणाकडे घेऊन जाऊन काही उपायोग नाही प्रत्येकाला तिच्याविषयी माहिती आहे पण ती दुरुस्त करण्याचे शहाणपण कोणीच उधार देऊ शकत नाही. स्पष्ट उमगतय की चूक चूक आहे पण चूक होण्याचे काही थांबत नाही
शरीरभर चुकचुकाट पसरलाय
पण तरीही ती डोके काढते
आणि काळजाचा ठोका चुकवत होते
तिचे मूळ जिभेत आहेत पण ऐनवेळी हे कळूनही जीभ ही चूक डिमान्ड करते आणि ती होते. आसपास सतत त्या चुकीचा सप्लाय
दिसता रात्री दुपारी संध्याकाळी एटीम असल्या सारखी चूक खुली आपण कधी तिच्या आज येतो ह्याची वाट पहात आणि आपण कायम तिच्या दरवाज्याच्या शोधात नाही मिळाला तर गेलाबाजार विडोच्या शोधात
चूक फोनवर नोंदवता येते आणि आजकाल तिची फ्री होम डिलिवरीही मिळते.
ही चूक माझा जीव घेणार हे मला स्पष्ट दिसतय आणि जीव जणू तिच्यातच प्राण असल्यासारखा ती सातत्याने करत.
मी चुकचुकतोय सतत चुकचुकतोय
आणि चूक
रसरशीत स्वादाने
डिफ़क मी इफ यू कॅन म्हणत
माझ्या शहाणपणाचे कपडे काढतीये
व्यभिचारातील स्त्रीविकृत अत्याचार संपत चाललाय व्यभिचारातलं -ve सेक्स अपील खतम होत चाललंय Netonic
platonicness जाळं वीणण्यापूर्वीच धाग्यात थकत चाललाय स्वातत्र्यांचा अर्थ शोधणारी त्वचा थकत चाललीये.
The End ची पाटी पडत नाहीये म्हणून सिनेमाघरात सिनेमा सहन करणारे डोळे थकत चाललेत मि राईट मिसेस राईटची भूमी चाचपणारी भुमिका make believe चा खेळ कधी आटोपणार ह्याची वाट पाहतीये On and
off corresponding curseponding होत चाललंय मी भाईंदर तू मीरारोड एकमेकाचा कोर्स एकमेकात complete करूनही दुपारची half
baked heat सापडतीये
discourse मध्ये sexual
video feed कितीकाळ टिकवणार नात्याचा स्टॅमिना ? डोकं tilt करून करून split होतय तुझ्या authoritive voice च्या featureless noise मध्ये टेपिंग कोओर्डीनेट करणार सॉफ्टवेअर टॅपच होत नाहीये एक शुष्कपणा चालून येतोय बिजनेस कार्डचा गेस्ट बहाणा करत curiosity ताजा ठेवणारा तुझा ambivalence presumpturus monster बनत चाललाय. ब्लाईंड डेट्स नव्हत्या म्हणता म्हणता आता कळतय आपला आख्खा गेमच Blind years चा फॉलोअप होता. उपाय नव्हता म्हणून तू फॉलोओनही दिलास आणि भाईंदरच्या खेळपट्टीवर दुसरी इनिंग सुरु केली regular basis चा base टाळला नातं बोनाफाईड व्हावं म्हणून हाडाची कांड केली sudden
passion wheels गरागरा फिरली तरी अचलतेचा screw उसवला नाही piece by piece illusions बोकाळली तरी adultery ची गेमऑलिम्पीक्स सदैव टाळली सतत alternative
reasons दिली भेटीची प्रत्यक्षात तुला पाहायचा भेटलो तेव्हा Fun ही confuse करूनच अधूनमधून फ्युज काढत चेक केली तुझ्या intense
electricity ची passionate धाव विराम जाणवला पण हे राम म्हणालो नाही नेटाने परतवला नथुराम जो तुझ्याबरोबर रहात होता मला गोळ्या घालत आता फेडअप होतीये तुला पाहण्याआधी तुझा आवाज चाचपण्याची माझी लकब मला पाहून आश्चर्य वाटण्याचे दिवस तुझ्या चेहऱ्यात आता मावळत चाललेत ताजमहाल फेड होत चाललाय उरत चाललीये कबर तुझा प्रॉब्लेम हाच की I am real माझा प्रॉब्लेम हाच की You are
reality वास्तव सिनेमातील गाणी पुटपुटतय लिपस्टीक खरडून गाण्याचा फोलपणा articulate करतय
तू त्यावर मात करण्यासाठी
deadline देतीयेस मी हसतोय pack up चा भुसा नाकात घुसताना दुसरा कोणी असेल अगर नसेल मारण्यासाठी मर्डरच कशाला हवा आत्महत्याही चालू शकतेच की ! तू आत्महत्या निवड असं चुकवत कठोरता ताठखतीयेस.
मी प्रथमच जमिनीवरून पाय पसरवत चालतोय आणि प्रथमच माझ्या एकाही पावलात आकाशाचा ना तणाव आहे ना बनाव
एक अस्सल नूत छापत न छापत चाललाय क्षण
आणि काळ बँकेबल हातांनी दरवाजा उघडत
आम्हा दोघांना आत घेतोय.
हा take आहे की Tech आहे
हे काय टायगरतय आपल्या घरात
आणि Gone with the wind कुठल्या विंडोतून आली आहे
ही नेट टोटल की नेट टोटल ?
आणि ही वेटींग विंडो की वेटिंग विंडो
आणि हे gonna
gotto
खोट्टा खोट्टा aint फेन्ट
तुझ्या हाताला अमेरिकन एम्बसीची वास यायला लागलाय
आता एक कोलंबस हुडक
स्पॉन्सर म्हणून
आणि माझे हजारो क्षण आणि त्यांचे नेटिव फोटो काढ
पायाखाली चुरगळायला
विसाव्या शतकात चाललीयेस म्हणून काय झालं
तिथे पोहचून सेटल व्हायला
killer Instinct तर तोच हवा
तेव्हा चुरगाळ
हे लग्न नाहीये म्हणून हा divorce ही नाहीये
कायदा नाहीये
मग मध्ये फायदा होता काय ?
वायदा ? वायदाबाजार ?
आपल्या नात्यातलं काय संपलय
म्हणून आपण एकमेकापासून लपवत
एकमेकासाठी रडतोय
मिसफिट हातांची मिठी
पुरी होत नाहीये
जंगलांनी एकमेकासाठी छाटून घेतलं
बागा केल्या
आणि मग बागा झेपेनात म्हणून
जंगलाचा कायदा आणून
एकमेकावर वाघसिंह सोडले
"वाघसिंह माझे सखे सोबती "
हा आपणा दोघांनाही आवडता धडा होता
होय ना ?
प्रथम शब्दात गुलाब भरले पाठवले
मग बुलेट्स भरल्या पाठवल्या
सारख्याच तीव्रतेनं
मग तझ्या माझ्यामध्ये ही तीव्रतेची झुंडशाही होती का ?
रडायचय तर रड Break Up ची performativity complete झाली पाहिजे Rituals सादर झाल्या पाहिजेत
आपण Live In Relationship मध्ये होतो
असं सांगायचं
की लग्न केलं होतं असं सांगायचं ?
की die in relationship असं सांगायचं
Intellectually involve असं सांगायचं
की emotionally involve "
"
की Physically "
" "
?
ही टेम्पररी उदासी समजायची की
ही कायमची जखम समजायचं
बघूया
जगाकडं आणखी काय शिल्लक आहे का द्यायला
मी प्रेमात अधूनमधून माणूस झालो
माझा बुद्धत्वाचा चेहरा अधूनमधून फाटला
चमत्कार केले
पण त्यात आढळभावापेक्षा ढळभावच जास्त होता
आपण काहीही नंतरच्या answerable विषयी बोलत
नाही आहोत
हा divorce ही आत्ता आहे
इति आहे
शेवटचा बाय - लेगबाय
***
COLLEGE
एक
आहेस का तू नेक ?
दोन
बरोबर का लागतो टोन ?
तीन
विणता येते का वीण ?
चार
करता येते का विचार ?
पाच
मिटवता येते का खाच ?
सहा
सौ बिल्लीयाँ खाके कहाँ चला चुहा ?
सात
दाखवता येतो का हात ?
आठ
करता येते का सारे पाठ ?
नऊ
मोजता येतात का तुला भाऊ ?
दहा
बनवता येतो का तुला चहा ?
अकरा
भरवता येते का तुला जत्रा ?
बारा
पहाता येते का तुला तारा ?
बारा
पहाता येते का तुला तारा ?
तेरा
डालता येतो का तुला डेरा ?
चौदा
पटवता येतो का तुला सौदा ?
पंधरा
मोजता येते का तुला धरा ?
सोळा
करता येतात का पैसे गोळा ?
सतरा
सुगंधित करता येतो का धोतरा ?
एकोणीस
पटवता येते का कोणी मीस ?
वीस
घेता येतो का पटदिशी किस ?
एकोणतीस
भेटला का तिचा बाप खवीस ?
एकोणचाळीस
भेट देतो का जुन्या चाळीस ?
एकोणपन्नास
सांगायला जवळ आहे का काही खास ?
एकावन्न
झाला नाहीस ना इतक्यात सन्न ?
एकोणसाठ
सिद्ध करता येते का हे घट्ट की दाट ?
एकसष्ट
दाखवता येतात का तुला दृष्ट?
एकोणसत्तर
लावलेस कोणते बाबा उत्तर ?
एकोणऐंशी
जातोस का कधी स्वतःच्या वंशी ?
एकोणनव्वद
म्हणता येते का कुणाला देवाचे पद ?
एक्क्याणव
तू ससा आहेस की जिंकणारे कासव ?
शंभर
शंभरी भरली आता तुझाच आहे नंबर ?
SPORTS
Commentary
1: मैदान कम्प्युटर स्क्रीनप्रमाणे चकाचक, हिरवे, ताजे शूटिंगसाठी सर्वथा योग्य डिजिटल कॅमेरे घेऊन तयात त्यांना काळाचा वध करत खेळ प्रक्षेपित करायचाय
२: एक मारेकरी हिरवा सुरा घेऊन कुणाला शोधतोय बरे
त्याच्या पायांना चंद्र चिकटलाय
ही फेविकॉलची एड तर नव्हे ?
३: टीम स्पीरिट वास्तववादी चित्रपटाइतकं लख्ख आहे
१: पडणारा पतंग डोळे मिचकावत पडतो आहे
त्याला पकडण्यासाठी सारी Z सिक्युरिटी पळते आहे
४: स्पेशालिस्ट दारू पिऊन स्पेशल इफेक्ट घायला तयात आहेत
५: पाण्याची बॉटल की SMIRNOFF?
२: हे घोडा कागदावर तरी वाघ वाटतायत आशा आहे प्रत्यक्ष मैदानावर ते शेळी ठरणार नाहीत
७: च्यायला ही ब्रामधून बॉल उडवत कोण चाललीये ?
९: लेफ्ट स्टॅन्ड झिंगून पडलाय त्याला जाग करा
८: माझ्याआधीच नववा कसा बोलला
६: पण तुही मला आडवा करून पुढे सरकलास गड्या
३: इंग्रजीत उभी असलेली बॅट तळपण्यास सज्ज आहे तिला बॉल आहेत आणि स्टंप आहेत
४: एक कॉलेजकुमार कॅप घालून लाईन मारतो आहे त्याला रिस्पॉन्स देणारी कुमारिका लाजून लाल पडत चेंडूप्रमाणे स्वतःतून उसळते आहे. तिचे रक्त पिसाळते आहे आणि हा तिने घेतलेला कीस कुमार भांबावून गेलेला ती टुकुटुकु चुटुकते आहे.
१: जो जिंकेल त्याला टोयोटो गाडी अर्थात मॅन ऑफ द मॅच
२: जो पहिला सिक्स मारेल त्याला १००० डॉलर
३: शतकवीराला I
Pod
४: सर्वाधिक छक्के मरणाऱ्यास Airtel Nokia Mobile
५: लोक एकमेकात exchange होतायत हे मैदानावरच अभूतपूर्व दृश्य आहे
५: यजमान कॅप्टनने ढग फेकला आहे तो आपटून पाणी फुटले तर छापा आणि तो विरून गेला तर काढा ढग हवेत उडवला गेलाय पाहुणा कॅप्टन पाहतोय - छापा
टॉप पाहुण्यांनी जिंकलाय छापा पडलाय - सर्वत्र पाणी
६: मैदानावरचं पाणी उपसताना ह्या ललना पुष्ट ढुंगण हलवत उन्नत उरोज उदात्त करत हास्यमस्करी करतायत ही लेडीज स्पेशल अफलातून आहे.
७: यजमान टीम फिल्डींग लावून सज्ज
सर्वांच्या प्रेयस्या व बायका नवस बोलतायत
सर्वांच्या आया प्रार्थना करतायत
सर्वांचे बाप बेस्टलक देतायत
आम्हा समालोचकांना कुणी कुत्राही विचारत नाहीये
समजत नाही हा लोच्या काय आहे
सर्वांच्या बहिणी हात जुळवतायत
कुणी खेडेगावातून आलय कुणी मुंबईतून
कॅप्टन मैदानाचं चुंबन घेतोय
८: माझ्या मागे एक रशियन मुलगी अवेलेबल आहे.
माझ्या एजन्ट भावाची घासाघीस करतो आहे.
५: पेप्सी पीत सर्व जिप्सी होतायत
हा पेप्सी पिणाऱ्यांचा तांडा
अफलातून दिवस फरफरतोय
२: वारा वेगवान गोलंदाजाना मदत करेल
असे हवामान माझ्या कानात सांगते आहे
१: दहा ब्रॅण्डशी एकाचवेळी डीलिंग करत सचीन तेंडुलकर चेंडू हाताळतोय मंगेश घाडगावकराना त्याचा अभिमान आहे बाळासाहेब ठाकरेंना त्याचा अभिमान वाटतो आहे लता मंगेशकरांना त्याचा अभिमान वाटतो आहे.
४: कॅप्टन आपली जर्सी गरागरा फिरवत तिची मजबुती चेक करतो आहे
२: पाहुण्याचे आघाडीवीर
३: " मधले वीर
६: " शेवटचे वीर
७ : स्कोरबोर्ड डोंगरासारखा दिसतो आहे त्यातून निघालेला वारा प्रत्येकाची टोपी उडवतो आहे.
९: काळजात INDIA आणि टेन्शन
२: मै हल्का होके आता हूँ
३: मीही तुतारी फुंकून येतो
४: मीही मोकळा होऊन येतो
१: सर्वांची नजर चार डोळे आणि दोन बॅटी
५: चणे शेंगदाणे विकणारे लोक आजकाल मैदानावरून गायब होतायत
६: बल्ले बल्ले करत हा पंजाब केसरी इथे कसली बल्लेबाजी करतो आहे ?
७: खली अली ? खली बली ?
९: जो इथे येतोय तो झक मारतो आहे
१०:आणि हा षटकार उडत्या त तबकडीप्रमाणे चढत उतरतो आहे
२: वजन कमी झाल्यामुळे माझ्या बोलण्यात आत्मविश्वास येतो आहे.
३: जीवन दौडनेका नाम
४: पिठीची झीप खाली सरकताना आणि कॅमेरा बोंबलला
५:थर्ड अम्पायर पँटची झीप खाली वर करत टीव्ही पुन्हा पुन्हा टवकारतो आहे
१: भारतीय आघाडीवीर
२: भारतीय मध्यवीर
३: आणि ही विजयी रन
४: मैदानाची आय घालत प्रेक्षक धावतायत
१: सूर्य चेंडू गिळत मावळतोय
४: जो तो मैदानातून निसटतोय जो पैसे देऊन आला निसटतोय जो मॅन ऑफ द मॅच झाला निसटतोय जो बायकोला थाप मारून कॅमेऱ्यापासून स्वतःला वाचवत मॅच पहात होता निसटतोय आणि आता आम्हीही निसटतोय.
१: मैदान लाखोंना जमवणारे एकटे आहे.
आपणाला एकत्र चांगलं वाटून किती दिवस उलटले पोरी माझी मॅच्युरिटीही क्रिमीनल वाटायला लागलीये तुला हा संसार म्हणजे एक सफेदपोश घरगुन्हा झालाय डबल ट्रबल बबल फुटत पण नाहीये आणि त्याच्या आत राहताही येत नाहीये एक अगतिकता त्याच्या आत शिगोशीग ब्लेमगेमचा उदास थकवा पसरतोय हवेत डिस्क स्पेस मागतीये क्लीनअप टूल यूटिलिटीची फाईल दिलीटिंग होत चाललीये आपण स्वावलंबी होत चाललीये रिस्पॉन्सची चाल प्रतिसादाचा हा गोगलगाय स्पीड फास्ट करेल असा अक्सेस कुठून आणू ह्या विखुरुन पडलेल्या प्रेमाच्या डाटात ?
एकमेकाला कोंडून कोंडून आपण आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या जागात बॅड सेक्टर्स डेवलप करतोय स्याडनेसच्या जमिनीवर फाईल मिसप्लेस झालेल्या सापडतच नाहीयेत एरर चेकिंग ऍबिलिटी गमावलेला तुझा हात माझ्यावर रोखतोय तुझी पाचही बोटं आणि मी ती माझ्यावर रोखलेत म्हणून संतापतोय.
मी तुझ्या आयुष्याचा सत्यनाशच केलाय तर मी तुझ्या आयुष्यात काय करतोय ? तुझ्या इच्छेच्या टोकावर तणाव आहेत आणि काय तू बनाव घडवून आणत बनावटतियेस काटकारस्थानाचा बबलगम बत्तीस दातांनी चघळत.
ह्या थेंब थेंब साचून बेचव झालेल्या स्वादाच्या तळ्याला चवदार शेवट कशाला हवा
?
टर्न ऑफ कर हा रिलेशनशिपचा कम्प्युटर तुला हवा असलेला डाटा इतरत्र सेव करून आणि दे पाठवून हा रंगहिन स्वादहीन चोथा
कॅन्सर गोळा करणाऱ्या मांसल गार्बेजमध्ये
आयुष्य डिजिटल जगलो, मृत्यू तरी मानवी कर !
तुझ्या बॉडीचा रिपल इफेक्ट ओसरतोय संभाषणाचा DNA ब्रेक होत तुकडतोय मी वाचतोय प्रत्येक तुकड्यातील जनेटीक कोड डोळस होत सगळे आयविटनेस मारतायत तुझ्या माझ्या प्रेमाचे ओरिजनल सिक्वेन्स सापडत नाहीयेत मूळकतींचे रिकन्स्ट्रक्शन अप्लाय करू पाहणारी आठवणींची मेथडॉलॉजी मी बाराच्या भावात निघताना पाहतोय स्पर्शाचे Extremophile बॅक्टेरिया सॉईल बॅक्टेरियात धर्मांतर करतायत आणि स्वातःची चवदार चव बदलतायत टॉक्झिक वेस्ट जमा करत छातीवर.
मी हळूहळू बनतोय वीषपुरुष ज्याने डंखोडंखी तुला पंखवले होते गिल्टचा इमोशनल डिलेमा डिप्लोमेटीक होऊन तुझ्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या पोर्टेबल प्रेमाची शेवटी एव्हरेस्टवरची
टॉयलेट व्हावी ह्याहून काय असू शकतं आसक्तीचं अधःपतन ? तुझ्या हसण्याचेही मला दंतदुखी व्हावी ह्याला काय म्हणावे ओठांनी ? सुरवातीला वाटले हा टेनीस एल्बो आहे विश्रांतीने ठीक होईल पण बघता बघता कॅन्सर झाला एका नाराजीचा आणि काळजाचे ठोके खेळण्यापूर्वीच बॅण्डेज मागायला लागले आपल्या प्रेमाने एकमेकात दहशत पसरवेपर्यंत
आपण पोस्टपोन करत राहिलो वैताग आणि मग व्यभिचाराच्या मार्गाने निघून गेले निष्ठा वाहताना कापलेले बोट
आता समोर आहे स्कीन कॅन्सर स्पॉन्सर करणारा रस्ता आणि गळ्यात अडकून पडलेली क्रीम
मी किंचाळतोय
"It's
Over"
आणि माझ्यावर चालून येतीये
शांततेची सफेद प्रतिष्ठा
जी निरोप घेताना आपण दोघांनीही सांभाळली होती
***
शेवटी मिळालं काय ?
यातना !
तुझ्या सेल्फओब्सेसड सर्कमस्टन्सेसचा सर्कमफरन्स कधीच सापडला नाही ह्या भोगवट्यात
पाय जळाले राईट कम्युनिकेशनच्या रॉंग किवर
जिने कुठलीच कुलपे कधी माझ्यासाठी उघडली नाहीत. वेळ अशी आलीये की आपण रिअल लाईफमध्ये काय आहोत हे दाखवायला रिऍलिटी शोत भाग घ्यावा लागतोय यारा रिली रिली करत पोर्तुगीजमध्ये oi म्हण की इंग्लिशमध्ये Hello जिथे फोनच डेड होऊन पडलाय कानपाळीत तिथे कुठल्या रुटनं न्ह्यायची ही रिलेशनशिपची बस ? जिथे अटीट्युड एक्सजेंज होत नाहीयेत. जिथे जिथे गुडबायही संपलेल्या टूथपेस्टसारखे पोचे वाटतायत तिथे ठेवणीतल्या स्माईलीज चेहऱ्यावर छापून अफोर्डेबल होणार आहे का हा निरोपाचा क्षण ?
संताप असेल तर नको बोलू. इमेल आणि फिमेल फालतू ज्योक जाताना नकोत. तुझ्या आईची कायम ड्रेसिंग रूममध्ये वाट पाहणारी धकधक नको धडकन आणि तडकन अपग्रेड करणारा किसिंगचा तो रोमॅन्टिक फिलरही नको मला कायम मागास समजणारा तुझा तो सामाजिक माजही नको. मी एकाचवेळी सेक्सी आणि योगी दिसतो. आताही तसाच दिसत असेन. ऍफ्लुएंट सोसायटीतील काळीज अंतिमतः जिगोलो मागतं पुरुषाकडून तसंही राहणीमान त्यात चालत गेलं का त्याचीही चर्चा नको परफेक्ट मॅचिंग ही आयडिया की आयडियॉलॉजी ह्यावरही वाद नको तुझ्या हातावरून माझं नशीब आता स्पॉन्सर होणार नाही ही मुक्ती की सजा तेही विचारू नको म्युच्युअल होमस्टोप संपुष्टात आणून मी बेघर होताना काय सोबत न्हेणारय मला माहीत नाही. अस्थेटिकली बोअर वाटायला लागलं आपल्याला एकमेकाच्या कंपनीत त्यामुळं 'ब्युटीफुली युवर्स ' ही नको.
काळाच्या समुद्रात बॉन्ट्रान्सप्लान्ट
स्वकमाईच्या इनव्हीजीबल फ्लडची फडा
टॉर्चरच्या कलरफुल टोर्चेस
लवइंजीनचं ऑईलस्लॅशिंग
नजरेची पॉवरप्लॅशर्स
रक्तातलं सेक्सस्टिम्युलेशन
काळजाचे साईडइफेक्ट मेंदूवर मारणारे प्रोग्राम
सगळं कसं कडी घालून चिडीचूप्प आहे
त्यांना बोलतं करणारा कुठलाही डंखतमाशा आता नको
मला हे घर सायलेन्ट मोडवर ठेवून
तुझ्यातून शांततापूर्ण मावळात
मवाळ जाऊ दे.
***
SONGS AND POEMS
मुंबईत सजतोय अमेरिकन मॉल ब्राउन
लंडनमध्ये अंडी घालतय चायनाटाऊन
अमेरिकन सिनेटर बसवतोय हनुमानाची कोनशिला
जापानीजना घाबरवतोय रोज रात्री ड्रॅक्युला
उत्तर कोरीया टाईल करतोय जर्मन टाईल
श्रीलंकेत वॉलवर ब्रिटिश स्टाईल
सिडनीला लटकतायत स्पॅनिश झुंबरं
इंडोनेशियाच्या धाब्यावर अरेबियन अंबरं
विखुरून पडलंय म्हणेतोवर जग झालं एक
गाणं म्हणून झालं आता दे माझा चेक
-----------------------------------------------------------------------------------------------------
माणसांच्या गर्दीश टनावारी गर्लिश सौन्दर्ये बुडतायत कुणाला काय पडलय बिल्डींगासुद्धा जंगलावर फेकून मरणारं हे शहर स्वतःला कुलूप घालून स्वतःला घरपण देणारी माणसे - सर्वत्र - एकमेकाच्या कड्या वाजवत ओवरकॉनवर्झेशनपाशी अडलेली !
दिव्यातही भुताटंकी रस्त्याच्या उजाड त्वचेवर तकतकीत बागुलबुवा अंग बरसे भिगे सावरिया अंग बरसे
छत्रीआड कुत्री
आयुष्यात खाजगी झालेले चेहरे नाकावर रक्तपिपासू डास बसल्यासारखे
श्वसन चालू श्वास नाक्यावर चक्कर टाकायला आल्या सारखे
पायांची घडी घालून ह्या सुटकेसमध्ये ते ठेवून उडता आले असते तर किती बरं झालं असतं ?
पावले पिंजणारा थकवा
घामाची द्रवीड घनचक्कर अंगभर.
हा ओला शर्ट घेऊन ट्रेनमध्ये चढण्याची सक्ती
प्रत्येक स्टेशनवर आपल्या कपड्यासाठी आपल्या नावाने एक लॉकर हवा साला !
साडेसातची भायंदर फास्ट !
फास्टींग काऊच !
प्रत्येक ग्रुपची पिल्लावळ एकमेकासाठी सीट राखून
आपण एकांतात उभे
संडासपुढे आणि बाकापुढे सारख्याच इन्टेनसिटीनं वाट पाहत.
इतक्या दुःखी आसमंतातही हसणारी मुलगी कोलगेट गर्ल
आपणच असे का घरगळते ?
कवितेची केशवसुती काळजात कापडं धुतीये आणि आपण वाळत घालायला दोरी नाही म्हणून ह्या गर्दीत
उदास तणावाचे टोकदार नीब सोसत अनरायटेबल
रेल्वेत लटकता लटकता कविता लिहिता आली पाहिजे
भर डब्यात पोरीचा कीस घेता घेता कविता लिहिता आली पाहिजे
ह्या गर्दीत पादता पादता कविता लिहिता आली पाहिजे.
ह्या मुंबईत मरता मरता कविता लिहिता आली पाहिजे.
***
An interaction with new post 80 borned Generation
What's Life ?
Life is like an internet You only download it
then mould it accourding to yourself and just
perform with ti an internet
cutting and posting ?
No man downloading, moulding and performing
For whom
For fucking audience without audience life is impossible man
Their input is necessary for moulding and performing
For whom/
For fucking audience without audience life is impossible man
Their input is necessary for moulding. Otherwise you only
perform which is downloaded Got man ?
What do a think about Post- 60
What Post- 60 ? Was it real ? I don't know man
Gautam Budhdha ?
I had laughing Buddha but he couldn't bring luck
Is Gautam Buddha is more luckier than laughing Buddha ?
I think it's error on page
May be Who cares ?
You have been authoured by Maya of fetishness
What Maya ! I think Vivek Oberoi is going to play the character of
Maya Dadas Vivek is hot he will play this bloody gangster very sexily.
Do you know Marx
You mean marks in exam or Mark Taylor kind of sportsman. No ? At
lease I am not pseudo- Let me confess I don't know this bloody bastard
He was an economist
Oh ! Can he give me an advice about investment
Oh ! He is dead : Everybody is going to die yaar !
Death ! what a real thing ! Everything can be pretended,
faked but death ? Impossible man !
It's your way of seeing ?
Experiencing ! Seeing is बच्चोंका खेल kids only see kind of T.V. Mature people experience
it
But experience can be weaved to fool you.
You mean ! That's art yaar! I like artistes. Life is a
mission to fool everybody around you and win the truth which is powerful.
It sounds intuk Na ? What's it's hurboversion ?
Hurboversion ?
Simple way to say same thing said by a too muck intuck ! It's
upscaling yaar !
What can I ask you now
Nice Question
But there is nothing nice about question
I said your question is nice
Oh! So what's next
You mean next fucking
No! I mean what you are going to do after this interview
Is it over ! I thought you are just started it.
Timebound. We always give more time to viewers for their
independent thinking.
But who need it yaar ! & if somebody wants some time to thing
he will just leave the channel off ! Anyway every empire controls the citizen
through this time ! Prison is the most naked version of time owned by state !
See you !
Fuck you man !
Regular Internet
Chat
Ramdeo : God is the surfaceful root
Probably
All
other is Surface
Me : If today is the text
I
can write it
Priya : What are you talking ?
S: Where from you
talking ?
Me: Talking ? Chating
S: Any Difference ?
Me 3 : Anoyumity is the most interesting thing
about conversations on the internet, Ramdeo Is it fake name ?
Ramdeo : There is no fake since life is all where authentic !
Priya : hey ! Are you talking with two people ?
Me : There- in- editing room multiplication of conversationist
Priya : Oh ! Neighbors ? Buiseness neighbors ?
Me: featureless language without social class,
ethnic origin, economic ground.
S: What's your age ?
Me 2 : 60 or 16 or 1600 or I am sixteen going on sixty-een
S: rubbish !
Me : NAME ?
S: NAMELESS SHAHANE
Ram : God is ......
me2: maharashtrian ?
S: Are you Maharashtrian ? Shy ?
Priya: Accentless Neighbors ? Or I'm confused !
me : Multicoding
Priya : Kunashi boltoyas Mama Dnyanda mami paratli ka ?
me: kuna ekashi kuna ekishi
me 3: electonic dicsussion is destroying face-to-face one
S: Equality in communication Because Nobody is afraid nobody
misses the chance Even shy one speak what he intends i mean
me2: I am missing
Ram : I is missing
Me2 : ing ing God
S: God is ing ?
Me: You are Just............. I want to fuck you
S: Shut Up -
Me2: Is it possible to shout on internet ?
S: I am leaving
Ram : You must leave surface to find the root.
***
मोबाईला ! मोबाईला !
।। एकशेएकवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
कवितेत तुमचं काहीच खाजगी रहात नाही
किंबहुना ज्यांना खाजगी व्यक्त करायची खाज असते
तेच कवी होतात
We all need good workshops
Make it Impactful
शुगरफॅक्टरी नका खोलू यार
राया,
नका घालवू वाया
इश्काची उमर
ओसरून जाईल नाहीतर
कम्प्युटरवरचा पोर्नोग्राफीक भर
अय्या भर का थर भर का थर भर का थर
जी जी जी जी
राया राया
सांगा हिला - सोड मांजा ढीला
कवी हा रंगीला जी जी जी
मोबाईल बोलतायत
आणि कविता कवीमधून उठून
मोबाईल पीठात स्थलांतर करतायत
।। एकशेदोनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
अनेक तोंडानी बहुमुखी गीतेची अनेकार्थी शपथ घेत अवतारांच्या detextual context मध्ये नक्कल करत त्या concept ची जी स्वतःच original नव्हती जिच्यात organs च्या टंचाईने काळ व्यापला होता आणि organic chemistry ने अवकाश आणि वाक्यप्रकाश त्यांची निळी स्टील कलर्ड बॉडी पहात
त्यांना भाषा तोंडासाठी मदत करतायत
ज्या जिभांनी
ज्यांनी सिरीयस गेस करत करत
चेस केला
सरफेस
मोबाईल बोलतायत
आणि something foreign
कानाहारी
सर्वत्र
माझे कान मोडून ते कधी खायाला मिळतात
ह्याची
वाट पाहतय
***
।। एकशेतीनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
केमीकली
क्रोनॉलॉजीकली
बॉयलॉजीकली
जो लोच्या झालाय
त्याचा पाठलाग करत
एक ऑरा पसरतोय
पण तो माझा की मोबाईलचा
कळत नाही
Defective happiness unhold seduction of my skin forced rapesystem
in blood
काय काय सहन करायच ?
मी अजून ओरिजनल कविताही पुरी केलेली नाही
आणि लोक मोबाईलवरून
माझ्याकडे तिचा करेक्ट वर्जन मागतायत.
***
No comments:
Post a Comment