श्रीवाहिनी शनिवार
मीरारोड स्टेशनवर 1996
कुठे जाण्यासाठी ट्रेन नाही
परतण्यासाठी हक्काचं घर नाही
ह्या मीरारोड स्टेशनवर माझं कैद होईल आयुष्य असं कधी वाटलं होतं ?
माझ्या पाठीवर तुझे चावे लिहून तू आता झोपली असशील मांजरझोपेत
मोकळ्या लेखणीने
झिरो कॅलरी फूडवर विश्वास दाखवणारे डास तुझ्या आसपास उडतायत
आणि तू त्यांना तुझ्या रक्ताचे हवालदार बनवून
मला क्रिमीनल कोर्टात दाखल केलंयस
प्रेम आणि खून दोन्ही तऱ्हेवाईकच असतात
ओझोन थराचा मसाज करणारी ऑक्सीजनी बोटं कुणाकडेच नसतात
मात्र प्राणवायूचा बॅनर घेऊन हिंडण्यात dogheही तरबेज.
ज्याला माझी दोस्ती सांभाळता आली नाही
त्याला तुझं प्रेम सांभाळता येईल
ही तुझी अंधश्रद्धा आहे की माझी नालायकी हे मला कळत नाहीये
फलाटांच्या सुनसान चेहऱ्यावर माझी ओळख सांडत
मी झोपण्याची बाकडं बदलतोय
इंडिकेटर्स ट्रेनच्या वेळा भाजून थकून गेलेत
आता एकही ट्रेन उगवणार नाही हा त्यांच्यासाठी आहे पुरषोत्तमी दिलासा
माझा मेल केशंट झिरोवर घसरत चाललाय
सतत रंगपट्टी देणारे तुझे डोळे आता खुनी आणि फॉर्मल होत चाललेत.
माझ्या पोटातील भूक फायबर मागतीये
व्हिटॅमिन्सना स्टिम्युलेट करणारी तिची स्टाईल
आताशा मालन्युट्रीशन्सना
सरावलीये
ही रात्र
एक aडिशनल कोपरखळी
ऑथरॉईज्ड स्टॉल्स बंद होतायत
विनंती करूनही खाणे नाकारणारी त्यांची वृत्ती
शेवटी त्यांनाही झोपायचय
मी दुसऱ्यांदा विनंती करण्याइतपत दुबळा नाहीये
भुकेला पॅम्पर करणारे पालक सुदैवाने माझ्याजवळ नव्हते.
पैसे नसणाऱ्या मेल स्टेशनवर फिमेल ट्रेनस सहसा थांबत नाहीत.
तू आलीस हेच खूप.
तुझी लो सेल्फ एस्टीम शक्य तेवढी मी उंचावतोय
आणि तू तुझ्या मॉनिटरी उंचीनं मला खुजा दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीयेस.
तुझे हॉर्मोन्स ओळखण्याची कला मी आत्मसात करतोय
पण जनेटीक विषाचं काय करायचं हे मला समजत नाही.
तुझ्या वाईट वेळा विटेवर उभ्या राहून मी सोसतोय
खूप डॅमेज झालय आपलं नातं
मला ते दुरुस्त करता येणार नाहीये ह्याची कल्पना आहे
फक्त तुला निरोप देताना तुझा गिल्ट कमी करता yava evdhich icha ahe
माझ्याविषयी कदाचित आकर्षण नव्हतं तुला
तुला फक्त माझ्या बॉडीतील डायमंडचे तुकडे गोळा करायचे होते
किंमत न चुकवता
पण पोरी असं एकतर्फी पॅकेज कुठं अवेलेबल असतं दोन लेवलहेडेड माणसांत
आपलं खरं दुःख हे आहे की आपल्या नात्यात आता कमबॅकची शक्यता ताटकळत नाहीये आपला भूतकाळ तर चक्क कार्टून फिल्मसारखा सपाट दिसायला लागलाय
आपण आवाज बदलून तेच तेच व्हाईस ओवर देतोय त्यातल्या सीन्सना
आपल्या कानात एकमेकाचा कुठलाच अल्बम बूम होत नाहीये
हा कंटाळा नाही की आपण लावलेला टाळाही नाहीये
हे काय आहे कळत नाहीये
आणि त्याचा निषेध म्हणून आपण उचलली जीभ लावली टाळ्याला करतोय.
आपण करवादून करकचून नातं मारायचा प्रयत्न करतोय
आणि ते मरत नाहीये
मतिमंद मुलासारखं ते फक्त आसपास वावरतय.
आता हा नात्याचा थकलेला देह घेऊन मी कुठल्या झोपेत शिरावं ?
पेजरचा व्हायब्रेटर मोड ऑक्सिजन मागतोय
आणि मी श्वास बंद करून काळजातल्या काळजात आठवतोय तुझा पहिला गंध
जो प्रथम दर्शनी तुझा हात पाहताना माझ्यात फ्लॅश झाला होता.
हायड्रोजन सल्फाईडच्या तावडीत सापडलेला चाफा !
शेवटचे श्वास मोडणारा !
माझ्याजवळ स्पेक्रोस्कोप नाही
फक्त एक फायरमुवमेंट आहे.
आकाशात ढग जळतायत
आणि मी तुझ्या वासाच्या पावसाळ्यात भिजत
न आलेल्या ट्रेनमध्ये चढतोय
मला झोपेचे अंतिम स्टेशन माहित नाहीये
आणि मी माझे पाय सलीपर्स मध्ये डुबवत
घरातून निघताना आपटलेल्या दाराचा मागोवा घेत चाललोय
त्याच्या त्यावेळी झालेल्या गंधहिन आवाजात.
***
असा कंटाळवाणा हुंदका नको देऊस
ही शरीराची मल्टी फ्रेनिक भाकरी
एवढ्या लवकर शिळी होईल असं मला तरी कुठं वाटलं होतं ?
वाढदिवसाची बोटं चढवलेल्या कँडल्स
वाढदिवसादिवशीच आखडून आखडून विझल्या
केक डिसिनट्रीग्रेट होत नाहीसा झाला
आणि हवेत मुलायम चवीचा पसरला पोलिटिकल मुलायम यादव
आता हृदयात उरलीये कन्फ्युज्ड एनर्जी
आई ज्या जागी मी जायंट लिप्स घेतल्या तुझ्या शरीरातून
त्या जागेची क्लायंट म्हणून उरलेली
भागीदारीतील अपरिहार्य गरज
मी लिव्हरमधून प्रेम केलं तुझ्या स्वच्छतेवर आणि टापटीपीवर.
एवढ्या टापटीपीची बाई आपलं टिपटॉप शरीर कसं ठेवत असेल
ह्याची एक्सपेन्सीव उत्सुकता
आणि तुझ्या शारीरिक इन्फ्रास्ट्रुक्चर विषयी
कोइन्सीडन्टली जागी झालेली जिज्ञासा
तू प्रितिकाराच्या चेअरमध्ये बसूनही तुझी चेअरवूमनशीप का वापरली नाहीस ?
की तू आधीपासूनच वाट पहात होतीस खुर्ची मोडण्याची.
अनॅलेसीस डिस्ट्रिब्युट करून निघून जातायत रिअक्शनरी क्षण
थकवा फ्युजन एनर्जी गोळा करतोय
पण त्याचा मरगळलेला हात गळू देतोय वाळू
संभोगात रिपीट टेलिकास्ट आणणारे शो मला अमान्य आहेत
जिवंतपणाच्या झऱ्यांची
एकमेकात तुलना करणारा कॅम्परेटीव स्टडी
मी फाट्यावर मारतो
मला प्रत्येक पळ हवा असतो सळसळीत आणि झळझळीत
दुर्दैवाने तुझ्या अदा आता फक्त उझळनी करतायत
होऊन गेलेल्या धड्यांची
तुझ्या भाषेत इतिहास वारंवार डोकावतोय
तुझ्या भौतिकतेचा अँटेना तेच तेच सिग्नल्स पाठवतोय
ही शिळी शांतता ब्रेक थ्रू साठी आचवलेली
आणि ह्या प्लॅटमध्ये चिमन्याही शिळी कोरिओग्राफी सादर करतायत
उडण्याची विद्या विसरून
प्रत्येक फ्रेश ब्रेड स्माईल कापल्या की बुरशीत लडवडलेल्या दिसतो
तुझा फ्रीज चुकीची फिल्डींग लावतोय
आणि बर्फ सेन्सरी सेल्समधल्या साउंडसना
डिटेक्टच करत नाहीये.
आवाजातून मूड ओळखणारी कला आपल्या श्रावणकलेतून
नामशेष होत चाललीये का ?
रंग उतरत चाललाय अंगाचा आणि स्ट्रेसरिडक्शनची
संभोगोत्तर गॅरंटी तेल लावत चाललीये. तुझी इमोशनल स्टेट उचंबळत नाहीये फक्त बदबदते. आयडेयंटीचेही डिझाईन बनवतच येता श्वासांचे तंतू तू जिथे गातीयेस तिथे ऑकॉस्टीक किंचाळतय तुझे ब्लॉन्ड स्तन आता माझ्यातल्या जेम्स बॉन्डला सस्पेन्सफूल वाटत नाहीयेत.
किती डल झाले आहेत हे सारे ढग
ढील देऊन देऊन मांजे संपून गेलेत
तुझ्या नितबांवरचे मांसही वाटतय निर्जीव
ही माझ्या मरणाची सजीव सुरवात आहे की बदलाची सुघंटी ?
ब्युटिफिकेशनचे दशावतार सेलिब्रेट करणारे इंजीन आता कुठून आणू ? संपुष्ठात आलेल्या शारिरीक उत्क्रांतीच्या अवस्था आता कुठल्या प्रेमळ क्रांतित धाडू ?
तू कपडे काढून म्हारे उभी आहेस नग्नातूर
पण खरं सांगतो
मला तुझा देह देहांत वाटतोय
हे प्रायश्चित्त आहे की कडेकोट ?
मरणाचे शेवटचे टोकही जांभई देतय तुझ्या नागड्या शरीरावर
आणि आत्महत्येच्या अंतिम थाळीत
पसरत चाललीये
शिळ्या कडीला ऊत आणणारी ठकीभागी स्वादिष्टता
हा दी एन्ड आहे आपल्या पॅशनेट भोजनांचा
आणि तो वाचण्याची तसदीही न घेता
तुझ्यामाझ्यातून निघून चाललीये
तुझीमाझी भूक
जिची भुकेकंगाल सावली
माझ्या काळजातून तुझ्या काळजापर्यंत पसरत चघळतीये
बुरशीच्या च्युइंगम
आधी ख़ुशी आधा गम
***
ही तुझ्या नखरेल अदांची टेक्नॉलॉजी तुझ्या प्रियकरासाठी राखीव ठेव तुझ्या वायरलेस फिडेलिटीचा पत्ता मला लागलाच हे मी तुला कोणत्या भाषेत सांगू ? स्पष्टवक्तेपणाची मिरर रिफ्लेक्शन्स मी मुद्दाम टाळतोय इमोशनल कॅम्पेन चालवणाऱ्यां प्रियकरांपैकी मी नाही मी फक्त एका ट्यूबमधून मेसेज देतोय "स्पष्ट बोल"
माझं प्रेम रनवे हीट कधीच नव्हतं माझ्या रोमान्सचा ग्रासरूट सपोर्ट बळकट करणारा अम्बियन्स कधीचाच हरवत चाललाय फॅन्सी कॅच करत तिला ब्रॉडकॉस्ट करणाऱ्या तुझ्या आवेगमिठीतून ! आपला संभोग हा चॅट शो बनत चाललाय आताशा तुझे स्तनही एनडॉर्समेंट अटेन्ड करत असल्यासारखे अटेन्ड करतात माझे ओठ माझ्या हातांचा पिसाराही आता पुरेसा इफेक्टीव राहिलेला नाही एकेका बोटाचं मोरपीस गळत चाललय अश्रुपूर्ण पावसाळ्यात तुझी त्वचा आताशा ऋतू घेऊन येत नाही आणि आलीच तर तिच्या अंगावर मख्ख उन्हाळा लिहिलेला असतो.
आपल्या पायऱ्या आताशा. फ्रीलान्सींग करत नाहीत त्यामुळे चालतानाही आपले पाय मॉडेलींगची केबल मोजत येतात- एकमेकाकडे - खरेतर आपण एकमेकाच्या रेंज वगळूनच एकमेकाला मिस कॉल देतोय "आय मिस यू " चा डेंजरस फील चकवत
आपला उद्या मरत चाललाय आणि आपण दहन टाळता यावे म्हणून नात्याच्या मृत्यूविषयी बोलत नाहीये. भयाची जनेटीक डिसऑर्डर खोळंबून आहे कविता विटनेस बॉक्समध्ये उभ्या करून आपण एकमेकाचा अंदाज घेतोय एकचं गाण पुन्हा रिरेकोर्ड करत एकमेकांचा चेहरा वाचण्याऐवजी पाठीच वाचण्यात मग्न असलेले आपले डोळे डिझायर्स स्टुडिओज टाकून ग्लोवज चढवतायत आणि हिवाळा थंडीत झाडांना पिळत शिशिराची मास्टर की तयार करतोय
तिने कुठले कुलूप उघडेल हे दोघांनाही माहीत नाही आणि आपली काळजं एकमेकात अनलॉक होत अलाउद्दीनच्या नको असलेल्या गुहेची दुःखी प्रतिक्षा करत. एकमेकात स्तब्धता हुंगतायत
FACE TO FACE
* Somebody Is Raping
Anything goes
Somebody Is Bombing
Anything goes
Somebody Is Shitting
रस्त्याच्या बाजूला
चालता है ।
IPS ड्रग विकतोय
चलता है यार ।
TV. actress in prostitution
छोड ना यार ।
बुरखा पहन के क्यूँ नाही आयी ?
चलने नही देंगे !
रस्तेपे चुम्माचाटी
?
चलने नही देंगे !
कल्याणसिंगनी भाजप सोडला
It happens in India
तेलगी कांडात भुजबळ
It happens in
India
क्या करे ? पब चले ? श्रीधर तेरी आवाज बहोत अच्छी है यार ! मुझे डब करेगा क्या ? डब चले ? की डूब चले ?चल यार ! भंकस मत कर ! ए क्या बोलती है आती है क्या खंडाला ? Digi !Digi !Digi ! ओ पाजी मैनु डीजे बना दे । साला सब ऍक्टिंग ! गली गलीमे दिलीपकुमार ! ऐसा लागता है लाईफ नामके थिएटरमे बैठेले है । थकेले । अकेले । दुनिया गई भाडमे । अभी है वहीच लाईफ बाकी सब पाणी कम झूठ !
सबकुछ खाया सबकुछ पाया गिलास तोडा तो निकला
बारह आना
चल यार उठा ग्लास । और खुदको तोड दे ।
FACE TO FACE OR CHOUTTHINAVTA
तुझा Interneted Intelligence बाजूला काढू
Internal Intelligence विषयी बोल
त्वचा दाखवून पैसे आणि कीर्ती उकळवणारे खूप पहिले
काळजात रक्त वसूल करून दाखव
Shallow waterbags घेऊन
किती मजल मारणारयस deserted destination कडे
ही नदी पुन्हा एकदा वाहती होतीये हा बघ
नाहीतर काय
खूप आले खूप गेले
डोळ्यांना न खुपता
परत जाता आले तर बघ
***
FACE TO FACE
डेथबेडवरुन
कुठे शोधू तो टेरेरिस्ट जो माझ्यात बॉम्ब लावून पळून गेलाय ? टेरर दाखवून टेरीफीक होऊ पाहणारा त्याचा हिरोईझम कुठे लपून बसलाय ? मी तो ट्रेस व्हावा म्हणून पर्चेस करतोय एक एक हायटेक गॅरेज सरंक्षणाच्या नॉनस्टॉप योजना खुळखुळतायत माझ्या आसपास आणि तो आहे की नुस्ता फोन करतोय माझ्यात बॉम्ब ठेवल्याची न्यूज वेगळ्या नंबरवरून त्याच त्याच आवाजात सांगण्यासाठी
शंभर टीव्ही सेट्स, दीडशे माउन्टेड कॅमेराज वीस मल्टीझोन मेटल डिटेक्टर, पंचवीस डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर माझ्या आसपास कॅबरे करतायत पण तो आहे की सिड्यूस होण्याऐवजी फोनवरून आवाज इंट्रड्यूस करून गायब होतोय.
त्याचा चेहरा इनस्टोल होत नाहीये त्याचा आवाज रिकॉर्ड होत नाहीये सगळी सॉफिस्टिकेटेड टेहळणी लावणी लावून न्याहाळणी करतीये प्रत्येक पॉसिबल रिस्क झोनची मॅक्झीमम बॉडी सिटी मॅक्झीमम डॅमेजसिटी बनत चाललीये मी मिलिटरी बोलावतोय आणि मॅनेजमेंटही तरीही त्याच्या पावलांचा ना स्फोट ना आवाज फक्त फ्लाईटची तिकीटे काढून तो उतरला होता माझ्या हृदयात माझ्या रक्ताला व्हिसा न दाखवताच एवढीच बातमी माझ्याजवळ आहे गॅप्स हेरून तो अलगद कसा लॅण्ड झाला माझ्या काळजात पण हाती काहीही लागत नाहीये ह्याची चौकशी चालू आहे मेंदूत माझा खाजगी एकांत वारंवार डिस्टर्ब होतोय ह्या विचाराने की माझ्यात एक बॉम्ब आहे त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो आणि जो कधीही मला झोपवू शकतो.
मी ना झोपतोय ना जागतोय माझी शूटींग प्रॅक्टीस
रेग्युलर सुरु आहे गनबॅटलसाठी सज्ज आहे प्रत्येक अवयव फक्त माझ्या अक्युरसीवर माझा विश्वास नाही मी पुन्हा पुन्हा तेच करतोय माझी हत्यारे आणि टेररिस्ट आहे की समोर येत नाहीये.
मी वाट पाहतोय माझ्यातील दहशतीचा कायमचा कपाळमोक्ष होण्याची टीव्हीमधील सोप ऑपेरा पहात
आणि दहशत टिकटिक आवाज करत माझ्या काळजात माझ्या घामाने मला आंघोळ घालतीये टाईप सिक्युरिटीत एक साबण फिरतोय दिवस रात्र माझ्या आत.
पण तो सोप आहे की बॉम्ब मला कळत नाहीये एक वास येतोय सरपटत सरपटत सरपटत माझं काळीज उमलवत खोलवरातून
कदाचित
मी साबणात
ब्लास्ट होईन
***
SONGS AND POEMS
इंद्रायणीसमोर - 7
लोक म्हणाले
लॉगिन करा
इमेल धाडा
आम्ही धाडले
लोकांना वाचलेच नाहीत
लोक म्हणाले
मोबाईल करा
आम्ही केले
लोकांनी मिस कॉल म्हणून
सेव केले
नंतर डायल केलेच नाहीत
लोक म्हणतायत
इतक्या कविता
लिहिल्यास कधी
आणि का ?
का ?
आम्ही काही म्हणतच नाही
इंद्रायणी
समोर
***
थोडं आध्यात्मिक
संत तुकाराम तुकाराम वाणीला म्हणाला, "संत हो " वाणी म्हणाला, "वाण्याला संत होणे शक्य आहे का ? तेही ह्या शतकात "
संत तुकाराम म्हणाला, "पाच हजार कविता लिही "
तुकाराम वाणी संत तुकारामाचा आदेश प्रणाम मानून कविता लिहायला लॅपटॉपसमोर बसला Body shopping continue करत कविता कशी लिहायची त्या प्रोग्रामसमोर
प्रोग्राम म्हणे
तू मेल की फिमेल की गे
मी विचारणार नाही
पण
तुकाराम म्हणे, "मार्केच्या दृष्टीने सोयीचे काय ?"
प्रोग्राम म्हणे, "लोकेशनवर जा आदिल जसावालाला भेट. International Market मध्ये काय कायदेशीर ते समजून घे "
तुकाराम वाणी म्हणाला Next
प्रोग्राम म्हणे, "तुझी जात काय मी विचारणार नाही पण तू बालक की कुमार की तरुण की मध्यवयीन की म्हातारा "
तुकाराम वाणी म्हणाला, "कविता लेखनाशी ह्याचा संबंध काय ?" प्रोग्राम म्हणे,
"Next ... पण Angeless म्हणाला असतास तर ते poetic झालं असतं..... असो ..... तुझ्याकडे कुठली कार आहे ?"
तुकाराम वाणी म्हणाला, "नामदेव ढसाळांकडे कार आहे ती आणू का ?" प्रोग्राम म्हणे, "उत्तम हाताने करतोस की चोटाने करतोस- एकदा की अनेकदा..... पोरं किती- मोबाईल किती लॅण्डफोकस किती- क्रिकेट पाहतोस की टेटे की टेनीस" तुकाराम म्हणाला, "ही वायवाय xz कर .... मी माझं बघतो " प्रोग्राम म्हणाला, "विचार कर .... माझे दिलीप चित्र्यांशी
contac आहेत मी कवितेतले इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट देऊ शकतो "
तुकाराम वाणी म्हणे, "डॉयलॉग्स, ब्लॉग्स लॉग्ज उडत चालले ब्ला ब्ला ब्ला टॉग्स "
तुकारामाने कविता लिहिली
पहिली
ती कोणी वाचेना
तिसरी
ती कोणी वाचेना
शंभरावी
ती कोणी वाचेना
तुकारामाने विचारले
"हा महाराष्ट्र कविता वाचत नाही हा मेला आहे काय ?"
कुणी उत्तर देईना
तुकाराम म्हणाला, "मी स्वतःसाठी लिहीन स्वतःच वाचेन "
मग तुकाराम रोज कविता लिहू लागला महिने इनवेस्ट झाले, वर्षे इनवेस्ट झाली, दशके इनवेस्ट झाली हळूहळू तुकाराम फक्त कविता लिहू लागला
कवितेच्या डोही कविता तरंग
कवितेचे अंग कवितेचे
कविता साठल्या तुकारामाला आयुष्यातली ती सर्वात मोठी प्रॉपर्टी वाटायला लागली तो कवितेबाबत पझेसिव झाला जिथे जाईल तिथे कविता सोबत घेऊनच हिंडू लागला. लोक कविता वाचत नव्हते तुकारामाची कविता थांबत नव्हती असेच कविता कविता करत तुकाराम वाणी इंद्रायणीकाठी आला. एकटाच कविता वाचू लागला ऐकायला कोणी नव्हते. तरी हजारो श्रोते आपल्या कविता एकतायत ह्या कल्पनेत रममाण होऊन तुकाराम कविता वाचू लागला कविता वाचून संपेनात कविता वाचता वाचता तुकाराम बेशुद्ध झाला .
दुसऱ्या दिवशी उठून जागा होऊन पाहतो तर काय सर्व कविता इंद्रायणीत बुडून गेल्या होत्या .
इतक्या हजार कविता इंद्रायणीत अश्या बुडून जाव्यात ?मेहनत पाण्यात जाते म्हणजे काय ते त्याला कळले .
तुकाराम प्रथम खोलवर विषादला आणि हळूहळू त्या कवितांतून मुक्त झाला .
त्याला मुक्त झालेला पाहून संत तुकाराम अवतरले म्हणाले ,'' संसार सुटला ?''
"हो "
"माया सुटली "
"तुझ्या कविता न वाचणाऱ्या मराठी माणसांचे आणि मराठी संस्कृतीचे आभार मान . वाचक लेखकाला बांधून ठेवतो . मराठी माणूस वाचनाने लेखकाला असा बांधून ठेवत नाही तेव्हा म्हण
रामकृष्ण हरी
कवितेच्या दगडापेक्षा विठ्ठलाची वीट बरी "
तुकाराम वाण्याच्या कविता बुडाल्या आणि तो मोक्षाला उपलब्ध झाला
तुकारामाप्रमाणेच
तुम्हा आम्हा सर्वांनाच मराठी संस्कृतीत कधीही वाचक न लाभो आणि सर्वचजण स्वतःपुरते लिहिता लिहिता त्यांचे सर्व लेखन पाण्यात जावो आणि लिहिणारे , वाचणारे आणि न वाचणारे सर्वचजण मोक्षाला उपलब्ध होवोत ही इंद्रायणीचरणी प्रार्थना !
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment