Sunday, December 27, 2015

चॅनेल ज्ञ लिव्ह इन लिव्ह आउट 

सब अपनी मौत मरते हैं मैं तेरी मौत मरा : श्रीधर तिळवे -नाईक 

हजारो मैल दूर असण्याऱ्या तुझ्या प्रेयसिय अस्तित्वाचे  

हे दिवाळखोर हिरवं शेवाळ 

इथं जमलय माझ्या खोलीत 

तू झाडे लावली नाहीस 
पण शिशिर सोडून निघून गेलीयेस

हे पानगळीच शिल्प बीटत बीटत इथं धडकतय काळजात
डोळ्यातील ताऱ्यांचे अंगठ्यातील खडे होतायत

माझ्या अश्रुंच्यावर तुझा अद्याप कॉपीराइट आहे
म्हणून ते अद्याप वहात नाहीत

खूप घडलंय
खूप बिघडलंय
सगळ रीअरेंज झालय म्हणे तोवर
माझ्या पुस्तकात स्वहस्ताक्षरात तू मुद्दाम सोडलेले साप
सप्प उगवत कपाळदंश करतात
आणि कपाळमोक्ष गिरवतात

आपण एक्स्चेंज केलेले धागे वीरता विरत नाहीत
आणि ह्या शिशिरात स्वेटरही बनत नाहीत

मी प्रेमात आत्माही विकणार नाही म्हणून
तू तुझ्या शरीरनिष्ठेच दिवाळ काढलं का ?

तू तुझ्या मार्गाने अमेरिकेत डॉलरजडित
मी माझ्या मार्गाने भारतात निर्वाणजडित

तरीही हे पानगळपिडीत शेवाळ
ह्या खोलीत वाढतच आहे

रोज नव्या ब्रान्डचा सूर्य उगवतोय
जुन्या ब्रान्डचा चंद्र बनून मावळतोय

ह्या पानगळीत मी तुझं काय हिरवं शोधत बसलोय ?

तुझा मेसेज आला कि मी ओ के व्हायचो
आता ते सारे मेसेजेस ओ के साबणासारखे ओउटडेटेड होतायत

 तुझ्या त्वचेची झुळूक अद्यापही मला किस करते आहे
आणि ती मिस करण माझ्या जीवावर येत

तुझ्या सावळ्या सौंदर्याचा नखशिखांत खजिना
अजूनही अनेक रत्ने चमकवत माझ्या देहात हिंडत असतो

तुझे नितंब म्हणजे राजस्थानी ढोल
आजही माझ्या पेशीत वाजतात

माझ्या किती गढ्या खर्ची पडल्या
प्रेमाची एक गुडी उभी कराय ?

त्वचेखाली श्वास घेत होत ते प्रेम
त्वचेवर रंग पालटत होती ती वासना
आपण दोहोत डुंबलो
आणि काळजाचे तीव्र काळेशार क्लॉक
स्तनास्तनातुन  क्षणाक्षणानी पिलो

पाने गळतायत कि तुझ्या स्तनांचे बोंड ?

माझा स्ट्रगल ट्रबल झाला
आणि त्यात पहिली विकेट आपल्या कम्युनिकेशनची पडली

मी म्हणालो कि ढग तोडून आणेन
आणि घरात नळाला पाणी आलच नाही

मी ज्या खिश्यात पेजर ठेवला
त्याला भोक पडून तुझे मेसेज वाहून गेले

फाटक्या प्रेमीचे फिकट आकांत फटके मारणारे

ठिगळ लावून कधी प्रेम शिवता येते का ?

तुझ्या हृदयाचे सुवर्णमंदिर
अतिरेकाने ताब्यात घेतले
आणि माझे पितळ उघडे पाडत तू म्हणालीस
''  सरेंडर  ''
मी म्हणालो ,'' हा जेन्डर फरक का ?
तू केलेस तर प्रेम मी केलं तर व्यभिचार ?''

बोरिवलीच्या आय सी यु कॉलनीत
आईसक्रीम खाताना मी हात पकडला
तर माझ्या हाती तुझ्या काळजातला बर्फ लागला
तेव्हाच मला कळाले
तू हिमालयावर चढणार
आणि आल्प्सवरून अमेरिकेत कोसळणार

कौंटडोवन होण्याचे टायमिंग मी साधले
कि तू साधले ?

आपण शरीर बनून झोपायचो
आणि प्रतिमा बनून उठायचो

प्रार्थना पाठवताना देव गाभाऱ्यात ठेवायचो नाही
आणि विशेस आणि ब्लेस्सिंग्स
स्ट्रेसिंग आणि ट्रेसिंग मध्ये ट्रान्सफॉर्म करत राहायचो

ही पानगळ म्हणजे त्यांचे बनलेले ट्रेसिंग पेपर्स का ?

एकमेकांना समजून घेण्यासाठी
आपण एकमेकावर कविता लिहिल्या
आणि दोघेही गद्य झालो

शेवटी तू राज्य केलेस
मग साम्राज्य केलेस
आणि अंतिमत : खालसा केलेस

मी नानक वाणीचा पालक पनीर झालो

जोक शेअर करत
स्मिते उधळली एकमेकाच्या ओठावर आपण
आणि कीस बनून लोळलो एकमेकाच्या ओठात

चादरी कुणी धुवायच्या ह्यावरून भांडलो एकांतात
आणि संभोग कुणी आटवले ह्यावरून पब्लिकमध्ये चर्चा केली

तुझा एक सॉफ्ट किस सॉफ्ट वेअर पेक्षा महागडा का झाला ?

तू एक्ज़ोहस्ट होऊन यायचीस
आणि मी संभोगाचे पाणी भरून तयार असायचो

शरीराच्या पलीकडे विक्टिम ?

ही पानगळ कुणी एक्टिवेट केली आपल्या नात्यात ?
हे दिवे कुणी भारनियमनाखाली आणले ?

वीज तर येताजाता खेळत होती आपल्या अंगात
पाठीचा कणा कायमस्वरूपी  ओवरपॉप्युलेटेड होता उत्साहाने

तुझ्या साध्या फ्लॅशने
कॅमेरे चमकायचे फोटो निघायचे

हा रक्ताचा स्टूडिओ कुणी रीता केला ?
एवरग्रीन सौंदर्यस्थळांचे दात चेक करण्याची वेळ कधी आली ?

जिप्सीक्वीन गवारी तोडता तोडता मेली
कि भेंडी न तळल्याने तिची गाणी विझली ?

वटवृक्षांच्या वेली बनवून
भावनांचे हे जंगल गार्डनमध्ये कधी सेटल झाले ?

खूप जुनी खूप नवी
कधी वाटायचं तुझी पी एच डी झाली
कधी वाटायचं फक्त बारावी

कायम टीनएजमधे असलेल्या बाईला कसे हाताळावे ?

टीनएजची ग्रेस आणि अंगभर काँग्रेस
गवताचा चार्म हरवला नाही
पण तुझ्या अंगावरचा घाम अलार्म झाला भांडणाचा

थकव्याच्या नशिबी डान्स नसतो
आणि बेकाराच्या भाग्यात रोमान्स नसतो

मी म्हणालो
''आकाश रडतंय ''
तू म्हणालीस
''निळी मारुती घे ''

खरंच मारुतीने आकाश पेलले असते

मी पूर्वी प्रेम केले होते
मी आत्ताही प्रेम करतोय
पण उत्खननाने
वर्तमानाचे प्रश्न सुटत नाही

आजारी शरीराला प्रेमाच्या भेगा पडतायत
आणि वैसलीन देणारी तू तिकडे पलीकडे
अमेरिकेत तुझे झोपडे

तुला सोडल्यानंतरही तुझाच विचार करत राहिलो
विरह प्लान केला तसा झाला
तरीही कोसळणारा कोसळला

प्रेमाचा ठोसा मोहमद अलीपेक्षा जोरदार
काळीज फाडत नाही- ठेचतो

आपल्या प्रेमाची सुरवात कीसने झाली नाही
देरीदाने झाली
ग्रामाटालोजीच्या शुद्ध जंगलात
आपण एकमेकावर सफरचंदे फेकली

ती फेक निघतील असं कुठ वाटलं होत ?

मी दारू पीत नाही पानगळ पितोय
कधी खंबा कधी सिप

हे सगळ पूर्ण फ्रेम बनवून माझ्या वॉलवर कधी लावता येईल ?

सुसंगतीचा स्ट्रोक मला आलेला नाही
हे प्रेमाचे असंगत आचरण मी तरी कुठे शिकलो होतो ?

तुझ्या गळ्यातला हुंदका टेम्पोसारखा आवाज करायचा
तुझे उसासे उश्या ओढून ओढून झोपी जायचे

व्यक्त होण म्हणजे हिंस्त्र होणे
अशीच तुझी समजूत होती का ?

तुझ्या माझ्या प्रेमात पैशनचे कितीतरी ग्लास फुटले
माझा मेंदू अनब्रेकेबल आहे हा माझा समज फुटला

शांतता कल्पना झाली
आणि शब्द कुबड्या घेणारे महायोध्ये होऊन
कापले गेले

सत्यावरून चालताना 
खरेखोटे रिमिक्स व्हायला लागले
आणि कळाले
तू माझ्या निर्वाणातील महाअडथळा आहे

तंत्र मार्गाने मोक्ष साधू पाहणारा माझा कामयोग
गच्चकन थांबला
आणि कामवासनेला शिव्या घालून
मी पुढचे स्टेशन पकडले

संभोगातून समाधी ?
घंटा
संभोगातून फक्त मादी

हाही तुझा उपकारच कि
मी तंत्रापासून कायमचा मुक्त झालो

त्या तंत्राचीच ही पानगळ का मग ?

शीरा शिरा होतात
धमन्या उपीट
आणि मी रोज तुझ्या आठवणीत ब्रेकफास्ट सुरु करतो

ह्या मलूल डोळ्यांना तुझा चेहरा दिसत नाही
मुखवट्यानच्या गर्दीत मान मुरगाळली आपण
एकमेकांच्या चेहऱ्यांची

प्रेम हे असे खतरनाक होते
न दिसलेल्या चुका
काळजावर हिमालय ठेवून जाऊ लागतात
आणि सह्याद्री तर असतोच
जन्मल्यापासून मेंदूत
जुना आणि प्राचीन

मी तुला जाऊ दिले
कि तू प्लान करून निघून गेलीस ?

सोन्याची नाणी पाडायचीस तू
चांगला मूड असला की
मग सोलकढी काय वरणभात काय

तुझ्यासारखा सुगरण हात मी नाही पाहिला
वाहायचा तेव्हा सुग्रास सुगंध पिकवायचा
आटला कि घरात साधं गवतही उगवायचं नाही

फैंसी शूज आणि रियालिटीतले पाय

अद्यापही तुझे पाय आणि शूज
ह्यांच्यातला फरक
मला सापडत नाहीये

ही पानगळ एवढी डोईजड कधीपासून झाली ?

श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ  , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

चॅनेल :ज्ञ लिव्ह इन अँड लव्ह आऊट श्रीधर तिळवे नाईक 

नुसत्या बुद्धीने काय होणार ?
नुसत्या भावनेने काय होणार ?

शेवटी दोघेही शरीरातच राहतातच 
शरीराचे लाईफलॉँग मेम्बर म्हणून 

मी शरीरच घेऊन आलोय तुझ्या शरीरापाशी 

अंतर्गत शरीराला भिडणे 
बहिर्गत शरीराच्या सहाय्याने 
एवढे सोपे नाही 

माझे गंध तुझ्या मेंदूफुलांशी मिसमॅच होतायत का ?

भाषा अंतर्गत शरीराने शोधली 
दुसऱ्या अंतर्गत शरीराच्या स्पर्शासाठी 

मीही अपवाद नाही 

बुद्धीला प्रतिवाद म्हणून 
ग्रेस रोमँटिसिझममध्ये घुसले 
नेमाडे देशीवादामध्ये घुसले 

मला हे बॅक टू पॅव्हेलियन मान्य नाही  

मला ह्या विसाव्या शतकातला शृंगार हवा आहे 
विसाव्या शतकातील अखेरच्या दशकातील प्रेयसीसोबत

तू ती प्रेयसी आहेस का हा प्रश्न आहे 

नुसते भावनांचे फ्लश
संडासात उपयोगी असतात 

झोपखोली ही थोडी गुंतागुंतीची गोष्ट आहे

तिथे खोलावेही लागते
झोपावेही लागते
आणि एकमेकाची खोली गाठत
एकामेकाच्या खोलीत
कैदही व्हावे लागते

तू म्हणतीयेस
"प्रेम हे इतकं मॉडर्न इतकं  रॅशनल व्हावं का ?"

मी म्हणतोय
"अगदी आधुनिकमध्येही प्रेम रॅशनल विरोधात उभे ठाकले आणि रोमँटिक झाले "

प्रेम विज्ञानाला समांतर
कि आल्टरनेटीव

आत्ता तर पोस्टमॉडर्न हेच इरॅशनल झाले
मग प्रेम पोस्टमॉडर्नला समांतर
कि अल्टरनेटिव

मग प्रेमाने रॅशनल व्हावे का
आणि झाले तर त्या रॅशनॅलिटीची मर्यादा  काय ?

रॅशनलसाठी मीडिया आहे ?
मग प्रेमाचे काम काय ?

मनोरंजन ?

न्यूज चॅनेल्स आपण मनोरंजन म्हणूनच पहात नाही का ?
तू माझे मनोरंजन आहेस काय ?

बातम्याच सेलला लागल्यावर
सगळे आर्थिक होत नाही काय ?

आपले प्रेम अद्याप सेलला लागलेले नाही
पण पुढे लागणार नाही ह्याची खात्री काय ?

प्रेमाचे तंत्रज्ञान बनवणारे कार्पोरेट कल्चर वाढीस लागल्यावर

"How to win girl "
"How to get rich man as a boyfriend "
"प्रेमाचा सल्ला "
"संभोग कसा करावा ?"
"प्रपोज कसे करावे ?"
असेच सर्व वाढीस लागणार नाही  का ?

हे सर्व पोस्टमॉडर्न टाळून
आपण एकमेकास कसे भिडणार आहोत ?

आज व्हॅलेन्टाईन डे आहे
आणि आज माझ्याकडे तुला भेट द्यायला फक्त प्रश्न आहेत

व्हॅलेन्टाईन डे ला प्रेमकांड मानून
आपण आज भेटणे टाळावे का ?

प्रेमाला औपचारिकतेचे स्टेशन लागले
कि ते डिरेल व्हायला लागते

मला तुला ग्रीटिंग कार्ड देणे फार औपचारिक वाटते  आहे
हे वाढत्या प्रेमाचे लक्षण आहे कि समजूतदारपणाचे ?

माझ्या कादंबरीत ग्रीटिंग कार्डाच्या आधारे लिहिलेला
एक चॅप्टर आहे
तो मी तुला वाचून दाखवावा का ?

ही कविता
मी व्हॅलेन्टाईनडेला काहीतरी तुला वाचून दाखवावे
म्हणून लिहीत आहे का ?

***

गिलोटिन

गॉड  हा इतका कुल
कि फ्रिज आणि ऐसीकडून
मारला जातोय

जिथे उकाडा टाळला  जातोय
तिथे कसे निघावेत कपडे

मी हे केशवसुत अवॉर्ड घ्यायला का आलोय
कि तुला भेटायचे हे  निमित्त आहे ?

मी सॅंडविचतोय
सँड आणि विचमध्ये

पोस्टमॉडर्न जादूटोणा आउटडेटेड झालाय
ज्याला बक्षीस मिळालंय तो माझा संग्रहही

बक्षीस इनडेटेड आहे ते तू भेटायला येणार म्हणून

माझं अंतःकरण तुझ्या निर्णयाच्या   गिलोटिनखाली आहे

मीपण  काटून मेंदू  जिवंत ठेवणे
हे ह्या युगाला तरी जमणार आहे काय

माझ्यासाठी तूच युग आहेस म्हणून विचारतोय

तू आलेली नाहीयेस
आणि मी ह्या युगातून
माझ्या अंतःकरणासकट कायमचा बाद होत चाललोय

***

आपण जे लिहू
ते साठोत्तरीच होईल
ह्या भयाने गंजून गेलेत कवी

त्यांच्या प्रेयस्या ग्रेसलेल्या तरी
किंवा नेमाडलेल्या आणि चित्राळलेल्या तरी

अपवादात्मक ढसाळलेल्या

ज्यांच्या प्रेयस्याच ताज्या नाहीत
ते काय लिहणार फ्रेश कविता ?

ज्याला त्याला घरात सौभाग्यवती हवी
आणि दारात क्रांतिकारी कविता

म्हणूनच जो कवी येतो
तो माझे तुझ्याविरुद्ध कान फुंकतो

व्यभिचार करायलाही
ज्यांना पु. शि. आणि पाडगावकर लागतात
त्यांना काय सांगावे तुझे कायाकल्प

काल्पनिक शिकार करून
जे रचतात रो मॅण्टीक कवितेचा  टोमॅण्टीक आकार
त्यांना काय सांगावेत तुझे मांसाहार आणि वामाचार

हे तसे बरेच आहे कि
तू ह्या युगाच्या बाहेर व्हायरससारखी उभी आहेस
आणि मला व्हायरल करत बेजारत आहेस

तुझ्या शरीराखाली
माझे गुरुत्वाकर्षण नाहीसे होते
आणि मी हलका होत
उभा राहतो

खालून वर जाणारे हे रक्त
सृजनाची खरी  प्रार्थना नाही काय ?

प्रिये
मी खालून धक्के देईन
तू वरून दाब दे
जे आहे पोर्नोग्राफिक
त्यास डिवाईन आब दे

ये
कवटाळ तुझा जार आणि
कविता फाट्यावर मार

***

तू
चालता बोलता पोस्टमॉडर्न केऑस आहे

मला वाटलं होतं
मी माझ्या चौथ्या नवतेत तुला फिक्स करेन

मी तुझ्या जगण्याला हेतू देईन
आणि साक्षर करेन

पण आता
स्पष्टता
ब्लॅक ऍण्ड व्हाईट टीव्हीत जाऊन आदळतीये
आणि तुझा कलरफुल पिसारा
स्वतःच्याच रंगाच्या
फूटपट्ट्या  बनवतोय

आपण पुन्हा पुन्हा
त्याच त्याच चुका करतोय
आणि त्या आता इतक्या ढोबळ होतायत कि
डोळे बंद केले तरी
स्पष्ट आणि स्वच्छ दिसतायत

तुला वाटतय
मी ग्रॅण्ड नॅरेटिवखाली
तुला दाबून ठार मारणार आहे
मला वाटतय
तू केऑसच्या नावाने
संधी साधूपणा करणार आहेस

विश्वास  संपलाय
आणि श्वास फुसफुसतायत
आपआपल्या फुफ्फुसात
***

मी लवबर्ड नाही
मी प्रेमकावळा आहे
जो तुझ्या डोमवर बसतो
आणि डोमकावळा होतो

मी सफेद नाही
काळा आहे
मात्र माझ्या रंगात उमटणारे तुझे चित्र
सप्तरंगी आहे

लोक जळतायत

नेबर्स एन्वी ओवनर्स प्राईड

***

मी - तू 

मी ह्या क्षणाची बातमी
जी न्यूज चॅनेल्स देऊच शकत नाहीत

तू ह्या क्षणाचा इवेंट
जो इवेंट मॅनेजमेंट कंपन्या मॅनेज करू शकत नाहीत

मी चिन्हसृष्टिच्या बाहेर
तू भाषेची गुप्तहेर

मी कवितेची समीक्षेची दुधारी जालदार तलवार
तुझा त्रिधारी जार
तू की बोर्ड  ज्याम       करणारा
प्रेमाची भडीमार

मी - नथींग
तू - बिग बँगचे बींग

***

मी कैकदा लोकांना प्रतिसाद देत नाही

मी कैकदा लोकांना प्रतिसाद देत नाही
आणि लोकांना त्याचा खूप राग येतो

मी कैकदा लोकांना फाट्यावर मारतो
कारण  मेन रस्त्यावर मला वेळ वाया घालवायचा नसतो

मी तुमच्याशिवाय काहीच नाही
तुमचे प्रेम तुमच्या शुभेच्छा हेच मला जिवंत ठेवतं
वगैरे बकबक
माझं डोकं उठवते

मी लोकांना बर्थ डे सांगत नाही
आणि त्यांच्या  बर्थ डे ना त्यांना विशही करत नाही
मी जन्मदिनी ट्रॅफिकमध्ये अडकू इच्छित नाही
आणि कुणाच्या जन्मदिनी ट्राफिक बनू इच्छित नाही

लोक म्हणतात मी सटॅक आहे
त्यांना माझे अस्तित्व अटॅक वाटते
मी लोकांना वाळीत टाकून
ते बरोबर आहेत हे सिद्ध करतो

मी लोकांविषयी बोलतोय
आणि तू लोकांच्यात आहेस
कि माझ्यात
ह्याचा अदमास घेतोय
***

 टिव्हीकरण 

मी जॉर्ज बुशनां  टीव्हीवर ओळखतो
मी नरसिंहरावांना टीव्हीवर ओळखतो
मी सचिन तेंडुलकरला टीव्हीवर ओळखतो
मी अनेकांना टीव्हीवर ओळखतो
माझ्या टीव्हीवर खूप ओळखी आहेत

आणि मीही टीव्हीला
टीआरपी म्हणून हवा आहे

माझे हे वाँटेड म्हणून हवे असणे
प्रेमातल्या अनवॉंन्टेड फिलिंगपेक्षा
किलर असते

आजकाल मी तुला कमी
आणि टीव्हीला जास्त ओळखतो

माझा  चेहराही   टीव्हीसारखा दिसायला लागलाय
आणि मी चॅनेलनुसार बोलायला शिकलोय
जे चॅनेल माझ्यात ऑन
त्यानुसार मी डॉन

माझ्यातला हा बदल तुझ्या लक्षात येत नाहीये

तू ती स्कॉलर आहेस
जी टीव्हीचा द्वेष करते

माझ्या डोक्यावर अँटेनांचे पीक उगवते आहे
आणि तू
मी तुझ्या गावाचाच नाही असं समजून
मला टीव्हीप्रमाणे पहात
तुला हवी तशी
माझी चॅनेल्स  बदलती आहेस

मी मल्टीचॅनेलर झालोय ह्याचे मला दुःख नाही
पण रिमोट तुझ्याच हातात असल्याने
मी तुझ्या हातून कधीही ऑफ होऊ शकतो
ह्या शक्यतेने
स्विंग-हँग  आहे

***

कबीर 

अशी महादुर्बिणीसारखी पाहू नकोस
मी काही तुझा ट्रान्समिशन एरिया नाही

कुणीतरी अवकाशात राहण्याचे रेकॉर्ड केले म्हणून
आपण ढगात जाण्याचे कारण नाही

ह्या प्लॅनेटवर आपण धूमकेतू आहोत
आणि आपणाला आपली आई माहीत नाही ही खरी शोकांतिका

आपल्या नात्यात डार्क मॅटर जमा होतंय हे खरं
पण ते तुझ्या सफेदपोश नोकरीने व्हाईट होणार नाही हेही खरं

सौष्ठव मी व्हरच्युअल नेटवर्क जमा करायला
किंवा भविष्यात माझी वेबरद्दी जमा करायला काढत नाही

मला माझ्या कक्षा माहित आहेत
आणि मला कुणाचा नक्षा उतरवायचा नाही

गोष्टी क्लिनिकल आहेत की क्रिमिनल
हे कळणे कठीण होत चाललंय
म्हणूनच मी कुणाच्या गोतावळ्यात सामील होत नाही

जे स्वतःचा सिक्वेन्स जुळवायला घाबरतात
ते गोतावळा काढून सिक्वेन्सला रिप्लेस करू पाहतात
हे माझे निरीक्षण आहे

शम्मी कपूरची जंगलीतील याहू ही डरकाळी
आणि ही आत्ताची याहू
ह्या दोन्ही गोष्टीत जंगल नाही
हे मी खात्रीने सांगू शकतो

तेव्हा प्रिये
सगळ्या आड्वान्समेन्टचा राजीनामा दे
आणि
ह्या झाडावर माकडिणीसारखी चढ

माझ्या देहात एक जंगल मिळेल
आणि एक रानटी माणूस

दोघेही सरफेस नाहीत
ह्याची फुल टू गॅरन्टी देतो

तरीही बाजारातच हरवणार असशील
तर एक सांगतो
ह्याही  वर्षी मार्केटला
कबिराची लुहाटी तयार करता आलेली नाही

***

मी तुला भेटतोय

मी तुला भेटतोय
कि एस्टेरॉइडवर दाखल होतोय ?

प्रत्येक भेटीत तू नवा चेहरा लॉन्च करतेस
आणि माझे सारे मुखवटे फ्लॉप होतात

सतत अस्ताव्यस्त अवाढव्य पण नवं भेटतंय
असा फील
आणि तू डिल करतीयेस
असा संशयही

हाताच्या बोटांवर ग्रहणे घेऊन फिरणारी तू
तुझ्या गुगलीने
मी कायमच आउट होतो

एकतर आकाशगंगा आपल्या बापाच्या मालकीची आहे
अश्या थाटात तुझे वावरणे
किंवा मग ब्लॅक हॉलमध्ये नाहीशी होत चाललीयेस
म्हणून बावरणे

भेट संपते
तेव्हा मी आवराआवर करत नाही

तू केलेला पसारा
कवितेत ट्रान्सफॉर्म मारतो
आणि कायमचा  विसरतो

***

ती म्हणाली मी  तुझ्या होस्टेलमेट्स चा फोटो काढते तेव्हा 

माझ्या ह्या हॉस्टेलमेट्सचा फोटोग्राफ
नको काढूस
इथली पोरं अशी कि
त्या फोटोमधून उडायची
आणि चंद्रावर पोहचायची

हा मंग्या
दूरवरच्या ग्रहावरून उतरतो
आणि सोशल हबलपुढे
बबलगम फोडतो

हा आल्हाद
ऐन दुष्काळातून आलाय असे वाटले तरी
प्रत्यक्षात दुष्काळात पाणी वाटणारा
हा तेरावा महिना आहे

हा महेश
ह्याच्या कक्षा फोटोग्राफिक होऊन
हा संपादक तरी होईल
किंवा पोर्नोग्राफिक होऊन
हा स्वतःच्या कक्षेत आत्महत्या करेल

हा कोंडया
हा काळ कोंडू शकतो
किंवा कोणत्याही क्षणी काळाशी  भांडू शकतो

हा बाळ
हा तुला पटवायचा प्रयत्न करू शकतो
किंवा संगीतात बसून फ्राईडला
मानसशास्त्र शिकवू शकतो
ह्याचा गळा लळा लावणारा  आहे
आणि ह्याचा हात गळा दाबणारा

हा अमर
भविष्याने झोंबला गेलेला
आणि भूतकाळाने कितीही आंबला तरी
हापूस आंब्यासारखा हसणारा

हा श्यामसुंदर
एम जी रामचंद्रनसारखा दिसतो
मार्क्ससारखा बुद्धी पिसतो
आणि तुझ्याप्रमाणेच
अंहगंड आणि न्यूनगंडात
उठाबश्या करतो

हा राजेश
देखणे पणाचे नोबेल प्राईज ह्याला द्यायला लागेल असा
बुद्धिमान आणि हसरा
ह्याचे हिरे चमकतील
आणि हा कोर्टात लखलखेल

ह्यांच्यापैकी कोणीही आत्महत्या करणार नाही
किंवा हत्या

हे संपूर्ण सफळ जगतील
आणि यशाचा पोवाडा रचतील

हे गांडू होणार नाहीत किंवा पांडू
विटी पाहून दांडू फिरवण्याची कला
ह्या सर्वानांच अवगत आहे

तेव्हा बघ
ह्यांचे  माणूस म्हणून फोटो काढायला जाशील
आणि फोटोत येतील
विट्या आणि दांडू

तुझ्यासाठी लायक बनण्याची प्रक्रिया 
आणि तिचं प्रेशर 
प्रत्येक हाडावर 
तळमळीचा स्टॅमिना टिकवत 
मी धडपडतोय 
तुझ्या डोळ्यातील त्या होकाराला 
जो फक्त माझ्यासाठी असेल 

आयुष्याच्या अँप्युटेशनचे प्रयोग माझ्या फोकस्ड चालण्यात 
मुंबईचे आयझोमर्स सर्वत्र 
जाणार तरी कोठे ?
आयुष्य थोडंच पायमोजा आहे 
सुपरइम्पोझिशन एक सारखं असायला ?

बिल्डिंगा किंचाळत नाहीत आताशा 
कान पेनिट्रेट करणारी किंचाळी थाटून मॉडेलसारख्या बसतात 

मी हात उंचावतोय होकाराचा 
समोरचा नकार डाऊन करत 
शटर तोंडावर मारत 

"निदान घरात ऑफिस घेऊन येतो म्हणून भांडायला 
ऑफिस कमव"

मी जिथे जातो तिथे शून्य निर्विकारपणे हाकलले जाते 

ह्या देशाला मुमुक्षु फक्त आश्रमात हवेत 
ऑफिसमध्ये नकोत 

जुन्या गोष्टी निगुतीनं मरायच्या 
नव्या थेट युजलेस म्हणून फेकल्या जातात कचऱ्यात मरायला 
नव्या जागा ह्याही अशाच 
तात्कालिक कॉन्ट्रॅक्टवर कितीकाळ काम करणार 
आणि कचऱ्यात कितीवेळा जाणार ?

बुद्धिमान माणसं कुणालाच नको असतात ह्या देशात 
ज्याला त्याला दास हवेत 
सरंजामदारी मानसिकता 
आधुनिक कपड्यात 
कार्पोरेट फेफड्यात 

मी फाफडा खात खात फाफडतोय फाफलत 
कफल्लत 

घरी परतावंसं वाटत नाहीये मला 
पण रस्त्यावर थांबून तरी 
कोणता समुद्र कमावणार आहे ?
 
मी घरात शिरतोय फ्लॉप  चेहरा घेऊन 

तुला वाटतंय 
मी बूट पुरेसे झिजवलेले नाहीत  

मी झिजलेले पाय तुला दाखवत नाही 
बुटात लपवतो 

श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ  , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

 चढ 

हा दोघांचा उठाव आहे 

जरी ह्यात तणाव आहे 

आकाशाला रेंगाळतांना पाहत 

ढगांनी चेहरा साफ करत 

इमारतींच्या छतावरती 

मी खाली तुझी छाती वरती 

मुंबईची सगळी सभयता फाट्यावर मारत 

मिडलक्लास जेनेटिक्स फेटाळून लावत 

हे ठाणं 

आपल्या दोघांचं 

आपल्यासाठी 

आपल्या दोन शरीरासाठी 

जी आसुसलेली 

एकमेकात विरघळाला 

पाणी करत काळजातल्या दगडांचे 

मांड्यातून अणुस्फोट झाडत 

सामाजिक कचरा साफ करत 

उचलत ओठ

दाट घनदाट

चुम्बने गोळा करत 

सोकावलेली 

ओकाबोकेपणा

पर्यावरणाला सुटेबल करत 

आत्मदंग दंगा करत 

एकमेकात घालत पिंगा 

डोळ्याचा अंगार

सिग्रेटीसारखा

विझवत

एकमेकांच्या देशांशी राख करत

देहाच्या ash ट्रे मध्ये 

वासना पिसाळळलेली 

आयाळी केसांच्या कुरवाळत

मोकाट

अफाट

ताठ 

लाटा झेलत

 समुद्रांना बोटावर नाचवत

बेटे निर्माण करत 

पर्वत करवतीने कापत झपाझप 

पायांनी पाशवी टाप देत

टायप्त

तापत 

तापी आणि नर्मदा 

डोंगर आणि धबधाबा

धगीचा पिसारा 

निखाऱ्यांचा पिसारा 

आगीची पिसं काढत 

इमारतीमागून इमारती सर करत 

उघडे 

नागडे 

वॉचमन लाथाडत 

चुकवून किल्ल्या मिळवत 

कैदखाने गिळत 

एक संभोग दोन संभोग 

लागलेली पिसे 

फाटलेले खिसे 

खजिने ओतत 

कुणाची पर्वा 

कशाची पर्वा 

फक्त आज ताज माज 

नितळ खाज 

गाज

जिला गन्ज चढत नाही 

धातू प्लास्टिकपेक्षा लवचिक 

वाटेल ते निर्माण करणारा 

घेत देत 

त्वचा वापरणारा 

त्वचा संपवणारा 

कसले अंतर 

फक्त अंत 

एकमेकात 

आणि पुनर्जन्म 

पुन्हा पुन्हा 

परत परत 

मरत मरत 

झोंबी 

झोंबाझोंबी 

शेत नांगरत 

स्वतःत सुफळ 

सापळे उडून गेलेले 

समाज राखरांगोळी झालेले 

फक्त दोघे 

आणि दोघांनी केलेले उठाव 

ठाव घेणारे 

चॅनेल : ज्ञ  , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरींजमधील चँनेल ज्ञ लिव्ह इन लिव्ह आउट ह्या काव्यफाईलीतून )